भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
आज फिल्डिंग बरीच सुधारलेली
आज फिल्डिंग बरीच सुधारलेली दिसतेय. खरं तर पूर्ण संघाची कामगिरी आज पुष्कळच सुधारलेली आहे. आजचा सामना हा टर्निंग पॉईंट ठरून भारताची कामगिरी उत्तरोत्तर सुधारावी, हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!
तिकडे इंग्लंडही पाकड्यांविरूद्ध सुधारलेले दिसताहेत. पाकड्यांची सर्वबाद ९९ अशी हालत केल्यावर इंग्लंडने ६ बाद १०४ अशी बर्यापैकी कामगिरी केली आहे.
उद्या सकाळी
उद्या सकाळी ऑस्ट्रेलियाविरूद्ध मेलबोर्नला पहिला एकदिवसीय सामना सकाळी ८:५० पासून (भाप्रवे) आहे. कसोटी सामन्यांच्या तुलनेत भारत निश्चितच चांगली कामगिरी करणार अशी माझी श्रद्धा आहे. तिरंगी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविण्यासाठी ८ पैकी किमान ४ सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताने श्रीलंकेविरूद्धच्या ४ पैकी ३ व ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ४ पैकी किमान १ सामना जिंकणे आवश्यक आहे. श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत व कसोटी मालिकेत नुकताच पाकिस्तान व द. आफ्रिकेविरूद्ध पराभव स्वीकारला. पण द. आफ्रिकेविरूद्धच्या शेवटच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात ३००+ धावांचा यशस्वी पाठलाग करून त्यांनी सामना जिंकला. त्यामुळे तो संघ स्थिरावताना दिसत आहे. भारताची कायम डोकेदुखी ठरलेला महिला जयवर्धने गेले काही महिने संपूर्ण फ्लॉप आहे. एकंदरीत ही मालिका खूप चुरशीची होईल असे वाटते.
उद्याच्या सामन्यात झहीर व सचिन नक्की आत येणार. तसेच यादव/पठाण यापैकी एकजण आत येईल. त्यामुळे विनयकुमार व जडेजा/राहुल शर्मा/अश्विन या तिघांपैकी दोघांना बाहेर जावे लागणार. झहीर, सचिन व यादव ला घेऊन विनयकुमार, राहुल शर्मा व अश्विन यांना बाहेर ठेवावे. राहुल शर्माला आत घेऊन रोहीत शर्माला बाहेर ठेवण्याचा प्रयोगही करता येईल. कदाचित यादव ऐवजी पठाणला घेतल्यास त्याचा फलंदाजीलाही उपयोग होईल.
आत्तां तरी कांहीं आडाखे
आत्तां तरी कांहीं आडाखे बांधण्याचा धीर होत नाही ; एक दोन सामन्यातली तिन्ही संघांची कामगिरी पाहिल्यावर मग तोंड उघडावं, हें उत्तम. उगीचच तोंडघशीं पडायला नको !
[ तरीही, राहवत नाही म्हणून -
सध्यां ऑस्ट्रेलियात आपली फलंदाजी अजिबात टिकाव धरत नाही आहे, हें स्पष्ट आहे. पहिल्या कांही सामन्यांत तरी कोहली, रैना, सेहवाग व सचिन इ. फलंदाजांचा अर्धवेळ गोलंदाज म्हणून, व जडेजाचा तथाकथित 'ऑलराऊंडर' म्हणून गोलंदाजीसाठी अधिकाधिक वापर करून फलंदाजांचा भरणा करण्याशिवाय पर्याय दिसत नाही. 'ऑफस्पीन' हा ऑसीजचा पारंपारिक कमजोर दुवा समजला जात असला तरी अश्विनला कांही त्याचा लाभ उठवतां आलेला नाही. इतर नियमित गोलंदाजही फारसा प्रभाव पाडूं शकलेले नाहीत . त्यामुळे, तीन नियमित गोलंदाज [३० षटकं], जडेजा व इतर फलंदाज/अर्धवेळ गोलंदाज [ २० षटकं] आणि धोनी असाच संघ सुरवातीला तरी खेळवला जाईल ,असं वाटतं ]
अर्थात, भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा व तिरंगी मालिका चुरशीची व रंगतदार व्हावी ही इच्छा.
