जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
माझ्या एका मैत्रिणीच्या चुलत
माझ्या एका मैत्रिणीच्या चुलत बहिणीच्या घरी काश्मिरी ब्राम्हण आले होते. त्याना मराठी समजत नव्हते. तिने त्या ब्राम्हणांना जेवायला दिले. तिला त्याना हिंदीत सांगायचे होते, 'लाजू नका, सावकाश जेवा.'
तिने सांगितले. 'शरम तो है नही, खाते जाव खाते जाव.'
"वो वाटी केक है!" >> 'शरम
"वो वाटी केक है!" >>

'शरम तो है नही, खाते जाव खाते जाव.' >>>
वर्षु, अगं ह्याच बाईकडे एकदा
वर्षु, अगं ह्याच बाईकडे एकदा साऊथइनडियन लोक आली होती. तिने सर्वाना खीर खायला दिली. आणि आग्रह करताना म्हणाली, 'वो भांड बहोत उथळ है, इसलीये वो खीर कम हि है!'
हे सर्व वाचताना हसून हसून मी
हे सर्व वाचताना हसून हसून मी खूर्चीवरुन खाली पडायची राहिले.फारच धमाल.
समई, सांभाल ग बाई पडू नको.
समई, सांभाल ग बाई पडू नको. आम्हाला प्रकाश कोण देणार?:हाहा:
अग, माझीही मघाशी तीच अवस्था झाली होती.
हिंदी बोलणार्या पाहुण्यांना
हिंदी बोलणार्या पाहुण्यांना एकदा मी 'या बसा' च्या ऐवजी "या बैठा बैठा" असे म्हटले.
असंच एका हिंदी भाषिक मैत्रिणीला रेसिपी सांगत असताना, 'वो बहोत मत बनाना, अपने ही आंगपर आता है' असं म्हटलं.
या सर्व चर्चेतील सुवर्ण पदक
या सर्व चर्चेतील सुवर्ण पदक विजेता म्हणजे... "आ मेरे अंगपे... ले ले मेरा जीव"... खरच हसुन हसुन जीव जायची वेळ आली....
तेव्हापासुन हे वाक्य बेंचमार्क झालं आहे...
या सर्व चर्चेतील सुवर्ण पदक
या सर्व चर्चेतील सुवर्ण पदक विजेता म्हणजे... "आ मेरे अंगपे... ले ले मेरा जीव"... खरच हसुन हसुन जीव जायची वेळ आली.... हसून हसून गडबडा लोळण तेव्हापासुन हे वाक्य बेंचमार्क झालं आहे...>>>>> अगदी अगदी. नथिंग कॅन बिट इट!
माझा मॅनेजर कुणालातरी
माझा मॅनेजर कुणालातरी रस्त्यासंबंधी सांगत होता...
"हा... व्वो.. अरे वो रस्ता तो बहोत वळवळके जाता है.. तुम वो दारुवाला गलीसे जाव"
माझ्या हिंदी मैत्रिणीला मी
माझ्या हिंदी मैत्रिणीला मी सांगत होते 'आज थंड बहोत है... तुम बाहर 'गिरोगी' (बाहेर पडणे चे शब्दशः भाषांतर) तो पता चलेगा' आणि ती म्हणायला लागली 'पर मै गिरूंगी क्यों, देखकेही चलूंगी'
तुम बाहर 'गिरोगी'...........
तुम बाहर 'गिरोगी'........... हसून हसून खुर्चीवरून 'गिरले;

माझ्या सहकार्यात बिहारी,
माझ्या सहकार्यात बिहारी, गुजराथी, दिल्लीवाले आहेत.
ते मला एकाच क्रियेसाठी अनुक्रमे निकालो, पाडो आणि खींचो म्हणतात.
कुठली क्रिया माहीतीय ? फोटो काढण्याची !
वर्षू... गिरू नको ग बाई....
वर्षू... गिरू नको ग बाई....
धापकन पड्या तो काडकन हात मोड्या आठवलं ही ही ही 
दिनेशदा..भारीच

