युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्चना, किती तासांचा प्रवास आहे. कुलरमधे कोल्ड पॅक ठेवून पराठे/ठेपले/नान वगैरे नेता आल्यास वरे पडेल. आधी फ्रीज केलेले पदार्थ वर खाली कोल्ड पॅकचे लेयर असे मी ८ तासाच्या प्रवासात नेले होते. नीट राहीले. फॅट फ्री रिफ्राईड बिन्स चे कॅन्स नेल्यास टॅको करता येतील.

आर्चना, तुम्ही केबीन मधे राहाणार असाल तर तिथे रेफ्री, ओव्हन, मावे, कूकींग रेंज सगळं असेल. एकदा खात्री करुन घ्या.

भेळ, पाणीपुरीची तयारी नेता येईल. उसळी छान फ्रीज होतात. मटकीची उसळ फ्रीज करुन त्याबरोबरच इतर मिसळीची तयारी पण नेता येईल. राइस कूकर, स्लो कूकर , छोटा ब्लेंडर( मॅ. बु. ) नेता येईल जर ड्राईव्ह करुन जाणार असाल तर. (आणि अर्थातच केबीन असेल तर.)

घरी मुलाची वाढदिवस पार्टी आहे..सधारण मोठे + छोटे असे १०० लोक असतील. निम्मे लोक शाकाहारी आहेत तर काहीना नॉन वेज शिवाय चालत नाही. बहुतेक सगळे बाहेरुनच मागवणार आहे पण २/३ छोटे प्रकार घरी करायचा विचार आहे. हा बेत कसा वाटतो -
अ‍ॅपेटायझर - मेलन, द्राक्ष फळे, सेलेरी नी बेबी गाजर विथ डिप (डिप घरी करेन), समोसे, ढोकळा (बाहेरुन), पन्हे (घरी)
मेन कोर्स - चिझ पिझ्झा, चिकन दम बिर्याणी, वेज मसाला राईस, नान (हे सगळे बाहेरुन), दोन भाज्या, ह्या घरी कराव्या असा विचार आहे, कोणत्या भाज्या आदल्या रात्री क्रुन ठेवता येतील? मटर पनीर आणी ?
गोडात केक आणी आईसक्रीम (घरी) आहे.

स्वाजो, छोले / कुर्मा स्टाईल भाज्या / दम आलू / ऊंधियो

नीधप, तांदळाची उकड, पोह्याची उकड, ज्वारी पीठाची उकड अगोदरच्या यादीत घालायची राहिली.
धिरडी, डोसे, घावनं (तयार पीठाची), इडली चटणी, इडली फ्राय (इन्स्टंट मिक्स पासून बनवलेल्या इडल्या)
सँडविच (तयार स्प्रेड्स वापरून किंवा दा कू ची दह्यातली चटणी / सॉस लोणची जाम वगैरे वापरून)
लाही पीठ तयार मिळतं. ते ताक / दही / दुधातून.
मेतकुटाचं दह्यातलं डांगर (कोणी कांदा चिरून देत असेल तर)
सुधारस, शिकरण (केळी / खरबूज) - पोळी. वरण भात तूप मीठ लिंबू.

(लिहून परत भूक लागायला लागली!!!)

यलोस्टोन मध्ये कुठे जाणार आहात ? सगळे मिळते. पण तयारी करून गेलेले चांगले. एक मोठा कुलर घ्यायचा, दोन पिशव्या बर्फ टाकायचं आणि मग आरामात फळं वगैरे टिकतात २ - ३ दिवस. तसेही कॅनियन विलेज, ओल्ड फेथफुल, मॅमथ अशा मोठ्या ठिकाणी कॅफिटेरिया आहेत आणि काही फार महाग नाही.

आम्ही दोन वर्ष तंबू ठोकून सुट्टीत मुक्काम केला होता. त्यातल्या एका वर्षी मस्त शेकोटीवर शिजवलं होतं सगळं पण दुसर्‍या वर्षी पाऊस होता मग कॅनियन च्या कॅफेटेरियात मस्त पास्ता खाल्ला.

पण सकाळी ब्रेकफास्ट साठी ब्रेड, सिरियल्स, एनर्जी बार्स, नुडल्स असे सगळे घेऊन जा. सिरियल्स, एनर्जी बार्स, हे हिंडताना पण खाता येतात.

देशी गोष्टी खाण्याऐवजी मस्त कँपिंगचा अनुभव घ्या. (थोडा तंदुरी मसाला न्या - मस्त ग्रील होतो)

अकु आणी मन्जुडी ला खरच पारितोषीक द्यायला हव, अकू ला जास्तीत जास्त आणी योग्य पर्याय सुचवल्याबद्द्दल आणी डी ला इनोव्हेटीव आयडीयाज बद्दल..

धन्यवाद मैत्रिणिन्नो . आम्ही ह्युस्टन हुन फ्लाय करून जाणार आहोत. त्यामुळे सामान अगदी मोजकेच न्यावे लगेल. बाकीची तयारी तिकडे गेल्यावर करणार.

