जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
(No subject)
माझा लेक (४ वर्ष) ....बाईला,
माझा लेक (४ वर्ष) ....बाईला, भा..(मग अचानक आठवतं भाजी नाहि हिंदीत सब्जि, तर भा अर्धवट टाकुन )सब्जि मे मिठ जास्त है!!
माझ्याशी फोन वर बोलताना, बाईने फोन मागितला बोलायला तर तिला म्हणतो, "थांबो, मेरा बात हुआ काय? नहि ना, मग?"
(No subject)
नादखुळा किस्से है सबके... लै
नादखुळा किस्से है सबके... लै मजा आ गयी ...

(No subject)
मैत्रिणीने सांगितलेला तिच्या
मैत्रिणीने सांगितलेला तिच्या आईचा किस्सा -
काकूंच्या शेजारी एक हिंदी बाई राहत होत्या. काकूंना २ मुले आणि एक मुलगा आहे.
शेजारच्या काकूंना त्या सांगत होत्या - बडी लडकी मेरे पती कि है... छोटी मेरी है.. और लडका हम दोनो का है... हे एकून दुसर्या काकू चाट. म्हणे - मला बोलली आहेस पण बाकी कुठे नको बोलूस.
काकूंना म्हणायच होत - मोठी मुलगी माझ्या नवर्यासारखी दिसते... छोटी माझ्यासारखी.. आणि मुलगा दोघांसारखा...
'जैसी / जैसा' शब्द वाक्यात न वापरल्याचा परिणाम.
सुप्रभात...
सुप्रभात...

एकदम खतरी...सुप्रभात!
एकदम खतरी...सुप्रभात!
सुप्रभात
सुप्रभात
एकदा आमच्या मावशींना वैद्य
एकदा आमच्या मावशींना वैद्य बुवांकडे घेऊन गेलेलो
आमच्या मावशींनी एका प्रश्नाला दिलेले उत्तर
" हम मैत्रिणी बचपन में वो डोंगरपे गई थी तो कुत्ते कुत्ते मेरा पाय घसर गया मै गिर गयी और मेरे माने को भी झटका लगा उसीच वजैसे मेरा दुख रा होईंगा क्या ???"
धोबि सायंकाळि ईस्त्रि चे कपडे
धोबि सायंकाळि ईस्त्रि चे कपडे मागतो : बाई कपडे निकाल के रखो मै बजुसे आया (:< घरातिल आम्हि सगळे चाट?
कालच आमच्या शेजारच्या काकू
कालच आमच्या शेजारच्या काकू म्हणत होत्या.
हमारे लड्की का बाडदिवस है परसो. तो हम लोग हैना उसको हॉटेलमे साजरा करेन्गे
एका रिक्शावाल्याला चुकून
एका रिक्शावाल्याला चुकून हिंदीत पत्ता विचरला (मी नागपूरकर, रिक्शावाला..... सूज्ञास काय सांगावे???)...... इदरसे सरळ जानेका... उजवीको वळ्नेका... एक खंबा पडेगा,, सरळजा कर एक मंदिर पडेगा.. वहापर वाडा विचारो...
नव-यानी हॉटेलात वेटरला: भैय्या.. ये कॉफी जरा गाळ के दो...
तसंच.... यहा रोज सुबह लोग भोत जमते है नं???? (जॉगर्स पार्क मधे सकाळ्च्या गर्दीबद्द्ल )
आमच्या ईथे एक काकु मेस
आमच्या ईथे एक काकु मेस चालवायच्या त्यान्नी विचारल होत ड्बेमे लोणच डालु क्या?
अरे पिताजीरे, ये कयसे कयसे एक
अरे पिताजीरे, ये कयसे कयसे एक से एक मस्त किश्शे लिख के रख दिये हय!

