Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे, दुधात घातल्यावर, मऊ
म्हणजे, दुधात घातल्यावर, मऊ झाल्यावर ते शिजवायचं, कि फक्त गरम दुधात घालून ठेवायचे, म्हणजे खीर झाली??
फक्त गरम दुधात घालायचे.
फक्त गरम दुधात घालायचे. थोडे-थोडे करून घाल नाहीतर खीरच्या ऐवजी शिरा होईल.
प्रथम अगदी वाटीभर गरम दुधात
प्रथम अगदी वाटीभर गरम दुधात अर्धा लाडू घालून आधी खाऊन बघ, आवडलं तर मग सगळे घाल दुधात.
हो, एकाच लाडूवर प्रयोग करुन
हो, एकाच लाडूवर प्रयोग करुन बघायचा. तसेही कडक लाडू बरेच टिकतात !
कजै राईस म्हणजे ब्राऊन राईस
कजै राईस म्हणजे ब्राऊन राईस का? (उकडा तांदूळ आहे आणि रंगाला ब्राऊन आहे) म्हणून विचारतेय.
हा भात करायचा झाला तर कसा बनवायचा? कूकरमधे की पातेल्यात?
हल्दीरामच्या रसगुल्ल्यासोबत
हल्दीरामच्या रसगुल्ल्यासोबत आलेला अर्धी बाटली पाक शिल्लक आहे.. केसर फ्लेवर्ड..त्याचं काही करता येइल का?
गुलाबजाम करुन पाकात सोडा
गुलाबजाम करुन पाकात सोडा
मी तरी सुधारस करते त्या
मी तरी सुधारस करते त्या पाकाचा नाहीतर टाकून देते.
हिम्स, पुन्हा तो पाक उरला तर काय करायचं ते लिही क.
चिंगी, सुधारस कर. फ्लेवर्ड
चिंगी, सुधारस कर. फ्लेवर्ड पाक आहे त्यामुळे चांगला होईल. आमच्याकडे शक्यतो पाक उरतच नाही. रसगुल्ल्यासोबत खावाच लागतो.
त्या ब्राऊन राईसचं जरा सांगा.
नंदिनी, मी ब्राऊन राईस बाहेरच
नंदिनी, मी ब्राऊन राईस बाहेरच करते. शक्यतो जेवढा तांदूळ तेवढंच पाणी (लाँग ग्रेन नसल्यास)
चिंगे शाही टुकडा कर. ब्रेड
चिंगे शाही टुकडा कर. ब्रेड तेलात तळून थंड झाल्यावर पाकात सोडायचा.
बेक्कार लागतं मग.
तुपात तळू नको, घशावर जाम थर येतात थंड झाल्यावर.
चिंगी, लिंबू सरबत.
चिंगी, लिंबू सरबत.
बरेच पर्याय मिळाले की..
बरेच पर्याय मिळाले की.. सर्वाना धन्यवाद.
हे त्या नंदिनीच्या पोस्टला पण
हे त्या नंदिनीच्या पोस्टला पण प्रतिसाद द्या की. तिच्याबरोबर माझंही काम होवुन जाईल. तिचं वाचुन मला आठवलं कि माझ्याकडे पण ब्राउन राइस आहे ( लाँग ग्रेन. उकडा नाही दिसत, पण जाड आहे.) चांगला एक किलो आहे. त्याची विल्हेवाट कशी लावावी, प्रश्नच आहे.
माझ्याकडे सध्या जो बासमती
माझ्याकडे सध्या जो बासमती आणला आहे तो जरासा (नाही चांगला )जाडसर आहे. शिजवताना शिजतही नाही पटकन आणि चवपण नाही, कालच रात्री मेहनतीने मसाले भात केला पण लेकीने सरळ नाक मुरडले (नवरा बिचारा काही बोलु शकला नाही पण चेहर्यावर भाव तेच होते) आधिपण दोनदा असाच झाला होता.
चांगला ५ किलो आहे, आता मी काय करु?
मनिमाऊ, वर दिलंय की उत्तर
मनिमाऊ, वर दिलंय की उत्तर नंदिनीला.
आमच्याकडे ब्राऊन राईस मी एकटीच आवडीने खाते. तो आवडून घ्यायला माझी रेसिपी :
पातीचा कांदा बारीक चिरुन, मश्रूम्स्म मध्यम चौकोनी चिरुन, गाजर चौकोनी तुकडे करुन, रंगीत भोपळी मिरच्या मोठ्या चौकोनी चिरुन, झुकिनी चौकोनी चिरुन, कॉर्नचे दाणे हवे असतील तितके, ठेचलेला लसूण किंवा गार्लिक पेस्ट चमचाभर, सोया सॉस चवीप्रमाणे, चायनीज चिली सॉस, भाज्या परतायला तेल, चवीप्रमाणे मीठ आणि शिजलेला भात.
