जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
मी ईथे मोठा वाद निर्माण
मी ईथे मोठा वाद निर्माण करतेय,सगळ्यांनी हलकेच घ्या हं.
) वाक्ये आता हिंदि ईंग्लिशमध्ये वाचू.
वरील मराठी हिंदितील हास्यास्पद (?
-वॉलके उपर डेड बॉडीजैसा पडा है.
-कॉफीमे शुगर ज्यादा डालो और मिक्स करो.
-पोळीपे बटर ज्यादा मतलगाना ,स्मेल आती है.और ओनियनके स्मॉल पिसेस करना , कितना थिक/ बिग पिसेस करते हो ?
-उत्सवमूर्तीऐवजी कदाचित पर्सन ऑफ ऑनर (?) म्हणाले असते तर हसायला आलं असतं?
माझं स्पष्ट मत आहे कि हिंदि बोलताना मराठी शब्द वापरले तरीहि चालावं. आपण एवढे सुशिक्षित तरिहि मराठी ,हिंदि बोलताना ईंग्रजीची मदत लागते, मग हि बिचारी ( बहुतांशी) जुन्या पिढीतील( ज्यांच्यासाठी हिंदि बोलणेचएखरंतर कौतुकास्पद आहे), किंवा गावाकडील लोकं( जिथे हिंदि सर्रास वापरली जात नाहि) हिंदि बोलण्याचा प्रयत्न करतात हेच खूप नाहि का?
एकिकडे आमिर खान तोडकंमोड्कं का होईना मराठी बोलतो म्हणुन आपण कौतुक करणार आणि दुसरीकडे आपलीच लोकं तोडकंमोड्कं हिंदी बोलणार तर त्याला हसणार?
भान इथे फक्त हलकीफुलकी चर्चा
भान इथे फक्त हलकीफुलकी चर्चा सुरू आहे.
तुम्हीही फार गंभीरपणे न घेता हे सर्व मजेने घ्यावं अशी नम्र विनंती.
आता राहिला जुन्या पिढीतल्या/गावाकडच्या लोकांनी हिंदी भाषेत मराठी शब्द वापरण्याचा. दॅट्स परफेक्टली ऑलराईट. इथे कुणिही कोणताही गंभीर असा प्रसंग हास्यास्पद (भाषिक) म्हणून लिहिलेला नही.
तसाच काही गंभीर प्रसंग असेल आणि आपले वाडवडील हिंदि/मराठी मिक्स बोलले तर त्यावेळी इथले सर्व लोक त्या भाषेच्या मिसळीपेक्षा त्यांच्या भावनेकडे नक्कीच जास्ती लक्ष देतील.
तसाच काही गंभीर प्रसंग असेल
तसाच काही गंभीर प्रसंग असेल आणि आपले वाडवडील हिंदि/मराठी मिक्स बोलले तर त्यावेळी इथले सर्व लोक त्या भाषेच्या मिसळीपेक्षा त्यांच्या भावनेकडे नक्कीच जास्ती लक्ष देतील.>>>
१००% पटले.
दक्षे तुला १०१ टक्के
दक्षे तुला १०१ टक्के अनुमोदन.
दोन भाषांची मिसळ इथे फक्त गंमत म्हणून अनुभवयाची आहे. यात कुणा व्यक्तीची किंवा भाषांची टिंगल टवाळी करण्याचा कुणाचा हेतू नाही हे सहज स्पष्ट होते. तेवढं भान सगळ्यांना आहे. पण नेमकं त्याचच भान सुटलं, म्हणून भान आधी 'हलके घ्या' म्हणताहेत आणि नंतर शेवटी स्वतःच जड प्रश्न विचारत आहेत.
दक्षिणा, अहो जाओ नको करुस गं
दक्षिणा, अहो जाओ नको करुस गं
पण काहि किस्से वाचून अगदीच राहावलं नाहि .
मीपण मजेतच घेईन
स्वारी
कौतुक तुम्हि मला टोमणा मारत
कौतुक तुम्हि मला टोमणा मारत असाल तर


आणि मजेत लिहिलं असेल तर
बाकि माझ्यामुळे व्यत्यय आल्याने क्षमस्व. कदाचित मला काय म्हणायचय ते नीट लिहु शकले नाहि. चालुद्या तुमचं
भान, चेहरा निळा करू नका. ही
भान, चेहरा निळा करू नका. ही जागा फक्त दात विचकण्यासाठीच आहे.
शिरोडकर
शिरोडकर
भान....व्यत्यय, त्रास वगैरे
भान....व्यत्यय, त्रास वगैरे गोष्टी असल्या धाग्यावर विचारातदेखील घेऊ नका. अहो हा केवळ एक हलकाफुलका, सहज घडू शकणारे मनोविरंगुळागत देवाणघेवाण प्रकरण आहे. आपल्या विनोद प्रांतात 'शिख' जमातीवर लाखोंनी विनोद अस्तित्वात आहेत पण त्यांचा इतिहास पाहिल्यास त्यांच्यासारखी कष्टकरी आणि म्हणून जगातील कोणत्याही भूमीवर आपले पाय रोवू शकणारी अन्य जमात या हिंदुस्थानात दुसरी नाही. तरीही त्यांच्यावर होणार्या विनोदाना ते दिलखुलास दाद देत असतात.
भाषेच्या वैशिष्ठ्यांतून होणारी नर्मविनोदमिश्रता दक्षिणाने इथे तितक्याच सहजतेने मांडली, ती सर्वाना भावली इतकाच या धाग्याचा अर्थ. वाचावे आणि विसरून जावे असेच याचे स्वरूप आहे.
सहभागाचा आनंद जरूर घ्या.
अशोक पाटील
भृंगराज, तुम्ही का लाजताय ?
भृंगराज, तुम्ही का लाजताय ?
कमऑन भान, सॉरी कशाला? ए
कमऑन भान, सॉरी कशाला?

