युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खजूराच्या लाडवांना विस्तव हवा>> ह्म्म.. बरोबर आहे.
मग दुसरे अजुन काय करता येईल?

फ्रुट सलाड नको सांगितल्याने मोठीच पंचाईत झालीये Sad

फ्रिज केक सारख आण्खी काही?
किंवा खवा वगैरे वापरुन मोदक, पेढे सारख काही?

मी_चिऊ, No flame recipes किंवा no fore recipes असा गूगल सर्च करा. चिक्कार पर्याय मिळतील.

चिऊ, फ्रुटस strictly NO NO आहेत का? थोडीशी चालणार असतील तर - हे क्विक, चुकुनही न फसणारं आणि आकर्षक डेझर्ट चालेल का? खरं तर रेसिपी नाहीच. परिक्षकांना गंडवणं आहे.

माझ्या घरी या ३१ डिसेंबरला मोठे आणि लहानांमधे खुप हिट्ट झालेलं हे डेझर्ट. खुप सारी कट फ्रुटस (अगदी कलरफुल अशी) फ्रीजमधे तयार ठेवली होती. ऐनवेळी कट फ्रुट्स त्यावर कयानीचा प्लेन केक ( छान गोल कट करुन) मग त्यावर वॅनिला आइसक्रीमचा लेअर आणि वर थोडी फ्रुटस, चेरीज, स्ट्रॉबेरीज गार्निशिंगसाठी. केकमधे आइसक्रीम मस्त शिरुन दोन्ही अजुनच यम्मी लागत होतं. फ्रुटसपण आइसक्रीममुळे मस्त लागली.

No flame recipes >> तेच बघत आहे..

स्वाती, बघते याही रेसिपी.

फ्रुटस strictly NO NO आहेत का>> नाही, फक्त फ्रुट सलाड नकोय, फ्रुट्स चालतील.
वाचताना तर छान वाटतेय, बघते करुन Happy

किती जणांसाठी बनवायचे आहे डेझर्ट ?
४-६ लोकांसाठी असेल तर
क्लीअर प्लास्टिक किंवा काचेचे मार्टिनि ग्लासेस , ३ कप स्ट्राबेरी चिरुन, त्यावर थोडी ब्रँडि, थोडी साखर शिंपडून.

३ कप फ्रेश क्रीम - त्यात पण थोडी ब्रँडी + साखर मिसळून.
क्लीअर ग्लासेस मधे स्ट्राबेरी / क्रीमचे दोन दोन थर आलटून पालटून लावायचे . शेवटी स्ट्राबेरीचा जूस ड्रिझल करायचा अन एकेक पुदिन्याचे पान ठेवायचे प्रत्येक ग्लास मधे.

--------------
लॉरा इंगाल्स वाइल्डरच्या पुस्तकातून एक रेसिपी
मोलॅसेस कँडी. बाहेर बर्फ पडला की त्यावर मोलॅसेस ( काकवी ) वेगवेगळ्या शेप्स मधे ओतायची. काही मिनिटातच ती कडक होते. मग बर्फावरून सोडवून ती कडक / कुरकुरीत झालेली मोलॅसेस कँडी गट्टम करायची.
उसाच्या रसवाल्याकडून मोठा बर्फाचा तुकडा आणून त्यावर करु शकता.
कडबोळे, प्रेट्झेल ( इंग्रजी ८ च्या आकारात ) वगैरे करु शकता.

माझ्याकडे हरभरा आणि मेथीची वाळवलेली पाने आहेत. त्यात काही पाने/काड्या च्या इथे पांढरे काहीतरी दिसते आहे ती बुरशी असेल का?
बाकी सगळी पाने हिरवी आहेत. साधारण २ कीलो तरी असेल ती भाजी जर ती बुरशी असेल तर मला सगळी भाजी फेकुन द्यावी लागेल का?
काय करु कोणी सांगु शकाल का प्लिज.......

माझ्या मिस्टरांनी काल खवा आणून दिला. त्यांच्या ऑफिसमधेच तीन दिवस तसाच विसरून राहिला होता.
काल मी तो जरा गरम करून फ्रीजमधे ठेवला. वास येत नाही, असं साबा. म्हणाल्या. मी त्याचे काय काय पदार्थ करू शकते ? मी प्रथमच खव्याचे काहीतरी करणार आहे . Happy

ग्लासला खाली जॅम लावून घ्या. फ्रुट्स (आंबा, ऑरेंज,चिकु,अ‍ॅपल इत्यादी) त्यावर कोणत्याही दोन फ्लेव्हरच आईसक्रीम स्कुप (रोझ +पिस्ता माझ फेव्हरेट आहे. चॉकोलेट +व्हेनिला पण मस्त लागत. ), त्यावर जेलीचे तुकडे, चेरी (रिअल चेरी नव्हे. आपल्याकडे ते फ्रुट ब्रेड मध्ये असतात ते), सजावटीला बदाम्,काजु. आणि सगळ्यात वरती केक आणि वेफर्सचा तुकडा. हेव्ही होत. पण क्लास लागत. फ्रुट्स मध्ये अ‍ॅक्च्युअली कस्टर्ड मिल्क घालतात. पण तुम्ही नाही घातलत तरी चालेल. तयारी करुन नेलीत तर ५-१० मिनिटात तयार.

