Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाजो, मी आणि लोला एकच म्हणतोय
लाजो, मी आणि लोला एकच म्हणतोय
लोला २-३ माणसं म्हणत्येय....
लोला २-३ माणसं म्हणत्येय.... तु ३० वाट्या १०० जणांना म्हणत्येय्स....
५० माणसांना लोला च्या हिशोबाने २२-२५ वाट्या लागतिल. तुझ्या हिशोबाने १५... मग तुम्ही दोघी एकच कसं म्हणताय? मकासना
असो... उपमा खाऊन संपला पण असेल कदाचित
अगं लाजो, मंजूडी म्हणतीय की
अगं लाजो, मंजूडी म्हणतीय की ३० वाट्या रवा घेतला तर १०० जणांना एक एक मूद प्रत्येकी येईल. थोडक्यात नैवेद्य किंवा प्रसादाला कसं एक मूद वाढतो तितका कमी येईल. बरोबर ना, मंजुडी?
निंबे, आता तु आणखीन कन्फ्युज
निंबे, आता तु आणखीन कन्फ्युज करू नकोस...
'मूद' साईझ काय?? त्यासाठीची वाटी किती मोठी की लहान???... जौ द्या झालं... 
लाजो निंबुडा, हो बरोबर! पण
लाजो
निंबुडा, हो बरोबर! पण प्रसादाची मूद नाही, चांगली मसालेभाताची मूद
)
(लाजोला आणखी कन्फ्युज करूया
लाजो, तिच मुद हाण आता
लाजो, तिच मुद हाण आता एकेकीच्या टकुर्यात.
मंजुडी आता आपापल्या
मंजुडी
आता आपापल्या वाट्यांचा (की मुदींचा?) फोटो टाका इथे.....
योडे, त्यासाठी मला
योडे, त्यासाठी मला अमेरीकेच्या दिशेने एक आणि ठाण्याच्या दिशेने दुसरी मुद हाणायला लागेल
गरम गरम उपम्याच्या मुदी करणेच
गरम गरम उपम्याच्या मुदी करणेच पण किती अवघड

लाजो, शो. ना. हो! तुझ्या
लाजो, शो. ना. हो! तुझ्या पुढल्या भारतवारीत माझ्याकडून तुला एक मुदाळं सप्रेम भेट देण्यात येईल.
पाणिनी, विरजण, दही लावणे यावर
पाणिनी, विरजण, दही लावणे यावर सविस्तर चर्चा झाल्यात इथे. या शब्दांनी शोधल्यास नक्कीच मिळतील.
---
रुचिरामधे ओगले आज्जींनी वाटी चमच्याचा लाईफसाईझ आकार छापलेला आहे.
त्यापेक्षा लहान ती वाटुली व चमची आणि त्यापेक्षा मोठा तो वाटा आणि चमचे !!
सर्वांनी उपम्यावर लक्ष
सर्वांनी उपम्यावर लक्ष केंद्रीत केलंय, पण सगळं बटाटेवड्यावर अवलंबून आहे.
उपमा उरणार हे मला आता कळून
उपमा उरणार हे मला आता कळून चुकलं आहे. किती उरला हे वाचायला येईन नंतर.
लोले
लोले

उपम्याचा विषय जिने काढला ती
उपम्याचा विषय जिने काढला ती मूळात कुठे गायबलीय?
ऑरेंज मार्मालेड ची मोठी बाटली
ऑरेंज मार्मालेड ची मोठी बाटली आणली आहे . तशीच पडुन आहे. काय करता येईल ते वापरुन?
अमया, मार्मलेडची चव जरा कडवट
अमया, मार्मलेडची चव जरा कडवट असते. त्यामूळे गोड पदार्थ, जसे कि शिरा, शिकरण याबरोबर खाता येते.
त्यात थोडेसे पाणी घालून गरम करायचे. मग थंड झाल्यावर ते आईसक्रिम, केकवर घालून खाता येते. अर्थातच
टोस्ट वर घालुन ते खुप छान लागते.
विड्याच्या पानात घालून पण छान लागते.
