Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही फणसपोळीला गोड
नाही फणसपोळीला गोड लागतो.
याचे सांदणही होतील (पापडही होतील) गर्याचे तूकडे तळताही येतील. पण भाजीच ब्येष्ट !
सामी. तळलेले गरे केलेस तर
सामी. तळलेले गरे केलेस तर तुला यायचीही गरज नाही. मीच धावत येईन तुझ्या नावाचा पुकारा करत
पण भाजी नक्को ग बाई.
निवेदिता, टुनटुन, दिनेशदा,
निवेदिता, टुनटुन, दिनेशदा, सुलेखा आणि मोनाली ..धन्यवाद
चिक महिनाभर फ़्रिजमधे ठेवला तर आंबत नाही का?
शक्य असेल तर वाळवुन ठेव. ६-८
शक्य असेल तर वाळवुन ठेव. ६-८ महिने पण टीकेल. मी ओला ठेवत नाही जास्त त्यामुळे कल्पना नाही. पण आठवडाभर तरी रहावा.
नाही फणसपोळीला गोड
नाही फणसपोळीला गोड लागतो.>
शिवाय रसाळही हो ना दिनेशदा.
फणसाचे वेफर्सच बनव. लांब आणि पातळ काप. मिठाच्या पाण्यात टाक. आणि मग चांगले कुरकुरीत होइअपर्यंत तळ.
मी ऐकलंय की फणसपोळी ही फक्त
मी ऐकलंय की फणसपोळी ही फक्त बरका फणसाची करतात.
गिळगिळित असल्याने सोप्पा पडतो म्हणे. खखोदेजा
एका गोअन फ्रेंडच्या उतु
एका गोअन फ्रेंडच्या उतु जाणार्या दिलदारीमुळे घरात एक चांगलं १/२ किलोचं काजुचं पॅकेट येवुन पडलं आहे. आता करु काय काजुचं. आम्हाला तिघांनाही काजु खायला आवडत नाहीत. स्वीट पदार्थ नको आहे. दुसरं काय करता येइल? दिवाळी २०११ मधे पिटकुलं आणलेलं पॅकेट अजुन संपलं नव्हतं. मग त्यात किटक झाले म्हणुन टाकुन देताना अपराधी वाटलं. याची परत तशीच वाट लागायला नको आहे.
खखोदेजा >> देव कशाला हवा..
खखोदेजा >> देव कशाला हवा.. कोकणातिल सुगरनी सांगतील ना
मने काजु कतली कर की.. मी
मने काजु कतली कर की.. मी परवाच पाव किलोची केली. आज्-उद्या उअरलेल्या पाव किलोही करणार आहे
आम्हाला तिघांनाही काजु खायला
आम्हाला तिघांनाही काजु खायला आवडत नाहीत. स्वीट पदार्थ नको आहे. >>>
म्याव, माझ्या घरी पाठव मग ते पाकिट
मनिमाऊ, ग्रेवी बनवताना वापरु
मनिमाऊ, ग्रेवी बनवताना वापरु शकाता. ग्रेवीला दाटपणा येण्यासाठी काजूची पुड करुन घालायची. मस्त लागते. हे पंजाबी ग्रेवीबद्दल.
बाकी भरल्या वांग्यांमधे वापरु शकता. मसालेभात, पुलाव मध्ये सजावटीसाठी. चिकन बनवताना, काजूची पुड टाकल्यास मस्त दाटपणा येतो.
Thanks Reema, वेफर्स च करिन .
Thanks Reema, वेफर्स च करिन . मिठाच्या पाण्यात किति वेल बुडवुन ठेवाय्चे?
मनिमाऊ, मी पण ग्रेवी बद्दल लिहिणार होति. उपमा किन्वा पालक च्या भाजित छान लागतिल
फणसपोळी ही फक्त बरका फणसाची
फणसपोळी ही फक्त बरका फणसाची करतात.
गिळगिळित असल्याने सोप्पा पडतो म्हणे
>>
होय. रसाळ फणसाच्या गर्यांचा चाळणीवर रगडुन रस काढायचा आणि तो रस ताटलीत घालुन वाळवायचा. फणसपोळी तय्यार.
मनिमाऊ -- पुलाव, ग्रेवी,
मनिमाऊ -- पुलाव, ग्रेवी, भाजीत भर म्हणून, उसळ, टिक्की वगैरेत वापरून संपवता येतील काजू. चिवड्यात घालता येतील. कोफ्त्यात वापरता येतील.
वर्षा, काजुकतली तिखट कशी
वर्षा, काजुकतली तिखट कशी करायची?
इतर गोड पदार्थ आवडतात, पण काजुकतली नाही.
निंबुडा, तु पुण्याला असतीस तर शक्य होतं. थोडे वापरले तरी वाटुनच टाकावे लागणार आहेत.
