जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
ते मूळचे गोंयच आहे. >>>> हो
ते मूळचे गोंयच आहे. >>>> हो मुळ नाव तेच आहे. कोकणी भाषेत गोंयच म्हणतात.
>>> ते मूळचे गोंयच आहे. >>>>
>>> ते मूळचे गोंयच आहे. >>>> हो मुळ नाव तेच आहे. कोकणी भाषेत गोंयच म्हणतात.
हो का! मला हे माहित नव्हतं. गोवेकरांना 'गोंयकर' म्हणतात हे माहित होतं, पण मूळ नाव 'गोंय' आहे याची कल्पनाच नव्हती.
मलाही मास्तुरेंनी गोंय चा
मलाही मास्तुरेंनी गोंय चा उल्लेख का केला हे कळलेच नव्हते. पन म्हटले असेल काहीतरी!
वो पत्रकार इतने लंबे क्यु बैठे है! >>>
डक्षे, आता हा फोटो मराठी
डक्षे, आता हा फोटो मराठी लोकांच्या हिंदीचा की हिंदी लोकांच्या मराठीचा ते तूच ठरव.
शेवटी जे % दाखवले आहे, ते
शेवटी जे % दाखवले आहे, ते पदार्थ किती परसेंट ताजा आहे त्याचे का?
अम्या
अम्या

अम्या..
अम्या..

% >>
% >>
माझ्या काकांना एकदा बँकेत एका
माझ्या काकांना एकदा बँकेत एका महिला अधिका-याचा फोन आला. ती फोनवरून हिंदीत बोलत होती. तिने एक माहिती लिहून द्यायला सांगितली. काकांनी तिला सांगितलं " लेखी कि क्या जरूरत है ? हम आपको तोंडीच बता देंगे "
तिने विचारलं " तोंडी ?"
काका म्हणाले " तोंड से बता देंगे "
काकांना मुंह हा शब्द आठवत नव्हता आणि हिंदीत तोंद या शब्दाचा अर्थ वेगळाच होतो हे त्यांच्या गावीही नव्हतं
kiran ....
kiran ....
किती परसेंट ताजा >>> हम आपको
किती परसेंट ताजा >>>
हम आपको तोंडीच बता देंगे >>>
तोंडी >> ही भाषा ऐकून त्या
तोंडी >>
ही भाषा ऐकून त्या बाईच्या तोंडचं पाणि पळालं असेल.
रात्रीच्या बस प्रवासात
रात्रीच्या बस प्रवासात जेवणाचा थांबा झाला की सहप्रवाशाला विचारायचा प्रश्नः
"आपको बस लगती है क्या ? "
एका मोठ्या भांड्यात ताट अडकले
एका मोठ्या भांड्यात ताट अडकले होते.
सा.बा ते कसे काढायचे हे त्या मुलाला explain करत होत्या..
"वो भांडा लेके थाळी को मध्यम से चीर पाडो और उलथनं लेके उस्को उचकटो...."
माझी ह. ह. पु. वा. ............
माझी south इंडिअन मैत्रीण
माझी south इंडिअन मैत्रीण सांगत होती कि तिने एका रिक्षावालाची तक्रार केली, मी आपल घाबरून म्हटलं "बाप रे उसने तेरे उपर डूख धरा होता तो क्या होता?"
ती पूर्ण hang झाली होती कि हिला काय म्हणायच आहे नक्की!!
'अभी आना कल कल कल' (परवा ये!)
'अभी आना कल कल कल' (परवा ये!) इति आमचे तीर्थरूप दूधवाल्या भय्यास! तो चक्करलेला.:))
शेणाचा किस्सा माझ्या मोठ्या
शेणाचा किस्सा माझ्या मोठ्या बहिण बाबतही लहानपणी घडलेले..तिला एका हिंदी भाषिक काकांचा गोठ्यातून शेण आणायला आईने सांगितले तर हिला हिंदीत काय बोलावे हे न कळल्यामुळे हि त्यांना म्हणाली - काका गाय का गुवा देव..तिच्याबरोबर गेलेल्या माझ्या मोठ्या आत्ये बहिणीने हे सांगितल्यावर सगळे तुफान हसले होते..
किरन्,हर्षल,कांचन्,डीजे,भारती
किरन्,हर्षल,कांचन्,डीजे,भारती,दिविजा सर्वच धमाल किस्से..