तिलाही कळ्ल उपमा उरणार म्हणून
तिलाही कळ्ल उपमा उरणार म्हणून ती ब. वड्यावर लक्ष केंद्रित करतेय ...:P
वाटी आणि मुद चर्चा>>
वाटी आणि मुद चर्चा>>
मला जाम आवड्ते ऑरेंज
मला जाम आवड्ते ऑरेंज मार्मालेड. दिनेशचे पर्यायच मस्त आहेत. आता आणतेच.
लाजो, मंजुडी, लॉट्स ऑफ
लाजो, मंजुडी, लॉट्स ऑफ धन्स....अग उपमा/ब्.व जरा जास्त झाला तरी चालेल्..मी १ वाटी = २ नॉर्मल माणसे असे धरले आहे आता. जे उरेल ते रिपिट फिरवायचे व आग्रह करकरून वाढायचे
कमी पडेल ते आपोआप अॅड्जस्ट होईल मग 
धन्यवाद दिनेशदा! टोस्ट आणि
धन्यवाद दिनेशदा! टोस्ट आणि आईसक्रीम चा प्रयोग करुन बघते.
मंजुडे धन्स गं, पण कुठल्या
मंजुडे धन्स गं, पण कुठल्या साईझचं मुदाळं देशिल?
माझ्याकडे १ इंच व्यास आणि दोन इंच व्यास अशी दोन आहेत मुदाळी त्यापेक्षा मोठचं दे हां 
बादवे त्या फोटोतला हात लहान मुलीचा गुबगुबीत हात असेल तर मुद मोठी असेल्....मोठ्या व्यक्तीचा टमटमीत हात असेल तर मुद साईझ लहानच
सुमेधा
उपमा उरला तरी दुसर्या दिवशी खायला ही मस्तचं लागतो
त्यात दूध घालून गरम करायचा मस्त लुसलुशीत होतो. सोबत अंब्याचं, मिरचीच नाहीतर मिक्स भाज्यांचं लोणचं.... आहाहा... तोंपासु 
लाजो
लाजो
१२५ ग्रॅमच्या वाटीत शीगोशीग
१२५ ग्रॅमच्या वाटीत शीगोशीग भरून रवा घेतला तर २ माणसांना पोटभर उपमा होतो. बरोबर वडेपण आहेत तर एका वाटीत ३/४ माणसांना पुरेसा होईल उपमा.
एगलेस केकचे पाकिट आणले आहे,
एगलेस केकचे पाकिट आणले आहे, त्यात फक्त बटर आणि सोडा वॉटर अॅड करायला सांगितले आहे. बटरला तुप ऑप्शन होऊ शकतो का? आणि सोडा वॉटरला खायचा सोडा(पावडर) वापरली तर चालेल का? बेकींग पावडर आहे त्यात ऑलरेडी. शिवाय मावेत काचेच्या भांड्यात हा केक होईल का? कनवेक्शन वर करायचा की मावे मोडवर?
बटरला तुप ऑप्शन होऊ शकतो
बटरला तुप ऑप्शन होऊ शकतो का?>>> हो.
आणि सोडा वॉटरला खायचा सोडा(पावडर) वापरली तर चालेल का?>>> नाही.
मावेत काचेच्या भांड्यात हा केक होईल का?>>> हो.
कनवेक्शन वर करायचा की मावे मोडवर?>>> कन्वेक्शनवर.
धन्स मंजुडी, मग सोडा वॉटरला
धन्स मंजुडी, मग सोडा वॉटरला काहीच ऑप्शन नाही का?
माझ्याकडे इडली रवा बराच उरला
माझ्याकडे इडली रवा बराच उरला आहे आणी उडद डाळ नेमकी संपली आहे. तर नुसत्या इडली रव्याचे मला काय करता येइल? सुट्टी साठी भारतात जायचे आहे तर उडद डाळ पाकीट आणुन ठेवायला नको वाटतेय. नुसता इडली रवा संपवण्याचे उपाय सुचवा प्लीज.
त्याचा उपमा करता येतो.
त्याचा उपमा करता येतो.
Pages