भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि धोणी पण. काहीतरीच! काय करत होता कुणास ठाऊक? विटी दांडूत विटी कोलतात तसा चेंडू कोलला त्याने.

सचिन अत्यंत भंगार बॉलवर कमिट होऊन आऊट झाला... नक्की काय करत होता ते त्याला तरी कळले का ह्याची शंका आहे... बॉलचा टप्पा पडायच्या आधीच स्ट्रेट बॅट पॅड जवळ नेऊन तयार होता... बॉल थोडासा डेव्हिएट झाला आणि कॅच हसीच्या हातात....

लक्ष्मणला पडलेला बॉल जबरी होता... बॅटच्या मागे गेल्यावर हलकेच स्वींग होऊन दांडी घेऊन गेला...

३०० पार केले बाबा एकदाचे... झहीर आणि अश्विन त्रास देताहेत पण फार वेळ त्रास देतील असे वाटत नाहीये...

झहीर नि आश्विन याम्ना खेळताना बघून असे वाटते की धोणी नि कोहली यांनाच काय प्रॉब्लेम आले? एका एकी ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सोपी झाली का?

नक्की काय करत होता ते त्याला तरी कळले का ह्याची शंका आहे... बॉलचा टप्पा पडायच्या आधीच स्ट्रेट बॅट पॅड जवळ नेऊन तयार होता... बॉल थोडासा डेव्हिएट झाला आणि कॅच हसीच्या हातात....>>>>>>

हिम्सकूल, मी तो रिप्ले एकंदर चार वेळा पाहिला. सर्वात खटकणारी बाब म्हणजे:

बॉल त्याच्या बॅटच्या एजला लागून मागे गेल्यानंतर सचिनने एक डिग्रीसुद्धा मान वळवून मागे पाहिले नाही आणि समोरच्या गोलंदजाचा जल्लोष पाहूनच निघाला. कोण हा आत्मविश्वास की कॅच घेतला गेला असेलच!

चक्क षट्कार मारला झहीरने!>>>>>

झक्की, चितेला आग लावण्यापुर्वी प्रेताला नवीन वस्त्रे चढवतात तसे आहे ते

आता मीच आडवा पडतो, उद्या सकाळी दहा वाजता उठून बघेन काय झाले ते!
कदाचित चहापानानंतर एकाएकी मुसळधार पाउस सुरु होईल तो उद्या रात्रीपर्यंत थांबणार नाही की सामना अनिर्णित! जय भारत!

बाकी काहीही म्हणा, मागील टेस्ट्पेक्षा या टेस्ट्मधे भारताच्या फलंदाजीमधे खुप सुधारणा झाली आहे. मागची टेस्ट १२२ धावांनी हरलो होतो, दुसरी टेस्ट कमाल ११७ धावात हरु. Lol

<< हा हंत हंत. तसे आज होणे नव्हते! >> गुड शॉट, झक्कीसाहेब; अचूक टायमींग, नेमकं प्लेसींग !!!
<< सेहवाग, धोणी, कोहली....भ%$&नां बसवा बाहेर.... >> त्रिकूट निवृत्त झाल्यावरची आपली दुसरी फळी आहे ती !!! ह्या सामन्यात गंभीरने धांवा केल्या म्हणून तो "भ%$&नां बसवा बाहेर " मधून बाहेर का ? Wink

बीसीसीआय ची नविन न्युज...........

दुसर्‍या देशांच्या संघा साठी भारतीय संघ उपलब्ध आहे... संघांची वैशिष्ट्ये..आणि करु शकणारी कामे खालील प्रमाणे...
१) कोणत्याही देशात हारु शकतो...आपल्या संघाला नविन उभारी देण्यासाठी आम्हाला बोलवा...
२) कोणत्याही फलंदाजाचा गमावलेला आत्मविश्वास आणि फॉर्म परत मिळुन देण्याकरिता आमचे गोलंदाज जीव तोडुन मेहनत करतात... त्यांना मदत करणारे अत्यंत विश्वासु क्षेत्ररक्षक अहोरात्र डोळ्यात तेल घालुन चेंडुंना सीमापार पर्यंत साथ देतात...
३) गोलंदाजांना विकेट्स मिळाव्यात त्याच बरोबर त्यांना नविन नविन विक्रम रचावेत या करिता आमचे फलंदाज प्रयत्नशिल असतात...आपल्या गोलंदाजांना फक्त बॉल टाकायचा आहे...विकेट देण्याचे काम आम्ही स्वतः करु....यात आमचे प्रमुख पदवीधर आहे सेहवाग, कप्तान धोनी आहेत..बाकीचे सुध्दा आहेत पण शिकत आहेत ते..
४) आमच्या विरुध्द आपण बिंधास्त पणे नविन नविन खेळाडु आणावे आणि चाचणी करुन घ्यावी...त्यांना योग्य ती उभारी आमचा संघ निश्चितच देईल.. नव नविन खेळाडुनां पुढे आणने हे आमचे कर्तव्य आहे...
५) आपल्या देशातील कोणत्याही गल्लीतल्या जलदगती गोलंदाजांना पुढे आणा......आम्ही त्यांचा यथोचित सम्मानाने वागवु... एकाच डावात ५ -६ विकेट्स तर त्यांना आरामात न मेहनत करता देउ...
६) तुमच्या रिटायर्ड होणार्‍या खेळाडुंना खेळावा...कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना नवनविन विक्रम आणि शतके साजरी करण्यास मदत करु...त्यासाठी आमचा संघ कटिबध्द आहे...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

पैसे आगाऊ देणे.....................
आपले नम्र
बीसीसीआय........