(ब्राऊन राईस बुटका असेल तर शिजूनही जरा कच्चटच वाटतो. त्यापेक्षा लाँग ग्रेन बरा आहे. बासमतीप्रमाणेच बाहेर डबल पाणी घालून शिजवावा)
पसरट पॅनमध्ये तेलात पातीचा कांदा घालावा. परतून त्यावर गार्लिक पेस्ट घालावी. (लसूण असेल तर कांद्याआधी तोच परतावा) मग बाकी भाज्या घालून चिली पेस्ट घालून मोठ्या गॅसवर झाक्ण घालून शिजवाव्यात. जरा शिजल्यासारख्या वाटल्या की मीठ, सोया सॉस घालून परतून शिजलेला भात घालून एक वाफ काढावी.
Brown Rice baaher
Brown Rice baaher shijavaayalaa jaraa veL laagato aaNi paaNeehee jaast laagate.
shijavaNyaa aadhee thoDaa taaNduL vegaLaa dhuvun baghaa, kadhee kadhee rangavalelaa asato.
ghaaRyaamadhe kaakaveechyaa prayog karun baghataa yeeel. malaa taree kaahi problem disat naahee
paN aadhee bhopaLyaabarobar shijavun parat taLaayache mhaNaje donadaa garam kelyaavar kaakavee
kaDavaT hoeel kaa, ashee shankaa aahe.
saaxee, to bechav taanduL idalee / Dosaa madhe vaaparaavaa laagel. piTh karun bhaakaryaa / aamboLyaa
karataa yeteel.
साक्षी थोडे थोडे मिक्सरमधून
साक्षी थोडे थोडे मिक्सरमधून काढून तांदुळाची पीठी कर, त्यात भाज्या, कांदा, टोमॅटो छोट्या छोट्या मिरच्या घालून सरळ तांदुळाची धिरडी कर. पटकन संपतील. सतत हे करायचा कंटाळा आला तर... २ किलो दुसरे तांदूळ आणून त्यात हे थोडे थोडे मिक्स करून टाकू शकतेस. तिसरा उपाय म्हणजे हे तांदूळ अगदी हल्के मिस्करमधुन काढायचे, म्हणजे फारतर एका तांदुळाचे २ तुकडे होतील असं. मग जास्ती पाणी घालून एकदम पातळ शिजवायचा, त्यात मेतकूट, तूप, लिंबू हळद घालून सरबरीत सुपासारखं पिऊन टाकायचं गरम गरम.
मग जास्ती पाणी घालून एकदम
मग जास्ती पाणी घालून एकदम पातळ शिजवायचा, त्यात मेतकूट, तूप, लिंबू हळद घालून सरबरीत सुपासारखं पिऊन टाकायचं गरम गरम.>> ओके चालेल हे पण करते.
ईडलीच पीठ पण करुन ठेवलय उद्यासाठी .....
पण पाच किलो तांदुळ संपवायचाय....... (आईग..)
पण मला सांगा ना चांगला बासमती कसा ओळखायचा? जनरली मी वाशीहुन आणते एकदम ५ किलो...
( माझ्या मोठ्या लेकीला तर साधि खिचडी सुध्दा बासमतीचीच लागते) एरव्हि भातला मी साधा तांदुळ वापरते.
बासमतीला अर्थातच तो वास
बासमतीला अर्थातच तो वास पाहिजे. दाणा किंचीत अर्धपारदर्शक हवा. दाणे अखंड असावेत, तूकडे नसावेत.
एखादा दाणा दातात धरुन चावल्यास तो कटकन मोडला पाहिजे, त्याचा भुगा होता कामा नये.
शक्यतो आधी अर्धा किलो आणून शिजवून बघायचा, आवडला तरच जास्त घ्यायचा. दुकानदाराला तसे सांगून ठेवायचे.
काल डेझर्ट साठी पपई आण्ली आणि
काल डेझर्ट साठी पपई आण्ली आणि लगेच कापली पण ती पुर्ण तयार नव्हती झाली
पुर्ण कच्ची पण नाहीये.. काय करता येइल..
लवकर सांगितलत तर खराब होण्याआधी करता येइल..
प्लिज लवकर मदता.. :वाट बघणारी बाहुली:
मी_चिऊ, पपईची भाजी करता येईल.
मी_चिऊ, पपईची भाजी करता येईल. साले, बिया काढून बारीक फोडी करून वाफवायच्या व तूप जिर्याच्या फोडणीत घालून परतायच्या. चवीला मिरच्यांचे तुकडे, ओला नारळ, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस, थोडी साखर वगैरे. किंवा पंचफोडण घालून देखील भाजी होईल.
सायो, ब्राउन राइसच्या
सायो, ब्राउन राइसच्या रेसिपीसाठी धन्यवाद. हाच उद्याचा टिफीनचा मेन्यु ठरवला आहे.
