युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉवर कट असतो ना तुमच्याकडे किती? ३-४ तासांपेक्षा जास्त? ३-४ तास रोज असेल, अन घरी कोणी नसल्याने उघडझाप ( फ्रीजची) नसल्याने काही होणार नाही..

अग रोज सायपण वीरजणात टाक व लोणीयुक्त ताक कर ना. व ते लोणी चांगल्या ऐर-टाईट डब्यात ठेव. पुरेसे साठले की कर तुप.

दक्षिणा , अनघा म्हनतेय तस कर, मी पण तसेच करते. काही वास वगैरे नाही येत, फक्त दर रविवारच काम वाढत . त्या सायीच लोणी काढा, ते कढवा. पण फायनल रिझल्ट एकदम भारी! रवाळ लोणकढं तूप!!!!

रवाळ तुप होण्यासाठी नक्की काय करायचं? माझी बहिण इतकं सुंदर तूप कढवते. माझं तसं होतंच नाही. Sad प्लेन होतं. तिने सांगितलं तसं सगळं फॉलो करूनही होत नाही. मी बारिक गॅसवर करते तूप, तसं करू नको का?

दिनेशदा, तुकडे काहि होत नाही आहेत. एक एक दाणा मोकळा करायचा प्रयत्न केला पण नाही होत आहे. शेवटी तो पिझाबेस घेऊन शेजारच्या आंटिकडे घेऊन गेली, त्यांच्या बाल्कनीत वाळ्त ठेवला आहे.

इंडोनेशियातला खास प्रकार आहे>>> पुढच्या वेळेस प्रयत्न करेन. Happy

तुप रवाळ होण्यासाठी तुप कढवताना त्यात चिमटीभर मीठ घालायचे, छान रवाळ तुप होते, आणि हो मी नेहमीच मिडियम गॅसवर कढवते तुप.

साबुदाण्याच्या पापड्या ओव्हनमध्ये कश्या वाळवणार? Uhoh तळल्यावर फुलणार नाहीत त्या. त्याला उन्हातच वाळवायला पाहिजे.

समजा तो कडकडीत वाळला तर कूटून त्याचे तूकडे करुन तळता येतील. तसे अळणीच लागतील ते.
मग वरुन लाल तिखट, मीठ वगैरे लावावे लागेल.
तेच तूकडे दूधात शिजवून खीर होईल.
समान आकाराचे तूकडे तूपात तळून, फसवे डींकाचे लाडू करता येतील !

पण ती प्रचंड जाड साय येते त्याचं काय करू? तूप करायला सांगू नका कारण एकदा प्रयत्न केला होता पुरेशी साय साठेपर्यंत त्याला वास येतो.. >>>>>>>>>
दक्षिणाजी: एक कप दुधाचे नेहमीप्रमाणे विरजण लाऊन दही करा. ते स्टेनलेसच्या भांड्यात ठेवा व रोजची साय त्यात घालत चला. साय घालतानाच ढवळली पाहिजे. अशाने वास येणार नाही. अर्धे साधे व अर्धे सायीचे असे दहीही स्वादिष्ट लागेल. हवे तेव्हा ताक करा व लोणी काढून तूप करा.

दक्षे, पण मुळात तू एक लिटर गाईचे दूध घेतेस ना, मग परत आणखी एक लिटर म्हशीचे दूध ते कशाला? आणतच जाऊ नकोस म्हशीचे दूध म्हणजे सायीचा प्रश्नच येणार नाही. हा, आता चहासाठी तुला ते लागत असेल तर फक्त अर्धा लिटरच घेत जा आणि आठवड्यातून दोन वेळा आण संपेल तसं. अर्ध्या लिटरवरची साय मॅनेज करायला पण सोपी. Happy

लोलादी, सध्या साबूदाणा पिझाबेस शेजारच्या आंटीकडे वाळवायला दिला आहे. Happy
त्यानंतर दिनेशदांनी दिलेल्या युक्तींमधील एक करून पाहिन. Happy

दक्षिणा, घरचं दही कस लावतेस?? मी बरेच प्रयत्न केलेत पण अजुन विकतच्या सारख आंबट दही बनतच नाही. नुसत गोडुस दुधच लागत.

ओये मंजे मी एकटी असले तरिही ऐनवेळेला कुणि आलं तर उगिच दूध आणायला धावाधाव नको म्हणून मी चहासाठी म्हशीचं दूध ठेवते घरी. एक लिटर फ्रिजर मध्ये आणि एक लिटर तापवलेलं. असो.. त्यामुळे इतका खटाटोप. अर्धा अर्धा लिटर खेळत कोण बसेल? Proud

साक्षी मी, माझ्या अनुभवाप्रमाणे हातगुणामुळे दही आंबट/ गोड लागते. मी लावलेलं दही कधीच आंबट ढॅण्ण होत नाही. थोडं होतं. पण अगदी २-३ दिवस राहिलं तरच. अन्यथा नाहीच.
आता दहीच लागत नसेल तुझ्या हातून तर तु विरजण लावून ते साय/दूध किती वेळ बाहेर ठेवतेस ते पहा. विरजण लावताना दूध अगदी किंचित गरम करून घ्यायचं आणि विरजण घातल्यावर चांगलं मिसळायचं. आणि निदान ८ तास बाहेर ठेवायचं. फ्रिजात नाही.

दक्षिणा म्हशीच्या दुधाच टोण्ड दुधाच पाकिट आणत जा ना.. त्याची अजिबात फारशी साय येत नाही..>>>> हा सगळ्यात भारी सल्ला आहे. Lol

ना रहेगी साय ना बनाना पडेगा तूप Proud

ओये टोण्ड दुधाचा चहा पिण्यापेक्षा मी गरम पाणिच पिते की Proud मग पैशे पण वाचतील बक्कळ Proud

माझ्या आठवणीत तरी आपल्याकडे चांगली मिल्क पावडर मिळत नाही. चांगली पावडर अगदी थंड पाण्यात
टाकली तरी लगेच विरघळते. ते दूध गरम केले तर त्याला साय येते ( स्कीम्ड नसेल तर ) तसेच त्याचे दहीही घट्ट लागते. माझ्या घरी ती असते. कधी कधी तर भाजीच्या ग्रेव्हीत, सुप मधे पण मी वापरतो.

भारतात पूर्वी इव्हॅपोरेटेड मिल मिळायचे. आता मिळते का ते माहीत नाही. हे दूध म्हणजे पूर्वी कोल्हापूरात गुलाबी रंगावर दूध तापवायचे त्या रंगाचे पण खुपच दाट दूध असते. एक कप चहात ते एक चहाचा चमचा घातला तरी पुरते. खीर वगैरे करायला मस्त. त्यात साखर नसते पण गल्फ मधे ते वेलची, आले अशा स्वादात मिळते.

आणि तिसरा पर्याय कंडेन्स्ड मिल्क. पण त्यात भरमसाठ साखर असते.

ओये टोण्ड दुधाचा चहा पिण्यापेक्षा मी गरम पाणिच पिते की ... मग पैशे पण वाचतील बक्कळ >>> Lol

Pages