भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी अजुन १३ धावा केल्या -विकेट न जाऊ देता - की आपल्याला डायरेक्ट चौथ्या कसोटीला जाण्याचा ऑप्शन आहे का? नसल्यास तसा नियम करता येईल का? कोणीतरी ई-सह्यांसाठी एक फेस्बूक पेज उघडा रे!

गेल्या दोन वर्षांमधली पहिल्य जोडीची कामगिरी. गेल्या वर्षी average नि शतकी partnership कमी झाल्या आहेत हे साहजिक आहे. फक्त त्यात गंभीरपेक्षा सेहवागचा वाटा अधिक दिसतोय.

http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;home_or...

भाऊ पहिली जोडी का महत्वाची ह्याचे सावकाशीत उत्तर देतो.>> केदार मला वाटतेय भाऊंच्या बोलण्याचा उद्देश हा होता कि मधली फळी जि अधिक मजबूत समजली जाते ती पण अपयशी ठरली असतानाही फक्त सलामीच्या जोडिला target करणे चुकीचे ठरेल.

<< डायरेक्ट चौथ्या कसोटीला जाण्याचा ऑप्शन आहे का? >> हा प्रश्न सध्या तरी " चौथ्या कसोटीला आणखी 'उतरण्याचा' आपल्याला ऑप्शन आहे का ? " असा विचारणं औचित्यपूर्ण होईल !
<< फक्त सलामीच्या जोडिला target करणे चुकीचे ठरेल. >> होय, केदारजी, मला नेमकं हेंच म्हणायचंय . शिवाय, कसोटी सामन्यांत पहिल्या जोडीच्या महत्वाची जाणीव आहे म्हणूनच मी पूर्वीपासूनच आपली सध्याची 'ओपनींग' जोडी निवडताना तें महत्व लक्षांत घेतलं गेलं नाही, अशा मताचा आहे- एक साधासुधा क्रिकेटप्रेमी म्हणून.

भाऊ टारगेट अजिबात करत नाही कारण आज आपल्यादेशात हीच टीम खेळली तर त्यांचाविरूद्ध ५०० उभे करतील हे नक्की. फक्त आकडेवारी दिली. हा प्रॉब्लेम परत गेल्या दिड वर्षात निर्माण झाला आहे.आणि संघाचे नेमके काय चुकते ह्यात सगळ्या पोझिशन्स कश्या आहेत, कुठे कमकुमत बाजू आहे? चढाची बाजू असेल तर तिथे धमधमा चढवायचा की खिंडार पडले ते बुझवायचे? हे सर्व ३६० डिग्रीने आपल्या संघाला करावे लागणार. आपण जेंव्हा भक्कम पाया रचला तेंव्हा ६०० पण आरामात क्रॉस केले आहेत हे विसरून चालणार नाही. कारण सगळ्यात बेस्ट लाईन अप आपले आहे. Happy
पाया भक्कम नसला की द्रविड पण खूपदा लगेच जातो. मग ४० वर तीन असे बरेचदा झाले आहे. शिवाय देशात असे चालून जाते कारण पाटा विकेट. पण परदेशात सगळी वीन उघडी पडते. सचिन, लक्ष्मण चालले नाही की मग सर्व संपले कारण सध्यातरी धोणी अन नवीन लोक तर काही खेळतच नाहीत. (गेल्या एक दिड वर्षात एखाद ५० चा अपवाद पण ओव्हरऑल फेल्युअरच ) मग १६० ऑल आउट

उलट आता ही ३६० तपासनी करण्याची वेळ आली कारण तिसर्‍या टेस्ट मध्ये आपण बाउन्स होऊ असे सर्व म्हणत होते तसे काही झाले असे वाटत नाही.

उलट आता ही ३६० तपासनी करण्याची वेळ आली कारण तिसर्‍या टेस्ट मध्ये आपण बाउन्स होऊ असे सर्व म्हणत होते तसे काही झाले असे वाटत नाही.>> I thought we reached the bottom in second test but then we started digging again Sad

पुढच्या टेस्ट्साठी पुढचा विचार करुन संघ निवडावा. संघ बांधणीचे काम सुरू करायला हरकत नाहि. ३-० नि ४-० काय, फार काहि फरक नाहि.

