जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
एकदा हॉटेलमधे गेलो असताना
एकदा हॉटेलमधे गेलो असताना माझा नवरा वेटरला म्हणे "अजुन वाढो, वाढो"..तर त्यावर आमच्या लेकीच करेक्शन..अस नाही बोलायच बाबा अस बोलायच.."वाढिये वाढिये"
होठ बाईट >
होठ बाईट >
जिस धागे मे लॉजिक नहि, वहा
जिस धागे मे लॉजिक नहि, वहा क्या इल्लॉजिकल....
वाढिये वाढिये
वाढिये वाढिये
वाढिये... हे वाढो वाढो वरून
वाढिये...
हे वाढो वाढो वरून मला आठवलं खींचो हा शब्द मला गरजेच्या वेळी कद्धीच आठवत नाही (तसं बर्याच हिंदी शब्दांच्या बाबतीत होतं ही वेगळी गोष्ट!) मी आपली जीव आणि गळ्याचा शीरा ताणून ओढो ओढो ओरडत राहते...
माझ्या बंगाली फिटनेस ट्रेनरला (जायचे ३ वर्षांपूर्वी, फरक नाय पडत म्हटल्यावर नाद सोडला...) मी कौतूकाने बंगाली शिकवायला सांगीतलेलं तर... पहले हिंदी तो अच्छेसे सीखो असं वाक्य खाडकन माझ्या तोंडावर मारलेलं बयेनं!!
मास्तुरे गोवा?
मास्तुरे गोवा?
अजून एक आठवल, आमचे शेजारी
अजून एक आठवल, आमचे शेजारी आपल्या सायकलबद्दल बोलताना म्हणले "मेरी सायकल गन्जी है"
'गंजणे' ला काय म्हणतात
'गंजणे' ला काय म्हणतात हिंदित?
'गंजणे' ला काय म्हणतात
'गंजणे' ला काय म्हणतात हिंदित?
>>> ज़ंग पकड लेना
मेरे घसे में बहुत दुख रहा
मेरे घसे में बहुत दुख रहा है... हे जरा हिंदीत सांगाल का.. बर्याचदा असं बोलून गेलोय
मेरी सायकल गंजी है >>>
मेरी सायकल गंजी है >>>
गले मे दर्द है... शब्दशः
गले मे दर्द है... शब्दशः करू न ये भाषांतर कुठल्याही भाषेचे. तेच आपण सगळेच करतो म्हणून मज्जा'ज होतेत.

सगळेच हिंदी जोरदार
1. वो धावते धावते आयाऔर धपकन
1. वो धावते धावते आयाऔर धपकन पड्या, तेल भी सांड्या और तुप भी लवंड्या।
2. पहिली बार पोहने गया तो क्या हुआ मालूम? पहिले पानीमे शिरा, फिर पोहा और बाद में बुडा।
3. घाई करो भैय्या, नहीं तो बस जाएगी और हमारी पंचाईत होगी।
4. शरबत में लिंबू पीळा क्या?
5. इतना महाग कैसा रे तेरे यहाँ? वो कोपरे का भैय्या तोस्वस्त देता है।
6. कंदा काट के, चिर केमस्त आमलेट बनाने का, और ऊपर से थोडा कोथिंबीर भुरभुरानेका।
7. अरे बाबा गाड़ी सावली में लगा।
8. ऐ भैय्या मेदूवडा शेवट लाना, सांबर में बुदके मत लाना।
9. केस एकदम बारीक़ कपोभैय्या, बाद में वो डोळे के सामने आते है।
10. पोत भर खाओ भैय्यालाजो मत।
11. धावते धावते गिरया तो काडकन हात का हाड़ मोड्या।
(No subject)
माझ्या मैत्रिणीच्या चुलत
माझ्या मैत्रिणीच्या चुलत बहिणीने, घरी आलेल्या बिगर मराठी पाहुण्यांना खाण्याचा आग्रह केला." खाते जाव, खाते जाव. शरम तो है नही"
(तिला म्हणायच होत, "आणखी घ्या, लाजू नका". :फिदी:)
शरम तो है नही >> हा किस्सा
शरम तो है नही >>

