भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> मास्तरा, २-०! यापुढे कितीही आपटली तरी आपण मालिका जिंकणार नाही हे लक्षात आलंच असेल तुझ्या!

जिंकणं सोड, आता मालिका अनिर्णित ठेवणे सुद्धा अशक्य आहे. किंबहुना ०-४ असा व्हाईटवॉश टाळता आला तरी नशीब!

च्यायला, आतापर्यंतचे सगळेच अंदाज चुकले.:राग:

आता यापुढच्या सगळ्या मालिकांसाठी भारत ०-५ / ०-४ / ०-३ अशी मालिका हरणार असाच अंदाज सुरवातीपासून व्यक्त करणार. अंदाजाप्रमाणे हरलो तर अंदाज खरा ठरल्याचा आनंद, कमी फरकाने हरलो तर नामुष्की टळल्याचा हर्ष आणि चुकून जिंकलो तर आनंदीआनंद! Biggrin

मास्तरा, इतकं वाईट वाटून घेऊ नकोस! अंदाज चुकण्यासाठीच असतात. म्हणूनच तर ते 'अंदाज' असतात. माझाही इंग्लंडच्या दौर्‍याच्या वेळेला साफ चुकला होताच की! दोन्ही टीमचे खेळाडू आपल्या मनातून जसे खेळायला हवे असतात तसे प्रत्यक्षात खेळतील असं धरून आपण अंदाज बनवितो. अँड देअर लाईज द प्रॉब्लेम!

त्यामुळे तू टोकाची भूमिका न घेता अंदाज वर्तवत रहा, मी पण वर्तवेन आणि आपला टीपी चांगला होईल. Proud

म्हणजे पॅटिसन ला पुढील सामन्यात विकेट्स भेटणार नाही........दुसर्‍या कोणाला तरी मिळणार Happy

जेम्स पॅटिन्सन जखमी असल्यामुळे उर्वरीत सामन्यांमधुन बाहेर.>>त्याच्या जागी हॅरीस येईल. तो जर फिट असेल तर "आगीतून फुफाट्यात". Sad

Sadly this is the best team we could have offered. So lets admit we were outplayed again.

गावस्कर एकदम वेगळ्या सूरात बोलू लागलाय सध्या, त्याच्या BCCI च्या १ करोडच्या missing or pending payment चा इथे कितपत संबंध असेल ?

गांगूलीने तेंडूलकरला तो बॉल defend करायला नको होता असा सल्ला दिलेला पाहून नक्की काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचत नाहि. पण बरेच जण त्याने कसे खेळायला हवे होते हे सांगत असतात तेंव्हा गंग्यानेही सांगायला हरकत नसावी Lol

>> पण बरेच जण त्याने कसे खेळायला हवे होते हे सांगत असतात तेंव्हा गंग्यानेही सांगायला हरकत नसावी.
गंग्याने दिला तर ठीक आहे एकवेळ! तो थोडा फार क्रिकेट तरी खेळला आहे. इथे माबोवरचेही त्याने कसं खेळावं (किंवा फॉर दॅट मॅटर कुणीही कसं खेळावं) हे सांगतात. बाकी माबोवरचे क्रिकेटचे बाफ वाचले तर खेळाडूंचं क्रिकेट सुधारेल. Wink

<< बाकी माबोवरचे क्रिकेटचे बाफ वाचले तर खेळाडूंचं क्रिकेट सुधारेल. >> फक्त माबोच्या 'बाऊन्सी' खेळपट्टीवरचे सामने खेळण्यापुरतंच ! Wink

हॅत्तेरी, हरले वाटते!
आता पर्थला नक्की जिंकणार म्हणे, म्हणजे काही कॉमेंटेटर म्हणत होते असे. तसे कॉमेंटेटर काही पण बोलत असतात म्हणा.