म्हणूनच मी पूर्वीपासूनच आपली सध्याची 'ओपनींग' जोडी निवडताना तें महत्व लक्षांत घेतलं गेलं नाही, >> दुर्दैवाने ती आपली सर्वात best जोडी आहे. त्यांच्यासाठी technically capable असे options नाहित. Sad

<< दुर्दैवाने ती आपली सर्वात best जोडी आहे. त्यांच्यासाठी technically capable असे options नाहित >> सेहवागच्या धडाकेबाज खेळाची भुरळ पडून असे options शोधायच्याच भानगडीत कुणी पडले नाहीत, असं तर नाही ना !!!!

दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्रात यादवने तीन बळी घेतले. कालच्या खराब खेळाची भरपाई करु शकेल का आज भारत?

भाऊ Lol

<< भारतिय संघाला परत बोलवायचे का ?? >> udayone , विनोद करून जरा उद्वेग हलका करणं ठीक आहे पण हे मात्र फारच होतंय असं नाही वाटत ?

भाउ..............राहुन तरी काय करणार आहे.. ? इंग्लंड सारखी अवस्था नको म्हणुन बोललो... Happy

औसी ची १ ही ली विकेट गेल्या कसोटीच्या दुसर्या डावापासुन ते २१५ रन्स होउ पर्यंत ५०० च्या वर रन्स झालेले....

<< इंग्लंड सारखी अवस्था नको म्हणुन बोललो... >> Udayone, Indian cricket is like a genius, 1% ecstacy & 99% agony; And we all are doomed to live with it !!! माझ्यासारख्या अगणितांच्या भारतीय क्रिकेटशीं असलेल्या या ' लव्ह-हेट रिलेशनशिप'ला तपं लोटलींत; आणि, सगळ्यांचा हा संसार तसा बर्‍यापैकीं सुरळीत चालूच आहे !!! Wink

पडली - पडली, अजुन एक पडली (असे मी खोटे-खोटेच लिहीणार होतो, आधी सहज पहावे म्हंटले तर चक्क वॉर्नरचा नव्हता झाला).

भाउ Rofl

काय करणार...
आयपीएल च्या परफॉर्मन्स वरून फॉर्म ठरवला जाणार... रणजी कडे बीसीसीआय सकट सगळे दुर्लक्ष करणार...
आयपीएल बद्दल सगळीकडे धामधूम असणार, शेंबड्या पोराला ही स्कोअर्स ठाऊक असणार... पण रणाजी च्या क्वार्टर फायनल्स आणि सेमिफायनल्स बद्दल पेपरात एका कोपर्‍यात छोटी बातमी येणार, कोणता संघ जिंकला हे तर बहुसंख्यांच्या खिजगणतीतही नसणार...
मग टेस्ट मधे टी-२० सारखे स्कोअर्स दिसले तर त्यात आश्चर्य ते काय...

भारतीय क्रिकेट बचाओ... बीसीसीआय अन आयपीएल हटाओ...

३६९//१० ऑल आउट.....२०८ ची आघाडी.......

आता किमान ३ दिवसापैकी १.५ दिवस तरी खेळाअवे लागणार

आज बॉलींग चांगली पडली. फुल क्रेडीट पण तरीही लुज बॉल खूप होते त्यामूळे निदान ७५ धाव वाढल्या.
आपल्या ३५० आधी असल्या असत्या तर मॅच खिशात टाकली असती. Happy पण आता खूप अवघड कार्य आहे. सलग २ दिवस खेळायचे वा ५०० धावा काढायच्या. तरच ही मॅच आपल्या कडे झुकू शकेन अन्यथा उद्याच संपेल. (मला तरी ती शक्यता जास्त वाटते.)

सलग २ दिवस खेळायचे वा ५०० धावा काढायच्या. तरच ही मॅच आपल्या कडे झुकू शकेन अन्यथा उद्याच संपेल. (मला तरी ती शक्यता जास्त वाटते.) >>>खरेय.

३४ ओवर्स आहेत अजुन.....................................राहायला हवे.......द्रविड आणि गंभीर ला उतरवा Happy

The big question going into the break is, can the out-of-form batting line-up of India stand up and deliver now? The series is on the line. Virender Sehwag and Gautam Gambhir will be out shortly, against the Aussie pace attack. Around 36 overs remain in the day.

याहू............................

Pages