मास्तुरे, टीम निवडीचे तुमचे
मास्तुरे, टीम निवडीचे तुमचे अंदाज साफ चुकलेले आहेते... फक्त सेहवाग ऐवजी सचिन एवढाच बदल केला आहे....
भारताने चार गोलंदाज व सात
भारताने चार गोलंदाज व सात फलंदाज [जडेजा धरून] खेळवलेत. झहीर व सेहवागला वगळणं जरा आश्चर्यकारक [खरीं कारणं नाही कळलीं]. दोन फिरकी गोलंदाज [ शर्मा, अश्विन ] खेळवणंही जरा वेगळा प्रयोग; मी लेग-स्पीनचा कट्टा पुरस्कर्ता असल्याने शर्माबद्दल आनंद पण अश्विनबद्दल जरा साशंक. आपली फलंदाजी अजून रंगात आली नसताना नाणेफेक जिंकून ऑसीजना प्रथम फलंदाजी दिलीय हें योग्य ठरेल का? कीं, फलंदाजी घेऊन फलंदाजाना समोर कोणतंही लक्ष्य न ठेवतां मोकळेपणे खेळायची व 'फॉर्म'मधे येण्याची संधी देणं अधिक योग्य झालं असतं ?
कीं, मीं माझ्या शहाणपणाचं प्रदर्शन थांबवून प्रत्यक्ष सामन्यावर लक्ष केंद्रित करणंच अधिक योग्य ?
ऑस. २३- २. दोन्ही विकेट विनय
ऑस. २३- २. दोन्ही विकेट विनय कुमारला !!
ईथे आजचे वेदर लई बेक्कार आहे!
ईथे आजचे वेदर लई बेक्कार आहे!
<< ईथे आजचे वेदर लई बेक्कार
<< ईथे आजचे वेदर लई बेक्कार आहे! >> प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासारखे कांही निर्णय यामुळेच घेतले असावेत .
पाऊस आलाच !!!!
आज सामना पूर्ण होण्याची
आज सामना पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मेलबोर्नला रात्री ११ पर्यंत पाऊस थांबण्याची अजिबात शक्यता नाही. सामना पावसामुळे अनिर्णित होणार बहुतेक.
>>> मास्तुरे, टीम निवडीचे तुमचे अंदाज साफ चुकलेले आहेते... फक्त सेहवाग ऐवजी सचिन एवढाच बदल केला आहे....
अगदी. आजचा संघ बघून जोरदार धक्का बसला. विनयकुमार संघात, झहीर खान व यादव दोघेही संघात नाहीत, सेहवाग बाहेर व चक्क ३ मुख्य फिरकी गोलंदाज आतमध्ये(अधिक रैनाची कामचलावू फिरकी गोलंदाजी) ही निवड धक्कादायक आहे. पण विनयकुमारने दोन बळी घेऊन आपली निवड योग्य ठरविली. पण पावसामुळे त्याच्या कामगिरीवर पाणी फिरणार बहुतेक.
<< ही निवड धक्कादायक आहे. >>
<< ही निवड धक्कादायक आहे. >> मास्तुरेजी, विचित्र हवामान हेंच कारण !!
>>> << ही निवड धक्कादायक आहे.
>>> << ही निवड धक्कादायक आहे. >> मास्तुरेजी, विचित्र हवामान !!
कदाचित पावसाचा अंदाज घेऊन आपल्याला बहुतेक २० षटकांचाच सामना खेळायला लागेल अशा अपेक्षेने धोनीने ट-२० चाच संघ जवळपास कायम ठेवला असावा.
पहिला सामना हरून एकदिवसीय
पहिला सामना हरून एकदिवसीय मालिकेची भारताने अपेक्षेप्रमाणे दणदणीत सुरूवात केली. सेहवाग, झहीर खान व उमेश यादवला बाहेर ठेवल्यावर, दिवसरात्रीच्या सामन्यात नाणेफेक जिंकूनसुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर, प्रवीणकुमार सारख्या मंद हालचाली करणार्या खेळाडूच्या हातात चेंडू असताना सुद्धा २-२ धावा आरामात निघत असताना, सचिन/गंभीर इ. नी पूर्ण निराशा केल्यावर आणि अश्विन व जडेजा यांनी जबरदस्त गोलंदाजी केल्यावर, यापेक्षा दुसरा कोणताच निकाल लागणे शक्य नव्हते.
