बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरच्या घरी वाढदिवसाची पार्टी आहे. लहान मोठे मिळुन १०-१२ जण असतील.
तर भाताचा प्रकार, रायता, चाट प्रकार, गुलाबजाम्/रसगुल्ले आणि केक हा बेत कसा वाटेल?

निर्मयी, चांगला वाटतोय मेन्यू. लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी सौम्य चवीचा भाताचा प्रकार/ वरण - भात वेगळा करायला हरकत नाही. मोठ्यांसाठी भाताचा मसालेदार प्रकार चालू शकेल.
तसेच सोबत सूप/ सार/ रस्सम् वगैरे ठेवायलाही हरकत नाही.

मंजू, फ्रूटसलाड जेवणानंतर देणार आहे त्यामुळे रायतं आणि ते चालून जायला हरकत नाही.तुझी पुर्‍यांची आयडिया पण छान आहे.
दीपा, इथे बाकरवड्या मिळाल्या तर नक्की करुन पाहिन.नाहीतर आहेतच आपले 'दीप' चे समोसे Happy
प्रॅडी,तुझा कंफर्ट फूड मेन्यू झक्कास आहे.पण ह्या चवीनं खाणार्‍या लोकांना बिर्याणीच पाहिजे Happy
थँक्यू मुलींनो..उद्या सांगतेच काय काय केलं ते Happy

अगं हो म्हणूनच लिहिलं मी. कंफर्ट फूड नाही ना करून घालत आपण लोकांना Happy त्यांच्यासाठी बेत म्हणून नाही सजेस्ट केला. चल छान होऊ दे तुझी पार्टी. आम्ही वाचूच उद्या काय केलंस ते.

शेवटी आज केलेला मेन्यू : चिप्स-डिप्स,समोसा चाट,पालक पुरी आणि त्याबरोबर खारातली मिरची,कैरीचं लोणचं,सनफ्लॉवर सीड्सची कोरडी चटणी,नंतर बिर्याणी-रायता,शेवटी फ्रूट सलाड Happy

गणपतीसाठी फक्त २८ दिवस राहिले आहेत. माझ्याकडे गणपतीच्या दर्शनाला संध्याकाळी जवळपास १५० लोक येतात. त्यांच्यासाठी डिश / स्नॅक्स / पेय सुचवा.

अंजली , साबुदाण्याचे वडे आणि खोबर्‍याची चटणी. मी वडे तयार करुन फ्रीज मध्ये ठेवते. आयत्यावेळी तळते. बरोबर फ्रुट सॅलड दिलय आतापर्यंत.
अर्थात हे ५/६ जण अचानक येत असतील तर शक्य आहे. २०/२२ लोक असतील तर केळ घातलेला शिरा किंवा आंबा शिरा केलेला. १५० लोकांच मात्र मला अंदाज नाही. इडली चटणी , उपमा, पुरी+बटाट्याची भाजी चालेल बहुदा.

पेयामध्ये
कोकम सरबत
वेलची घातलेली कॉफी
पन्हं (अ‍ॅपल सॉस घालून)
जलजीरा

अंजली,
http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/04/strawberry-lemonade.html

हे पेय करता येईल का? स्ट्रॉबेरीज फ्रेशच असल्या पाहिजेत असे काही नाही फ्रोझन वापरून करून ठेव. लेमोनेड पण आधी करून ठेवू शकतेस. लेमोनेड डिस्पेन्सर आणलास तर मग तुला हात घालून बसावे लागणार नाही प्रत्येकाला द्यायला. आणि ते स्ट्रॉबेरी क्युब्स अक्खेच असले पाहिजेत असेही नाही. कुकरच्या भांड्यात करून एक एक भांडे प्रत्येक लेमोनेड बॅचला करायचे.

स्नॅकमधे रगडा पॅटिस कसे वाटेल? टिक्क्या, रगडा आधी करून ठेवता येतील तसेच चटण्या वगैरे पण. शेफिंग डिश असेल तर बर्नर लावून ठेवलेस तर रगडा गरम राहिल म्हणजे मग ते गरम करायचे काम वाचेल. १५० वर टिक्क्या ओव्हनमधे ठेवल्यास तर त्यापण गरम रहातील.

प्रज्ञा, सीमा
धन्यवाद. मी बाहेरूनच करून घेईन. एवढ्या लोकांसाठी घरी करणं मला शक्य होणार नाही. पण मेन्यू आणि कृती मला सांगावी लागेल. पन्हं मागच्या वर्षी (घरीच) केलं होतं, यावर्षी बाकी काही सुचलं नाही तर तेच परत करेन.

मिनोती, मी माझी पोस्ट टाकेपर्यंत तुझा रीस्पॉन्स आला :). स्ट्रॉबेरी लेमोनेड छान वाटतंय. माझ्याकडे लेमोनेड डिस्पेन्सरपण आहे. रगडा पॅटीस २-३ वर्षांपूर्वी केलं होतं. यावर्षीपण करायला हरकत नाही.