मागे कुणि लिहिल्याप्रमाणे भारताने दुसरा डाव प्रथम खेळावा, व फलंदाजीला ११, १०, ९, या क्रमाने खेळाडू पाथवावे, म्हणजे यादव पहिला, मग इशांत, मग आश्विन वगैरे.

अरे, सचिनच्या शंभराव्या शंभरीसाठी कुणि पैसे लावले नाहीत वाटते? म्हणून का थांबला आहे तो?
एकदा कुणि पैसे लावले नि मॅच फिक्सिंग केले की सगळ्या लोकांचे गंगेत घोडे न्हाईल.

>>> आता पर्थला नक्की जिंकणार म्हणे, म्हणजे काही कॉमेंटेटर म्हणत होते असे.

आता जरा सेफ खेळतो. मी काहीतरी अंदाज वर्तवायचो आणि तो चुकला की चिमणला आसुरी आनंद होणार. त्याला आसुरी आनंद मिळून देण्यापेक्षा सुरवातीलाच जरा सेफ अंदाज वर्तवतो.

माझे सुधारीत अंदाज -

पर्थ कसोटी - भारत डावाने हरणार
अ‍ॅडलेड कसोटी - ऑस्ट्रेलिया डावाने जिंकणार

आता अंदाज चुकायची शक्यता अजिबात नाही आणि चुकले तरी भीति नाही. Wink

अरे, सचिनच्या शंभराव्या शंभरीसाठी कुणि पैसे लावले नाहीत वाटते? म्हणून का थांबला आहे तो?
एकदा कुणि पैसे लावले नि मॅच फिक्सिंग केले की सगळ्या लोकांचे गंगेत घोडे न्हाईल.>>कमाल आहे तुमची खरच. एकच ते घेऊन जिकडे तिकडे त्याचे तुणतुणे लावण्यात तुमचा हात तर सोडाच, नख सुद्धा कोणी धरू शकणार नाहि. अर्थात ते चांगलेच आहे म्हणा Happy

एकच ते घेऊन जिकडे तिकडे त्याचे तुणतुणे लावण्यात तुमचा हात तर सोडाच, नख सुद्धा कोणी धरू शकणार नाहि. अर्थात ते चांगलेच आहे म्हणा

इथे कुणितरी नुकतीच गणू ची आठवण काढली होती, पण ते आले नाहीत, म्हणून मीच त्यांच्या वतीने लिहीले, त्यांना जे म्हणायचे असते तेच.
मला जे म्हणायचे होते ते बरेच काही काही वर लिहीले आहे, ते तुम्ही वाचलेले दिसत नाही.

हंSSS, एकंदरीत वाईट काय तितकेच लोकांना दिसते, चांगले काही दिसत नाही!
हटकेश्वर, हटकेश्वर.
जाउ दे झाले!

म्हणून मीच त्यांच्या वतीने लिहीले>> असे आधी केलेले आठवत नाहि तुम्ही, तुम्हीच असावेत ते असे धरायला हरकत नाहि आता. सारखेच गुण दिसताहेत. Wink

मला जे म्हणायचे होते ते बरेच काही काही वर लिहीले आहे, ते तुम्ही वाचलेले दिसत नाही.>> वाचले ना. तुम्ही लिहिलेले सगळे गेली दहा वर्षे वाचतोय. अजूनही आशेवर आहे कि कधीतरी बदलाल. तुम्ही नाहि अजून बदलत तर तुमच्या पेक्षा लहान भारतीय खेळाडू ते कसे बदलणार ? ... . Lol

जाउ दे झाले!

जाउ दे हेच खरे.

