मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

शेवाला काय म्हणतात ते?
शेव स्त्रीलिंगी का? मग शेवेला.>>>>
शेवेला 'भुजिया' म्हणतात आणि करंजीला 'गुजिया' Happy

काल - मुंबईत सासूबाई वॉचमनला दम देताना: वो बल्ब काय को नही लगाया? हमारे जिनेमे कालोखा होता है फिर बच्चे घाबर जाते हैं....

वो चकचकित पर्स देना जरा..

माझ्या ४ वर्षाच्या मुलीने तिच्या गुजराथी आजीला सांगितले - हमेको पुढका विक हॉलिडे जानेका. (आम्ही पुढच्या आठवड्यात हॉलिडेला जाणार).

कुणी गोविंद घ्या ह्या एकांकिकेतला हिन्दी मराठी भाषिकांतील संवादः
मराठी: हमारे यहाँ शादीमे नवरा और नवरी एकदुसरेको घास खिलाते है.
हिंदी: क्या तुम्हारे यहाँ लोग गायभैस जैसा घास भी खाते है?
मः घास याने गायभैस खाते है वो घास नही. भातपे वरण डालके कालव कालवके उसका गोळा बनाके मुंहमे
रखते है वो घास.
नंतर हे ऐकणार्‍याच्या पोटात कालवा कालव झाली असेल.

थोडे वेगळे...माझी ऑफिसातली सहकारी गुजराती, पण मराठी बोलायची.कशी ते पुढे वाचा.
एकदा तिने कुणालातरी विचारले -'तुला भीक नाही लागत?'

गुजरातीत भीक म्हणजे भीती. डर नही लगताचा मराठी अनुवाद व्हाया सुरत.

भीक Rofl

भरत मयेकर :
शेवाला काय म्हणतात ते?
शेव स्त्रीलिंगी का? मग शेवेला. >>>>>

प्राची म्हणते ते बरोबर... ती शेव <=> भुजिया
तो शेव (पदर) <=> पल्लू
शेवा (सेवा) <=> सेवा च म्हणतात .... Proud Light 1

भुजिया ऐकला होता...हा युपी बिहारचा शब्द असावा हल्दीरामचे आलु भुजिया मिळते ना. पण मुंबईतले आपले बांधव (पक्षी भैया) सेव बटाटापुरी, सेवपुरी विकतात)
. इंदूर मध्य प्रदेशात रतलामी सेव फेमस आहे...(आणि ती जाळ काढणारी शेवच आहे)

आमच्याच घरातीला दूरध्वनीवरील संभाषण. " ए क्या रे (समोर बाई आहे बरे का) कल तुम ऑफीस को आनेका नाही क्या ओ मोठा साब है ना ओ इतना गुस्सा किया सबको ये - वो किया तुमको मालूम. फिर हम भी उसको ऐसा ये किया पुछनेका नही." ये, वो, ऐसा, वैसा, हे जोकर बरे का कसेही कुठेही वापरा. विषयांतर - कुणी गोविंद घ्या ही एकांकिका कोणी लिहिली हे माहीत नाही पण हा संवाद जुने विनोदी लेखक वि. आ. बुवा. यांच्या एका पुस्तकातला आहे.

आज ट्रेन मधली शेजारची बाई समोरच्या बाईला:
"अरे, मेरी लडकी बेंगलोर मे जिधर पीजी रेहती है ना उस की बिल्डींग क्या देखोगे तुम? ऐसी मस्त ऐसपैस पसरी है|"

आता त्या समोरच्या हिंदी भाषिक बाईला "ऐसपैस पसरणे" चा अर्थ कळला की नाही देवच जाणे! Wink

तेरी शेर्डी मेरी पर्डी मे क्यों ओरडी ??

मै धावते धावते आया धपकन पड्याच फिरभी रड्याच नै

आज मै बहोत कंटालगया हय तब्बीच जादा लिहीत नाय

माझ्या मैत्रिणिच्या नवर्‍याने केलेला हिन्दिचा अशक्य खून !

महाशय मुंबईमधे टँक्सिमधे फिरले. रिवाजाप्रमाणे ड्रायवर होते, सरदारजी. बिल देवुन झाले. सुट्टे देताना ड्रायवरने पाचची नोट दिली. ह्याला काही फोन करायचे होते, म्हणुन ड्रायवर कडुन नोट ऐवजी सुटी नाणी हवी होती. ह्याने सांगितले "सरदारजी ये नोट रख्खो, और उसके बदले मैं नानी दे दो " बिचारा सरदार ईथे राहून राहून मराठीचे हिन्दिवरले अत्याचार या विषयावर Ph.D. करु शकण्या ईतपत मराठी शिकला होता. त्याने एक उद्विग्न नजर टाकून सांगितले, "साब coin चाहिये बोलो ना. " दूसरा एखादा सरदार असता तर हिंस्त्र होउन तलवार नस्ती काढ्ली तर मुंबई सोडून नक्की गेला असता.

