Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिन्कि
पिन्कि http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46075.html?1135249025
इथे पहा.
या पानावर शोध या शब्दाखाली जी चौकट आहे तिथे कच्च्या केळ्याची भाजी, असे टाईप करुन. एंटर दाबले कि जून्या पाककृती दिसतात. ( हा पर्याय कुठल्याही जून्या लेखनासाठी वापरता येतो.)
पिन्कि कच्ची केळी सालासकट
पिन्कि कच्ची केळी सालासकट कुकर मध्ये उकडून घ्या . (२/३ शिट्या) . मग साले काढून बटाट्यावड्याच्या भाजी सारखी भाजी करा. मस्त होते.
गेल्या काही दिवसात मी घरी दही
गेल्या काही दिवसात मी घरी दही लावायचे २-३ अटेंप्ट केले.. विविध पद्धतीने..
पण लागतच नाहिये, काय चुकतंय काही कळत नाहिये. 
काही कळत नाहिये.
दिनेशनी सांगितल्याप्रमाणे बरणी गरम पाण्याने धुवून पाहिली. दूध किंचित कोमट करून दही लावून पाहिलं. त्याला तार आली. दुसर्यांदा बरणी गरम पाण्याने धूवून मग कोमट दूधाला दही लावलं.. दही लागलं, फ्रिजात ठेवलं दुसर्या दिवशी तार आली..
दक्षे, दूध खराब आहे.
दक्षे, दूध खराब आहे. पावडरच्या दूधाला अशी तार येत असते !
तार आलेल्या दह्याचे ताक चांगले होते पण तरी मनात शंका राहतेच.
सेम हिअर दक्षिणा. दही नीट
सेम हिअर दक्षिणा.
दही नीट विरजलं गेलं तरी दुसर्या दिसशीच फ्रिजमधल्या दह्याला तार येते. दरवेळी बाजारातून नविन चांगलं दही आणून त्याचं विरजण लावून बघितलंय. तरी तेच.
आणि लोणी काढण्यासाठी ठेवलेल्या सायीला मात्र चांगलं विरजण लागतंय. पण दुधाचं दही होताना गडबड.
अमूलचं फुल क्रिम दुध घेतेय
अमूलचं फुल क्रिम दुध घेतेय मी. आणि आज आलेल्या दुधाला दुसर्या दिवशी सकाळी विरजण लावतेय. जवळपास आठवडाभर प्रयत्न केल्यावर परवा चांगलं दही लागलं होतं.
पूर्वी कधीच दही न लागळ्याचा प्रश्न आला नव्हता, अगदी थंडीमध्ये सुद्धा.
अल्पना आणि दक्षिणा,
अल्पना आणि दक्षिणा, उत्सुकतेपोटी एक प्रश्न: दूध पहिल्यांदा तापवल्यापासून किती वेळाने तुम्ही दह्यासाठी विरजताय? ते दूध मधे किती वेळा उकळले जाते?
दक्षे विरजन कुठले वापरतेस? ते
दक्षे विरजन कुठले वापरतेस? ते स्पुर्ती , अमुलचे दही मिळते त्याचे नाही ना वापरत? त्यामुळे पण हे असे होते :स्वानुभवः
जवळपासच्या डेअरीतुन थोडे ( १० रु ) दही घेउन खालील प्रमाने लावुन पहा
१] म्हशीचे दुध उकळी आली की गॅस बंद कर
२] भांडे गार पाण्याच्या भांड्यात ठेउन दुध कोमट होउ दे
३] हाताला सोसवेल एव्हडे कोमट झाले की प्लॅस्टीकच्या / टप्परवेररच्या ड्ब्यात विरजन (छोटा चमचाभर ) घालुन झाकन लावुन रात्रभर राहु देत
सकाळि मस्त कवडि दही तयार.
मी सहसा दुध पहिल्यांदा
मी सहसा दुध पहिल्यांदा तापल्यावर २०-२१ तासांनी विरजण लावते. किमान दोन वेळा तरी दुध उकळलं जातं आणि एकदा उकळल्यावर कोमट झालं की लगेच फ्रिझ मध्येच असतं दुध.
मी दुध पहिल्यांदा उकळल्यावर १०-१२ तासांनी विरजण लावून पण बघितलं. पण त्यावेळीसुद्धा दुसर्या दिवशी दह्याला तार आली होती.
अल्पना, १) विरजण बदलून
अल्पना,
१) विरजण बदलून बघ.
२) दूध पहिल्यांदा उकळल्यावर जरा कोमट झालं की विरजण लावून बघ.
३) विरजण लावलंस की ते भांडं बंद मायक्रोवेवमधे किंवा कॅसरोलच्या डब्यात ठेवून दे, बाहेर हवेवर ठेवू नकोस.