अंजली, माझा दोन वर्षांपुर्वीचा गणपती मेनु ५०-६० लोकांसाठी- पोह्याचा चिवडा, चण्याची रस्सा उसळ आणि शिरा.
चिवडा आधीच करुन ठेवता येतो. शिर्‍याची तयारी पण आधीच करुन ठेवता येते, चणे उकडुन, ग्रेव्हीची तयारी आदल्या दिवशी करता येते. एक तास आधी चण्याची उसळ आणि शिरा करुन होतो. कमी श्रम आणि पोट्भरीचा मेनु होतो.

सीमा, तुझ्याकडे दरवर्षी गणपतीला साबु वडे असतात का. नाही म्हणजे आपलं असंच विचारलं. माहिती म्हणून. Wink

अंजली, दिडशे माणसांसाठी बाहेरून करून घेण्याशिवाय पर्यायच नाही. साबुदाणा खिचडी/ मसालेभात/ भरपूर भाज्या घातलेला पुलाव यापैकी काही द्यायला तुला आवडेल का बघ. सोबतीला दह्यातलं एखादं रायतं आणि गोड म्हणून मोतीचूर लाडू किंवा उकडीचा मोदक.

इकडे दर्शनाला लोकं येतात ते आधी किमान पाच घरी जाऊन आलेली असतात आणि पुढे दहा घरी जायची असतात, त्यामुळे चिवडा, चकली, कचोरी, बाकरवडी इत्यादी सुका फराळ खपून जातो.

मी मागच्या वर्षी रवा इडली - दोन प्रकार - एकात काजु, कढीपत्ता, कोथिंबीर आणि दुसर्‍यात पालक प्युरी आणि त्याबरोबर हिरवी चटणी आणि टोमेटो चट्णी केली होती. सोबत बटाट्याचा चिवडा, अळुवडी आणि शेवटी मसाला दूध. बाकी प्रसादाचे प्रकारही होतेच. पण २५-३० जणांसाठीच.

१५० लोकांसाठी मसाला पूरी, उपासाची मिसळ (सामान ठेवायच आणि मेक इट युअरसेल्फ), मुगाचा शीरा वगैरे चालेल का?

मला प्रवासात २-३ दिवस टिकेल आणि दात नसतानाही खाता येइल असे पदार्थ सुचवा प्लिज......
शक्यतो पातळ असे काहीही नको. आणि जेवणासारखे पोटभर होइल असे पाहीजे आहेत.

निर्मयी, गोडाच्या पदार्थांत बेसनवड्या/ रवा-बेसन वड्या, लाडू, सांजोर्‍या, पुरणपोळ्या आहेत. त्या दुधाबरोबर मऊ करून खाता येतात. इथे माबोवर कोबीच्या वड्या/ भानवले, कोथिंबीर वड्या असे प्रकार लिहिले गेले आहेत, जे कोरडे / दही-ताकाबरोबर ओलसर करून खाल्ले जाऊ शकतात.
भातात टॅमरिंड राईस टिकू शकतो. बिर्याणीही टिकते बहुतेक. लेमन राईस, चित्रान्न, पुलियोग्रे राईस हेही टिकतात बहुतेक. इथले अनुभवी सांगतीलच!
सोबत चहा - कॉफी / दूध/ ताक/ सूप असे पदार्थ असतील तर कोरडा पदार्थही खाता येतो.
तयार केलेली सँडविचेस कितपत टिकतील माहित नाही. ब्रेड, चीज, बटर, जॅम, सॉस सोबत ठेवले व एखादी कोरडी चटणी ठेवली तर आयत्या वेळी सँडविचेस बनवता येतील.
कपकेक्स, फ्रूटब्रेड, मिल्कब्रेड हाही आणखी एक पर्याय होऊ शकतो. बिस्किटे, कुकीज....

लाह्यापीठ/ राजगिरा पीठ साखरेच्या पुड्या व दुधाचे कार्टन.
ग्लूकोज बिस्किटांचे पुडे व दुधाचे कार्टन.

वरील पिठे, सुकीचट्णी/ ठेचा व ताकाचे कार्टन.
पोहे साखर व दूध
फार वयस्क माणसे असतील तर लहान मुलांचे सिरेलॅक चा डबा व गरम पाणी.

सूप पाकिटे व गरम पाणि मिळत असेल तर ते ही बरे पडेल.
चक्क गुळ खोबर्‍याचे सारण.
साधी फोड्णी दिलेला उपमा, तांदुळाची उकड. पहिल्या दिवशीसाठी नेता येइल.

आणखी एक सुचले : पोळी/ ब्रेड/ भाकरीचा बारीक भुगा करून व्यवस्थित पॅक करून नेता येईल. गरजेप्रमाणे दूध/ ताक/ सूप/ सार/ आमटी/ डाळ इत्यादींत घालून खाता येईल.

