Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.tarladalal.com/rec
http://www.tarladalal.com/recipes-using-rice-flour-534 हे घे नंदिनी
मोप प्रकार आहेत!
.
.
अरे देवा. तांदूळाचे पीठ नको
अरे देवा. तांदूळाचे पीठ नको आहे. अख्खा तांदूळ (भिजवून वाटलेले चालतील) अथवा त्याचा रवा अशीच थीम आहे (पण भाताचे प्रकार नकोत).
आणी स्पर्धेला म्हणून जरा कठिण रेसिपी सुचवा रे. आई रत्नागिरीत आहे. तिथे लोक दररोज तांदळाच्या भाकर्या/उकड आणि मोदक खातातच की.
देशी सुशी? चिकट भातात शिजताना
देशी सुशी?
चिकट भातात शिजताना केशर आणि बाकी फ्लेवर्स घालता येतील. वळकट्या करताना चटण्या आणि मीट किंवा भाज्या वापरून बघायचं. अशीच नारळ, सुकामेवा वापरून गोड सुशी?
नंदिनी! जुन्या हितगुज वर
नंदिनी! जुन्या हितगुज वर सुरनोळीची रेसिपी होती ति ट्राय करता येईल.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93071.html?1134039795
अख्खा तांदूळ (भिजवून वाटलेले
अख्खा तांदूळ (भिजवून वाटलेले चालतील) अथवा त्याचा रवा अशीच थीम आहे (पण भाताचे प्रकार नकोत). >>> हे नीट न वाचता सगळे भाताचेच प्रकार सुचवले होते म्हणून पोस्ट एडीट केलं
देशी सुशीची लाजोची
देशी सुशीची लाजोची रेसिपी
http://www.maayboli.com/node/10559
मृण्मयी, सुशीचा आयडिया चांगली
मृण्मयी, सुशीचा आयडिया चांगली आहे. पण त्याला तांदूळ कुठला वापरायचा?
लाजोच्या कृतीमधे राईस पेपर नसेल तर फेण्या करायची मस्त कल्पना आहे. आईला हे सर्व सांगते. तिला जमलं तर ती नक्की करेल. मला करायची हुक्की आली तर मीपण करेन.
धन्यवाद. काहीच नाही जमले तर फिरनी तरी नक्कीच बनवणारे म्हणाली. 
नंदिनी, १. तांदळाच्या
नंदिनी,
१. तांदळाच्या रव्याचा आमरस घालून शीरा
२. तांदळाच्या रव्याचा उपमा
३. भाताचे वडे कांदा, मिरची, कोथींबीर, कढिपत्ता घालून- खूप खुसखुशीत होतात. भिजवलेला साबुदाणा घातला तर दिसतापण छान.
४. भाताचं थालीपीठ
भाताचे वडे करा..
भाताचे वडे करा.. साबुवड्यासारखे. शॅलो किंवा डीप फ्राय करता येतात.

आर्च, भाताच्या वड्यामधे आधी
आर्च, भाताच्या वड्यामधे आधी तांदूळ शिजवून त्याचा भात केला असेल तर ते बाद होइल.
अख्ख्या स्पर्धेचे नियम अचाटच आहेत. (स्टीलच्याच वाटीप्लेटमधे सर्व्ह करायचे असापण नियम आहे) तांदळाचा रवा म्हणजे आपण इडलीला वापरतो तो का? त्याचा उपमा पण करता येतो?? कसा करायचा प्लीज सांग. जामोप्या, फोटो छान दिसतोय.
आईने सध्या फिरनी फायनल केले आहे. तीन चार वेगवेगळ्या फ्लेवर्समधे (केसर्पिस्ता, बदाम, चॉकोलेट, रोझ) अशी बनवायची म्हणतेय.
आधी काय नियम आहेत ते सांगा...
आधी काय नियम आहेत ते सांगा...
बापरे, कडक नियम आहेत.
बापरे, कडक नियम आहेत.
द्राक्षाच्या पानात भात व इतर भाज्या गुंडाळून Dolma नावाचा ग्रीक प्रकार करता येईल. गुगलवर चिकार प्रकार सापडतील. ओगले आजींच्या पुस्तकात कोबीची पाने वापरून पण एक रेसिपी आहे.
जाड, बुटका तांदूळ मिळत असेल तर रिसोटो करता येईल.
इथे देशी इन्स्पायर्ड रिसोतो आहे http://www.maayboli.com/node/24355
सुशीसाठी जाड, चिकट भात होईल असा कुठलाही तांदुळ चालेल.
ए फिरनी म्हणजे नक्की काय?
ए फिरनी म्हणजे नक्की काय?
खीर
खीर http://nishamadhulika.com/sweets/kesar-phirni-recipe.html
इडली चटनी सांबर आणि काय करता
इडली चटनी सांबर आणि काय करता येईल बर ???
