Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षे, ओट्स मिक्सरवर बारीक
दक्षे, ओट्स मिक्सरवर बारीक करुन घे आणि ते पीठ रोजच्या पोळीच्या/पराठ्याच्या पिठात २ चमचे मिक्स कर. मी तर वाटी / अर्धीवाटी ओटस आयत्यावेळेस उकळत्या पाण्यात भिजवते आणि तो मऊ लगदा पोळी / पराठ्याच्या कणकेत कालवते. किंवा मग मफिन्स, बिस्किट्स, धिरडी यात खपवते. ओट्स चे गुणधर्म बघता ते थोडे तरी खाल्ले जावेत ही त्यामागची सदिच्छा! नाहीतर आमच्याकडे ओट्स ला माझ्याशिवाय कोणी वाली नाही
दुधात शिजवून खातात ओट्स.
दुधात शिजवून खातात ओट्स. पौष्टिक न्याहारी होते. त्यात मध, फळं घालून मस्त लागते>+१
आवडत असेल तर शिजवताना त्यात ओल्या नारळाचा किस, गुळ, वेलची घालू शकतेस, +सुका मेवा, मनुके...
घ्या, म्हणजे गुळ ,खोबर,, सुका
घ्या, म्हणजे गुळ ,खोबर,, सुका मेवा खाऊन, दक्षेचे वजन वाढायची सोय झाली !
दिनेशदा, (वजनावरून आठवले)
दिनेशदा, (वजनावरून आठवले) कृपया कमी तेलातल्या उंदिओची पाककृती टाका लवकर....मी कधीपासून वाट बघते आहे.
राहिलीच कि, उद्या विपू करतो !
राहिलीच कि, उद्या विपू करतो !
दक्षिणा ताकातले ओट्सही चांगले
दक्षिणा ताकातले ओट्सही चांगले लागतात. ओट्स बुडून एक पेर वर येईल एव्हढे ताक, चमचाभर जिरे, मीठ,साखर घालुन शिजव ५-७ मिनिट. हवं तर मिरची,कोथिंबीर
थँक्स सगळ्यांना.. अवल ताक
थँक्स सगळ्यांना..
अवल ताक घालून शिजवायचे ओट्स? किती वेळ?
दक्षिणा, दिनेशदा नी ओट्सची
दक्षिणा, दिनेशदा नी ओट्सची धिरडि लिहिली आहेत ना, एकदम मस्त, काहिहि खटाटोप नाहि.
दक्षे नीट वाच की :रागः
दक्षे नीट वाच की :रागः लिव्हलय की ५-७ मिनिटं
जगातले सगळे प्रश्न दक्षीलाच
जगातले सगळे प्रश्न दक्षीलाच कसे पडतात हा मला पडलेला मोठ्ठा प्रश्न आहे

लाजो अन तेही नको त्या
लाजो
अन तेही नको त्या ठिकाणी. दक्षे वाचतेयस ना ? :काडी:
घरात २ किलो खजुर सिरप आहे.
घरात २ किलो खजुर सिरप आहे. त्याचे काय करता येईल? पोळिला लावुन पाहिला पण नाहि आवडला.
चिंच खजून चटणी भेळ इ.साठी,
चिंच खजून चटणी भेळ इ.साठी, दुधातून, आटवून खव्यासह वड्या. पण २ किलो म्हणजे जरा जास्तीच आहे खपवायला
मामींच्या पद्धतीने फोडणीचे
मामींच्या पद्धतीने फोडणीचे ओटमील पण करता येईल - मी हि मि, लसूण, जिरं फोडणी करते किंवा कधी हि मि ,कढीपत्ता, उ डाळ, आलं अशी फोडणी करते. त्यावर ओटमील परतून घ्यायचं, मग पाणी घालून शिजवायचं . खाताना वरतून लो फॅट दही किंवा ताक मिसळून खायचं.
ओट्स चे फोटो टाकणार का कुणी?
ओट्स चे फोटो टाकणार का कुणी? काही पाकृ मध्ये रोल्ड ओट्स असा प्रकार ऐकला आहे. माझी आई मला व्हीटी स्टेशनच्या बाहेरील एका दुकानातून ओट्स चे पाकिट आणून देते. मी तरी ताकात रव्याबरोबर भिजवून धिरडी हा प्रकारच ट्राय केलाय आता पर्यंत सक्सेसफुली. खीर बनवायचा प्रयत्न केला पण लगदा झाला व काही चवही आली नाही.
यात दिसतायत ते ओट्स...
यात दिसतायत ते ओट्स...
मग मला वाटतं मी आणते ते ही
मग मला वाटतं मी आणते ते ही असेच आहेत. फक्त इतके पसरट चपटे नाहीत. जाडे पोहे कसे दिसतात तसे लांबट आहेत आणि थोडे ब्राऊनिश कलरचे आहेत, माझ्याकडे जे ओट्स आहेत ते!