मंजूडे प्रामाणिकपणे मी दूध
मंजूडे प्रामाणिकपणे मी दूध आणल्यावर एकदाच तापवते संपेपर्यंत. मला एक लिटर दूध किमान ४-५ दिवस जाते. मी चितळे फुल क्रिम एक लिटर आणि गायीचं एक लिटर असं २ लिटर घेते. दही गायीच्या दुधाचंच लावते.
आता तु हा प्रश्न विचारल्यावर माझी उत्सुकता ताणली आहे.
हमखास दही लागण्यासाठी हमखास
हमखास दही लागण्यासाठी हमखास टिपा असा वेगळा बाफ हवाय आता! वर्षा_म तू करतेस का सुरू? तुझ्या ह्याच टिपा हेडरवर ठेवू शकतो.
पौ तै, यु सु यु सां - ३ हवाय
पौ तै, यु सु यु सां - ३ हवाय
दिनेश मी पावडरीचं दूध नाही
दिनेश मी पावडरीचं दूध नाही वापरत. यापुर्वी मी घरी लावलेलं दही किती सुरेख लागायचं एखाद वेळेस बाहेर राहिलं तरिही आंबट व्हायचं नाही. आता हे तार प्रकरण प्रचंड छळतंय.
हो, करते सुरू आता ह्या बाफवर
हो, करते सुरू
आता ह्या बाफवर लिहू नका. तिसरा धागा सुरू करते आहे..
दक्षे, नजर लागलेय दह्याला..
दक्षे, नजर लागलेय दह्याला..
हादग्याची फुलं मिळाली एका
हादग्याची फुलं मिळाली एका शेतकरी बाईकडे.... गावाकडून शहरात शेतातली भाजी विकायला येतात. त्यांच्याकडेच मिळतात अशा दुर्मिळ भाज्या..
त्याची पीठ पेरून भाजी केली. साधारण पितॄपक्ष आणि नवरात्रीत मिळतात ही फुले.
आता ह्या बाफवर लिहू नका.
आता ह्या बाफवर लिहू नका. तिसरा धागा सुरू करते आहे..
>>>
हा धागा प्रतिसादासाठी बंद करा की मग!
हादग्याची फुलं म्हणजे काय??
हादग्याची फुलं म्हणजे काय??
हा धागा प्रतिसादासाठी बंद करा
हा धागा प्रतिसादासाठी बंद करा की मग!>>>> करतील की निंबुडा.
तिसरा धागा आलाय का? मला
तिसरा धागा आलाय का?
मला प्रश्न आलाय
पिकलेल्या पेरुन्चे काय करता
पिकलेल्या पेरुन्चे काय करता येइल? (तिखट-मीठ लावुन खाण्याव्यतिरिक्त ;-))
रायतं, कोशिंबिर आणि जाम. माझी
रायतं, कोशिंबिर आणि जाम. माझी पसंती जामला. कोणी कॅथॉलिक फ्रेन्ड असेल तर त्यांच्याकडून पेरुची ख्रिसमस स्पेशल जबरी रेसिपी विचारुन घ्या. मला नाव माहीत नाही.
शर्मिला जामची रेसिपि द्याल का
शर्मिला जामची रेसिपि द्याल का प्लीज?
युक्ती सुचवा युक्ती सांगाचा
युक्ती सुचवा युक्ती सांगाचा चौथा धागा आहे, तिकडे आपल्या समस्या मांडाव्यात.
(आणि त्या समस्यांवर युक्तीही तिकडेच सुचवावी)
पिकलेल्या पेरुन्चे काय करता
पिकलेल्या पेरुन्चे काय करता येइल?
<<
भाजी करतात. छान लागते गोड-आंबट-तिखट, पोळीसोबत. बियांसकट वा बिया काढून करायची, ते बिया किती कडक आहेत, व आपल्या दातांची आवड, त्यावर ठरवावे.
माफ करा वै, रेसिपी काही मला
माफ करा वै, रेसिपी काही मला देता यायची नाही. मी जाम खाल्ला आहे, बनवला नाही.
पिकलेल्या पेरुंचे सरबतही करता येते (मी केलेले नाही, तेव्हा रे.दे.या.ना.)
पंचामृत. इब्लिसांनी वर लिहिली
पंचामृत. इब्लिसांनी वर लिहिली आहे त्याप्रमाणे भाजी. मस्त लागते.
पेरूची मेथांब्यासारखी रेस्पी
पेरूची मेथांब्यासारखी रेस्पी - जीरं, मोहोरी, मेथी, हळद, लाल तिखट, गूळ, मीठ घालून भाजी करतात. फ्रीजात टिकते आठवडाभर. मस्त चव असते.
अरे देवा...कुणीतरी मंजुडी
अरे देवा...कुणीतरी मंजुडी यांच्या सुचनेकडॅ लक्ष द्या की
Pages