Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आर्चना, दिनेशदांचा बाळाचा खाऊ
आर्चना, दिनेशदांचा बाळाचा खाऊ आणि नाश्ताचे पदार्थ असे दोन धागे आहेत.
धन्यवाद आरती. मी बघते शोधुन.
धन्यवाद आरती. मी बघते शोधुन.
तयार पदार्थांसाठीचा एक धागा
तयार पदार्थांसाठीचा एक धागा होता ना? 'बी' ने काढला होता. कुठे आहे तो?
मला तयार गहू पीठाची माहिती हवी होती, नेमका ब्रँड आठवत नव्हता. 'सात्विक' की काही तरी आहे बहुतेक.
कृपया माहिती द्याल का?
सकस ब्रँड आहे. अग्रज हाही एक
सकस ब्रँड आहे. अग्रज हाही एक ब्रँड आहे.
धन्यवाद
धन्यवाद
सकस ची पीठं सगळी चांगली आहेत
सकस ची पीठं सगळी चांगली आहेत पण त्यांच्या कणकेच्या पोळ्या काही नीट जमत नाहीत मला. त्यासाठी पौष्टिक बेस्ट आहे.
तो बी ने काढलेला धागा एकदम
तो बी ने काढलेला धागा एकदम कसा गायब झाला?:अओ: बी कुठाय रे तुझा तो धागा? नाव पण आठवेना त्याचे.
रंगासेठ पुण्यात कर्वेनगर
रंगासेठ पुण्यात कर्वेनगर मध्ये मनिषा भेळेकडून पुढे कर्वेनगरात जाताना डाव्या बाजूला कॉर्नरलाच (रस्त्याच्या) आस्वाद नावाचं दुकान आहे. तिथे त्यांची सिंहोर्+लोकवान सोयाबिन युक्त कणिक उत्तम आहे. छान होतात पोळ्या.
स्तुफ्फेद परथे करयल तोर्तिल्ल
स्तुफ्फेद परथे करयल तोर्तिल्ल प्रेस्स वपरते. विशेश्तह मूल अनि फ्लोवेर चे परथे करतन फरच सोयिचे पदते. आनि इतर कुथलेहि परथे/पुर्य छन होतत.
I use tortilla press for
I use tortilla press for making stuffed parathas, especially cauliflower and mooli paratha. They are difficult to roll out. so tortilla press works really well!
चांगली युक्ती आहे. कुठल्या
चांगली युक्ती आहे. कुठल्या ब्रँडचं प्रेस वापरता तुम्ही?
छान आहे धागा. माझ्या वॉलवर
छान आहे धागा.
माझ्या वॉलवर देखील थोडं फार या धर्तीचं लिखाण आहे.
केक करत होते. बॅटर मावेमधे
केक करत होते. बॅटर मावेमधे ठेवले आणि मावेचं सॉकेटच उडालं!
आता त्या बॅटरचे काय करु? एगलेस आहे.
खरं तर हा बिनमहत्तवाचा प्रश्न झाला. सॉकेट दुरुस्त होईल का? concealed wiring आहे.
कुकरची रिंग व वेट न लावता
कुकरची रिंग व वेट न लावता आतल्या रिंगवर ४५ मि. ठेवा
पाणी घालून की न घालता?
पाणी घालून की न घालता?
पाणी न घालता.
पाणी न घालता.
हम्म.. ठेवलाय कुकरमधे, बघु
हम्म.. ठेवलाय कुकरमधे, बघु आता.
सॉकेट दुरुस्त होईल.. जरी
सॉकेट दुरुस्त होईल.. जरी कन्सिल्ड असले तरी सॉकेट वरुन काढता येणारे असते..
काय झालयं माहितेय का.. सगळ्या
काय झालयं माहितेय का.. सगळ्या किचनमधेच अंधार झालाय.
कुठल्यातरी सेंट्रल पॉइन्टलाच शोर्ट सर्किट झालायं. बघु आता हा केक कितीत पडतो 
कुकर मधे ड्राय हिटींग प्लीज
कुकर मधे ड्राय हिटींग प्लीज करू नका. नंतर तो फुटायचे चान्सेस वाढतात. अॅल्युमिनियम्चे पातेले किंवा कढईत ते बंद होईल असे झाकण घालून त्यात ठेवा.
सुमेधा, मी पण नेहमीच हे सांगत
सुमेधा, मी पण नेहमीच हे सांगत असतो. कूकरचे भांडे या तपमानाला वापरण्यासाठी बनवलेले नसते. त्याचे आकारमान बदलू शकते वो तो नंतर योग्य तर्हेने ( कूकर म्हणून ) काम न करण्याची शक्यता असते.