खरे तर मी मायबोलीवर बरेचदा लिहीले होते, की माझ्या लिखाणामुळे तुमच्या भावना दुखावत असतील तर मला क्षमा करा. पण जर मी लिहीलेले खोटे असेल तर तसे सिद्ध करा. अजून कुणि तसे केले नाही, म्हणून मग लिहीत बसतो.
आता मी म्हातारा झाल्याने, बरे वाईट दिवस पाहिल्याने, माझ्या भावना दगडासारख्या झाल्या आहेत, कुणि काही म्हंटले तर मला भावना दुखावल्या वगैरे होत नाही. त्यामुळे तुमच्यासारख्या कवी मनाच्या, हळव्या, फक्त चांगले अनुभव घेतलेल्या लोकांच्या भावना मला समजत नाहीत.

क्षमा करा.

एव्हडे का कावलेत पब्लिक..? कुठल्याही तयारीशिवाय आधी ईंग्लंड आणि मग ऑस मध्ये सेहवाग, गंभीर, लक्षमण, कोहली जातात तेव्हा काय वेगळी अपेक्षा असू शकते? ते काही लंकेचे मैदान नव्हे की या चौघांना झोपेतून ऊठवले आणि म्हटले धावा करा किंवा किमान ऊभे रहा (सेहवाग दोन्ही बाबतीत अपवादच आहे म्हणा). तेव्हा सचिन असो वा ईतर कुणी, ऊत्कॄष्ट गोलंदाजी तीही ऑसी च्या खेळपट्ट्यांवर खेळायला मुळात तंत्र आणि भरपूर पूर्वसराव लागतोच. धोणी व शेपूट वगळता तंत्र सर्वांकडे आहे पण सराव..? t20, ipl, one day मध्ये निव्वळ १० षटके हाणामारी कऊन हिरो बनलेल्या, करोडो कमावणार्‍या खेळाडूंना ना चार सत्रे (कसोटी) ऊभे रहायची शिकवण्/सराव असतो ना त्यासाठी कुठलेही मोटीवेशन. ऑसी व ईं. च्या खेळाडूंनी अ‍ॅशेस च्या तयारी साठी आयपिल ला रामराम केला होता हे पुरेसे बोलके आहे.
खेरीज ईतके जगभरातील विक्रम ज्याच्या नावावर आहेत तो सचिन असा १०० व्या शतकाचा बाऊ करतो, दबाव घेतो हे "अनाकलनीय" आहे.
अधिक काय बोलावे..?
मी पहिल्या सामन्यानंतर म्हटले होते या मालिकेत आपली कुछ खैर नही.. आता तिसर्‍या वा चौथ्या पैकी एखाद्या सामन्यात सेहवाग शंभर करेल, सचिन बहुतेक शतक करेलही, द्रविड ऊभा राहील आणि पुन्हा सर्व ये रे माझ्या मागल्या... ऊपयोग काय? ही मालिका पहिल्या सामन्यातील पहिल्याच डावात आपण गमावली आहे.
कसोटी मध्ये निव्वळ एक डाव वा एखाद्याची लक्षणीय कामगिरी एव्हड्याने भागत नाही. सांघिक खेळ तोही सर्व डाव झाला तरच विजयाची शक्यता असते. आणि ऑसी, ईं. सारख्या संघांविरुध्द एखादा डाव जरी तुम्ही सुस्त राहिलात तर डाव तुमच्यावर उलटवण्याची जबरदस्त कुवत, क्षमता आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे तसा "अ‍ॅप्रोच" त्यांचेकडे आहे.
जाता जाता: दोन दिवस शिल्लक असूनही क्लार्क ने नविन विक्रम नोंदवायचा मोह टाळला. खूपच आवडलं, महान आदर वाटला त्याच्याबद्दल. त्याच्या जागी आपले सेहवाग, द्रविड वा खुद्द सचिन खेळत असते तरी नक्कीच अजून एखादा विक्रम होईपर्यंत आपण त्यांना खेळू दिले असते. नसते दिले तर आज याच मिडीयाने धोणी च्या सात पिढ्यांचा उध्दार आणि संघात दुही वगैरे आहे असे रकाने भरून लिहीले असते. असेही सामना आपण हरणार नाही तेव्हा विक्रम करून घ्या.. ऊलट क्लार्क ने ऊरलेला वेळ वापरून सेहवाग, द्रविड ला बाद केल्यावर आपल्या सामना वाचवायच्या शक्यताही संपवून टाकल्या. असो.
फरक नेमका हाच आहे, नविन काही नाही. बिसीसीआय ची धोरणे, देशातील क्रिकेट स्पर्धा, निवड समिती, राजकारण, पाट्या खेळपट्ट्या, प्रश्ण, मुद्दे, दृष्टीकोन, त्रिकूटाचे वाढते वय, अक्षरशः पूर्व पुण्याईवर दौरे करणारे खेळाडू, सर्व तेच तेच जुने आहे..मैदाने फक्त बदलत आहेत. Happy