स्वाती/सामी, हॉटेलच्या ग्रेवीमधे काजुपेस्ट असते हे ऐकलं होतं पण ती कशी करायची सांगणार का? मसालाभात, चिवडा किंवा जिथे कुठे तोंडात काजुचा तुकडा येतो अशा ठिकाणी काजु आवडत नाहीत. लोक चिवड्यातले दाणे आणि काजु वेचुन खातात, आम्ही तिघं वेचुन टाकतो. चिवडा विकत आणला कि धान्यातले खडे निवडल्यासारखं दाणे आणि काजु वेचुन काढणं हे काम असतं मला. मग मी त्याची पावडर करुन ठेवते भरीत किंवा भाजी मधे टाकायला.
मने मी पुण्यात रहाते खारे
मने मी पुण्यात रहाते

खारे काजु कर.. लगेच संपतील
फ्रीज मधले थंड काजू सरळ
फ्रीज मधले थंड काजू सरळ मिक्सर ला लावून पेस्ट करायची आणि भाजीत घालायची .
पाण्यात भिजवायची गरज नाही.
लोक चिवड्यातले दाणे आणि काजु वेचुन खातात, आम्ही तिघं वेचुन टाकतो >> आमच्याकडे काजुचे पैकेट बाहेर काढले कि बोलता बोलता चट्टा मट्टा होतो . आणि चिवड्यातील दाणे\ काजू वेचून घेण्यासाठी मारामारी होते
वर्षा, कसे करु सांग ना? ते
वर्षा, कसे करु सांग ना? ते आवडतील. मावेमधे माहित असेल तर अजुनच छान. काजुच्या आत सॉल्ट कसं जातं? नुसतं वरुन टाकलं तर मजा नाही येत खायला.
तु रेसिपी सांगितल्यावर करेन पण तुला बोलावणार नाही खायला. नुसत्या शेंड्या लावते मला. यायचं नाही नुसतं आश्वासन.
सामी, थँक्स.
सामी,
थँक्स.
अर्धाच किलो काजू आहेत ना? मग
अर्धाच किलो काजू आहेत ना? मग ते पाकिट ऑफिसात नेऊन डेस्कवर ठेवा फक्त... ते कसे संपतील हे तुम्हालाही कळणार नाही.
खारवलेले काजू मायक्रोवेव्ह :
खारवलेले काजू
मायक्रोवेव्ह : http://food.sify.com/vegrecipes/Salted_Microwaved_Cashews-150623
विस्तव : http://fusion-food.blogspot.in/2007/09/nuts-about-nuts-roasted-cashews-a...
मंजुडी, ऑफिसमधे नाही पण
मंजुडी, ऑफिसमधे नाही पण स्वयंपाकाच्या मावशी किंवा मेडचा फायदा असतो याबाबतीत. यावेळेस काजु ग्रेवी आणि दुसरी काही तिखट रेसिपी हाती पडते का पहायचं होतं.
भरत, मावेची लिंक ऑफिसनेटवरुन उघडत नाहीए, पण विस्तवाची वाचली. छान वाटते आहे. थँक्स.
अग माऊताई, मी तुझ्या बाजुच्या
अग माऊताई, मी तुझ्या बाजुच्या गल्लीत रहाते हे तु कसं बरं विसरतेस?
माऊ ते काजू भिजत घालून,
माऊ ते काजू भिजत घालून, त्यांची तिखट उसळ करून टाक की सरळ.
स्निग्धा हो गं खरंच. दक्षे,
स्निग्धा
हो गं खरंच.
दक्षे, रेसिपीसकट पदार्थ सुचवायचा गं. मी हॉटेलमधे मेन्युकार्डमधे फक्त ही उसळ वाचली आहे. अजुन कधीच खाल्ली नाही त्यामुळे ती कशी दिसते आणि कशी करायची हेच माहित नाही.
मला तरी कुठे येतेय पण २-३ तास
मला तरी कुठे येतेय पण २-३ तास काजू भिजत घालून नेहमीप्रमाणे उसळ करून टाक. हाका नाका
बाकी हरभर्यापेक्षा काजू मऊ असतील असं धरून २-३ तास भिजत घाल म्हणालेय. जाणकार प्रकाश टाकतीलच.
काजूची उसळ
काजूची उसळ
वोके. त्यातच थोडी काजुची
वोके. त्यातच थोडी काजुची पेस्ट टाकुन घट्टपण होईल आणि ग्रेवीची ट्रायलपण होइल हे बघते. एकात एक. मस्तच आयड्या !
आता इतके सगळे प्रकार अर्धा
आता इतके सगळे प्रकार अर्धा किलो काजूत होणार नाहित, अजून किलोभर घेऊन ये, प्रयोगार्थ
दक्षे, शहाणी आहेस. भरत, आता
दक्षे, शहाणी आहेस.
भरत, आता ती रेसिपी दिसते आहे. आधी लिंकच नव्हती. थँक्स. ओले काजु आणि भिजवुन ओले केलेले काजु याच्या चवीत नक्कीच फरक असणार. हो ना? आम्ही हरिहरेश्वरला जेवलो तिथे त्यांनी पालकच्या भाजीत आणि आमटीत ओले काजु घातले होते. काजु आवडत नसले तरी ते मात्र फार भारी होते चवीला.
Pages