पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डी मार्ट मधले ते ऑयल नका वापरू हो.
भारतातले सफोला सुद्धा चालेल. आवडत असेल तर लोणी सुद्धा छान लागते.

(माझे मत). मी केक लोणीच वापरून करते.

मला गुजराथी लोक ज्वारी-बाजरीच्या पिठाचे वाफवून मुटके/मुठीये करतात त्याची रेसिपी मायबोलीवर कोणी टाकली असेल तर हवी आहे. रसिया मुठिये मिळाले ते नको आहेत, मुटकुळ्याही मिळाल्या त्याही नको आहेत.

रेसिपी नसेल तर इथेच कोणी तरी ते कसे करतात, काय काय घालतात ते सांगा कृपया.

नुसत्या ज्वारी-बाजरीच्या पिठाच्या मुठिया माहित नाही. पण पिठात किसलेला दुधी किंवा मेथी किंवा इतर कोणती भाजी घालून - मीठ, तिखट, तीळ ओवा हळद घालून रोल वाफवायचे.(ढोकळ्यासारखे शिट्टी काडून) कापून फोडणी द्यायची.

नुस्त्या बाजरीच्या पिठाच्या मी.ति.ती. घालून थापून छोट्या छोट्या पु-या करतात. त्या पण मस्त लागतात. तळायला जास्त तेल लागत नाही. अन चव छान येते. तिखट थोडे जास्त घालतात. ह्या पु-या विकत ही मिळतात.

शर्मिला, मी तरला दलालच्या कृतीने करते, खूप छान होतात. गूगलमधे नुसतं मुठीया लिहिलं की तरला दलालचीच लिंक पहिली येते.

आले लसूण आवडत असल्यास घालता येईल. तसेच कोथिंबिर, ति. च्या ऐवजी हि.मी. Happy

कणीक-रव्याच्या मुठियापेक्षा हे जास्त चविष्ट लागतात. यात थोडी कणीक घातली तरी चालते.

ओके. ही लिंक मिळालीय >>> http://www.tarladalal.com/Doodhi-Muthia-(-Gujarati-Recipe)-553r

एक ही सुद्धा इंटरेस्टींग मिळाली >> http://www.archanaskitchen.com/indian-recipes/breakfast-tiffins/1029-doo...

फक्त मी यात सोडा घालणार नाही, आणि ज्वारीचं पीठ अ‍ॅड करणार (संपवायचं आहे).

अजून काही ज्वारी, नाचणीच्या पिठाच्या रेसिपी माहीतेय का? भाकरी सोडून. धिरडी सोडून.

नाचणीच्या पिठाचे आलू पराठे मस्त होतात. दोन वाट्या नाचणीच्या पीठाला दोन चमचे तांदुळाचं पीठ घालून कणकेसारखं तेल-मीठ-पाणी घालून भिजवायचं. त्याचे उंडे करून बटाट्याचं सारण भरून पराठे लाटून, भाजून गट्टम करायचे.

मी गव्हाची कणीक, चण्याचं पीठं, ज्वारी-नाचणीचं पीठ+ दुधी-गाजर किस+ हिरवी मिरची-लसूण-कोथिंबीर ठेचा+ ओवा+ थोडं दही+ हळद-हिंग-मीठ घालून थालिपीठापेक्षा थोडं सैल भिजवलं अणि वाफवायच्या जाळीच्या ताटल्यांवर सांडग्यांपेक्षा थोड्या लांबट आकाराचे मुठीये घालून २० मिनिट वाफवले. मग तेलावर मोहोरी, तीळ, कढीपत्ता घातलेल्या फोडणीत परतले. अप्रतिम चवीचे खमंग आणि पौष्टीक मुठीये तयार.

सर्वांना धन्यवाद.

सिंडरेला हो. पण मला यावेळी ज्वारी-नाचणीचं पीठ संपवायचं होतं.

मंजुडी, नाचणीच्या पीठाचे आलूपराठे करणार.

नारळाच्या दुधाचा टेट्रा पॅक मिळाला म्हणून घेवून आले पण सोलकढी करायला घरात आमसुलं नाहीत आणि आगळ पण नाहीये. इथे आमसुलं तर कधी मिळणारही नाहीत. पॅकमधलं नारळाचं दुध वापरुन काय करता येईल? शक्यतो तिखट पदार्थ. गोड संपत नाही घरात. (कोल्हापुरी पांढरा रस्सा करावा म्हणून लालुची रेसेपी शोधली तर त्यात तिने कॅनमधलं नारळाचं दुध अजिब्बात वापरु नका. सुकं खोबरं वापरा अं लिहिलंय म्हणून तो ऑप्शनपण बंद झाला)

उद्या सकाळी ज्वारीचं पीठ आणि भाजणी (यातलं किमान एकतरी) पोचेल इथे. नाचणीचं पीठ आहेच घरात. येत्या आठवड्यात मुठिये करून बघण्यात येतील Happy

नाचणीच्या पिठाचे आलूपराठे ऐकून मस्त वाटताहेत, पण आलूपराठे करण्याइतकं (म्हणजे सारण भरलेले उंडे धडधाकट लाटण्याएवढं) कौशल्य अंगात आहे की नाही माहित नाही Uhoh