"झोपी गेलेले काही जागे होत नाहीत..." (तेव्हा ऊगाच तुमची झोप खराब करू नका!)

खरे तर मी मायबोलीवर बरेचदा लिहीले होते, की माझ्या लिखाणामुळे तुमच्या भावना दुखावत असतील तर मला क्षमा करा. >> हा ! तुम्हाला क्षमा करणारा मी कोण ? तुमचे वरचे संपूर्ण पोस्ट मी "तुम्ही बदलला नाहित " ह्याचे अचूक उदाहरण आहे. क्रुपया नवीन लोकांवर हि gimmics वापरा हो. तुमच्याच शब्दात सांगायचे तर "जर मी लिहीलेले खोटे असेल तर तसे सिद्ध करा." Lol

योग, पोस्ट पटले फक्त एका भागाबद्दल "ऑसी व ईं. च्या खेळाडूंनी अ‍ॅशेस च्या तयारी साठी आयपिल ला रामराम केला होता हे पुरेसे बोलके आहे." त्यांनी केला होता पेक्षा त्यांना करायला भाग पाडला होता.

, सर्व तेच तेच जुने आहे..मैदाने फक्त बदलत आहेत.
>>>>>

मैदानेही तीच आहेत , फक्त तारखा बदलत आहेत Proud

या मास्तराचा पार बाबूभाई कुशवाह झालाय Proud

>> फक्त तारखा बदलत आहेत
मिलॉर्ड मिली है तो सिर्फ तारीख पे तारीख.. तारी़ख पे तारीख... Happy

योग, बराचसा सहमत.

क्रिकईन्फो च्या लेखकाने लिहीले आहे त्याप्रमाणे हा पराभव झाल्यावर दोन तासांत आयपीएल २०१२ ची घोषणा झाली. ५७ मॅचेस की काहीतरी. आता पुन्हा फालतू लोकांचे चे गौरवगान सुरू होईल.

पुढची दोन वर्षे भारताचा परदेश दौरा नाही असे वाचले. म्हणजे मधल्या काळात बरेच गल्लीतील शेर निर्माण होतील.

आश्विनची निवड ही घोडचूक होती. आपण पूर्ण वेगवान गोलंदाजीवर क्वचितच मॅचेस जिंकलेल्या आहेत. सपोर्ट स्पिनर्स लागतातच. लीड्स, अ‍ॅडलेड वगैरें विजयात कुंबळे, तेंडुलकर वगैरेंच्या बोलिंगचा मोठा हात होता. कधी ते काम हरभजन करतो. आपले पेसर्स १०-१२ ओव्हर्सच्या पुढे तेवढी इंटेन्सिटी ठेवू शकत नाहीत जेवढे इतरांचे ठेवू शकतात.

>>> पुढची दोन वर्षे भारताचा परदेश दौरा नाही असे वाचले. म्हणजे मधल्या काळात बरेच गल्लीतील शेर निर्माण होतील.

बापरे! म्हणजे मग मुरली विजय, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, नमन ओझा, युसुफ पठाण इ. गल्लीतले शेर हे आपले नवीन आधारस्तंभ म्हणून संघात येणार. Uhoh

>>> त्रिकूटाचे वाढते वय,

भारताची फलंदाजी परदेशात प्रचंड प्रमाणात ढासळली हे खरे आहे. पण इथे वयाचा संबंध दिसत नाही.