ह्या सामन्यात गंभीरने धांवा केल्या म्हणून तो "भ%$&नां बसवा बाहेर " मधून बाहेर का>>>>>>. गंभीर किमान ५ डावात एकदा तरी खेळतो... Happy

बाकीचे १० डावात सुध्दा एकदा खेळत नाही...........

धोनी ने शेवटचे ५० कधी केले टेस्ट मधे...........????? ज्याला आठवते त्याला माझ्यातर्फे १ रुपयचे बक्षीस Happy

धोनी ने शेवटचे ५० कधी केले टेस्ट मधे...........????? ज्याला आठवते त्याला माझ्यातर्फे १ रुपयचे बक्षीस >>

याच कसोटीच्या पहिल्या डावात. आता बक्षीस मिळेल का? Happy

ये रे ये रे पावसा....

गावसकरनी जाम शिव्या घातल्यात इंडीयन टीमला आज..

गावसकरनी जाम शिव्या घातल्यात इंडीयन टीमला आज.. >>> घालणारच शिव्या तो... प्रत्येक अंदाजाला पैसे मोजतात ना... :p

३०० अंदाज ४००ला पडला...

दारूण पराभव का म्हणतात ते भारतीय संघाला चांगलंच माहित आहे. Happy

धोणीला चष्म्याचा नंबर आलाय का? बॉल दिसला नाही, की समजला नाही की नक्की झाले काय?

विराट कोहली सध्या त्याचे टोपणनाव सार्थ करतोय. "चिरकूट"

अपेक्षेपेक्षा बरी झुंज दिली. गेल्या ११ डावांपासून सतावत असलेला ३०० धावांचा अडथळा पार झाला. सचिनला होत असलेला १०० धावांचा अडथळा असाच पार व्हावा हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना!

पहिल्या २ सामन्यात, भारताच्या वरच्या ७ फलंदाजांनी खेळलेल्या एकूण २८ डावात फक्त ७ अर्धशतके झाली आहेत (सर्वाधिक ८३). यावरून फलंदाजीची दारूण अवस्था लक्षात येते. कोहली पुढच्या सामन्यात बाहेर जाऊन रोहीत शर्मा नक्कीच आत येणार. गंभीरने ८३ केल्यामुळे त्याची हकालपट्टी लांबणीवर पडणार. खरं तर धाडस करून सेहवागऐवजी रहाणेला आत आणावे. पण पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर रहाणे बळीचा बकरा ठरेल. गोलंदाजीत फार बदल करता येणार नाही. ओझाला आत आणला पाहिजे. पण त्यासाठी एक फलंदाज (कोहली किंवा त्याची जागा घेणारा) किंवा अश्विनला वगळावे लागेल.

संघातल्या वयस्कर खेळाडूंना वगळावे अशी काही जण मागणी करत असतात. पण इंग्लंडच्या दौर्‍यावर भारताचा सर्वाधिक वयस्कर खेळाडू (द्रविड) फलंदाजीत प्रथम क्रमांकावर होता, तर त्याखालोखाल वय असलेला (सचिन) दुसर्‍या क्रमांकावर होता. आतासुद्धा पहिल्या २ सामन्यानंतर सचिन फलंदाजीत प्रथम क्रमांकावर आहे.

गांगुली निवृत्त झाल्यावर त्याची ६ व्या क्रमांकाची जागा अजूनही भरून निघालेली नाही. आधी युवराज, नंतर रैना आणि आता कोहली त्या जागेवर फारसे काही करू शकलेले नाहीत. आता बघू रोहीत शर्मा काय करतो ते.

एकंदरीत भारताने दुसर्‍या डावात तब्बल ८ तास फलंदाजी करताना ११० हून अधिक षटके खेळला आणि सकारात्मक फलंदाजी करताना प्रतिषटक ३.६० च्या धावगतीने ४०० धावा केल्या हेही नसे थोडके!

मास्तुरे, ही सकारात्मक विचार करण्याची बाब (माझ्यामते तरी) किंचित अधिक होत आहे. पराभवातही दर्जेवारी ठरवण्यात काय अर्थ आहे? पूअर शो झाला हेच खरे ना? Happy

मास्तुरे ..............११० ओवर्स खेळला यावर समाधान मानायचे ...म्हणजे अण्णांनी सरकार लोकपाल वर चर्चा करते यावर समाधान मानन्या सारखे आहे Happy

मास्तरा, २-०! यापुढे कितीही आपटली तरी आपण मालिका जिंकणार नाही हे लक्षात आलंच असेल तुझ्या! Proud

पण ४०० रना केल्यामुळे टीम अजूनही थोडी फार फाईटिंग स्पिरिट दाखवतेय याचा थोडा आनंद झाला!

ओझाला आत आणला पाहिजे. पण त्यासाठी एक फलंदाज (कोहली किंवा त्याची जागा घेणारा) किंवा अश्विनला वगळावे लागेल. >> अश्विनला फलंदाज म्हणून घेउन कोहलीला वगळावे (अश्विनचा तसाही गोलंदाजीत काही उपयोग नाहिये) आणि एक गोलंदाज वाढवावा. तसेच अश्विनला धोनीच्याही वर फलंदाजीला पाठवावे Happy

on a serious note सेहवागला २ मॅच बसवून ठेवावे.

Pages