तुम्ही फोटो निकालता का मग?
नैनितालचा मुक्काम आटोपला
नैनितालचा मुक्काम आटोपला होता, क्वॉलिस गाडीत बाकीचे मित्र बॅग्ज भरत होते. ज्याच्याकडे पैशाचे व्यवहार दिले होते तो हॉटेलचे बिल देण्यात मग्न असतानाच लोकल गाईड त्याला म्हणाला, "बाबु जी, जल्दी आ जाना. मुझे भी दुसरा कॉल है |" यावर मित्र त्याला उत्तरला, "काळजी नही करनेका, बिल भगाकर आत्ता हूं".
हे 'भगाकर' म्हणजे काय याचे त्या बिचार्या गाईडला काहीच आकलन झाले नसल्याने तो 'कॉल कॉल' करतच राहीला.
तुमको पता हय, हमारे घर मे
तुमको पता हय, हमारे घर मे इतन्या मुंग्या हुया, इतन्या मुंग्या हुया की क्या बताऊ कितन्या मुंग्या हुया >>>>>>>>>>>>>>>>>>हहपूवा
आमच्या आईसाहेबांचा हा
आमच्या आईसाहेबांचा हा किस्सा...
एकदा सिमला-कुलु-मनाली ला गेली असताना फायबर ची खेळणी विकणारा एक विक्रेता तिला भेटला...
तो स्वतःच्या खेळण्यांची अॅड करत होता कि ती किती मजबूत आहेत..आणि १० फुट उंचीकरुन फेकली तरी कशी फुटत नाहीत वगैरे....त्याने १-२ खेळणी फेकुनही दाखवली..
शेवटी आईला म्हाणाला की "बेहेनजी आप खुद फेकके देखिये ना"
तर आमच्या माताजी स्वतःच्या उच्च हिंदीत त्याला म्हणतात कशा...
"तुमने टाका तो नाही फुट्या पर हमने टाका और फुट्या तो ? "
खेळणीवाल्यासकट सगळे या हिंदीच्या मार्याने गार झाले...
हा व्हिडो बघा. विजय
हा व्हिडो बघा. विजय पाडळकरांचे हिंदी तितके वाईट नाहीये, पण त्यानंतर गुलझारना ऐकले की अस्सल हिंदी म्हणजे काय ते कळते. आणि नंतर परत पाडळकर बोलतात तेव्हा कानात कापूस घालावासा वाटतो. (अमिताभ हेमाची बडबड ऐकून शोलेमध्ये घालतो तसा. - तुम्हारा नाम क्या है बसंती? :फिदी:)
http://youtu.be/t4cYLJ9UeEI
दक्षे, पहिली २ च पानं वाचली
दक्षे,
पहिली २ च पानं वाचली आणि हसून हसून पुरती वाट लागली. आता २/३ दिवसांनीच पुढचं पान वाचीन. अशक्य आहे हे!!!!! धम्माल............
>>आ मेरे अंगपे... ले ले मेरा
>>आ मेरे अंगपे... ले ले मेरा जीव>> हे अशक्य आहे.
हे प्रत्यक्षात घडलेले किस्से
हे प्रत्यक्षात घडलेले किस्से आहेत. माझ्यासमोर नाही, पण अपरोक्ष. मित्राच्या वडिलांचं हिंदी लई भारी!
१#.
अपरिचित माणूस : यह ७ नंबर बिल्डिंग कहा है?
मि.व. : वो जो पानी तुंब्या है ना, वहा से वळवळ के जाव.
२#.
चणेवाला : चना ले लो भाईसाब.
मि.व. : वो मक्कड का खाना हमे पसंत नाही. (ते माकडाचं खाणं मला नाही आवडंत.)
आमचे घरमालक एकदा फोन वर एका
आमचे घरमालक एकदा फोन वर एका हिन्दी भाषिक मुलिला....
" अभी इधर मत आओ, बहोत मुसळधार पाउस गिर रहा है"........
आणी घरमालक काकु भाजीवल्याला.......
"कैसा बटाटा दिया, शीजता हि नही है..... "
आपण मराठीत एखाद्या गोष्टीचा
आपण मराठीत एखाद्या गोष्टीचा भाव विचारायचा असेल तर म्ह्णतो ना "कितीला पडली?" तसं माझ्या बाबांनी एकदा एका अमराठी मित्राला विचारलं होतं "ये घर आपको कितने मे गिरा"
तुम उस झाड के नीचे थांबो, हम
तुम उस झाड के नीचे थांबो, हम ताबड्तोब आता है...
माझ्या एका मैत्रीणीचं जबरदस्त
माझ्या एका मैत्रीणीचं जबरदस्त हिंदी :
"भैय्या वो उस का रस देना" (ऊसाचा रस)
नशीबाने ती ऊसाच्याच रसाची गाडी होती. नाहीतर त्या भैय्याने विचारलं असतं "उसका मतलब किसका रस चाहीये"
आमच्या एका फॉमिली मित्राची
आमच्या एका फॉमिली मित्राची हिन्दी तेहि एका पठाणा बरोबर... आज इतना पाऊस गिरया.....थेंबे थेंबे सर्व भर गया....तो पठाण पन मान डोलवत होता त्याला पाउस काय कळला कोण जाणे
माझी आई एकदा एका मुस्लीम
माझी आई एकदा एका मुस्लीम स्त्री शी बोलतांना...
स्त्री--- कहॉ जा रहे हो!!!
आई--- अकोला
स्त्री---मकान है आपका वहॉ?
आई---हा..हमारा घर आता बांधना चालु है... तभी हम वहॉ राहायला जाऊ!
एकदा मला आणि नवर्याला एका
एकदा मला आणि नवर्याला एका काकुंनी जेवायला बोलावलं होतं. त्यांचा नवर्यासोबतचा संवादः
काकू: तुमको दाल डालू क्या? (तुला वरण वाढू का?)
नवरा: हॉ चलेगा, थोडा देना.
काकू: हॉ थोडा ही दाल डालती हूं नही तो तुम डाल दोगे
नवरा डाल्-डाल्-दाल मध्ये एकदम कन्फ्युज होऊन गेला.
.<<.हमारा घर आता बांधना चालु
.<<.हमारा घर आता बांधना चालु है... तभी हम वहॉ राहायला जाऊ!<<
(No subject)
ट्रेन मध्ये एकाने माझ्या
ट्रेन मध्ये एकाने माझ्या मित्राच्या पायावर पाय दिला.
मित्र : पैर हटाओ. कल लगती है.
Pages