इंग्लंडमधले ४ कसोटी सामने व ऑस्ट्रेलियातले पहिले २ सामने बघितले तर असे दिसते की या ६ सामन्यातल्या १२ डावात सर्वाधिक धावा संघातल्या २ सर्वात वयस्कर खेळाडूंनी केल्या आहेत (सचिन १२ डावात ५०५ धावा, सरासरी ४२, ४ अर्धशतके, शतक एकही नाही आणि द्रविड ५०० च्या आसपास धावा, सरासरी ४१ च्या आसपास, १ अर्धशतक, ३ शतके). जवळपास त्यांच्याच वयाचा लक्ष्मण मात्र फेल आहे.

याउलट तुलनेने तरूण खेळाडूंची कामगिरी खूपच खालावलेली दिसत आहे. सेहवाग (४ सामन्यात ११० धावा, सरासरी - १३, १ अर्धशतक), गंभीर (४ सामन्यात १२५ च्या आसपास धावा, १ अर्धशतक), सुरेश रैना (२ सामन्यात ६० च्या आसपास धावा), युवराज सिंग (२ सामन्यात ६० च्या आसपास धावा), कोहली (२ सामन्यात ५० च्या आसपास धावा) आणि धोनी (६ सामन्यात १५० च्या आसपास धावा, १ अर्धशतक) या तरूण खेळाडूंची फलंदाजी सचिन व द्रविडच्या तुलनेत खूपच फिकी पडलेली दिसत आहे.

त्यामुळे फलंदाजीत खालावलेल्या कामगिरीचा आणि वयाचा फारसा संबंध दिसून येत नाही.

सेहवागची नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. माझ्या आठवणीत तो दोन वर्षात त्याचे "मोठे शतक" मारू शकला नाही (त्याची २००४ च्या आसपासची सलग ११ शतके ही १५०+ होती).

वनडे मधले ते द्विशतक सोडले तर तेथे मुळातच त्याची फारशी कामगिरी नसतेच. वर्ल्ड कप मधे पहिल्या मॅच मधे बांगला देश विरूद्ध खेळला तो आणि थोडा द. आफ्रिकेविरूद्ध. पण सहसा ५०-६० च्या पुढे जात नाही.

त्यामुळे फलंदाजीत खालावलेल्या कामगिरीचा आणि वयाचा फारसा संबंध दिसून येत नाही.>>> हे पटण्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियात सचिन मस्त खेळतोय (पण त्याने मोठे डाव खेळणे आवश्यक आहे हे नक्की). द्रविड चाचपडत असला तरी सहा महिन्यांपूर्वीच इंग्लंड मधे चारही बोलर्स स्विंग करत असताना तो अभेद्य होता.

राहिला लक्ष्मण - पण त्याचे सातत्य सहसा नसतेच. तो एकदम मधेच खेळून जातो. त्याच्या अपयशाचा वयाशी किती संबंध आहे माहीत नाही. अजून एखादी सिरीज बघितल्यावर कळेल.

उलट ही सिरीज नवोदितांबद्दलच जास्त प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. गांगुली, २००५ मधेच काय पण २००८ मधेसुद्धा नसता गेला तरी चालले असते असे दिसते :). कुंबळेही थोडा अजून हवा होता.

