युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूधी/गाजर हलव्यात घालून पहा. हलवा शिजल्यावर मग त्यात तुकडे घालून चांगलं मिक्स करून एक वाफ आणल्यास चांगली लागू शकेल. असं दुसर्^या एका मिठाईच्या बाबतीत केलं होतं..कतलीवर प्रयोग करताना आधी थोड्या प्रमाणात करून पहा आणि कळवा Happy

काजु आयस्क्रिम / कुल्फी बनवा, मिल्कशेक मधे घाला, फळांच्या तुकड्यांवर कुसकरून घाला, मोदकाचे/करंजीचे सारण म्हणुन वापरा, केक मधे वापरा....

काजुकतली माझी ही अत्यंत आवडीची. तुमच्याकडे अशी काजुकतली राहते तरी कशी?
काजुकतलीचे काजुमोदक, काजु चॉकलेट, साखरेचा पक्का पाक करुन चिक्की केली तर?

माझी आई थंडीच्या दिवसांत कुठच्या कुठच्या चिक्क्यामध्ये थोडा थोडा डिंक फुलवून कुटून घालते. तसं करून पहा.

ए तुम्ही सारखं सारखं काजुकतली काजुकतली करू नका हं....इथे "तशी" मिळत नाही म्हणून जीव जातो Proud

कतली कतली काजू कतली... कत्तली...
वाईट्टं आहात सगळे... (मला भ्यंकर म्हंजे भ्यंकरच आवडते)
जे कय कराल त्याचं... त्याचा मला नैवेद्यं दखवून खा म्हणजे बाधणार नाही Happy

नीता, अजुन एक आयडिया... थंडाईमधे घाल... बदामाच्या ऐवजी... आता गरम व्हायला लागलच आहे नाहीतरी आपल्याकडे Happy

परवा केक केला. ओहन मधे ठेवला आणि लाईट गेले. ६ अंडी आणी पाव किलो लोणी असा मोठा केक होता. मग मोठे स्टीलचे पातेले गॅसवर मोठ्या आचेवर ३-४ मिनीट गरम केले. त्यात चोटे टेबलावर ठेवतो ते स्टिलचे स्टॅन्ड ठेवले. आणि केकचा टीन ठेवुन वर अ‍ॅल्युमिनीयमचे झाकण ठेवले. वेळ नाही पाहिली पण केक छान झाला. फक्त खाली थोडा करपला.. करपला म्हणजे काढुन टाकण्या एव्हडाही नाही.. पण काळा झाला.

मला सांगा की असे अचानक लाईट गेली / ओहन खराब झाले तर आणकी दुसरी काही पध्दत वापरता येते का?

वर्षे, झाला ना गॅसवर केक.. मस्तचं की गं Happy

प्रेशर कुकर मधे पण करतात ना केक??? अनुभवी लोकं सांगतिलच Happy

प्रेशर कुकर मधे पण करतात ना केक??? >> हो पण मी २-४ वेळा केला तेव्हा प्रत्येक वेळी कुकरचा वॉल्व गेला.. मग ती कटकत नको वाटते.. हे असे पातेल्यात ठेउन करण्याची ही दुसरी वेळ. आणि सगळ्यांचे म्हणणे.. केक छानच झाला चवीला Happy

कुकरमध्ये मंदाग्नीवर खाली वाळू किंवा खडेमीठ(ते उपलब्ध नसेल तर बारीक मीठ) याचा थर देऊन केक करायचा म्हणजे काही होत नाही.

रोजच्या वापरातील कुकरमधे ड्राय हीटींग करु नये असे मॅन्युअलमधे स्पष्ट लिहिले आहे. जुना मोडका कुकर असेल तर फक्त ह्याच कामासाठी तो ठेवला तर हरकत नाही.

हो. बरोबर सुमेधा. केकसाठी मी जुना अ‍ॅल्यूमिनीयमचा कुकर वापरते. अन गॅस मोठा करायचाच नाही. मिडीयम आकाराचा केक मंद विस्तवावर अर्ध्या तासात होतो. अन कुकरही खराब झालेला नाही. मक्याच्या लाह्या फोडून मात्र कुकर खराब होतो.. झालाय.. काळपट होतो आतून

सुमेधा, अगदी बरोबर.
कूकरची बॉडी आणि सेफ्टी व्हॉल्व ज्या धातूपासून बनवलेले असतात, ते जास्त तपमानाला वापरणे अयोग्य असते. कूकरमधे तळणही करु नये, तंदूरी रोटी देखील भाजू नये.
मी तर संजीव कपूरलादेखील तसे सूचवताना बघितलेय. ज्यांचे कार्यक्रम अनेक गृहिणी बघतात, त्यांनी असे चुकीचे संदेश देऊ नयेत, असे वाटते मला. ( पदार्थ झाल्यावर गॅस बंद करायची तत्परताही दिसत नाही, अनेकदा गॅस तसाच ढणाढणा, पेटताना दिसतो. अर्थात मी त्याचे कार्यक्रम बघून, बरीच वर्षे झाली.)

कुकरची बॉडी ड्राय हिटींग साठी बनवलेली नाही. ड्राय हिटींगमुळे ती कमकुवत होऊन नंतर कधीतरी कुकर फुटु शकतो त्यामुळे हे सुरक्षीततेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

निता, काजुकतली कुस्करून दूधाचा हबका दे ते पुरण कणकेत भरुन काजू पोळ्या/साटोर्‍या करु शकते.

माझ्याकडे एक ते दिड किलो ओटस आहेत. मी आजतागायत फक्त त्याचा उपमा करून खाल्ला आहे. दूधात शिजवून ही खातात ना? ते कसं लागतं ते मला माहीत नाही.

दक्षे गोड आवडत असेल तर इथे माबोवरच्या एका रेसिपीने स्नो बॉल्स करून बघ
असले मस्त होतात ना
आमच्या घरी पुर्वी कधीही आवर्जुन ओट्स आणले गेले नाहीत.. आता आणले जातात
पण ती रेसिपी बहिणीने शाळेतल्या एका स्पर्धेत केल्यानंतर तिच्या मैत्रिणी बर्‍याचदा घरी येतात आणि ते लाडू करून मागतात
चविष्ट ही आणि पौष्टिकही!
जेवणानंतर एक खायला हरकत नाही Happy

बर दुधात शिजवून खातात तोप्रकार मीही कधी खाल्ला नाही पण माझ्या हॉस्टेलवर खुप मुली खायच्या आणि म्हणे की आईसक्रिम सारखे लागतात..
खखोखाजा!
मला जरा उपम्याची रेसिपी सांग की

धन्यवाद रिया Happy मी लिहीलेली रेसिपी आहे ती- स्नो बॉल्स Happy शाळेतल्या मुलींना आवडली हे वाचून मजा वाटली.

दुधात शिजवून खातात ओट्स. पौष्टिक न्याहारी होते. त्यात मध, फळं घालून मस्त लागते. दुधात ब्रेकफास्ट सिरियल घालून खातात- तो प्रकार आवडत असेल, तर ओट्सही आवडू शकतील.
आईसक्रीम?? गार करून खातात का त्या? Happy

लाजोचीही ओट्स मफिन्सची रेसिपी आहे इथे.

सवय झाली की चांगले लागतात. पण ओटसची चव काही विशेष चव नसते. आता तर सकाळी ओट्स खाल्याशिवाय दिवस सुरु होत नाही.

येस्स्स आठवलं मला तूच लिहिलियेस Happy
अग तिच्या टिचर्स नी पण रेसिपी लिहून नेली Happy
धन्स ग!!!!!!!!!!!!!

Pages