पद्मा, कोणत्या वेळी करणार
पद्मा, कोणत्या वेळी करणार त्यावरून सुचवता येतील अजून पदार्थ. ब्रेफा, लंच, संध्याकाळचे खाणे म्हणून, कधी करणार इडल्या?
संध्याकाळी. म्हणजे रात्रीच्या
संध्याकाळी. म्हणजे रात्रीच्या जेवण सारखच, सगळे मित्र मैत्रिणी जमणार आहोत. आधी चिप्स, कॉल्ड ड्रिंक्स असेलच. मिसळ , पाव भाजी करून झालेय आधी. म्हणून आता इडली. जास्त किचकट नको, लहान मुलांना सांभाळून जमेल असं.
अगं नंदिनी भाताचे प्रकार नको
अगं नंदिनी भाताचे प्रकार नको आहेत ना ? मग सुशी किंवा डोल्मा कसं चालेल ? खरं तर रिझोटो पण नाही चालणार.
पद्मा, साऊथइंडियन स्टाईलचा
पद्मा, साऊथइंडियन स्टाईलचा भाताचा प्रकार जाईल बरोबर ... कॅप्सिकम राईस, टोमॅटो राईस किंवा लेमन राईस. गोड जेवणानंतर खायला ठेवायचं. फ्रूटसॅलड विथ आईसक्रीम किंवा ट्रायफल पुडिंग वगैरे
आज नवर्याचा मित्र जेवायला
आज नवर्याचा मित्र जेवायला येतो आहे. मलवणी पध्धतिने मासे बनवणार आहे. पण स्विट डिश म्हणुन काय करु ते सुचत नाही. नवर्याची सुचना मासे असतील तर दुधाच काहिही बनवु नको म्हणुन. काहितरी स्वीट डिश सुचवा ना! जेली बनवु का? की काही वेगळ?
रीमा खान्डवीच्या वड्या.
रीमा खान्डवीच्या वड्या. सोप्प एकदम.
इडली रवा तुपावर परतुन दुप्पट पाण्यात गुळ घालुन शिरा करायचा. ताटात थापुन वरुन खोबर ,बदामाचे पातळ काप
ह्या बेसिक शिर्यात आपापले बदल अॅडिशन केले की झाले!
Office मध्ये पॉटलक लंच आहे.
Office मध्ये पॉटलक लंच आहे. राईस / भाजी / ग्रेव्ही नेलि तर ७-८ लोकाना पुरेल एवढी, स्वीट नेल तर ३०-४० लोकाना पुरेल एवढ न्यायच आहे. मी गुलाबजाम चा विचार करते आहे, म्हणजे आद्ल्या दिवशी करुन ठेवता येतिल, आणि सकाळी घाई होणार नाही. मि स्वयंपाकात expert नाहिये. त्यामुळे प्लीज मला जमतील असे पदार्थ सुचवा.
इन्ना मासे आणि शिरा जमेल का?
इन्ना मासे आणि शिरा जमेल का?
अवंतिका, सायोच्या रेसेपीने
अवंतिका, सायोच्या रेसेपीने मलाई बर्फी, कप केक्स, ब्राउनीज वगैरे प्रकार आदल्या दिवशी करुन ठेवण्यासारखे आहेत.
रिमा, माझा पण हाच गोंधळ उडाला होता. पण तरीपण आम्ही कॅरेमल कस्टर्ड आणाले होते. ते पाहुण्यांना जेवण झाल्यावर बर्याच वेळाने खायला दिले
छ्या , आपल्या मालवणी जेवणात फॅन्सी गोड पदार्थांची कमीच आहे हं.
तू फळ कापून ठेऊ शकतेस. फळ, जेली बरोबर किंवा गोवन 'बिबींका' पण माश्यांबरोबर चालू शकते.
खांडवी गोव्याचीच की हो... पण
खांडवी गोव्याचीच की हो... पण शिरा म्हणून अपमान (दोघांचा ही).
नाहीतर डोडोल करा... मालवणी/ गोवन जेवणानंतर मस्त.
पण ते दूध, बर्फी बरा नाय वो मासे सांगाती.. पावण्याक काय कित्येक तास बसविता.. तीन तास तरी लागतात पचविल्याला...
झंपे, बंगाली लोक तर मासे
झंपे, बंगाली लोक तर मासे खाल्ल्या खाल्ल्या (फाटक्या) दुधाचे गोड पदार्थ खातात. त्यांना काही नाही होत, मग मराठी कोठे इतके नाजुक का?
बंगालात मासे शाकाहारीच
बंगालात मासे शाकाहारीच समजतत्त.. म्हणून मासे + दूध चालत असेल.
मॄण्मयी, हेच लिहिणार होते मी.
मॄण्मयी, हेच लिहिणार होते मी.
किंवा मृ, दूध फाटलेले असते
किंवा मृ, दूध फाटलेले असते म्हणून चालत असेल !
Pages