आयपीएल लिलावात १० कोटी रूपयांना विकत घेतलेल्या जडेजाने २.४-०-४१-० अशी जबरदस्त गोलंदाजी करून त्याला विकत घेणार्यांना फेफरं आणलं असणार. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या डावातला फक्त शेवटचा चेंडू टाकायचा शिल्लक असताना त्या चेंडूवर आधी वाईड, नंतर नोबॉल व त्यावर पळून काढलेली एक धाव आणि त्यावर कळस म्हणजे नोबॉलमुळे द्याव्या लागलेल्या फ्रीहीट साठी फुल्टॉस टाकून षटकार मारण्याची संधी देणार्या जडेजाचे कौतुक करावे तितके थोडेच!
आपल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातल्या अश्विनच्या गोलंदाजीवर डोळे झाकून विश्वास टाकणार्या धोनीचे अभिनंदन! अश्विनने ५-०-४८-० अशी जबरदस्त कामगिरी करून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविल्याबद्दल त्याचे पण अभिनंदन! एका षटकात ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्टपिच टाकून त्यावर षटकार बसला तरी त्यामुळे डगमगून न जाता पुढचा चेंडू अजिबात वेगळा न टाकता अगदी तस्साच टाकून तशाच शॉटवर फलंदाजाला चौकार मारण्याची संधी देणार्या अश्विनचे कौतुक वाटते.
परवा भारताने दुसर्या ट-२० सामन्यात आपला जो खेळ उंचावला होता, तो त्याच दिवशी होणार्या आयपीएल च्या लिलावावर नजर ठेवूनच उंचावला होता, असे कुशंका घेणार्यांचा निषेध!
हमको तो ये आदत नही है, फिरभी
हमको तो ये आदत नही है, फिरभी हम कुछ नही कहते !!
अरेरे.... तरुण रक्तानेही
अरेरे.... तरुण रक्तानेही निराशाच केली
मास्तरा, इतक्या मोठ्ठ्या व
मास्तरा, इतक्या मोठ्ठ्या व सखोल विवेचनाबद्दल कौतुक व अभिनंदन! मी मॅच आहे तेच विसरलो होतो पण तुझ्या विवेचनामुळे काय झालं ते समजलं. धन्यवाद!
ये रे माझ्या मागल्या
ये रे माझ्या मागल्या
रिडीफ.कॉम वर डीन जोन्सचा या
रिडीफ.कॉम वर डीन जोन्सचा या भारतीय संघावर एक अप्रतिम विश्लेषणात्मक लेख आहे,जरूर वाचावा असा. -
http://www.rediff.com/cricket/slide-show/slide-show-1-australia-tour-ind...
>>> मी मॅच आहे तेच विसरलो
>>> मी मॅच आहे तेच विसरलो होतो
नशीबवान आहेस! आमचं कुठलं एवढं भाग्य?
चांगला लेख आहे तो. पण त्यात
चांगला लेख आहे तो. पण त्यात नवीन असे काही नाही. पण परदेशात परत परत जोन्स म्हणतो तेच अंडरस्कोअर होते. बिसिसीआय काही तरी शिकेल का? मला नाही वाटत. आता तर आयपीएअल फिवर जोर धरू लागला आहे, मग तर काय कुठला सिंह (वल्डकप चॅम्पस) अन कुठले सिंहावलोकन.
<< बिसिसीआय काही तरी शिकेल
<< बिसिसीआय काही तरी शिकेल का? >> केदारजी, मला नेमकं हेंच म्हणायचंय. एक ऑसी इतक्या अभ्यासपूर्वक भारतीय संघाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करतो, दूरदृष्टी ठेवून उपाययोजना सुचवतो [ ती चूक वा अचूक आहे, हा मुद्दा नाही] पण तसं कांहीही विचारमंथन किंवा योजनाबद्ध कार्यवाही आपल्याकडे होतेय असं कधीही वाटत नाही ! कदाचित , म्हणूनच जिंकण्या/ हरण्याबाबत त्यांच्याकडे आपल्यासारख्या टोंकाच्या प्रतिक्रिया उसळून येत नसाव्यात !!!
