भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार. पेपरवाल्याने आज अत्यंत प्रेमाने मला दोन कानडी, एक मल्याळम आणि एक गुजराती पेपर टाकलाय. Happy ऑनलाईन मधे कुठे टीओआय बघू का?

Rahul Sharad Dravid laa chaalisaavyaa varshaat padaarpanaachyaa haardik shubhechchhaa...

Thanks a lot for always being there for real cricket... The Test Cricket... And playing it more (in terms of balls faced) than any other living or dead...

>>हे सर्व टेस्ट बद्दल चालू आहे.
+१ धन्यवाद केदार! "आठवण" करून दिल्याबद्दल Happy

भाऊ,
सहमत.. पण माझी पोस्ट पूर्ण वाचा. प्रेरणा ही "ईंटेंसिटी" या अर्थाने मी लिहीलय.. leading from front हे कप्तानासाठी जर "प्रेरणा वा ईंटेंसीटी" च्या व्याखेत बसवणे तुम्हाला मान्य असेल तर त्या बाबतीत "कसोटी" मध्ये धोणी कमी पडतो ना?
प्रेरणेचा मुद्दा मला गौण वाटतो.. सांघिक खेळ, तोही ईंटेंसिटी ने खेळला तर या भारतीय संघाला रोखणे आजही अवघड आहे. नेमकी तिथेच गडबड होते आहे. आणि अयापिल, t20 वगैरे मूळे एकंदरीत कसोटी साठी आवश्यक मानसिकता दुर्मिळ होत चालली आहे हेही खरे (टिकलेत ते सचिन, द्रविड, कारण कसोटी हाच त्यांचा फोकस होता. बाकी नवोदितांसाठी कसोटी हा ऑप्शन चा पेपर असल्या सारखे त्यांचा अ‍ॅप्रोच असतो. अशा वेळी कप्तान कुणालाही करा, निकाल तोच लागणार.)

युवराजने २००० साली भारतीय संघात पदार्पण केले. सेहवागने २००२ साली व धोनीने २००५ साली. धोनी २००७ मध्ये भारताचा कर्णधार झाला. धोनीच्या अनुपस्थितीत कधी रैना, कधी गंभीर तर कधी सेहवाग कर्णधार असतो. पण ती तात्पुरती सोय असते. युवराजला तात्पुरता कर्णधार व्हायची संधी पण कधी मिळाली नाही. युवराज व सेहवाग या वरिष्ठ खेळाडूंच्या दृष्टीने धोनी 'कानामागून आला आणि तिखट झाला' असा असणे स्वाभाविक आहे. सेहवागची नाराजी फारशी कधी दिसली नाही, पण युवराज अनेकवेळा आजाराचे कारण दाखवून दौर्‍यातून माघार घेतो. यामागे बहुतेक ही नाराजीच असावी.

बाकी नवोदितांसाठी कसोटी हा ऑप्शन चा पेपर असल्या सारखे त्यांचा अ‍ॅप्रोच असतो. अशा वेळी कप्तान कुणालाही करा, निकाल तोच लागणार>>> सहमत. मुळात सध्या क्रिकेट इस एक्वल टू वन डे झालेले आहे. कारण तिथे ग्लॅमर जास्त आहे. त्यामानाने कसोटी सामने डल वाटतात (मला नव्हे!!!)

सांघिक खेळामधे मोठ्ठा मुद्दा खेळाडूच्या इगोचापण येतो. नविन आलेला खेळाडू त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्यापेक्षा किंवा एक संघ म्हनून खेळण्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक आकडेवारीचीच चिंता करायला लागतो तेव्हा सचिन, राहुल सारखे लोक कुठे कुठे सावरणार?

अतिक्रिकेट हे दुसरे कारण. खरंतर या अतिक्रिकेटचा चपखल वापर करून घेत भारताला दोन तीन बॅकप टीम तयार ठेवणे सहज शक्य आहे. पण ते होताना दिसत नाही. एखादा प्रमुख खेळाडू दुखापतीने जास्त काळासाठी बाहेर गेला की मग त्याची रिप्लेसमेंट शोधायची सुरूवात होते.

मास्तुरे,
तुम्ही पण केदार सारखे (कुठली वर्तमानपत्रे वाचतोस रे?) "संध्यानंद" छाप गॉसिप करताय का? Happy

>>स्वतःच्या वैयक्तिक आकडेवारीचीच चिंता करायला लागतो
१+ दुर्दैवाने त्याला दुसरा पर्याय नसतो.. कारण संघात आपले स्थान पक्के करणे हा त्याचा पहिला ऊद्देश असतो असे नाही का? आणि एक दोन संधीतच फेल गेला की त्याच्या नावाने आपल्याकडे शंख वाजवतात.