कोल्हापुरच्या सोळंकी वाल्याकडे जे कॉकटेल मिळत ते अस असत. अर्थात आपण केल तरी ती चव येण अशक्य आहे. पण एक वेगळा पदार्थ म्हणुन सगळ्याना आवडत.

धन्स चिनुक्स, मला खरं तर खव्यामधलं काहीच कळत नाहि. त्यामुळे द्विधा मनस्थितीत होते.

No flame recipes :>>>>>>:लिंबु सरबत बनव आने जुस च्या नावे खपव Wink

nirmayइ>>>>>>>>>>>>>> तेवढीच पाने काढुन टाक , मेथिचि पाने सुकव्व......

ग्रेव्ही करताना वापर घट्ट होते ग्रेव्ही

प्रितिभुषण वाळवलेलीच तर पाने आहेत. बारीक चुरा केलेला आहे त्याचा.
प्लिज सांगाना काय करु सगळे फेकुन च द्यावे लागेल का?

१जास्त आहेत तर तशीच प्लास्टीक च्या पिशवित बाण्धुन थेव जेवा ग्रेव्हि कर्शील तेवा घेत जा,

२घर्च्य घरइ शेक शेगदि करत आसशिल तर तशी खपव

३एका कपड्याच्या पिशवीत भरुन लोड म्हणुन वापर

मधाच्या चविचे कॉर्नफ्लेक्स(खुप चिवट व बेचव आहेत ,केलॉग्स चे नाहित) संपवण्यासाठी काहि युक्ती ?

बेकिन्ग पावडर व सोडा अश्या दोन पुड्या फ्रिजमधे आहेत बर्‍याच दिवसांपासून पण आता कोणती पुडी कसली हेच समजत नाहीये..कसे ओळखायचे? काही युक्ती आहे का त्यासाठी ?

जयु... मिक्सर मधुन कॉर्नफ्लेक्स काढ. तो चुरा कटलेट्स, घावण, थालीपिठ यात वापर. खजुराच्या लाडवात हि तो चुरा टाकता येईल.
माझ्याकडे उड्दाचे पिठ आहे...जुने आहे. काल त्याचे मेदुवडे केले. पण जरा कडवट लागले....आता त्या पिठा चे काय करु? कि टाकुन देउ?

विद्याक, ज्वारीच्या किंवा गव्हाच्या पिठात (तीनास एक या प्रमाणात ) मिसळून एकदोन भाकर्‍या करुन बघा. त्याही कडवट लागल्या तर पिठ वापरु नका.
ते पिठ भाजून वड्या, लाडू करता येतील. पण कडवट असल्याच नकोच.

स्वस्ति, आंबट द्राक्ष्याची भाजी किंवा सरबत करता येईल.

मला सांगा, आप्पे आधी करून ठेवले, आणि खायला देतेवेळी मावेत गरम करून दिले तर चिवट लागतात का?

मंजुडी ,चिवट लागतील्..पण एका वाटीत थोड्याशा तेल- पाण्यात एकदा बुडवुन नंतर मावेत झाकण ठेवुन[मावेच्या भांड्यात चमचाभर तेल पाण्याचे मिश्रण घाल] गरम केलेस तर छान ताजे ,मऊ आप्पे मिळतील.

मंजुडी ,हो झाकुन ठेवायचे..आप्पे इडलीपेक्षा कोरडे असतात्..म्हणुन ते छान भिजवुन अन मावेच्या भांड्यात थोडे से पाणी घालुन झाकण ठेवुन गरम करायचे..मधे एकदा मावे बंद करुन चमच्याने ढवळुन्[वर खाली करुन म्हणजे पाणी सगळीकडे लागते व ओलसर रहातात्..]पुन्हा एकदा गरम करावे..समजा एक मिनिटासाठी ठेवले तर अर्ध्या मिनिटानंतर ते वर्-खाली करुन पुन्हा ठेवायचे..तेल पाणी असल्याने अगदी पाणचट लागत नाही..

Pages