प्राजक्ता Wink

स्वाजो, तुम्ही १०० माणसांसाठी भाज्या करण्याचा घाट घालताय त्याबद्दल तुमचं कौतुक आहे.
१०० माणसांसाठी घरी भाज्या करायच्या तर पनीर मसाला/ पनीर माखनी/ छोले/ पालक पनीर/ दम आलू इत्यादी भाज्यांशिवाय जास्त काही पर्याय नाहीत. ग्रेव्हीसाठीच्या कांदा टोमॅटोंव्यतिरिक्त भाज्यांची चिराचिरी नाही.

Happy स्वाजो २-३ म्हणता म्हणता ५-६ पदार्थ घरी करायचा घाट घालताय Happy
एवढ्या लोकांसाठी आईसक्रिम घरी करायचे म्हणजे तेवढी फ्रिझर स्पेस हवी.

एवढ्या लोकांसाठी आईसक्रिम घरी करायचे म्हणजे तेवढी फ्रिझर स्पेस हवी.>>>> Happy

माझ्या मनात पहिला विचार आला .

एवढ्या लोकाना पार्टीला बोलवायच म्हणजे घरी तेव्हडी स्पेस हवी Happy दिवा

Dhani+1. Aarchana, we too relied on cafeteria outside. We didn't get fridge either in cabin. But this was Grand Tetons national park. Please enquire about microwave, fridge,grill stuff before you go. Energy bars, chips, dips are good suggestions. Our stuff like puranpoli, thepalas are good snacking options.

माझ्या घरी तांदुळाचं पिठ खुप पडुन आहे..
काही वेगळ्या कारणासाठी आणल होत .. वापर नाही झाला..
काय करता येईल या पिठाच? लिन्क रेसेपी काय असेल तर सांगा प्लिज

मोदक, निवगर्या, उकड, आयते (घावन / धिरडी), रोजच्या पोळीसाठी कणीक भिजवताना थोडे तां. पीठ घाला, वरूनही लावायलाही तां.पीठ वापरा.

धन्यवाद प्राची..

<<निवगर्या:- हे काय?,
उकड, आयते (घावन / धिरडी), :- हे करताना नुसत पिठात पाणी घालुन करायला घायच की थोडा वेळ भिजवत ठेवावे लागेल पिठ??

तांदुळाच्या पीठात कांदा, मिरच्या कोथिंबिर बारिक चिरून मीठ वगैरे घालून इन्संट धिरडी करता येतात. मस्त होतात. पीठ अज्जिबात भिजत ठेवावं लागत नाही.

आयते करताना नुसते पाणी घालते मी, त्यात चवीनुसार मीठ, जिरे, कांदा, हि.मि., कोथिंबीर घालते आणि लगेच तव्यावर घालते.

तां. पीची तिखट- कांदा, मिरची घालून धिरडी होतात, तशीच गोडही धिरडी एकदम मस्त होतात. तां.पी मध्ये नारळाचं दूध (असेल तर), नाहीतर खोवलेला नारळ आणि गूळ आणि वेलदोडा घालायचा आणि धिरडी घालायची. त्याच पिठात काकडीही घालून काकडीची घावनं होतात. काकडीची गोडसर चव आवडायला हवी मात्र Happy

घरी चुकून जास्त केळी आणली गेली. सध्या आमरसाची चलती आहे. त्यामुळे शिकरण, सुधारस यांना कोण विचारणार नाही. केळी अॉलरेडी पिकलीयेत. उन्हाळ्यात पटकन काळवंडतायत. त्याचं काही चटपटीत (!) करता येईल का?

केळी मुरडून त्यात, रवा,तांदळाचे पीठ,गूळ मिसळून भजी करा त्याला 'उंबर' म्हणतात.मस्त लागतात.
केळ्याचे पंचामृत करता येईल.

केळी , रवा, दूध किंवा सढळ हाताने साय, गूळ, मीठ, ओलं खोबरं , बारीक चिरलेली हिरवी मिरची असं एकत्र करुन थालिपीठं लावायची. गुळाचे बारके बारके चंक्स असावेत , एकदम भुगा नको. खोबर्‍याच्या चकत्या घालता आल्या तर एकदम बेष्ट ...
भूक लागली

धन्यवाद मंजूडी Happy मटर पनीर आणी कसुरी मेथी छोले ठरलेय. माझा फ्रीझर बराच मोठा आहे आणी फ्रोझन प्रकार फारसे घरात नसल्याने तसा रिकामाच असतो. स्वस्ति, पार्टीसाठी पार्क शेल्टर बुक केलेय त्यामुळे जागेचा अजीबातच प्रश्न नाही.

आशू, आंबा-केळ्याची शिकरण खूप सुंदर लागते. आंब्याची कोय दुधात छान कुस्करून घ्यायची आणि त्यात आंबा-केळ्याचे तुकडे घालायचे. साखर घालायची गरज नाही, थंडगार खाताना अगदी ब्रम्हानंदी टाळीच!

Pages