परवाच्या सामन्यात मी वैयक्तीक, लक्षमण ला बसवून रोहित शर्मा ला घ्यायला उत्सूक असेन (क्षेत्ररक्षण अधिक चांगले शिवाय गोलंदाजी देखिल करतो).

पुजारा कुठे गायबला आहे? तो बराच प्रॉमिसींग वाटला होता.

जाऊ दे लोक हो! भांडू नका उगाच! पर्थ ची मॅच आपण जिंकणार! मास्तरच्या अंदाजाच्या बरोबर उलट अंदाज वर्तवायचा हेच आपलं ध्येय! Proud

दुसरी कसोटी जर आपण पहिली गोलंदाजी घेतली असती तर जिंकले असते........सगळा ऑस्ट्रेलिया बोंबलत होता पहिल्या दिवशी बॉल रंग दाखवणार आहे......तरी सुध्दा अक्कल नाही वापरली.......

आता पर्थ मधे नसलेली अक्कल वापरण्याची बुध्दी दे देवा Happy

पुजारा कुठे गायबला आहे >> तू कुठले पेपर वाचतोस रे ? Wink IPL च्या आधी injured झालाय तो. सध्य फिट आहे पण अर्थात त्याला फिटनेस नि form prove केल्याशिवाय घेतले जाणार नाहि हे उघड आहे.

संघात दुफळी असल्याच्या बातम्या नेहमी down under च्या दौर्‍यात का येतात ? Happy

सेहवागला captaincy हवी असे ग्रुहित धरले तरी असे अचानक तो का करायला लागेल ? विशेषतः त्याच्या स्वतःच्या फारशा धावा होत नसताना ? २-३ असा स्कोर असताना ? Give him little bit of credit guys !.

युवराज अजून टेस्ट मधे नक्की असल्याचे फारसे दिसत नाहि तो माघार घेण्याचा प्रश्नच कुठे आला ? त्याला फारसे मनावर घेउ नका. Happy

१+ दुर्दैवाने त्याला दुसरा पर्याय नसतो.. कारण संघात आपले स्थान पक्के करणे हा त्याचा पहिला ऊद्देश असतो असे नाही का? आणि एक दोन संधीतच फेल गेला की त्याच्या नावाने आपल्याकडे शंख वाजवतात. >> नवीनच कशाला, जुन्यांच्या नावाने पण वाजवतात. थोडक्यात काय प्रत्येक बॅटसमन ने प्रत्येक मॅचमधे शतक ठोकले नाहि, प्रत्येक बॉलरने ५-५ विकेट्स घेतल्या नाहित नि कप्तानाने प्रत्येक मॅच जिंकली नाहि कि कोणि ना कोणी तरी कुठे ना कुठे तरी शंख घेऊन उभा असतोच Wink

gulf news, arabian business >> अच्छा म्हणजे पाकिस्तान क्रिकेट follow करतोयस होय Lol

मुळात सध्या क्रिकेट इस एक्वल टू वन डे झालेले आहे. कारण तिथे ग्लॅमर जास्त आहे. त्यामानाने कसोटी सामने डल वाटतात
माझे मत पुनः मांडतो. जसे आय पी एल मधे खेळाडू विकत घेऊन संघ बनवतात तसेच फक्त भारतातील खेळाडू (विकत) घेऊन १२ ते १६ संघ बनवावे, नि त्यांच्यात एक दिवशीय सामने ठेवावेत. हे असे निदान पुढली तीन वर्षे करावे. त्या योगे, अनेक नवीन खेळाडूंना संधि मिळेल. व ती सुद्धा निवड समितीतल्या नि बीसीसीआय मधील ठराविक लोकांवर अवलम्बून न रहाता! आपपापसातल्या स्पर्धेमुळे खेळाचा दर्जा सुधारेल. जुन्या खेळाडूंना केवळ वय झाले, इतरांना संधि या कारणासाठी बसवून ठेवण्या ऐवजी त्यांना खेळू देत, थकले की आपोआप निवृत्त होतील.