गुगल इमेजेस वर सर्च कर.... तु
गुगल इमेजेस वर सर्च कर.... तु म्हणतेस ते अख्खे ओट्स असावेत. मी दिलेत ते रोल्ड क्विक कुकिंग ओट्स आहेत.
लुज ओटस मिळतात का माहित नाही.
लुज ओटस मिळतात का माहित नाही. फॉरेन ब्रॅन्डस महाग असतात, पण हल्ली सफोला ( सेम तोच तो आपला आपला तेलाचा ब्रँड) त्यांनी पण मार्केटमधे ओटस आणले आहेत. ते क्विक कुकिंग आहेत आणि स्वस्तही. याचा ताकातला उपमा (मामी रेसिपी) किंवा पॉरिज मस्त होतं.
क्वेकर ओट्स मिळतात सर्रास,
क्वेकर ओट्स मिळतात सर्रास, केलॉग्जचेही. सफोलाही. सर्व क्विक कुकिंग ओट्सच आहेत.
क्वेकर ओट्स सर्वात बरे.
क्वेकर ओट्स सर्वात बरे.
जाडे पोहे कसे दिसतात तसे
जाडे पोहे कसे दिसतात तसे लांबट आहेत आणि थोडे ब्राऊनिश कलरचे आहेत, माझ्याकडे जे ओट्स आहेत ते!>> मग ते ओटस
शिजायला जास्त वेळ लागेल. माझ्याकडे स्टिल कट ओटस आहेत (ते लांबट नाहीत, कणी सारखे दिसतात) त्याला शिजायला कमीत कमी ३० मि. लागतात.
नेट वरून..How to turn Rolled Oats into Instant Oats: Chop the rolled oats up in your food processor or blender so that they're smaller, more granulated and the consistency of instant oats.
ओट्सना स्वतःची अशी काहिही चव
ओट्सना स्वतःची अशी काहिही चव नसते, त्यामूळे आपल्या घश्याखाली ते उतरत नाहीत. म्हणून त्यात गोड / तिखट काहीतरी घालावेच लागते. पण तरीही ते खावेत. तब्येतीला चांगले.
भारतात मोठ्या ऊभट बरणीत, ओटस मिळतात. स्वस्तही असतात ते.
ओटसबरोबर राजगिर्याच्या लाह्या, भोपळ्याच्या सोललेल्या बिया ( घरी सोलल्या तर उत्तम आणि स्वस्तही ) मनुका, सुकी अंजीरे, अळशी, तीळ, ओवा ( शक्य असल्यास बाळशेपाही ) खजूर असे न्याहारीत असावे.
एकान्कडे जेवायला जायचे आहे.
एकान्कडे जेवायला जायचे आहे. वाईन न्यावी असा विचार आहे. ती (बाट्ली) देताना कशी देतात? म्हण्जे पिशवीत घालून. की डायरेक्ट हातात? बरोबर अजून काही द्यायचे असते का? डिनरच्या वेळी व्हाईट वाईन गिफ्ट केली तर चालते का?
मला कच्च्या केळ्यांची भाजी
मला कच्च्या केळ्यांची भाजी करायची आहे, plz कशी करायची ते सांगा ना? प्रश्न कुठे post करायचे हे माहीत नसल्याने येथे विचारत आहे. धन्यवाद
मला कच्च्या केळ्यांची भाजी
मला कच्च्या केळ्यांची भाजी करायची आहे, plz कशी करायची ते सांगा ना? प्रश्न कुठे post करायचे हे माहीत नसल्याने येथे विचारत आहे. धन्यवाद
मला कच्च्या केळ्यांची भाजी
मला कच्च्या केळ्यांची भाजी करायची आहे, plz कशी करायची ते सांगा ना? प्रश्न कुठे post करायचे हे माहीत नसल्याने येथे विचारत आहे. धन्यवाद
धनश्री, व्हाईट वाईन न्यायला
धनश्री, व्हाईट वाईन न्यायला प्रॉब्लेम नाही. वाईन जिथून घ्याल तिथेच त्यांना रॅप करुन द्यायला सांगू शकता.
मी मागे फॅब इंडियातून वाईनकरता बॅग घेतल्या होत्या.
सायो +१ जिथून वाईन घ्याल
सायो +१
जिथून वाईन घ्याल तिथेच त्याच्यासाठी सुंदर गिफ्ट बॅग्स मिळतात.
Generally, you give the wine
Generally, you give the wine bottle in a bag - you can get all kinds of wine bags -Fancy ones made of silk and lace can cost as much as a decent bottle of wine:)
You can nice paper bags at party supply/ gift racking sections.
If your hosts are serious about wine-and it's a formal dinner, they may not serve the wine right away. This is acceptable. At more casual events, it is acceptable to serve the wine right away . If you want the hosts to save the wine for themselves, please mention that as you hand it to them.
If you think they might serve it try to chill it before hand.
Hope this helps
Pages