युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेका, धन्यवाद!
ती सूचना नाही, विनंती आहे.
ज्यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून आपले घोडे पुढे दामटले त्यांना मराठी वाचता येत नाही असे मी समजते.

Proud

मन्ड्ळी माफ करा. माबो वर नवीन आहे. लक्शात नाही आले की हा लेटेस्ट धागा नाही. ज्यानी प्रतिसाद दिले त्यान्चे आभार.

तनु cif म्हणुन एक बाजारत मिळते...ते ट्राय कर.....क्रीम बेस मधे असते.. लाउन ठेवायच....आणि थोड्यावेळाने पुसुन..मग नेहेमी सारखं भांड घासुन टाकायच........
मी याने कमोड, बाथरूम, किचन चा ओटा आणि असले हट्टी चिकट डाग आसानीसे काढुन टाकते...

मला २० लोकांसाठी पुर्या करायच्या आहेत अंदाजे ८०-१०० पुर्या करेन पुरयांसाठी मला भरपूर वेळ लागतो
वेळ कसा वाचवता येईल सर्व स्वयंपाक पण मला एकटीलाच करायचा आहे

पुर्‍या त्रिकोनी चालणार असतील तर (इथे हॉटेल मध्ये असतात. आणि बरेच जण घरी कोणाला जेवायला बोलावल्यावर वैगरे पण करतात) मोठी पोळी लाटून सुरीने + चिन्हात कापायची एकदम ४ पुर्‍या होतात.
रोटी मेकर मध्ये पण पटापट होतात म्हणे.
बाकी इथे अजुन उपाय मिळतीलच. Happy

.

सुखी, अनुश्रीने सांगितले आहे तसंच पण गोल हव्या असल्यास शार्प कडा असलेली वाटी घ्यायची. आधी मोठी पोळी लाटून घ्यायची आणि वाटी तीवर दाबून पुर्‍या काढायच्या. एक दोन पेपर घ्यायचे, त्यावर थोडे पीठ शिंपडाय्चे. पुर्‍या एकमेकांना लागु न देता पेपरावर काढायच्या. खूप वेळ असेल तळायला, तर झाकून ठेवायच्या. कुणी तळून देणार असेल तर पटकन होइल. एकटीनेच लाटून तळायचे असेल तर एक-दोन घाणे निघतील एव्हढ्या पुर्‍या तयार ठेवून मग तळावे.

सुखी, कॉस्ट्को मधे लाटलेल्या चपात्या मिळतात. फ्रोझन सेक्शनमधे. त्या आणून, वर सांगितल्याप्रमाणे वाटीनी किंवा त्रिकोणी कापून, तळून पुर्‍या छान होतात.

बाप रे..एकटीने शंभर पुर्‍या..आणि वीस जणांसाठी स्वयंपाक? मला ऐकूनच दडपण आलं.

एका कलिगने दोन मोठ्या बिन बॅग भरुन कढीपत्ता दिला आहे.>. ती पाने टाकून देउन बीन बॅग मध्ये स्टायरोफोम चे गोळे भरून घ्या. अगदी आराम्शीर होते बसायला. गेम्स खेळायला इत्यादी. अदरवाइज पा नांची म स्त चट्णी होईल. सीमांचा रवा डोसा आहे त्यात आहे चटणी

पेरु, आमच्या ओळखीतल्या एक आज्जी कढीपत्त्याची पाने धुवून सुकवून, कोरडी करून एका मोठ्या परातीत पंच्याखाली झाकून उन्हात कुडकुडीत वाळवायच्या. अगदी कुरकुरीत होईपर्यंत. मग त्या पानांना एका घट्ट झाकण असलेल्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या. त्यांच्याकडे दर आठवड्याला त्या येणार्‍या-जाणार्‍यांसाठी व घरच्यांसाठी ताजा चिवडा करत असत त्यात अगदी सढळ हाताने त्या ही सुकवलेली कढीपत्त्याची पाने वापरायच्या.

इथे कढीपत्त्याची पाने सुकवून वापरण्याची कृती आहे.

चटणीचा पर्याय तर आहेच.

रोटी मेकर मध्ये पण पटापट होतात म्हणे.>>+१
मी आदल्या दिवशी करुन फ्रिजमधे ठेवते.
दुसर्‍यादिवशी पटापट तळायच्या.

सुकवुनच वापरावा लागेल. काल एक बॅग वाटुन संपवली. ठेवायचा कुठे हा खरचं मोठा प्रश्न आहे.
चटणी करुन पाहिली काल. छान झाली पण किती दिवस टिकते काय माहीत.

पुरणपोळी किंवा गुळपोळी करताना पातळ लाटली जावी म्हणून मैदा वापरतात. मला मैदा आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक वाटतो. गुलाबी रताळी उकडून मी नेहमी पिठात घालून पोळ्या करते -विशेषतः इकडे ताजे पीठ मिळत नाही आणि बर्याच चामट पोळ्या होतात म्हणून. रताळी किंवा बटरनट स्क्वाश उकडून पिठात मिसळला कि पोळ्या मउ होतात आणि भाजीपण खाल्ली जाते. या दोन्ही भाज्या इथे स्वस्त .

हेच रताळ्याचे पीठ मी पुरणपोळीला आणि गुळपोळीला वापरून बघितले, मस्त मऊ पोळ्या झाल्या आणि मैद्याची गरजही नाही पडली

कुकर मध्ये एका डब्यात ( वरच्या ) रताळी उकडून घेऊन त्यातच पीठ मिसळायचे - शक्य तेव्हडे कमी पाणी. मस्त मऊ पोळ्या होतात आणि मिश्र कार्ब पण मिळतात - मुलांच्या डब्यात अगदी उत्तम राहणारा पदार्थ

मला आधी करून ठेवता येतील किंवा सकाळी पटकन होतील असे हेल्दी नाश्ट्याचे पदार्थ सुचवाल का प्लीज. रोज फार पंचाईत पाडते. त्यात मुलीचे नखरे, नवरा व मुलीचे डबे आणि एक बाळ. सकाळी अगदी तारांबळ उडते.तसेच हेल्दी स्नॅक्स पण सांगा.

ती पाने टाकून देउन बीन बॅग मध्ये स्टायरोफोम चे गोळे भरून घ्या. अगदी आराम्शीर होते बसायला. गेम्स खेळायला इत्यादी.
<<<
अमा Lol
लै भारी!

Pages