फार तर याच संघात काही कसोटी सामने पण खेळावेत. फार तर वर्षाला एक परदेशी संघ (जो त्या वर्षी प्रथम क्रमांकाचा असेल त्याला) बोलवावे. परदेशात असतात तशी पिचेस तयार करण्याचे तंत्रज्ञान नि पैसा आहेच. पण परदेश दौरे तीन वर्षे बंद. कुणाला परदेशी जायचे असेल तर जातील सुट्टी काढून, स्वतःच्या पैशाने. क्रिकेट खेळाडू सोडून इतर सर्व जण तसेच करतात!

केदार, असामी, भाउ, फारेंड, मास्तुरे, चिमण काय म्हणता?

नाहीरे बाबा... "ईथे" तेच पेपर येतात.. बाकी ऑनलाईन पहावे लागतात.. टाईंम्स चे पेज घरी ऊघडायची सोय नसते (लहान मुलगी असल्याने) ईतके "रंगीबेरंगी" फोटो असतात! पाक क्रिकेट फॉलो करावे लागणार नाही. ईथे फुकट तिकीट देवून बोलावून नेतील Happy

मुली ला बाबांची मॅच मात्र आवडीने बघायची असते हे काय ते सुदैव! ३ १/२ वर्षाची ती पोर काय फोर मारली /कॅच घेतला म्हणून टाळ्या पिटते.. अन्यथा डिस्कवरी, नॅशनल जीओ, हॅरी पॉटर्स, जुमानजी, किंवा थेट जुनी हिंदी गाणी हेच ऐकावं/बघावं लागतं.. Happy

असो. थोडक्यात मॅच बघून ती खुष असते.. मग पाँटींग ने आपल्याला धुपटले तरी टाळ्या पिटते किंवा चुकून ऊमेश यादव ने कॅच घेतला तरी.. हे असं आपल्याला जमायला हवं नाही?

केदार, असामी, भाउ, फारेंड, मास्तुरे, चिमण काय म्हणता?>> स्वप्नरंजन Lol वर लोक IPL ला शिव्या घालत आहेत नि तुम्ही तेच करायचे म्हणता ? Happy

मग पाँटींग ने आपल्याला धुपटले तरी टाळ्या पिटते किंवा चुकून ऊमेश यादव ने कॅच घेतला तरी.. हे असं आपल्याला जमायला हवं नाही? >> Happy .. तू गंभीरचे कौतुक करुन सुरूवात तर केली आहेसच कि, पुढची पायरी धोनी Wink

झक्कीजी, कदाचित आपण उपरोधिकपणे वरची पोस्ट लिहीली असेल; पण, सिरियसली, मलाही असाच एक प्रश्न हल्ली सतावतो. ज्यावेळीं आपण आंतराष्ट्रीय सामने जिंकतच नसूं तेंव्हा लोक क्रिकेटचा निखळ आनंद मनसोक्त लुटत असत. जिंकण्याचं युग सुरूं झालं व त्या निखळ आनंदाला पैसा, ग्लॅमर व राष्ट्रीय प्रतिष्ठा यांची फोडणी मिळाली. या नव्या पदार्थाचीही एक झिंग आहे हे निर्विवाद पण खेळाच्या निखळ आनंदाची खरी अवीट चवच त्यामुळे आपण विसरून गेलो कीं काय अशीही शंका येते. बेसबॉल अमेरिकेत लोकप्रिय असूनही त्या खेळाचा अनेरिकन इतर देशात प्रसार करण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामागे हेच तर कारण नसेल ? पूर्वी कांगा लीग, आंतर महाविद्यालयीन, रणजी करंडक सामन्यांचा काय आब असायचा; पण त्यांत पैसा, ग्लॅमर व मुख्य म्हणजे राष्ट्रीय प्रतिष्ठा यांच्यामुळे येणारी झिंग नसल्याने केवळ राष्ट्रीय संघात येण्यासाठीच्या वाटेवरचे अपरिहार्य टप्पे म्हणून खेळाडू त्या स्पर्धांकडे पहातात व प्रेक्षक तर त्याकडे पाठच फिरवतात. आपण म्हणतां तसं फक्त आपसातच संघ पाडून खेळण्याने क्रिकेट खेळाचा निखळ आनंद पुन्हा घ्यायला मिळेल. पण कालचक्र असं उलटं फिरवणं आतां शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे.
असो. हा धागा सध्याच्या दौर्‍यापुरताच असल्याने असे मुलभूत प्रश्न काढून कशाला टपली मारून घ्या !!!

