मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक किस्सा माझा.
एका मुस्लीम मुलीशी ओळख झालेली. ती एकदा बांगड्या घालून आमच्या घरी आली होती. तिच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून बांगड्यांची स्तुती करावी असा विचार केला आणि तिला म्हटल. "अच्छे है तुम्हारे बैंगन "

मै भी पहले नदी मे शिरा, फिरपोहा, फिर बुडा तो बाजुवालेने बाहर वडा (= वढा), वढवढते पड्या ,तो हात का हाड काडकन मोड्या..

चक्रमचाचा | 8 November, 2012 - 10:42
कोंडीबाजी
तब्येतीस जपा. ताठ बसा. काळजी घ्या.>>>> तुम मत काळजी करो ,इस के लिए देव समर्थ है.

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला असणार्‍या कार्यशाळेमध्ये एक मास्तर होते, वेल्डींगचं प्रात्यक्षिक करतांना, त्या वेल्डींग रॉडची माहिती देत होते.

"ये एक वेल्डींग रॉड होता है, इसपर रासायनिक केमिकल का कोटींग होता है..." शेवटपर्यंत नव्हतं कळलं बिचार्‍या मराठी न कळणार्‍या मुलांना Lol

मराथी दूरचित्रवाणी मालिकांमधील संवादांवर असलेल्या हिंदीच्या छापाबद्दल आपण नेहमीच बोलतो. एका हिंदी मालिकेत मराठी लोकांचे हिंदी ऐकायला मिळाले. स्टार-प्लसवर अर्जुन: इन्स्पेक्टर अर्जुनसाहेबांनी संशयिताला विचारले की 'कल रात को नींद बराबर नही लगी क्या?' आता हे ठरवून आहे की चुकून आहे माहीत नाही. इ.अर्जुन हे पात्र मराठी आहे.

एकदा रेडिओवर रमेश देव यांची हिंदीत चाललेली मुलाखत ऐकत होतो.
त्यामधे शेवटी मुलाखत घेणार्‍या बाईने प्रश्न विचारला,
आप फिल्म इंडस्ट्रीमे आनेवाले नये लोगोंको क्या संदेश देना चाहेंगे ?
त्यावर रमेश देव म्हणाले,
मैं आजकल के नौजवानों को ये बताना चाहता हूँ,
हमारे समय का जमाना अब रहा नही है,
अगर आना है तो जरा जप के आओ !

नींद बराबर नही लगी क्या?
>> Biggrin

इथे एक उलटा किस्सा आठवतोय. कदाचित इथे अवांतर आहे. पण असो.

सर्वाधिक खपाच्या/अग्रगण्य/ लोकांचे आवडते इ. बिरुदावली मिरवणार्या मराठी वृत्तपत्रांमधल्या बातम्यांचे मथळे वा मजकुर बर्‍याचदा हिंदी शब्दवापरामुळे इतका विनोदी होतो !

संभावना हा शब्द मराठीत व हिंदीत वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. मागे एकदा बहुदा मायबोलीवर किंवा मनोगतावर कुणीतरी रेडीओ वर हिंदी पाठोपाठ मराठीतून दिल्या जाणार्‍या बातमीचा उल्लेख केला होतो. तेव्हा हिंदीतील बातमी मध्ये "अमुक होण्याची शक्यता आहे" अशा अर्थी "संभावना" शब्द वापरला होता. मराठीत तेच वाक्य शब्दश: भाषांतर करून "अमुक होण्याची संभावना आहे" असे वाक्य निवेदिकेने म्हटले होते, असे त्या प्रतिसाद कर्त्याने उल्लेखले होते.

आंब्याच्या बागेत राखणीसाठी ठेवलेला गुरखा कापणीच्या कामाला आलेल्या गड्याला - किधर ? 
गडी - तिधर, गवत कापू कापू

आॅफीसमधला टीममेंबर टीमलीडला - अरे वो जुना फाइल है. मैने नवा भेजा है.

इंदौरला बसमधून उतरल्या उतरल्या स्थानिक रिक्षावाल्यांनी आम्हाला चौघांना (मी, आई, काका-काकू) गराडा घातला आणि 'कहाँ जाना है?' वगैरे चौकश्या करू लागले. मी नुकतीच झोपेतून उठले होते आणि एका नव्या शहराला भेट देण्याचा आनंद असेल म्हणून तत्परतेने उत्तरले, ''हमारा कझिन हमें लेनेको आ रहा है, उसकी और हमारी चुकामूक न हो जाये इसलिए हम यहाँ खडे है!'' माझ्या उत्तरासरशी ते रिक्षावाले गोंधळून जरा पांगले पण घरच्यांनी मात्र भरपेट हसून घेतले!