हा किस्सा आधीही कुठेतरी वाचल्या सारखा वाटतोय. ह्याच बीबी वर आधी पण टाकला आहात का?
'गंजणे' ला काय म्हणतात
'गंजणे' ला काय म्हणतात हिंदित?
>>> ज़ंग पकड लेना
पण ज़ंग म्हणजे तर युद्ध ना..
हा किस्सा आधीही कुठेतरी
हा किस्सा आधीही कुठेतरी वाचल्या सारखा वाटतोय. ह्याच बीबी वर आधी पण टाकला आहात का?>>>>>>>हो. मी कुठे टाकलाय, ते आठवत नव्हतं. म्हणून इथे टाकला.
जंग आणि ज़ंग हे २ वेगळे शब्द
जंग आणि ज़ंग हे २ वेगळे शब्द आहेत. एका मध्ये ज च्या खाली बिंदी आहे.
जंग च्या "ज" चा उच्चार जबलपूर मध्ल्या "ज" सारखा आहे तर ज़ंग च्या "ज़" चा उच्चार जहाजातल्या "ज" सारखा आहे.
धन्यवाद..
धन्यवाद..
बिंदी
बिंदी
बिंदी >>> हिंदीत ज चा किंवा झ
बिंदी >>>
माझ्या एका हिंदी भाषिक मित्राने तरी हेच सांगितले मला.
हिंदीत ज चा किंवा झ च वेगळा उच्चार दाखवण्यासाठी त्या अक्षराखाली टिंब देतात त्याला बिंदीच म्हणतात ना??
नुकता
नुकता
ओके. धन्स
ओके. धन्स
>>> मास्तुरे गोवा? बरोब्बर.
>>> मास्तुरे गोवा?
बरोब्बर. "गोंय" हे नाव वाचल्यावर बराच वेळ काही कळलंच नव्हतं. नंतर लक्षात आलं की हे गोवा या नावाचं हिंदी रूपांतर आहे. नाहीतरी इतरांची नावे भ्रष्ट करायची हिंदीला सवयच आहे. सचिनला जगभर "तेंडुलकर" नावाने ओळखले जात असताना हिंदी चॅनेलवाले अजूनही "तेंदुलकर" असे दाखवतात. तीच गोष्ट टिळकांची. त्यांचे नाव अजूनही तिलक असेच छापतात.
बिंदी- (उर्दू- नुक़्तः) हिंदीत
बिंदी- (उर्दू- नुक़्तः) हिंदीत बिंदी च म्हणतात.. उच्च हिंदीत' सिफ्ऱ')

'सायकल गंजी.. देवा देवा..
मस्त किस्से आहेत एकेक...
<< बरोब्बर. "गोंय" हे नाव
<< बरोब्बर. "गोंय" हे नाव वाचल्यावर बराच वेळ काही कळलंच नव्हतं. नंतर लक्षात आलं की हे गोवा या नावाचं हिंदी रूपांतर आहे. नाहीतरी इतरांची नावे भ्रष्ट करायची हिंदीला सवयच आहे. >>
ते मूळचे गोंयच आहे. इतरांची नावे भ्रष्ट कराय्ची सवय असलेल्या मराठीने त्याचे गोवा केले.
आमच्या सोलापूरचे (एकमेव)
आमच्या सोलापूरचे (एकमेव) सुपूत्र दिल्लीत कोणत्यातरी मोठ्या पदावर बसले आणि पहिल्याच पत्रकार परिषदेत वदले की- 'वो पत्रकार इतने लंबे क्यूं बैठे हय?'
पहिले पानीमे शिरा, फिर पोहा
पहिले पानीमे शिरा, फिर पोहा >>>> अयायायाया ... पाण्यात शीरा आणि पोहे!
वो पत्रकार इतने लंबे क्यूं
वो पत्रकार इतने लंबे क्यूं बैठे हय? >>>
Pages