हा धागा सध्याच्या दौर्‍यापुरताच असल्याने, असामी व भाऊ यांना उत्तरे क्रिकेट - २ या ठिकाणी लिहीली आहेत. भारत ऑस्ट्रेलिया मालिकेचा या विषयाशी संबंध नाही.

नच कशाला, जुन्यांच्या नावाने पण वाजवतात. थोडक्यात काय प्रत्येक बॅटसमन ने प्रत्येक मॅचमधे शतक ठोकले नाहि, प्रत्येक बॉलरने ५-५ विकेट्स घेतल्या नाहित नि कप्तानाने प्रत्येक मॅच जिंकली नाहि कि कोणि ना कोणी तरी कुठे ना कुठे तरी शंख घेऊन उभा असतोच >>>
+ १ म्हणूनच जेंव्हा इंग्लंड मध्ये आपले पानिपत झाले तेंव्हा मी बिग डील हारलो तर हारलो असे लिहिले होते पण मला वाटले ते फ्लुक मध्ये हारलो, पण ऑस्ट्रेलियात दुसरे पानिपत बघवत नाहीये. आपण त्या आधी विंडिजला गेलो तिथेही फार उच्च खेळलो नाही. म्हणून प्रश्न उभे राहिले. शिवाय संधी नव्हती असे नाही. पहिली मॅच आपण जिंकू शकलो असतो. तिथेच गेम झाली.

आपली गंमत (भारतीयांची) अशी आहे की एक मॅच जर दणक्यात किंवा साधारण जिंकली तरी हे सर्व प्रश्न परत लयाला जातील. पडद्या आड आणि मग कोणीच पुढच्या तीन वर्षात आपली टीम कशी असेल ह्याचा विचार करणार नाही. Happy

आपली गंमत (भारतीयांची) अशी आहे की एक मॅच जर दणक्यात किंवा साधारण जिंकली तरी हे सर्व प्रश्न परत लयाला जातील. पडद्या आड आणि मग कोणीच पुढच्या तीन वर्षात आपली टीम कशी असेल ह्याचा विचार करणार नाही >> +१ Happy

दोन नवीन म्हणी:

सचिनच्या महाशतकाच्या प्रतीक्षेत: "नशीब पांडू त्याला काय करील तेंडू"

द्रविड चार डावात चार वेळा त्रिफळाचित झाला: "भरवशाच्या भिंतीला भोक"

मला वाटतं की भारताचे कसोटीसाठी २ वेगवेगळे संघ असावेत. एक संघ फक्त भारतातले सर्व व परदेशातले फक्त बांगलादेश, झिंबाब्वे, विंडीज अशा लिंबूटिंबू संघाबरोबरचे कसोटी सामने खेळेल. दुसरा संघ फक्त परदेशातले बलाढ्य संघांबरोबरचे कसोटी सामने खेळेल. पहिल्या संघात मुरली विजय, दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल, युसुफ पठाण, बद्रीनाथ इ. गल्लीतले दादा असतील. दुसर्‍या संघात सचिन, द्रविड, झहीर इ. शेर असतील.

भोक परवडेल भगदाड नको!
दुसर्‍या संघात सचिन, द्रविड, झहीर इ. शेर असतील. सध्या ऑस्ट्रेलियात आहेत तसे?! Proud

मटा मधुन साभारः-
इथेच झुकविल्या होत्या कांगारूंच्या गर्विष्ठ माना
जगातील सर्वात बलाढ्य फलंदाजी असे भारदस्त बिरूद मिरविणारी फलंदाजी असतानाही परदेशातील लागोपाठ झालेले सहा पराभव, खचलेला आत्मविश्वास अन् खांदे पाडलेली देहबोली आणि अनेक क्रिकेट पंडितांनी वर्तविलेले 'व्हाइट वॉश'चे भाकित... जणू काही सर्वच जग विरोधात गेले असतानाही 'टीम इंडिया' या बॅडपॅचवर मात करू शकते. अगदी २००७-०८ च्या मालिकेप्रमाणे... तेव्हा सिडनीत झालेल्या 'मंकीगेट' प्रकरणानंतर त्वेषाने खेळलेल्या भारताने पर्थवर ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले होते. अगदी त्याचप्रमाणे सिडनीत मानहानीकारक पराभवानंतर भारतही पुन्हा पर्थवर दिमाखाने भरारी घेऊ शकतो...

जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी असा पर्थचा लौकिक.असे असूनही २००७-०८ मध्ये पर्थमध्ये भारताने ७२ धावांनी विजय मिळविला होता. तेव्हाही पहिल्या दोन कसोटीत भारताचा पराभव झाला होता. सिडनीत तर हरभजनसिंग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यात घडलेल्या 'मंकीगेट'ने वातावरण पूर्णपणे दूषित झाले होते. वादाच्या एका क्षणी तत्कालिन कर्णधार अनिल कुंबळे याने दौरा अर्धवट सोडण्याची धमकीही दिली होती. मात्र, प्रकरण निवळले आणि दौरा शाबूत राहिला. तिसरी कसोटी होती पर्थमध्ये. हिरवीगार वेगवान खेळपट्टीवर भारतीयांचा कस कसा लागणार नाही, याचे चित्र रंगविण्यात ऑस्ट्रेलियातील मीडिया गुंग होती.

ब्रेट ली, मिशेल जॉन्सन यांच्या भेदक माऱ्यासमोर दविड खेळपट्टीवर टिच्चून उभा राहिला. तेंडुलकरही साथीला धावला. दुर्दैवाने दविडचे शतक (९३) हुकले खरे, पण त्याने आपले काम चोख पार पाडले होते. भारत सर्वबाद ३३०. प्रचंड फॉर्मात असलेली कांगारुंची फलंदाजी साफ कोसळली. सायमंड, गिलख्रिस्ट यांचा अपवाद वगळता सारे शेर आर. पी. सिंह आणि इरफान पठाणसमोर ढेर झाले होते. भारताला पहिल्या डावात आघाडी मिळाली ती तब्बल ११८ धावांची. द्रविड- तेंडुलकर स्वस्तात बाद झाले; पण सेहवाग, लक्ष्मण, ढोणी, पठाण यांनी कांगारुवरील आघाडी चारशेच्या पलीकडे नेऊन ठेवली होती. पर्थवर चौथ्या डावात ४१२ धावा करण्याची वेळ येईल, याची कल्पनाही ऑस्ट्रेलियाने केली नव्हती. मात्र पाँटिंग, हसी, क्लार्क खेळत गेले. मिशेल जॉन्सननेही शेवटपर्यंत किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पठाण, आर.पी.सिंग. कुंबळे, इशांत शर्मा यांच्यासमोर त्यांची डाळ शिजली नाही. अखेर ३४० धावांवर डाव संपला. भारताने एक ऐतिहासिक विजय मिळविला होता. कांगारूंना त्यांच्या शक्तीस्थानी चिरडून टाकले होते. इशांत शर्माने आपल्या आगमनाची चुणूक दाखविली होती. पठाणचीही अष्टपैलू खेळी त्याच्यामधील क्षमतेची चुणूक दाखविणारी होती. या युवा खेळाडूंनी एक ऐतिहासिक विजय साकार केला होता. आताही तसेच होईल? 'टीम इंडिया' या देदिप्यमान विजयापासून प्रेरणा घेऊ शकते...!

'टीम इंडीया'चं माहित नाही, निदान उद्यां पहाटे थंडीत मॅच बघायला उठण्यासाठी आम्हाला तरी या रिपोर्टमुळे प्रेरणा मिळावी !!! Wink

आम्हाला तरी या रिपोर्टमुळे प्रेरणा मिळावी !!! डोळा मारा >>> Lol मिळणार मिळणार. भारत हारो वा जितो, क्रिकेट बघावेच लागणार. काय करणार डिएनए तसा आहे.

बाकी उदय कडून + पोस्ट (लेखाची का होईना) पाहिल्यावर बरे वाटले. Happy

>>> 'टीम इंडीया'चं माहित नाही, निदान उद्यां पहाटे थंडीत मॅच बघायला उठण्यासाठी आम्हाला तरी या रिपोर्टमुळे प्रेरणा मिळावी !!!

भाऊसाहेब,

उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजता सामना सुरू होणार आहे. तेव्हा पावणेआठ पर्यंत मस्त उबेत झोपा.

धन्यवाद, मास्तुरेजी.
तुम्ही आमच्या झोपेची काळजी घेतलीत,पण उद्या आपल्या हिरोनी मात्र परत आपली झोप उडवली नाही म्हणजे मिळवलं !! Wink

उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजता सामना सुरू होणार आहे. तेव्हा पावणेआठ पर्यंत मस्त उबेत झोपा.
>> नशीब. नायतर परत साडेपाचला उठून सक्काळ सक्काळ शिव्या घालत बसावं लागलं असतं. Happy उद्या शिव्या खायचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नशिबात असू दे.

Pages