भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
सेहवाग नेहेमीप्रमाणे हजेरी
सेहवाग नेहेमीप्रमाणे हजेरी लावून गेला.. भिंतीचं भोक मोठं झालं..
आता पुढे काय होतय पाहुयात.
<< आता पुढे काय होतय पाहुयात.
<< आता पुढे काय होतय पाहुयात. >> आमच्या केबलवाल्याला काय धाड भरलीय, मॅचच गायब ! आम्हाला मॅच बघून त्रास होतो, याची त्याला काळजी !!!
साहेब.........गायब
साहेब.........गायब झाले.............................
२०० झाले तरी खूप झाले...
२०० झाले तरी खूप झाले... गंभीर पण गेला...
विकेट अजूनही पर्थची वाटत
विकेट अजूनही पर्थची वाटत नाही. साधीच वाटत आहे. पण आपले लोक काय, कुठेही आउट होत आहेत. २०० म्हणजे फारच झाले रे हिम्या
धोनी चे मित्र प्रेम संघाला
धोनी चे मित्र प्रेम संघाला भारी पडत आहे.......विराट ला ४ इनिंग्स खेळुन परत घेने म्हणजे अति झाले आहे.......रोहित आणि रहाने ला का बाहेर बसवले आहे हेच कळत नाही........
गंभीर, द्रविड ओपनिंग -
रहाने, सचिन, लक्ष्मण.
रोहित, धोनी, अश्विन
इशांत् झहिर, उमेश
अशीच टिम हवी होती..........उगाच अश्विन ला काढले......कीमान तो रन्स तरी करतो.......
धुव्व्वा,demolish,तहस महस
धुव्व्वा,demolish,तहस महस करना वगैरे शब्द आपल्या टीमसाठी चपखल बसतात नाही का?
पुन्हा पानिपत !!!!
पुन्हा पानिपत !!!!
पुन्हा पानिपत>>>>>>पानिपत
पुन्हा पानिपत>>>>>>पानिपत नाही हो.......यात फक्त सचिनच आहे रोहित ला मुद्दामुन घेतला नाही.....
रेव्यु - That is an
रेव्यु - That is an understatement
अश्विन असता तर २०० पर्यंत जाऊ
अश्विन असता तर २०० पर्यंत जाऊ शकतील अशी आशा तरी होती.. आता तर १५० पण अवघड..
१६१ ऑल
१६१ ऑल आउट...........................
१० पैकी ८ जण स्लिप गली विकेट्च्या मागे कॅच देउन आउट झाले.......... काय खेळलेत जबरदस्त.......
बल्ल्या वाजलेला आहे... परत
बल्ल्या वाजलेला आहे... परत एकदा ४०० वगैरेचा लीड येणार.. ग्रेट इनिंग बाय वॉर्नर...
हिम्सकूल - बल्ल्या
हिम्सकूल - बल्ल्या
बैल साले
बैल साले
शिव्या खायचा दिवस इन्डियाचाच
शिव्या खायचा दिवस इन्डियाचाच का?

चिडून-निराश होउन काहीएक फायदा
चिडून-निराश होउन काहीएक फायदा नाही.. आपण अशेच कसोटी क्रिकेट खेळणार.. अतिशय सुमार खेळ चालवालय आपल्या संघाने..
काय भिक्कार खेळाले
काय भिक्कार खेळाले ऑसीस.............हे काय खेळने झाले १४९/० ते ही २३ ओवर्स मधे.....असे खेळायचे का?
भारताने कसे ६० ओवर्स खेळलेत टिच्चुन..रन्स पण नाही काढले आणि विकेट्स ही दिल्यात..हे आहे जातिवंत कसोटी खेळाडु..... वॉर्नर हा तर दुसरा वानरच आहे.....अक्कलच नाही......इतक्या लवकर लवकर खेळाला.....सकाळी निट केले नाही का ??
भन्नाट... एकच शब्द आहे वॉर्नर
भन्नाट... एकच शब्द आहे वॉर्नर च्या खेळीसाठी.
डावाने हारायची शक्यता अधिक आहे. नेमकीच अश्वीन ला बाहेर बसवलय.. धोणी च्या बाबतीत एकच म्हणता येईल- ऊपरवाला जब लेता है तो...
भारतीय फलंदाजीच्या अब्रुचं
भारतीय फलंदाजीच्या अब्रुचं खोबरं झाल रे देवा.
ज्या पीच वर आपले सगळे मिळुन १६१ तिथेच वार्नर फक्त ६९ बॉलमध्ये १०० मारतो म्हणजे....
बैल
बैल
सारखे सारखे क्रिकेटबद्दल काय
सारखे सारखे क्रिकेटबद्दल काय लिहीता? गो कार्टींग पण केले भारतीय संघाने, त्याबद्दल लिहा. हरभजन नाही तर udayone यांनी पुन: 'मंकीगेट' उघडले. ते जुने म्हणून आता मंदार्_जोशी यांनी 'बैल गेट' पण उघडले. तसे काही तरी लिहा. इशान, कोहली यांच्याबद्दल लिहा! इतर काही भनगडी केल्या तर त्या निमित्ताने तरी या दौर्याबद्दल काही वेहळे संस्मरणीय असे लिहीता येईल.
भाउ, अजून विनोदी चित्र आले नाही!
मेराभारत महान्,शतकसे और
मेराभारत महान्,शतकसे और कसोटीसे परेशान
श्या अगदीच pathetic खेळलेत आज
श्या अगदीच pathetic खेळलेत आज
अश्विनच्या ऐवजी विनयकुमार ? तेही waca चा curator कडक सूर्यामूळे पिच crumble होईल सांगतोय तरी ?
धोनी ने एक तर घटस्फोट घ्यावा
धोनी ने एक तर घटस्फोट घ्यावा नाही तर कॅप्टन शिप सोडावी........लग्न झाल्यापासुन एक ही कसोटी मालीका जिंकली नाही..............

परीसस्पर्श म्हणे..
परीसस्पर्श म्हणे..
>>अश्विनच्या ऐवजी विनयकुमार ?
>>अश्विनच्या ऐवजी विनयकुमार ?
आहो नशीब दोड्डा गणेशला घेऊन नाही गेले
It's India's eighth score of
It's India's eighth score of less than 250 in the first innings in their last 16 Tests!!
In 19 overseas innings since the start of the tour to the West Indies in 2011, India's average opening partnership has been 14.31, with a highest of 63
नक्कीच काही तरी चालू आहे. चेन्नई सुपर किंग्स कदाचित टेस्ट मॅच जिंकून देतील २० ओव्हर्स मध्ये. त्यांना तरी न्या. रोहितला का वाया घातला? विनय कुमार पण धोणी फेवरेट आहे. पाटा पिच वर चाललेला. भारतात सगळेच बादशहा!
आघाडीच्या जोडीने शतकी
आघाडीच्या जोडीने शतकी भागीदारी केव्हा केली होती शेवटची?
मधली फळी इतकी मजबूत असताना
मधली फळी इतकी मजबूत असताना आघाडीची जोडी फुटली म्हणून डाव कां कोसळतो ? आघाडीच्या जोडीला वेगळं काढून असं नाही झोडपता येणार [ जरी माझ्या मतें कसोटीसाठी आपली आघाडीची जोडी तंत्र व मानसिकता या दोन्ही बाबतीत जेमतेम उत्तीर्ण होण्याइतपतच गुण मिळवूं शकेल ] !!
Pages