ए कौतुक टोमणा मारलास?
(No subject)
अरे ऐसे भांडते नै रे. अच्चे
अरे ऐसे भांडते नै रे.

अच्चे से रहनेका.
वो एखादा शब्द हिकड तिक्ड होताच हय.
सध्या माझ्या वर्गात बरीच
सध्या माझ्या वर्गात बरीच मराठी मुलं आहेत. आणि कधी कधी जाम मजेदार हिंदी बोलतात. त्यांच्या निरागस बोलण्याने जास्त मजा वाटते.
काही उदा.
वो मुझे झोपाळेपे नही बैठने दे रहा है.
आज मै उपासचा साबुदाना लाया हुं.
मुझे खोकला हो गया था कल.
वो मुझे दगड मारी.
माझ्या मुलीने 'डोंगरपर बरफ गिरी है' असे म्हणून नवर्याच्या एका साउथ इंडियन सहकार्याला
करायला लावलं होतं. 
माझ्या नवर्याच्या कॉलेजातले
माझ्या नवर्याच्या कॉलेजातले मराठी प्रिंसिपल बाकीच्या जाट सहकार्यांना मिटींगमध्ये अचानक कल छुट्टी नही ले सकते कहींसेभी काम गीर सकता है म्हणून घाबरवून टाकतात.
सर्दी (जुकाम), अंग (बदन),
सर्दी (जुकाम), अंग (बदन), वगैरे बरेच हिंदि शब्द हवे तेव्हा नेमके आठवत नाहित
अहो मग क्लास लावा
अहो मग क्लास लावा चारुदत्त..
काय पण जाहिरात.. :p
तसाच काही गंभीर प्रसंग असेल आणि आपले वाडवडील हिंदि/मराठी मिक्स बोलले तर त्यावेळी इथले सर्व लोक त्या भाषेच्या मिसळीपेक्षा त्यांच्या भावनेकडे नक्कीच जास्ती लक्ष देतील>> हे माझ्या मते १०% बरोबर आहे.. सगळेच लक्ष देतील असं नाहि.. आंतर्जालावर कुणीहि सगळ्यांबद्दलची ग्वाहि देणं पटत नाहि.
वो मुझे दगड मारी. ऐकताना
वो मुझे दगड मारी.
ऐकताना मसाला च्या मारी सारखं वाटतय 
आंतर्जालावर कुणीहि
आंतर्जालावर कुणीहि सगळ्यांबद्दलची ग्वाहि देणं पटत नाहि. >> समीर मी तु सोडून इतर सर्वांची ग्वाही दिलेली आहे. एक तुझ्याबद्द्लच नक्की सांगता येत नाही. एखाद्या गंभीर प्रसंगी आपले वाववडील मराठी मिक्स्ड हिंदी बोलले तर तु हसू शकशील, इतर कोणी नाही हसणार नक्कीच.
प्राची मी ते दगड मारी आत्ता
प्राची
मी ते दगड मारी आत्ता वाचलं 
समीर >> क्लास वगैरे झाले करून
समीर >> क्लास वगैरे झाले करून शाळेत ... ५ ते ८वी होते हिंदि... " पर उस टाइम से अब थोडी बरी अवस्था है |"
(No subject)
तेच सांगायचय कि असं
तेच सांगायचय कि असं सगळ्यांच्या बाबतीत म्हणू शकत नाहि..
मी काय करीन हा जसा माझा प्रश्न आहे दक्षिणे तसाच इथल्या प्रत्येकाचा आहे. आणि इथला प्रत्येक जणं असा विचार करणारा आहे हा समज न पटणारा आहे.
हो हो बरोबर
हो हो बरोबर
मी काय करीन हा जसा माझा
मी काय करीन हा जसा माझा प्रश्न आहे >> आहे ना? मग मला द्याविशी वाटतेय ग्वाही, मी दिली..
टाईम आऊट. आय हॅव नो मोअर टाईम टू स्पेन्ड ऑन सच इललॉजिकल डिबेट्स.
भांडू नकोस ग, विचार कर.. बरं
भांडू नकोस ग, विचार कर..
बरं तुमचं चालु दे, मी जस्त वेळ घेऊ इच्छित नाहि तुमचा.
(No subject)
मंद्या मुस्काड फोडिन, दात
मंद्या मुस्काड फोडिन, दात काढू नकोस
मी कशावर दात काढायचे हा माझा
मी कशावर दात काढायचे हा माझा प्रश्न आहे


दक्षे, दिवा फोडू नकोस, अंधार होईल
दिवा फोडू नकोस, अंधार होईल
दिवा फोडू नकोस, अंधार होईल >>
Pages