सरदारजी ये नोट रख्खो, और उसके बदले मैं नानी दे दो >> हाहा लै भारी

माझा दोस्त कंपनीच्या बिहारी सेक्युरिटी गार्डला कापुस मागत होता त्याची कहाणी,

दोस्त : अरे भैय्या, कॉटन है क्या?
गार्ड : कुच समझे नही हम.
दोस्त : अरे Sad रुई है क्या रुई?
गार्ड : नही भाई कुच समझ नही रहा...

थोडा वेळ दोस्त त्याच्याकड रागान बघतो आणि स्वता जाऊन ईर्म्जन्सी किटमधुन कापुस आणतो. गार्ड हे बघुन जोरात म्हणतो,

गार्ड : अरे कापुस चाहिये थाक्या, बोलनेकाना Happy

एका पार्टीत व्हेज आणि नॉनव्हेज एकत्रच ठेवलं होतं. मी आणि माझ्या बरोबर अजून काहीजण व्हेज होते. सगळे जरा लाईट मूडमधे होते. त्या वेटरला सांगायचं होतं की हे व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळं मांडा.
तर माझ्या तोंडून गेलं, " हं..नही तो हमारा सोवळा मोडेंगा ना!"

एकदा लोकलमध्ये एक बाई तिच्या अमराठी मैत्रिणीला मार्गशिर्षातली देवीची पुजा कशी करायची ते सांगत होती, "अरे कुच नही, एकदम साधी होती है ये पुजा, अपना कलश रहता है ना तांबेका? वो लेने का, अच्छा धो के साफ करने का, उसमे अपना आंबेका टाला लगाने का और उसपर नारीयल रखने का, और ना देवी को ना सफेद फुल पसंद होते है इसलीये सफेद फुलसे पुजा करने का, प्रसाद के लिये रवेका शिरा बनाने का........................................"

यावरून आठवलं कालच TV वर पाहिले भडकमकर ने एक पुस्तक लिहिलय बंबॅया हिंदी. त्याला डॉ जब्बार पटेलांची प्रस्तावना आहे. त्याने पण काही किस्से सांगितले. मजा आला.
असाच एका हॉटेलात एक डायलॉग ऐकला तो पण एका खाटीकाच्या तोंडातून :
"क्या बोलू तेरेकू मेरे दिलमे ऐसी धडधड होती ना रात् को नींद नही आती. डॉ ने दवा तो दे दी पर ये हार्ट का कुछ तो भी प्रॉब्लेम है करके बोल्या. किसी भारी डॉ को दिखाना पडेगा क्या? कैसी क्या आवाज आती है पता नही यार."

आजी बाई : रिक्षा कडे कडे से और सावली मे से हाकना, आगे डावी को वळण है, उधर वळणेका और थोडा आगे वडा के झाड के समोर देऊळ है ना उसके समोर थांब जाओ.

रिक्षावाला : अम्माजी ईधर तो कोई वडा का दुकान नही है, हम तो बहुत सालो से ईहा रिक्षा चलावत है.

आजी बाई : अरे वडा का दुकान नही, वडा का झाड बोला मैने, तुमको ऐकणे का problem है क्या ?

रिक्षावाला : वडा का झाड ???

आजी बाई : अरे हा बाबा वडा का झाड, उसको पारंब्या रहता है ना, लहान मुल उसको टिंग के झोपाळा खेळताय, वही झाड.

रिक्षावाला : पारंब्या ???

आजी बाई : अरे बाबा, वोह झाड रहता है ना, जिसमे से लाल colour का फळ रहता है, उसके फांदी लटकते रहते है, वही झाड.

रिक्षावाला : फांदी ??? अम्माजी हमे तो कुछ भी समझ नही आ रहा.

आजी बाई : तुम चलो , मै तुमको बताती हु.

माझ्या हिंदीमध्ये खूपच भर पडली. आता " गाढवाला पाठवल आहे पण मला पाठवल नाही". याच हिंदी भाषांतर कोणी सांगेल का?

लेंगा पुराण

मी : लेंगा का कापड दिखाओ.

दुकानदार : ??? (बहुतेक नवीन असणार)

मी : अरे वोह घर पर सदरा डालताय ना, वोह, समझा क्या ?

दुकानदार : सदरा ???