शिकायला मामांकडे होतो
शिकायला मामांकडे होतो तेव्हाचा किस्सा .
मामी अहिराणी बोलणार्या, शेजारील प्लॉटमधे मुस्लिमकुटुंब होते. मामांचा प्लॉट मधे सामाइक भिंत बांधुन दोन भावांची सोय काढलेला त्यासंदर्भात मामी शेजार्यांना सांगताना
मा. : हमको येरायेर को बोलनेके लिये खिडकीबी नै हय और देकने के लिये दरवाजा बी नै हय.
हमको येरायेर को बोलनेके लिये
हमको येरायेर को बोलनेके लिये खिडकीबी नै हय और देकने के लिये दरवाजा बी नै हय. >> एकामेकांशी ???
सगळ्या नवीन पोस्टींना
सगळ्या नवीन पोस्टींना
सगळे अशक्य आहेत......
सगळे अशक्य आहेत......
परवा ट्रॅफिक जॅम मधे
परवा ट्रॅफिक जॅम मधे अडकल्यावर माझे बाबा वैतागुन ड्रायव्हरशी बोलत असताना म्ह्णाले " वो देखो, ना धड इधरसे जा रहा हय ना धड उधरसे" . मी मनातल्या मनात म्हंटलं की त्या ड्रायव्हरला "धड" या शब्दाचा काय अर्थबोध झाला असेल राम जाने.
हिंदीत तोंद या शब्दाचा अर्थ
हिंदीत तोंद या शब्दाचा अर्थ वेगळाच होतो हे त्यांच्या गावीही नव्हतं >>>>
अगदी अगदी.
तोंड --> तोंद, मुलगी --> मुर्गी.
आम्च्या कदे १ मछिवाला आला
आम्च्या कदे १ मछिवाला आला होता त्याच्या तोप्लित १ गान्दुल पद्ल होत आम्च्य बाजुच्या काकु ने ते पहिला आनि म्हनल्या अरे भैया वो तोप्लि मे क्या गन्दुल के जैसा वल वल ता है त्या भैया च तोन्द बघ्न्या सार्खा झाल होत
माझी नणंद ट्युशन घेते एक
माझी नणंद ट्युशन घेते एक मुलगा फारच रडत होता तर ही त्याला म्हणे की टॉयलेट मे कोंड के रखुंगी आभी
:ड
बाप रे सगळेच नवीन प्रतिसाद
बाप रे सगळेच नवीन प्रतिसाद भन्नाट आहेत.
अजून एक किस्सा माझ्या मावशीचा - एकदा तिच्या घरी काहीतरी प्लम्बिंगचं काम चालु होतं. मजूर अर्थातच यु. पी/बिहारचे. बरेच पाईप्स पडले होते. मावशी येता-जाता कधीतरी त्यावरून घसरली. मग त्या मजुरांवर तिच्या हिंदीत तिने शस्त्र उगारले, "ये सब पाईप्स यहा आडवेतिडवे क्यु पडे है? नीट एकावर एक रखके गठ्ठा करो. नाहीतर दोपेहरका चाय नही करुंगी." बिचार्यांना कळलं की नाही देव जाणे.
आडवेतिडवे एकावर एक रखके गठ्ठा
आडवेतिडवे

एकावर एक रखके गठ्ठा >>>
काकांचाच आणखी एक
काकांचाच आणखी एक किस्सा.
पूर्वी त्यांच्याकडे राजदूत बाईक होती. पहिल्या संपूर्ण वर्षात हवासुद्धा भरली नव्हती इतकी काळजी घ्यायचे काका :हाहा:. एकदा हायवेला गाडी आचके देत बंद पडली. एका केरळ्याच्या गॅरेजमधे गाडी नेली ( दिवे घाटाच्या अलिकडे रेल्वे क्रॉसिंगचं ) . त्याला एक्स्प्लेन करताना काका म्हणाले. "वैसे तो अच्छी चल रही थी लेकिन अचानक इंजिन मे आकडी आकर बंद पडी " काकांचे एक मित्र मागे बसले होते. त्यांनी जमिनीवरच लोळण घेतली. अजूनही ते हा विषय हटकून काढतात.
आकडी आकर बंद पडी >>> काकांचे
आकडी आकर बंद पडी >>>

काकांचे एक मित्र मागे बसले होते. त्यांनी जमिनीवरच लोळण घेतली
>>
मग केरळ्याची काय रीअॅक्शन?
Pages