धोनीला वन डे आणि २०-२० ला कप्तान ठेवून. द्रविड किंवा एकदम प्रयोग म्हणून झहीर किंवा कोणालातरी टेस्ट कप्तान करायची आयडिया कशी वाटते? कुंबळे तयार असेल तर परतही आणायला हरकत नाही Happy

फारेंड, बीसीसीआयकडे हा प्रस्ताव मुळात वनडे, २०-२० आणि टेस्टच्या टीम्स वेगळ्या ठेवायचा असा होता. काही खेळाडू फिटनेसनुसार आणि आवश्यकतेनुसार तीन्ही टीममधे असू शकतात, मात्र याला खेळाडूनी फारसा प्रतिसाद दिला नाही, जो दिला तो बर्‍यापैकी नकारार्थी होता. याची कारणे अर्थातच आर्थिक असावीत असा अंदाज. Happy

हो त्याची कल्पना आहे. मी फक्त कप्तानपदाबद्दल सध्या म्हणतोय, ते ही फक्त कसोटीसाठी. कारण धोनीला एकतर फार इंटरेस्ट नसावा किंवा इतर अनेक जबाबदार्‍या असल्याने टेस्ट्स ची प्रायोरिटी त्याच्या दृष्टीने कमी झाली असावी. कल्पना करा - आज तो एक दोन टेस्ट सिरीज हरला तर तेवढ्यापुरती टीका होईल, नंतर लोक विसरून जातील. पण जर चेन्नई वाले हरले तर फार मोठे नुकसान आहे - आर्थिकही आणि इतरही.

मी येथे त्याच्या Integrity बद्दल शंका घेत नाहीये. कोणत्याही सिस्टीम मधे एक 'अलिखीत समज' तयार होतो - तेथील वरिष्ठ लोक ज्याला महत्त्व देतात, एखाद्याचे त्या कंपनीतील्/ऑर्गनायझेशन मधील महत्त्व कशामुळे वाढते व अशा इतर अनेक कारणांवरून. त्याचा परीणाम असा नकळत होतो - ज्या गोष्टीला ऑर्गनायझेशन मधे कमी महत्त्व असते त्याकडे आपोआपच तेवढे कमी लक्ष दिले जाते.

धोनीचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे भारताबाहेर यश अगदी कमी आहे आत्तापर्यंत. मी आर्काईव्ह्ज नीट बघितले नाहीत पण बहुधा वन डे मधे सर्वोच्च विजय २००८ मधला ऑस्ट्रेलियातील तिरंगी स्पर्धांचा असावा. २०-२० मधे पहिला वर्ल्ड कप फक्त. त्यानंतर दोन्हीमधे फारसे काही आठवत नाही.

टेस्ट मधे तो खेळायला हवा, पण कप्तान नको. कॅप्टनशिपचे प्रेशर नसेल तर आपल्यालाही एक गिलख्रिस्ट मिळेल पुन्हा.

भारताची फलंदाजी परदेशात प्रचंड प्रमाणात ढासळली हे खरे आहे. पण इथे वयाचा संबंध दिसत नाही. >> मास्तुरे तेव्हढे सोपे नाहिये ते. त्याच लोकांचे त्याच्या आधीचे statistics बघा. त्यांनी ज्या मापाने आधी धावा काढल्या आहेत त्या मापात नि त्याच सातत्यात त्या आता येत नाहियेत. जेंव्हा ते काढत होते तेंव्हा साहजिक बाकीच्यआंसाठी एक buffer तयार होत होता, ज्यामधे इतरांचे loss of forms, lack of techniques लपू शकत होते (rather accomodate होत होते). आता ते होत नाहिये आणि त्यामुळे उणीवा अधिक दिसून येताहेत. शिवाय फक्त बॅटींग चा भाग उरलेला नाहिये तर field intensity चा भाग आहे. लक्ष्मण किंवा द्रविडला आता तो भाग कठीण जातोय हे सहज दिसतेय. (ह्यात सेहवाग, झहीरहि आलेच) सचिन अजून त्याबाबतीमधे टिकून आहे.मांजरेकरच्या लेखात मुख्य आक्षेप हा होता. कि अजून १-२ वर्षांनंतर हे तिघे एकत्र असण्याचे chances कमी आहेत तेंव्हा Why not start baptism for young turks now ? हाच अनुभव त्यांना कामी येईल. लक्षात घ्या कि ९९ मधे जेंव्हा सचिनच्या नेतुर्त्वाखाली आपण aus मधे आलो होतो तेंव्हा असाच दणकून मार खाल्ला होता नि त्यात वेळी द्रविड, लक्ष्मण नि गंगू test team साठी establish होत होते. (Yes I know they debuted much earlier but thats they were in and out for non cricketing reasons - laxman forced to open, dravid getting bradished for poor scoring rates in ODI, etc). एक टिम म्हणून उभे राहायला लागले होते. ह्या सगळ्याचा फायदा २००४-८ मधे झाला.