मी : अरे वोह जेंट्स लोगों का नाईटी ड्रेस रहता हय ना, वहीच.

दुकानदार (शो केस मधले कापडं दाखवत) : कौनसा बाबुजी.

मी : वोह डावी कड से (मोजत) १,२,३,४,५,६ ... सहावा

दुकानदार : ???

मी : अरे वोह दाए बाजु से छ्ठा.

दुकानदार : यह वाला.

मी : हा वहीच, वोह चटेरी पटेरी वाला भी दिखाओ.

सौ (दुकानदाराला) : पांढरा रंग का भी दिखाओ.

दुकानदार : पांढरा ???

मी : सफेद रंग

दुकानदार : तो ऐसे कहिए ना बहनजी, हमे कैसे पता चलें पांढरा मतलब सफेद.

मी (सौ ला) : पांढरा रंग मळणार.

दुकानदार (सौ ला) : हा बहनजी , पांढरा रंग मळेगा.

सौ (दुकानदाराला) : तुम क्या मराठी हय क्या ? ऐसा मराठी लोगो जैसा क्यो बोलताय, और हमारे नवरा बायको के संभाषण के बीच मे नाक कयु खुपसताय.

दुकानदार : नही नही, हम तो ईलाहबाद के है, और हम तो यु ही आप को बता रहे थे, हम नही नाक खुपस रहे.

मी (दुकानदाराला) : क्या भाव दिया

दुकानदार : १५० रु प्रति मीटर.

मी : हा पॅक कर दो.

सौ : नही, नही, ईतना महाग क्यु , शिवणे का भी भाव जोडा हय क्या ?

दुकानदार : शिवणे का ???

मी : सिलाई का भी भाव लगाया हय क्या?

दुकानदार : नही नही, हम सिर्फ बेंचते है, शिवते नही.

सौ : कुछ तो कमी करो.

दुकानदार : नही नही, हमारे यहा Fixed Rate है, भाव नही होता ( Fixed Rate ची पाटी दाखवत)

सौ : तुम तो पुणेकर नही हो ना, फिर पाटी क्यु दाखवताय (पुणेकर दिवे घ्या Light 1 ) और तुम्हारा दुकान तो Mall मे भी नही, जीधर सब वस्तुओं का भाव Fixed रहता हय, ऐसा हय तो बोलो, हम Mall मे जाके ही लेंगा का कपडा लेगा.

मी (सौ ला) : Mall मध्ये लेंग्याचे कापड खरेदी करायचे.

सौ (हळुच) : तुम्ही गप्प बसा हो जरा, तुम्हाला काही कळतं का, तो का येऊन बघणार आहे आपल्या पाठी Mall मध्ये.

सौ (दुकानदाराला) : जल्दि जल्दि बोलो फायनल भाव हम को और भी बहुत जागे जाना हय, बहनजी बोला हय ना, तो बहन को लुबाडेगा क्या, बराबर भाव बोलो.
सौ ने अचुक नाडी पकडली होती.

दुकानदार (सौ ला) : आप ही सोच समझ के दे दिजिए.

सौ : नही नही आप ही बताईयें, फायनल भाव.

ब-याच Negotiation नंतर फायनली त्या दुकानदाराने ते लेंग्याचे कापड आम्हास विकले (Read : सौ ने ते तिला पाहिजे त्या किंमतीत घेतले)

दुकानातुन बाहेर पडल्यावर

सौ : अहो, तुम्ही पण ना खरंच, असं कोणि लगेच पैसे देतं का, आणि म्हणे सिनियर पर्चेस ऑफिसर आहात, जरा सुद्धा bargaining करता येत नाही, सांगा तुमच्या ऑफिस मध्ये तुमच्या MD ना मला रिक्रुट करायला, पर्चेस मध्ये, बघा किति फायदा करुन देते तुमच्या कंपनीला.

मी : अगं ते काय लेंगा खरेदी करण्या एव्ह्ढं सोपं असतं का.

सौ : तुम्ही ना, बायको चं जरा सुद्धा कौतुक नाही तुम्हाला.

Happy

आजी हिंदी शेजारणीला: तुमको पता हय, हमारे घर मे इतन्या मुंग्या हुया, इतन्या मुंग्या हुया की क्या बताऊ कितन्या मुंग्या हुया Biggrin

मी दुकानदार भैया ला विचारले "भय्या कप केक है क्या?"
दुकानदार भैया "नही है!"
मी "नही है? तो फिर वो क्या है वहा शेल्फ मै?"
दुकानदार भैया "वो वाटी केक है!"
मी :अओ:!!!

Pages