अशक्य हसते आहे.धमाल किस्से
अशक्य हसते आहे.धमाल किस्से आहेत.
माझ्याकडुन काही, माझे बाबा वेटरला म्हणाले होते " भैय्या मेंदुवडा सांबार में बुडा के मत लाना"
त्यांचि काही अशीच वाक्य : इस में लिंबु पिळ्या क्या?
"घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!"
नवर्याला नविन पायजमे हवे
नवर्याला नविन पायजमे हवे होते. दादरमधे कुठे मिळतील हे विचारत होता. त्याचे आधिचे पायजमे म्हणजे सुरवार आणि लेंगे यामधलं एक hybrid होतं. म्हणून मी त्याने मराठी पध्दतीचे लेंगे घ्यावेत असं सांगत होते. त्यावेळचा हा अजब संवाद :
नः मुझे घर में पेहेनने के लिए पजामें चाहिये|
मी: हा ठीक है, हम तुम्हारे लिये लेंगे लेंगे| दादर में आपटे का दुकान है वहा से लेंगे| और सरळ के सरळ लेंगे|
तो बिचारा या लेंग्यांच्या सुळसुळाटात एवढा गांगरून गेला की त्याला कळालेच नाहि की शेजारीच बसलेली आपली मेहुणी अशी एकदम अंगात आल्यासारखी खाली पडून का लोळायला लागली.
---------------------------------------------------------------------
माझ्या बहिणीनी तिच्याकडे काम करणार्या बिहारी कामवालीला सांगितलं की "वाणी के पास जावो और अर्धा किलो बेसन का पीठ लावो|" तिला अर्थातच हे झेपणारं नव्हतचं (नुकतीच बिहारहून आलेली). पण दोनचं दिवसांपूर्वी, बहिण तिला घेऊन बाजारात गेली असताना एका दुकानातून लाडू घेतले होते. त्यामुळे या पठ्ठीने 'बेसन' च्या जोरावर तिथे जाऊन अर्धा किलो बेसन लाडू आणवून दाखवले.
---------------------------------------------------------------------
एक हिंदी भाषिक मित्र बरेच दिवसांनी भेटला. तर मी त्याला विचारलं "क्या आशिष, क्या कह रहे हो?"
तो बुचकळ्यात.... 'मैं?????"
मी : "हा, तुम ही.... क्या कह रहे हो?"
तो : "मै कहां कुछ कह रहा हूँ?"
शेवटी एका सूज्ञ मैत्रिणीला लक्षात आले काय घोळ झाला ते आणि तिने मला समजावून सांगितले की हिंदीत असे मराठी सारखं (काय म्हणताय?) असं न विचारता "कैसे हो?" असे विचारावे.
अर्थात आतापर्यंत माझे हिन्दी खूपच सुधारून बाकिच्यांच्या हिंदीला हसण्याइतपत आत्मविश्वास आला आहे.
आतापर्यंतच्या माझ्या
आतापर्यंतच्या माझ्या हिंदी-ज्ञानात जी काही वाढ झाली आहे, त्यातली ही एक ओंजळः
मराठी <=> हिन्दी
लाल भोपळा <=> काशिफल किंवा सीताफल
सीताफळ <=> शरीफा किंवा सीताफल
कलिंगड <=> टरबूजा
टरबूज <=> खरबूजा
बटाटे <=> आलू (मला माहित आहे हे सर्वांना माहित आहे ते, पण पुढच्या शब्दाकरता देतेय)
अळू <=> अरबी
जास्वंद <=> लटकझंपा (पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी वेडी व्हायचे बाकी राहिलेले)
गवारीच्या शेंगा <=> कुत्ते कि फली (का ते माहित नाही)
कोबी (पत्ताकोबी) <=> करमकल्ला (इथे मी वेडी झाले)
या सगळ्याची परतफेड नवरा 'सफरचंदा'ला हसून करतो. त्याला ते फळाऐवजी एखाद्या माणसाचं नाव वाटतं. म्हणजे कैलासचंद वगैरे.
लटकझंपा सही नाव आहे हे. मला
लटकझंपा
सही नाव आहे हे. मला फार आवडले.
गवारीच्या शेंगा <=> कुत्ते कि
गवारीच्या शेंगा <=> कुत्ते कि फली (का ते माहित नाही)>>मला गवार खूप आवडते.त्याला असं नाव आहे हे ऐकून मला खूप वाईट वाटले

कोबी (पत्ताकोबी) <=> करमकल्ला (इथे मी वेडी झाले)>>मी चुकून कमरकल्ला असं वाचलं आणि डोळ्यासमोर कोणीतरी कमरेला कोबी अडकवला आहे असं चित्र डोळ्यासमोर आलं
कोबी<=> कमरकुल्ला????
कोबी<=> कमरकुल्ला????:खोखो:
या सगळ्याची परतफेड नवरा
या सगळ्याची परतफेड नवरा 'सफरचंदा'ला हसून करतो. त्याला ते फळाऐवजी एखाद्या माणसाचं नाव वाटतं. म्हणजे कैलासचंद वगैरे >>>
मामी, जबराट
मामी, जबराट
हो ना. कुत्ते की फली हे नाव
हो ना. कुत्ते की फली हे नाव घरात ban केलयं. पण मग मामा त्याला 'गँवार' म्हणतात. वालाला मामा 'वॉल' म्हणतात.
या सगळ्याची परतफेड नवरा
या सगळ्याची परतफेड नवरा 'सफरचंदा'ला हसून करतो. त्याला ते फळाऐवजी एखाद्या माणसाचं नाव वाटतं. म्हणजे कैलासचंद वगैरे <<<<<<<<<मामी, नवर्याला सांगायचं की सारखा प्रवास करणार्यालापण 'सफरचंद' म्हणतात मराठीत
सांगेन हा आता........
सांगेन हा आता........
सफरचंदावरून आठवलं माझी मुलगी
सफरचंदावरून आठवलं
माझी मुलगी लहान असताना (१.५-२ वर्षाची) सफरचंदाला फकरचंद म्हणायची. पहिल्यांदा ऐकल्यावर माझी आणि बायकोची हसून हसून पुरेवाट झाली होती.
मध्य प्रदेशात (इंदूर) गवारीला
मध्य प्रदेशात (इंदूर) गवारीला चतुर फली म्हटलेले ऐकले आहे (गवार=ग्रामीण).
सफरचंदाला हिंदीत सेव्/सेब म्हणतात त्याने किती घोळ होऊ शकतात. शेवाला काय म्हणतात ते?
शेव स्त्रीलिंगी का? मग शेवेला.
<<<<<गवारीच्या शेंगा <=>
<<<<<गवारीच्या शेंगा <=> कुत्ते कि फली (का ते माहित नाही)
कोबी (पत्ताकोबी) <=> करमकल्ला >>>>
हसुन मी वेडी झाले.
शेवा म्हणजे काय, भरत मयेकर?
शेवा म्हणजे काय, भरत मयेकर?
Pages