कूकर कंपन्या आपल्या कूकबूक मधे असे आवर्जून लिहितात.
पण अनेक पुस्तकातूनच नव्हे तर प्रथितयश टिव्ही शेफ पण असे सुचवताना दिसतात
फार काही झालं नसेल, सर्किट
फार काही झालं नसेल, सर्किट ट्रीप झालं असेल. इलेक्ट्रिक panel मध्ये किचनचा स्वीच चेक करा आणि तो खाली आला असेल तर वर करा. नसेल येत तर तेवढा फ्युज बदला. वेगळं panel नसेल तर मेन फ्युज चेक करा, इतक्या सहज वायरिंग नाही जळणार.
आणि कुकरचा वाल्व्ह जवळ ठेवा, तो पण जाणारे थोड्या दिवसांनी. :D::दिवा:
धन्यवाद सगळ्यांचे सर्किट
धन्यवाद सगळ्यांचे

सर्किट ट्रीपच झालं होतं आणि स्विच वर केल्यावर सगळं सुरळीत झालं
केक शेवटी कुकरमधेच केला. मावेमधे अर्धवट झाला होता. त्यामुळे फार स्पॉन्जी नाही झाला पण ओके!
ऑरेगैनो म्हणजे नेमके काही
ऑरेगैनो म्हणजे नेमके काही वेगळे असते का वाळवुन सुकवलेली ओव्याची पाने असतात??? अमेज़न वरून इकडे (भारतात) गौर्मे हर्ब्स स्पाइस डील पिकल्स घेर्किन्स स्प्रैड्स वगैरे मागवणे ठीक राहील का?
मी कायम रेडीमेड तांदूळ पीठ
मी कायम रेडीमेड तांदूळ पीठ वापरते. पण यंदाच्या किराण्यामध्ये दोन किलो तांदूळ एक्स्ट्रा आलेत तर ते दळून घ्यावेत असा विचार चालू आहे. तांदूळ पीठ जास्त करून थालिपीठात आणि उकड वगैरे बनवण्यासाठी वापरलं जाईल.
तर ते तांदूळ पाण्यात धुवून उन्हात सुकवून मग दळून आणावेत का? ते पीठ लवकर खराब होइल का? किंवा तसेच कोरडे तांदूळ दळायला दिल्यास काय होइल?
कोरडे नाही. धूवून उन्हात
कोरडे नाही. धूवून उन्हात सुकवून दळून आणलेले पाहिलेले आहेत. पण सुकल्यावर भाजून मग दळतात का ते नाही माहीती...
तांदूळाच्या पिठाची पण विरी
तांदूळाच्या पिठाची पण विरी जाते. (ज्वारीसारखी) तेव्हा एकदम सगळे दळून आणण्यापेक्षा थोडे थोडे दळावेत.
आधी १ किलो नुसतेच दळून आण.
आधी १ किलो नुसतेच दळून आण. म्हणाजे न धुता वगैरे. फक्त दळण्याआधी नीट निवडून, पाखडून घे. न धुतलेल्या तांदळाची पिठी मिश्र पिठांच्या धिरड्यासाठी, रवा डोश्यात मिसळण्यासाठी किंवा भाकरीसाठी वापरते मी. तू अजून काही करत असशील तर चांगलंच आहे. आणि अगदी सपिटी चाळून घेतलं तर मोदकसद्धा केलेत मी. फक्त रंग शुभ्र नाही येत.
बाकीचा तांदूळ इडली-डोश्यात संपवता येईल. किंवा रुचिरा (आणि वेळ, उत्साह वगैरे
)असेल तर कुरडया वगैरे रेस्प्या बघ.
तांदुळ धुतल्यावर कधीही उन्हात
तांदुळ धुतल्यावर कधीही उन्हात वाळवू नयेत. ते नेहमी सावलीतच ( घरात) जुन्या चादरीवर वगैरे वाळवावेत. आरामात मस्त वाळतात. उन्हात वाळविलेल्या तांदळाच्या पिठाला एक प्रकारचा वास येतो. तांदुळ पीठ फ्रीज मध्ये खूप दिवस टिकते.
तसेच ही तु दळुन आणु शकतेस पण धुऊन घेतलेल्या तांदळाची पीठी अधिक हलकी होते तसेच धुतल्याचे ही समाधान मिळते.
थालीपीठ आणि उकड या साठीच
थालीपीठ आणि उकड या साठीच वापरणार असशील तर सगळे एकदम दळुन आणलेस तरी चालेल. या दोन्ही पदार्थांचा आणि वीरीचा तसाही काही संबंध नाही
तांदळाला पावडर वगैरे काही लावलेले नसेल तर न धुता दळुन आणलेले चालतात.
Pages