मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल
::)

सॉलिड....

दक्षिणा.... छान बाफ

माझी आई पण असेच बोलते.
एकदा गॅस वाल्याला फोन वर म्हणाली," कल बोला तो नक्कि लाना हा, घर का चावि शेजारी के पास रखती हु. सारखे सारखे फोन करनेकु नही लगाना."

मी साधारण दहावीत होते तेव्हाची गोष्ट पण कायम लक्षात राहिलेली
आमच्या शेजारच्या काकू अशाच धम्माल हिंदी बोलायच्या.. आम्ही -(आमची आणि शेजारच्या काकूंची फॅमिली)ग्राऊंड फ्लोअर्ला रहात असू, वरती एक प्रभाग समिती कार्यालय होते, त्या कार्यालयाच्या बाल्कनीच्या एक्झॅक्ट खाली म्हणजे आम्हा ग्राऊंड फ्लोअर वाल्यांसाठी वापरायला मोठ्ठी मोकळी जागा होती, तिथे ह्या काकूंची मुलं अभ्यास करत नेहमी.

वरच्या बाल्कनीत रोपटी लावलेली कुंड्यांमधून, त्याला पाणी घातलं की खाली ह्यांच्या पुस्तकांवर उडायचंच... पोरांची किरकीर झाली की, काकूंचा किनरा आवाज, रोज दुपारी...

"अरे, वो वर कौन है रे? का बरं बदाबदा पाणी डालते रोज? इधर नीचे सगळी पुस्तकं भिगतात ना हो!
ओ मामा, ऐकनेको नही आता क्या?... एक तो हमारा शैलेश लाजाळू है, वो नै बोलेगा कितना भी पुस्तक भिगा तो...."

रोज हाच सूर, काकू बोलायला लागल्या की आम्ही खिडकीतून खोखो हसत हसू...

काकू: देखो, हसरे मेरे भाशेको को सब, आता बंद करता का पाणी??

Rofl

.

मी आणि माझी एक मल्ल्याळी मैत्रीण सारख्या एकमेकिनकडे पडीक असायचो..
आणि रात्री उशीर झाला की माझी आई तिच्या आईला फोन करून सांगायची, "उसको बोलो अभी कितना अंधार पडगया, घर नही आने का क्या?"....

परवा माझ्या मोठ्या मावशीच्या मुलीचे लग्नाचे केळवण केले. शेजारच्या साऊथ इंडीयन शेजारणीला हिंदीतून "केळवण" म्हणजे काय हे समजावण्याचा माझ्या धाकट्या मावशीचा हा प्रयत्नः
"हमारे यहापर जिसकी शादी होनेवाली होती है ना उसको और उसके घरवालोंको खाना खिलानेका पद्धत होता है. उस दिन उन्होने कुछ काम नही करनेका, सिर्फ खाने पे डायरेक्ट आ जानेका. और हम सब लोग उनके लिये खाना पकाएंगे और उनको खिलायेंगे. वो लोग उस दिन उत्सवमूर्ती होते है!"

शेजारीणीच्या चेहर्‍यावर करुण भाव. मी अवाक :-०

माझ्या वडिलांची गिर्‍हाईक पटवताना वापरलेली टिपीकल वाक्ये:

१. अरे भाई तुम ये वस्तु एक बार लेके देखो, बहुत अच्छी हय. हम पे भरोसा रखो हम स्वतः इसको घर मे वापरते हय. Proud

२. ये अंघोळीका साबुन है, इससे कपडा-भांडे नही धुने का Lol

आणि आमच्या पुणेरी बॉसची हिंदी :

आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलो की ह्यांचा ऑर्डर मीच देणार असा हट्ट. आणि ऑर्डर देताना आमची हहपुवा! ते वेटरला सांगतात, '' वो पोळी मे ज्यादा घी मत लगाव, उसको बास आता है. और कांदा जरा बारीक बारीक चिरो ना कितना जाडा होता हय Uhoh ''

कॉफी मागवली की हे त्याला सांगणार '' कॉफी मे शक्कर ज्यादा डालो और उसको अच्छे से ढवळो'' Proud

उत्सवमूर्ती.. Rofl
श्रुती काश उर्दू शब्द आहे.. हिन्दीत' भगवान करे,ईश्वर करे..' असा अर्थ आहे..
आता मराठीत तूच ट्रांस्लेट करुन पाहा Happy

आज आमच्या शेजारच्या काकु कचरेवाल्या भाभीला सांगत होत्या

भाभी इधरसे नीट झाडके लेओ ना
सारा कचरा उधरीच आडक्या हुवा होता है

आणि त्याच काकु एक दिवस एका भाभीला सांगत होत्या
अरे वो कौवा हमेशा इधर बेठता है ना तो मेरेको डाळ वाळत घालने को नही आता है
इसलिये मै उसको शुक शुक करके हकल रही थी
Proud

बकरी ईदच्या दिवशी कोल्हापूरातील एका मुस्लिम मित्राकडे जेवणाचे आमंत्रण होते, त्यासाठी आम्ही चौघे गेलो होतो. त्यात एक बंगलोर भागातीलही होता.

अशा सणाच्यावेळी मुस्लिम पद्धतीत एकाच ताटात घरातील पुरुष मंडळी जेवत असली तरी हिंदू निमंत्रितांसाठी स्वतंत्र ताटाची व्यवस्था आवर्जून केली जाते. मात्र या ताटात रश्शासाठी वाटी न देता बिर्याणीलाच उलथण्याने छोटा खळगा पाडून त्यात तो रस्सा वाढला जातो.....या रश्श्याला 'सालना' असे त्यांचे नाव आहे.

जेवण सुरू झाले आणि तो रस्सा त्या बंगलोरवाल्याला काहीसा चवदार वाटल्याने त्याने आमच्या मित्राला 'शायद अलगसे कोई कप मिल जाता तो मै ये करी आरामसे एंजॉय कर सकूंगा....' असे हळूच म्हणाला. यावर त्या मित्राने सरळ 'एका वाटीत याला वेगळा रस्सा द्या...' असे म्हणू शकला असता. पण मुस्लिम घरात आपले हिंदी पाजळताना तो मोठ्याने म्हणाला....

"भाभी, इस्कू सालना ओरपनेका है, एक वाटी देव !"

त्याच्या 'ओरपण्याने' आम्हाला असा काही ठसका लागला की पूछो मत !

अशोक पाटील

घरात नविन water purifier बसवला होता. त्याच्या demonstration साठी कंपनी मधून माणसे एक आठवडा झाला तरी आली नाहित.

आमच्या मातोश्री फोनवर "वो water purifier भिंती के उपर चार दिनसे dead body जैसा पडा है. अब उसको वापस लेके जाओ."

"वो water purifier भिंती के उपर चार दिनसे dead body जैसा पडा है. अब उसको वापस लेके जाओ."

>>>> Rofl

Pages