युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिवा, तुम्ही फक्त उ. भाजणीची थालीपीठं केली होती का ? ती खरंच नाही चांगली लागत. त्याऐवजी उ. भाजणी वाटीभर + भिजवलेला साबुदाणा वाटीभर + उकडलेला बटाटा किसून/कुस्करुन दीड-दोन वाट्या + अर्धी ते पाऊण वाटी दाण्याचं कूट + मीठ, चवीला साखर, लिम्बुरस आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हे सगळं जरुरी पुरतं पाणी घालून मळून घेउन थालीपीठं लावून पहा. खूपच टेस्टी होतात.

मधाच्या चविचे कॉर्नफ्लेक्स(खुपच चिवट व बेचव आहेत ,केलॉग्स चे नाहित) संपवण्यासाठी काहि युक्ती ?

शुगोल, नाही नाही नुसती नव्हती केली. वरचं तुम्ही लिहिलेलं सगळं घालून...(साबुदाण्याशिवाय माझं काय होतय... :)) नेहमी तशीच करते. पण ही भाजणी जरा चिकट-चिवट आहे. खुसखुशीत नाही होतेत थालिपिठं... म्हणून...

तुप कसं ओळखायच?
दारावर तुप विकायला आलेल्या बाईला आई ने घालायला साडी दिली तिच्याकडे नव्हती म्हणून तर त्या बाईने पाव किलो तुप दिले आईला पैसे न घेता. ते तुप पिवळ्या रंगाचे आहे आणि वास ही येतोय तुपाचा. पण पप्पा नको वापरु बोलतात ते बोलले खराब असेल किंवा भेसळ असेल. आईला ते टाकून देण जड होतयं. कसं ओळखायचं ?

ओळखायचे कसे ते नाही माहीत, पण ते तुप दिव्याला वापरता येइल की, किंवा लाडु करता येतील कसलेही पीठ त्यात भाजुन, भाजल्यावर त्याच्यातील भेसळीचा परिणाम (असली तर) कमी व्हावा माझ्या मते...

असं दारावर विकत घेतलेलं तूप एकतर खूप जुनं असतं शिवाय त्यात डालड्याची भेसळ असू शकते. माझ्यामते न खालेल्लं बरं तरिही एकदा त्या तूपाला चांगला चटका देऊन मग निर्णय घ्यावा. अगदी टाकवत नसेल तर लीनास च्या म्हणण्याप्रमाणे दिव्याला आणि कणिक वगैरे मळताना २-२ चमचे वापरून संपवायला हरकत नाही.

मला नीर डोसा ची रेसिपि हवी आहे. कोणी देऊ शकेल का?

व्हीटफ्लेक्स उरले आहेत, गहु दळताना त्यात टाकले तर पीट चान्गल लागेल का?

ती बाई रोज तूप विकते का तुमच्या एरीयात. मग कोणी घेणारे असतीलच त्या एरीयात? त्यांनाच अनुभव विचारा तूपाचा.

माहीती नसताना खाणं चुकीचेच. सरळ दिव्यात वापरा. पण देवाला सुद्धा असे दिवे नसते लावायचे ते टाकून द्या. अपाय होण्यापेक्षा हे बरं नै का?

काल तिळगुड केला पण वड्या निट पडल्या नाहियेत, मिश्रण पातळ झालय बहुतेक, मग सकाळे थोडं घट्ट होईल अशा अपेक्षेने ताट तसंच ठेवल, आणि वड्या मोडून लाडू वळले, पण ते सगळे लाडू आता पातळ झालेत... पुन्हा मिश्रण झालय.
नक्की काय कमी/जास्त झालं असावं? Uhoh
चिक्कीचा गुळ उपलब्ध न झाल्याने पाव किलो आपला नेहमीचा गुळ वापरला होता.

वेफर्स चे बटाट्याचं काय करता येइल? ते आतमधुन थोडे लालसर आहेत.
वेफर्स नाही करता येणार कारण सुकण्याचा प्रश्न आहे. आजुबाजुला इमारतीची बांधकाम सुरु असल्याने बरीच धुळ असते.

चिवा, चटणी कशी करतात माहित नाही. ती पावडर एक चमचा दुधामध्ये किंवा सॅलडवर भुरभुरुन खावी. चांगली असते शरीरासाठी. (फु.स. बद्दल माफी)

दक्षिणा, पांढरे तीळ आणि शेंगदाणे चांगले भाजून त्याची पावडर करून त्या गार मिश्रणातच एकेक चमचा मिसळ. थापण्याजोगं मिश्रण झालं की वड्या थाप. मिश्रण गरम करू नकोस, गूळाचा पाक होऊन वड्या/लाडू चिकट होतील.

वेफर्स चे बटाट्याचं काय करता येइल? ते आतमधुन थोडे लालसर आहेत.>
वेफर्स च बनव. सुकवायची गरज नाही. वेफर्स ची स्लाइस काढली की लगेच मिठाच्या पाण्यात टाक मग जरावेळाने गाळुन घेउन तसेच तळुन घे.

फिंगर चिप्स करा..... बटाट्याच्या लांबलचक फोडी कापा.. त्यात मीठ, हळद आणि तेल घाला. कालवा आणिमंद आचेवर भांडे झाकून ठेवा.. साधारण दहा मिनिटानी फोडी भाजल्या- फ्राय केल्या- शिजल्या जातील . करपल्या कच्च्या राहिल्या कशाही झाल्या तरी चांगल्याच लागतील. Happy नंतर चाट मसाला भुरभुरवा आणि खावा... अधून मधून भांडे हलवून फोडी परतवा.. झाकणातले पाणी त्यातच पडू द्या. मस्त शिजतील.

उद्या मी सांडगे/वाळवलेले वडे करणार आहे. पण आत्ताच मला माझ्याकडे वाळवणाचे प्लॅस्टिक नाहीये असा साक्षात्कार झालाय!
तर ते वडे स्टीलच्या ३-४ ताटांत वाळवायला ठेवले तर चालेल का? म्हणजे वाळल्यावर ते वडे निघुन येतील का?

तेच तर पहिले शॉपिंग कर मग ब्यागा येतील त्या कापून वापर. Happy

पार्मेजिआनो रेजिआनो चीज कसे स्टोअर करायचे? फ्रिज मध्ये ठेवले तर जरा जास्त दगड होतो आहे.
रोज तर वापरले जात नाही. पास्ता आठ्वडयातून एकदाच करतो. का काही बाही करून संपवू? क्रोस्तिनी, गार्लिक चीज ब्रेड इत्यादी करून ?

रिमा, भाजी कर लसूण कांद्याची फोडणी देऊन.
पण तत्पुर्वी ते नीट भिजवून मऊ करायचे आणि शिजवायचे चांगले. सुंदर होते भाजी.

दक्षिणा लसुण - कांद्या बरोबर मिरची, लाल तिखट, गरम मसाला काय चांगल जात आणि सांणगे सोया चंक्स वापरतात तसेच वापरायचेत ना? भाजी ड्राय करावी की रस्सा चांगली लागते?

Pages