माझ्या मते, येत्या काहि वर्षांमधे राहाणे, पुजारा, कोहली, शर्मा अशी मधली फळी असणार आहे. अजून कोणी पटकन दिसत नाहि.

वर IPL हे मुख्य कारण आहे असे कोणी तरी म्हटलय जे योग्य असले तरी its necessary devil. Eventually someone has to find out a way tp work with it rather than work around it. Why do you think other boards are struggling for stable finances other than Eng, India, Aus and upto some extent RSA ? Gennie is out of the bottle and there is no way to put it back in. मी मागे पण म्हटले होते कि आपण T-20 च्या कामगिरीवर ODI team निवडतो, ODI च्या form वरून Test team. खरी घोअडचूक हि आहे Sad

आश्विनची निवड ही घोडचूक होती. >> हे कळले नाहि ? त्याच्या जागी अजून कोणाला घेणार होते ? हरभजन injured होता आणि तसाही त्याचा भारताबाहेरचा record फारसा चांगला नाहि, सध्या तो form मधे नाहि (आधीच्या दोन रणजी मॅचेसमधे त्याला २ विकेट्स मिळाल्या होत्या). ओझा आत नव्हता कारण ज्या कारणामूळे अश्विन click झाला नाहि. तसे पाहता पहिल्य टेस्ट्स्नंतर ponting म्हणाला होता कि अश्विनकडून lyon ला शिकण्यसारखे बरेच आहे. मी त्याची तरफदारी करतोय असे समजू नकोस फक्त त्याच्या जागी अजून कोणी येउ शकत नव्हते हे दाखवतोय.

पुढची दोन वर्षे भारताचा परदेश दौरा नाही असे वाचले. म्हणजे मधल्या काळात बरेच गल्लीतील शेर निर्माण होतील.>> १३ मधे SL नि १४ च्या शेवटी RSA नि मग कधी तरी England away tests आहेत.

<< त्रिकूटाचे वाढते वय, >> कोणत्याही मालिकेसाठी संघ निवडताना त्यावेळीं उपलब्ध व फॉर्ममधे असलेल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम असलेल्याना निवडावं, हें सरळ,सोपं व धोपटमार्गी झालं. पण त्याचबरोबर पुढील कांही वर्षांचा विचार करून निवडीमधे थोडाफार फरक करणं हे खरं दूरदर्शीपणाचं ठरतं. सचिनला कोवळ्या वयातही [ असामान्य गुणवत्तेच्या आधारावर] संघात घेणं जितकं शहाणपणाचं होतं तितकंच आतां 'त्रिकूटा'वरच अवलंबून रहाणं घातक ठरूं शकतं; नवोदित खेळाडूंच्या गुणवत्तेबरोबरच त्याना अनुभवाची व जबाबदारी घेण्याची संधी मिळाल्याशिवाय त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा करणं अन्यायकारक आहे. मी मागेच म्हटल्याप्रमाणे, 'त्रिकूटा'ची संघात निवड होणं स्वाभाविक असलं तरी त्यापैकीं दोघानाच आळीपाळीने सामन्यांत खेळवणं योग्य झालं असतं/होईल; त्यात त्रिकूटाच्या वयाचा निकष नसून संघाच्या हिताचा विचार आहे, हे वयामुळेच समजण्याची परिपक्वता 'त्रिकूटा'त नक्कीच असावी. [ शिवाय, असामीजी मांडलेला field intensity चा मुद्दा तर आहेच ].
<< सेहवागची नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. >> सेहवागचा खेळ हा असामान्य ' रिफ्लेक्सेस' व तीक्ष्ण नजर यावर मुख्यतः आधारलेला असावा व त्यामुळेच तंत्रशुद्ध नसूनही तो गोलंदाजांची डोकेदुखी ठरत असावा. सहाजिकच, लय सांपडली नाही, तर ती सांपडेपर्यंत द्रविडसारखं पाय रोवून उभं रहाणं तंत्राअभावी ' उसके बसकी बात नही' ; त्यांतच सर्वानी 'सेहवाग आपली खेळाची स्टाईल सोडणार नाही ' असा जल्लोष करून सेहवागची मानसिकताही तशीच केलेली ! 'त्रिकूटा'सारखं वयाला न जुमानणं किंवा कारकिर्दीतला 'बॅड पॅच' निभावून नेणं सेहवागला जमणं जरा कठीणच ! [ तो फलंदाजीतलं एक दुर्मिळ,सुखद आश्चर्य आहे, हें मात्र निर्विवाद !].