हौशीने आणून झाल्यावर मग लोळत
हौशीने आणून झाल्यावर मग लोळत पडलेल्या ब्राउन राइस चा मला सापडलेला नंबर १ उपयोग : मुगाच्या डाळीची खिचडी करतांना त्यात ब्राउन राइस घुसवावा - माझे प्रमाण १ वाटी मुग डाळ, १/२ वाटी ब्राउन राइस, १/२ वाटी नेहमीचा तांदूळ - नेहमीप्रमाणे फोडणी करुन, तीप्पट पाणी घालून कुकर मधे शीट्टी मारुन झकास प्रकार तयार होतो. मउ तरी पण ब्राउन राइसमुळे छान बाइट येतो - ब्राउन राइस संपवायला नक्की करुन बघा. रच्याकने माझ्याकडे बुटका ब्राउन राइस आहे. लांबडया ब्राउन राइस ची अजून नाही केली कधी मी.
फालुद्यात घालायच्या मऊ शेवया
फालुद्यात घालायच्या मऊ शेवया (म्हणजे अॅक्च्युअली फालुदा) कशा करायच्या. मी बाम्बिनोच्या शेवया आणून, वेळून वापरायचे. पण त्यांची मजा येत नाही. क्रॉफर्डला बादशहाचा फालुदा खाल्ल्यानंतर आता बाम्बिनो एकदम डाऊनमार्केट वाटू लागल्या आहेत.
मी_चिऊ, पपईची भाजी करता येईल.
मी_चिऊ, पपईची भाजी करता येईल. साले, बिया काढून बारीक फोडी करून वाफवायच्या व तूप जिर्याच्या फोडणीत घालून परतायच्या. चवीला मिरच्यांचे तुकडे, ओला नारळ, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस, थोडी साखर वगैरे. किंवा पंचफोडण घालून देखील भाजी होईल.>> धन्स अकु.
पपई तशीच फ्रिज मधे थेवुन दिली होती. बघते आता कशी आहे ते..
मामी, बॉम्बिनोच्या
मामी, बॉम्बिनोच्या 'व्हर्मिसेली' आणतेस का तू? आणि वेळून म्हणजे नक्की कश्या वापरतेस ते सांग.
ता.क. : वरील प्रश्नात सुधारणा.
बॉम्बिनोच्या 'लाँग कट' व्हर्मिसेली आणतेस का तू? फालूद्यासाठी त्या बेस्ट आहेत.
मला सर्वात आधी कजै राईस
मला सर्वात आधी कजै राईस म्हणजेच ब्राऊन राईस का ते सान्गा प्लीज. हा भात बनवल्यानंतर चुरमुर्यासारखा दिसतोय. दानेदाने पे खानेवाले नाम काय अख्खं चरित्र लिहिता येईल इतका मोठा दाणा बनतो.
हा भात उकडून त्याचं पाणी कांजी करून पितात हे समजलय. पण उरलेल्या भाताचं काय करायचं??
नंदीनी, कांजी कर्नाटकातलाच
नंदीनी,
कांजी कर्नाटकातलाच प्रकार आहे. ती नाश्त्याला पितात (कांजीत वडे पण घालतात.) बाकीचा भात माश्याच्या कढीबरोबर खातात. पाणी काढल्यामूळे तो भात पचायला हलका होतो (म्हणे).
हा दाणा फारच मोठा होतोय म्हणजे शिजायला भरपूर पाणी घालावे लागणार. (दुपटीपेक्षाही जास्तच ) तसेच हा चिकटही होत असणार.
मी इतालियन राईस आणला होता तो असाच होता. पण सोलकढीबरोबर चांगला लागला.
मामी, फालुद्यातल्या शेवया
मामी, फालुद्यातल्या शेवया सहसा कॉर्नफ्लोअरच्या बनवतात. मी सहसा घरी बनवताना मात्र तांदळाच्या शेवया बनवते. तांदळाची उकड काढून शेवपात्रामधून त्याची शेव बनवायची.
ग्लासमधे शेव घालून त्यावर रोझ सिरप अथवा हवं ते सिरप्/सरबत्/ड्रायफ्रूट्स/दूध घालायचं. (सर्व काही थंड पाहिजे). सब्जाचं बी पाण्यामधे तीन चार तास भिजत घालून ते यामधे घालायचं. वर आईस्क्रीमचा मोठ्ठा स्कूप ठेवायचा. अमिताभ बच्चन चमचा घ्यायचं आणि खायचं..
रच्याकने. क्रॉफर्ड मार्केटमधे रेडिमेड फालुद्य्याची पाकिटे मिळतात. त्यातला सर्व मालमसाला अर्धा लिटर दोधात घालून उकळायचं. गार करून आईस्क्रीम घालून खायचं. दोन तीन ग्लास फालुदा तयार होतो एकट्यासाठी करायला मस्त आहे.
Pages