आमच्या बाई बंगाली आहेत. रोज सकाळी ७ वाजता स्वयंपाकघरात त्यांच्याशी हिंदी बोलणार्‍या आम्हाला कुणी ऐकणार्‍या त्या एकट्याच आहेत शिवाय त्यांना मराठी थोडेफार कळते म्हणून निभतंय. सकाळी सकाळी घाईच्या वेळेत योग्य शब्द सुचेपर्यंत गप्प बसण्यापेक्षा काम होणं महत्त्वाचं असतं. पण ही काही वाक्यं बोलताना, ऐकताना मला हसू आवरत नाही.
१. उसमे थोडा दाणे का कूट डालो.
२. कल की सब्जी ऐसी सपक क्यूं हुई थी?
सपक ?
मतलब पाणचट.
३. ये ऐसा चौकोनी चौकोनी क्यूं कांट रही हो? लंबा लंबा काटो.
४. टोमॅटो डाला तो हमेशा छोटा गूळ का खडा डालनेका.
५. वो पोळपाट लाटणा यहां रखो. कणिक का डिब्बा बाहरसे पोंछ लिया करो.
सगळ्यात महान
६. गॅस चला गया.

आमच्याकडची परिस्थिती म हा न आहे. बाईला तमीळशिवाय काही येत नाही. मग मी मराठी हिंदी कानडी इंग्लिश अशी भेळ करून आणि त्याला हातवार्‍यांची फोडणी देऊन काम करवून घेते.

सुरूवातीला मी हातात घेऊन हे घाल, ते घाल, मग हे काप करून समजवायचे. नंतर नंतर ती आता मला "कांदा कट, उर्रूनंगल कट (म्हणजे बटाटे!!!), शेंगा कूट ओता, सॉल्ट ओता, अब क्या ओतू?"असलं काय्तरी विचारते.

(घालणे याला तिने "ओतणे" हेच क्रियापद फिक्स केलय, का कुणास ठाऊक!!, त्यामुळे मशिन तूणी ओता म्हणजे मशिनमधे कपडे घातले!!!!)

माझ्या आईकडची कामवाली सगळ्यात धन्य आहे. मराठीच आहे. पण तिला हिंदी नाही तर english बोलायची भयंकर हौस आहे.
ती ३ वर्षापूर्वी कामाला लागली तेव्हा पगाराच्या बाबतीत म्हणाली आईला, ' काकू तुम्ही मला 5 (Five) तारखेला पगार देत जा. इतर घरी मला 5(five) तारखेलाच मिळतो.'
काल संध्याकाळी ४ वाजता ती कामावर आलेली असताना आईने तिला सांगितल, ' आत जाऊन चैत्राली ला सांग सगळ्यांसाठी चहा ठेवायला.' तर तिने मला येउन सांगितलं, ' ताई,काकूंनी tea करायला सांगितला आहे!. मग मी tea ठेवला तिच्यासकट सगळ्यांसाठी.

दक्षिणा>>>>>>>>.. सही आहे......माझी आई बाजुच्या भाभी ला सांगत होती " वो जरा जाली उघडके देदो " Happy

रासायनिक केमिकल>>>>>>>>>>>>
गॅस चला गया >>>>>>>> Rofl

माझ्या आत्या ची सासु आजारी पडली होती... शेजारची एक बाई विचारायला आली.. तर आत्या म्हणे, डॉक्टर ने बोला की... उनके अंग में रक्तच नही है.. तो उनको चक्कर आ गयी Proud

हाच बाफ शोधत होते सकाळपासून.
ताजीच म्हणजे कालचीच गोष्ट.
घटळी रोडवरच्या नागरीक मधे गेले होते. तिथे एक काकु \ आजी आल्या आणि एक एक सामान हळु हळु सागू लागल्या. मग मधेच स्वतःशी बडबडत कायतरी आठवायच्या मग पुन्हा एखादा नग सांगायच्या. तो दुकानदार शुध्द मराठीतच ओरडला"जरा लवकर सांगा आज्जी" त्यावर आजीबाईंच उत्तर " अभी वय हुवा है ना तो पटपट आठवताच नै आजकल"
दुकानदार आणि मी अक्षरशः आजींना वाईट वाटु नये म्हणुन आलेलं हसू मह्त्प्रयासाने दाबलं.
आता दुकानदार मराठीत बोलतोय तर आजींचा हिंदीत [ते पण धेडगुजरी] बोलण्याचा अट्टाहास का हो.

Pages