फारच आव आणला का मी तज्ञ असल्याचा ? इतर कोण ऐकणारय तरी माझं, माबोशिवाय !! Wink

अरे भज्जीची इन्ज्युरीची बातमी तरी निदान सिलेक्शन नंतर आली. तो आधीपासून जखमी होता का माहीत नाही. पण निदान ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याचे आधीचे सातत्य महत्त्वाचे नव्हते.

पेस बोलर्सच्या १०-१५ ओव्हर्स झाल्या की एका बाजूने पूर्वी कुंबळे किंवा हरभजन जेव्हा विकेट्स काढत (कधी सचिन, सेहवाग) तेव्हाच आपण परदेशात त्यांना लौकर गुंडाळू शकलो आहे. ते काम आश्विनने केले नाही. तुम्ही पोर्ट ऑफ स्पेन (२००२), लीड्स (२००२), अ‍ॅडलेड (२००३), जमेका (२००५), जोहान्सबर्ग (२००६), ट्रेन्ट ब्रिज (२००७), पर्थ (२००८), हॅमिल्टन (२००९), दरबान (२०१०) या परदेशात जिंकलेल्या टेस्ट मॅचेस ची स्कोअरकार्ड्स बघा. ही 'सपोर्ट अ‍ॅक्ट' अत्यंत महत्त्वाची आहे. ते काम कधी कुंबळे, कधी भज्जी तर कधी तेंडुलकर/सेहवाग ने केले आहे. माझ्या मते याचे कारण म्हणजे आपले पेसर्स ५-१० ओव्हर्सच एका भरात त्याच इंटेन्सिटीने टाकू शकतात. आपण तीन पेसर्स पेक्षा जास्त कधीच खेळवत नाही. आश्विनने विकेट्स काढल्याशिवाय आपण ऑसीजना लौकर आउट करणे अवघड आहे.

एक वॉर्न सोडला तर बाकीच्यांचा क्लासिकल स्पिन तेथे फारसा यशस्वी नाही. भज्जी जरा खुन्नसमुळे खेळ उंचावू शकणारा (वॉ सारखा) खेळाडू आहे. त्यामुळे तो तेथे आवश्यक आहे. २००८ मधे ते मंकी गेट झाल्यानंतर त्याचा वन डे फायनल मधे (त्या प्रकरणातील मुख्य लोक) हेडन व सायमण्ड्स च्या विकेट काढण्यात मुख्य हात होता. घरच्या सिरीज मधे (विंडीज) त्याला आधीच दणका दिलेला होता, त्यामुळे तो जागा होऊन नीट खेळला असता/खेळेल.

Pages