थाई रेड करी किंवा ग्रीन करी करता येउ शकेल ...."Real Thai" branch च्या रेड करी किंवा ग्रीन करी पेस्ट मिळतात super market or local grocery shop madhye. आप्ल्या आवडीच्या मिक्ष व्हेज (मी कांदा, बटाटा, छोटी वांगी, बीन्स, मश्रूम, सिमला मिर्ची, गाजर वापर्ते) + तेल+ रेडीमेड मसला. पाकिटावर कृती लिहिली आहे. तेलावर भाज्या परतून त्यात मसाला घालोन, भाज्या बुडतीम इतपत पाणी घालून शिजवायचे... भाज्या बोतचेप्या शिजल्या कि नारलाचे दूध घालून २ मि ठेवायचे... दाण्याचे कूट घालून गॅस बन्द... गरम भात किंवा रेडीमेड केरला परोठ्या बरोबर छान लागते... लछा पराठा पन चालेल.

हि एक खालिल लिन्क बघत हे तेल न घातलेल्या जाड डोश्याबरोबर छान लागते.

http://www.syvum.com/cgi/online/serve.cgi/recipes/srcpv6.tdf?0

थाई करी... लास्ट ऑप्शन म्हणून ठेवते. तितकीशी आवडत नाही आमच्या घरात. (मला चालते, नवरा आणि पोरगा हातही लावत नाहीत) पॅक घेताना सोलकढी किंवा पांढरा रस्सा हेच डोक्यात होतं. (त्यात हे दोन्ही पदार्थ २-४ वर्षात कधीतरी एकदा खायला मिळतात. Sad )

अल्पना, टोमॅटोचे सूप, सार यात घालता येईल. कर्माची फळे, अननसाचे सांबारे, आंब्याची कढी करता येईल. रस्साभाजी, बिरडे इ. प्रकारात घालता येईल. चिंच वापरुन कढी करता येईल.

अल्पना, मुगाचं बिरडं कर Happy त्यातली सालं काढायची स्टेप गाळलीस तर पटकन होतं.

वरदा, आलु पराठे करायला कौशल्य लागत नाही असा स्वानुभव आहे. पराठा फुटतोय असं वाटलं की लाटायला थांबायचं. जाड झाले तर उत्तर भारतीयांमध्ये असेच करतात पराठे असं म्हणायचं . पातळ झाले तर मला नै बै आवडत ते उत्तर भारतीयांसारखे जाड पराठे असं म्हणायचं Proud

सिंडे, तुझी पोस्ट मननीय आहे Proud
तुझ्या भरवशावर पराठे लाटून बघण्यात येतील. पण आमच्याकडच्या उकाड्यातून एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली/खूप दणकून पाऊस पडला/ मला तेव्हा उत्साह असला की मगच

अल्पना तुम्ही श्रिम्प खाता का? असेल तर त्याचा पुलाव्,खिचडी इ.इ. मध्ये अर्ध पाणी, अर्ध नादु. घालायचं. अफाट लागतं.
पनीरबिनीरच्या राइस डीशमध्ये ते तसं लागेल का माहित नाही पण फक्त व्हेजिच खायचं असेल तर व्हेरियेशन म्हणून ट्राय करून पाहायला हरकत नाही.

दुधीची भाजी , हिरच्या मिरचीचे वाटण घालून नारळाच्या दुधात शिजवायची. सुरेख लागते
मिक्स भाज्या , लाल सुक्या मिरचीची फोडणी आणि नारळाचे दुधात शिजवून केरळी मिक्स व्हेज छान होते.
सायोच्या विपूत पण तिची एक चांगली रेसीपी आहे.

म्हंजे आता विपौड्या मारायच्या. Wink मला माझ्याकडे पण थोडं उरलेलं नादु आहे ते आठवलं.

कुणीतरी विपुरेसिपीज बाहेर काढायचं पुण्यकर्म करणार का? मं़जुडी तू नोट करतेयस नं Wink

ट्रेकींग साठी १. नेहमीचा मेथांबा . आंबट तिखट आणि गोड असल्यामुळे पोळी ,भाकरी अथवा पराठ्यांबरोबर छान लागतो .लगेच पावसाळी सहलीला वापरता येतो .यावेळी सर्पण मिळत नाही आणि तयार पदार्थ न्यावे लागतात .२. रवा ,उडिद डाळ ,मीठ आणि सुक्या लाल मिरच्या एकत्र तेलावर खमंग भाजून अॅल्युमियम कोटिँग असलेल्या पिशवीत ( चहा पाउडर अथवा बिस्किटाची येते ती) ठेऊन न्यावा .जागेवर एका भांड्यात चिरलेला कांदा टोमेटो टाकून दीडपट पाण्यात शिजवला की उपमा तयार होतो .३.लाह्याच्या पिठात साध्या खजुराचे बिया काढून तुकडे मिसळून एका डब्यात ठेवावे .गरज लागेल त्यावेळी अर्धा कपाला दोन चमचे नेस्लेची दुध पाउडर मिसळून फक्त पाणी घालून कालवले की छान आहार तयार होतो .दूरच्या रेल्वे प्रवासात ,लहान मुलांसाठी आणि उपासालाही उपयोगी .४. तांदळाच्या पिठाचे लाडू आठ दिवस टिकतात ,अॅसिडटि होत नाही .

Pages