युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीड माप इडली रवा, १ माप चणा किंवा मूगडाळ भिजवून, वाटून एकत्र करून त्याचे ढोकळे होतात, किंवा धिरडी. ढोकळ्यांना आलं मिर्ची जिरं वाटून घालाय्चं. मीठ्-हळद घालून, वाफवण्याआधी लिंबाचा रस आणि इनो फ्रूट सॉल्ट. फर्मेंट करून पण चांगले ढोकळे होतात.

इडलीरवा आणि ताज्या मक्याची धिरडी करता येतील.

मी इडली रवा पटकन इडली करायला बरी म्हणून आणला आता बहुदा त्याचा उपमा आणि ढोकळे होणारेत.... Happy
मस्त सजेशन्स मृ आणि दिनेशदा.... Happy

कोणी वॉलमार्टमधली कणीक वापरली आहे का?इथे इंडियन मधे १०/२० पौंड चा पॅक येतो..मला आता इंडियात जायचे आहे म्हणून मोठा नको आहे..
आणि नवर्‍याने प्रचंड मोठे टरबूज आणले आहे..त्याचे नुसते खाणे आणि ज्यूस सोडून काय करता येईल?

स्नेहा टार्गेट मधलं होल व्हीट पीठ् आणलं होतं ..आई होती घरी म्हणुन नशिब ..पण ती म्हणाली कोंडा जास्त आहे.....मला जमल्या नसत्या...
तू थोडे दिवस दुसरे प्रकार किंवा दुसरे पर्याय वापर....तू इतरवेळी प्रचंड चांगल्या चपात्या करत असशील तरी या पीठाच्या चपात्या साधारण टॉर्‍टिया सारख्या लागतात आणि चपाती पीठ आणि मायदेशवारी दोन्हीसाठी शुभेच्छा .. Happy

धन्यवाद, वेका..
मी इतरवेळीही भयानक करते गं...म्हणून ताज्याच करते.थंड झाल्या की मी स्वतः मी केलेल्या खाऊ शकत नाही. आणि मायबोलीवरचे 'हेल्दी' लेख वाचल्यापासून फ्रोजन आणणे फारच कमी झाले आहे..

नुसता इडली रवा संपवण्याचे उपाय सुचवा प्लीज.
>>>
अकुने इथेच राईस बुलेट्स ह्या नावाने एक रेसिपी टाकली होती. ते ट्राय करता येईल.

पाणिनी, केक मिक्समध्ये काय मिसळलेले आहे आणि ते पीठ किती ग्रॅम आहे हे माहिती असल्याशिवाय त्यात किती सोडा/बेकिंग पावडर आणि किती पाणी/ दूध मिसळायचे हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे पाकिटावरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात तरच केक छान होईल.

अजुन वेळ आहे भान्...पण एक छोटा प्रयोग दहा लोकांचा बरोबर झाला परवा. सेम मेनु ठेवला मुद्दाम. बायका जरा आवडीने खातात उपमा असे लक्षात आले. परत वाढून घेतला सगळ्यांनी. पुरुषांनी वडे आवडीने खाल्ले आणि उपमा "जिवावर आल्यासारखा" (चांगला झाला होता बरं...तरीसुद्धा..) हा नवीन शोध. तर १ वाटी रव्याचा उपमा २ बायकांना पुरला आणि ३ पुरुषांनी २ प्लेट्स वाटून घेतल्या. Happy

ट्च् ट्च्. नीट सांगा टोटल माणसं किती आणि टोटल वाट्या किती. (आणि उरला किती :P) Happy
थोडक्यात लिंगनिरपेक्ष अनुमान सांगा. Proud

अरे वा! हे बरे झाले.
५० लोकांपैकी-

बायकांची संख्या/ २ = इतक्या वाट्या रवा (अ)
पुरुषांची संख्या/३ = इतक्या वाट्या रवा (ब)

टोटल रवा वाट्या = अ+ब

१०० बटाटेवडे. Happy

बायकांनी वडे न खाण्याचे कारण काय असावे पण? wait.gif

१. तेलकट, वजन वाढेल.
२. पुरुषांनी ताव मारलाय तर आपण उपमा खावा, वडे कमी पडायला नकोत.
३. स्त्रियांना वड्यापेक्षा उपमा जास्त आवडतो.
४. पुरुषांना जिवावर आलेली गोष्ट बायका सहज करतात.

ब. व. का उपमा?