त्याने लिहीलेले योग्य आहे, पण
त्याने लिहीलेले योग्य आहे, पण लेखाचा टोन मला भावी कोच चा रोल पुढे ठेवून लिहील्यासारखा वाटला
इंग्लंड सुध्दा हारला...3—0
इंग्लंड सुध्दा हारला...3—0 ने.....त्यावर कधी लिहीणार जोन्स...?
<< भावी कोच चा रोल पुढे ठेवून
<< भावी कोच चा रोल पुढे ठेवून लिहील्यासारखा वाटला >> असेलही ! पण त्यासाठी अभ्यासपूर्वकच बारकाईने तयारी करतोय, हेंही नसे थोडकें !!!
आज आतापर्यंत तरी भारताने
आज आतापर्यंत तरी भारताने चांगली गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केलं आहे. सेहवाग आणि झहीरला आत आणून मागच्या सामन्यातली चूक अंशतः सुधारली. पण यादव अजूनही बाहेर आहे आणि राहुल शर्माला बाहेर ठेवून अश्विनला अजून एकदा खेळविणे हे लॉजिकच समजत नाहीय्ये. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर यादव नक्कीच फायदेशीर ठरला असता.
<< राहुल शर्माला बाहेर ठेवून
<< राहुल शर्माला बाहेर ठेवून अश्विनला अजून एकदा खेळविणे हे लॉजिकच समजत नाहीय्ये. >>लेग-स्पीनविषयीं अविश्वास व अनास्था आणि काय ! आजचा संघ गावसकरने सुचवल्यानुसार [ गंभीरचं वगळणं सोडून] आहे, अश्विन ही सुद्धा त्याचीच शिफारस आहे ! -
"Why do we need to change the order of Sehwag, Tendulkar and Gambhir? That (order) won the World Cup," he told NDTV.
Gavaskar said he wants three seamers and one spinner in Ravichandran Ashwin on the Perth wicket in India's second tri-series match against Sri Lanka .
"I would prefer three seamers and Ravindra Jadeja bowling, besides Ashwin. Ashwin though looked tired and jaded in the first match. But if he is fit he should be there in the team," said Gavaskar.
Sri Lanka 183/5 (42.1
Sri Lanka 183/5 (42.1 ov)
India
Sri Lanka won the toss and elected to bat
Sri Lanka RR 4.33
Last 5 ovs 28/1 RR 5.60
Refresh scorecard
Current time: 15:11 local, 07:11 GMT ODI career
Batsmen Runs B 4s 6s SR This bowler Last 5 ovs Mat Runs HS Ave
*Angelo Mathews (rhb) 2 6 0 0 33.33 0 (0b) 2 (6b) 64 1243 77* 31.87
Dinesh Chandimal (rhb) 61 77 4 0 79.22 17 (25b) 17 (16b) 23 712 111 39.55
Bowlers O M R W Econ 0s 4s 6s This spell Mat Wkts BBI
एक बेजबाबदार फटका मारण्याच्या
एक बेजबाबदार फटका मारण्याच्या नादात सेहवाग पुन्हा बाद ! श्रीलंका - २३४; भारत - १९-१.
>> एक बेजबाबदार फटका
>> एक बेजबाबदार फटका मारण्याच्या नादात सेहवाग पुन्हा बाद
हे पिवळं पीतांबर, गाईचं गोमूत्र सारखं नाही वाटत का कुणाला?
आज तेंडल्याची सेंचुरी होणार
आज तेंडल्याची सेंचुरी होणार फायनली!
तेंडल्या ४८ वर गुल! फार लवकर तोंड उघडलं की असं होतं बरं का रे मास्तरा!
हे पिवळं पीतांबर, गाईचं
हे पिवळं पीतांबर, गाईचं गोमूत्र सारखं नाही वाटत का कुणाला?>>>
आपल्या लोकांच्या कपड्यांवरचे 'सहारा' चे लोगो तसेच आहेत. ते काढणे (आणि पुन्हा दिलजमाई झाली की लावणे) जास्त त्रासाचे आहे म्हणून सध्या आहे तसेच ठेवा सांगितलेले दिसते
Pages