५. पुरुष वजनाने कमी जाडीचे होते म्हणून ब. व. ताव मारला.
६. बायका सर्व(च) जाड्या होत्या ( आरोग्याचा धागा दिला पाहिजे माबोवरचा)
७. बायांनी पुरुषांसाठी वड्याचा त्याग केला( सोशल कंडिशनिंग, वडे उरले तर खावे. आधी पुरुषांनी खावं)
८. उपमाच्या चिंता वाटली बायांना, कारण एक बाईच स्वयंपाकाचे कष्ट जाणते.(पुन्हा सोशल कंडिशनिंग की स्त्रीलाच स्वयंपाक बनवावा लागतो, व्यव्स्थापन तिलाच करावे लागते म्हणून इतर बायांनी हे ओळखून मदत केली उपमा संपवायला).
९. 'तो' उपमा व 'तो' ब. व. असून सुद्धा पुराणात लिहिले असेल उपमा स्त्रीयांसाठी असतो.

तात्पर्यः अजुन्नही सोशल कंडिशनिंगमुळे स्त्रीची गळचेपी सूरु आहे. Proud
Proud
धन्यवाद!

जोक्स अपार्ट,
सुमेधावी, उपमा मुलांना/पुरुषांना आवडत नाही सहसा हे बर्‍याचदा एकलेय/पाहिलेय मी.(दुसर्‍यांचे अनुभव)

उपमा व मुगाची खिचडी पुरुषांना आवडत नाही ह्याचे कारण माझ्या मते असे..की ते करायला सोपे असते म्हणून बायकांना सोयीचे होते Happy आणि रोज रोज मग सोय बघितली जाते आणि कंटाळा येतो..
रच्याकने. ब.व घेताना बायका घाबरत होत्या. म्ह्णणजे अगदी बारीक बारीक बायका सुद्धा.नको बाई तळकट असे म्हणून १ घेत होत्या. २रा बहुतेक नाहीच घेतला कोणी. Happy उपमा प्रश्न सॉलीड पेटलाय.

मावेत काचेच्या बोलमध्ये केक करायचा आहे तर बोलवर झाकण ठेवायचे का मावेत ठेवल्यावर? माझ्याकडे मावेबरोबर मिळालेले ट्रीओचे काचेचे बोल्स आहेत, त्यातल्या एकालाही झाकण नाहीये. प्लास्टीकची मावेसेफ भांड्यांची झाकणे आहेत पण ती २०-३० मि. ठेवायची म्हणजे मेल्ट होतील ना?

मावेत काचेच्या बोलमध्ये केक करायचा आहे तर बोलवर झाकण ठेवायचे का मावेत ठेवल्यावर?>>> नाही. झाकणाची गरज नाही.

पाणिनी, प्लास्टिकची भांडि नकोच वापरुस ते पण इतक्या वेळेसाठी ...तुमच्याकडे PYrex वगैरेची काचेची असतील मावेसेफ तर बरं पडेल ..

बायकांनी वडे न खाण्याचे कारण काय असावे पण?

१. तेलकट, वजन वाढेल.
२. पुरुषांनी ताव मारलाय तर आपण उपमा खावा, वडे कमी पडायला नकोत.
३. स्त्रियांना वड्यापेक्षा उपमा जास्त आवडतो.
४. पुरुषांना जिवावर आलेली गोष्ट बायका सहज करतात. >>>>>>>>> +१०० Happy

सुमेधाव्ही, उपमा + ब व चा अंदाज नक्की लिहा इथे!

बाकी वरील चर्चा वाचुन खुप हसले!

मला युक्ती सांगा बर आता! आज मी राजमा केला होता. स्लो कुकरातला. तो झाला चांगला पण फारच मसालेदार झाला होता. सोबत इतर पदार्थ असल्याने आणि राजमा मसालेदार असल्याने, एक टेक अवे डबाभर राजमा उरला आहे. त्याला सध्या कुणीच वाली नाही! म्हणुन तो डीपफ्रीजात ढकलला आहे. त्या राजम्याला कसे सुधरवु? म्हणजे तो खाता येइल?
एक शंका, स्लो कुकरात पदार्थ करताना मसाले कमी वापरावेत का की माझाच अंदाज चुकला म्हणायचा?

राजम्याची टिक्की बनव वत्सला. बाइंडिंगसाठी बटाटा किंवा कॉर्नफ्लोअर/ब्रेड घाल, म्हणजे मसालाही पुरेसा होईल. Happy

Pages