खारी, बनपाव, बिस्किटे, शंकरपाळे सारखे प्रकार चहाचा किंवा दुधाचा पर्याय उपलब्ध असला तर.

गरम पाण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर, तूप / तेल - जिर्‍याच्या फोडणीत रवा भाजून त्यात तिखट, मीठ घालून कोरडा उपमा वा कोरडी भाजलेली तांदळाची खिचडी किंवा कोरडा शिरा किंवा मॅगी नूडल्स/ तयार पास्त्याची पाकिटे. सूपची पाकिटे.

धन्यवाद मामी आणि अरुंधती
पण मला पातळ असे बरोबर काही नेता येणार नाही.
त्यामुळे दुध , ताक नाही जमणार आणि मिळणे पण अवघड आहे. गरम पाणी मिळेल.
सांजा, पास्ता, तांदुळाची तयार खिचडी , शिरा हे सगळे बंद डब्यात २ दिवस चांगले राहील का? भात नाही रहात बहुतेक पाणि सुटल्यासारखे होते आणि वास पण येतो. माझे चुकले असेल तर त्यच्यावर उपाय पण सांगा प्लिज.
अजुन काही पदार्थ सुचवता येतिल का?
रव्याच्या शिरा पेक्षा कणकीचा शिरा टिकेल का?
शिर्‍यात दुध घातले तर नाही ना टिकणार?

भाताचा प्रकार नाही टिकत. दशम्या मत्र टिकतात २ - ३ दिवस. शिरा कुठलाही टिकतो, दुध घालुन केलेला पण टिकतो. तुप मात्र जास्त घालायचे प्रसादा सारखे. ती.मी पुर्‍या, गोड पुर्‍या, थालीपीट / पराठा पण टिकते २ दिवस.

निर्मयी, सांजा, खिचडी, उपमा ह्यासाठीचे पदार्थ फोडणीत कोरडे परतून घेऊन जाता येतात व टिकतातही. जर व्यवस्थित हवाबंद पॅक केले तर टिकतात. प्रत्येक वेळेच्या खाण्यापुरते वेगवेगळे पॅक्स बनवावेत.
त्यात गरम पाणी घालून आयत्यावेळी शिजवायचे. त्या पदार्थांत कोणत्या भाज्या वापरायच्या नाहीत. शिराही कोरडा तुपावर भाजून नेता येतो. उकळते पाणी (प्रमाणात) घालून डबा बंद करून ठेवायचा. शिरा तयार होतो.

टॅमरिंड राइस, पुलियोग्रे राईस हे पदार्थ दक्षिणेत सर्रास एक-दोन दिवसांच्या प्रवासात नेण्यासाठी वापरतात.
सूप, पास्त्याची व मॅगी नूडल्स ची तयार पाकिटे (रेडी टू ईट) मिळतात, उकळत्या पाण्यात घालून शिजवायची, ती वापरता येतील.
वेगवेगळ्या राईस च्या प्रकारांचीही जर रेडी टू ईट इन्स्टंट पाकिटे मिळत असतील तर ती बरोबर घेऊन जा. तसेच आजकाल रेडीमेड उपमा मिक्स देखील मिळते. हे पदार्थ गरम पाण्यात शिजवायचे असतात फक्त.
अंडी उकडून तीही देता येतील.
मूग डाळीचा हलवा / शिराही टिकतो बहुतेक.

गणपतीला मामाकडे सगळे जमतो, २०-२५ जण. ४-५ जणान्ना उपास आहे. बेत काय करावा?
तसेच दूसर्-या दिवशीही काय बेत करावा, विसर्जन करून आल्यावर पोटभरीचा एक पदार्थ?

दीपा, साबुदाणा खिचडी/ भगर त्यांच्यापुरती करता येईल किंवा सर्वांसाठीच तो मेनू ठेवता येईल. जर सर्वांसाठी मेनू असेल तर सोबत काकडीची उपासाला चालते अशी कोशिंबीर, उपासाची बटाटा भाजी वगैरे करता येईल.

दुसर्‍या दिवशी एकच पदार्थ ठेवायचा असेल तर कोळाचे पोहे / भेळ / डाळींच्या इडल्या = तूरडाळ + उडीद डाळ + हरभरा डाळ + मूगडाळ + मसूर डाळ + इडली रवा + तांदूळ वापरून, आंबवून त्या पीठाला फोडणी देऊन व त्यात मिरची, मीठ घालून बनवलेली इडली व चटणी. किंवा उसळ-पाव / मिसळ-पाव (कांदा नको असेल तर कांदा वगळून) असे ठेवता येईल.

मैत्रिणः marthastewart.com इथे बेबी शावर च्या खूप थीम्स व कल्पना मिळतील. मेनू कसा हवा आहे? भारतीय का वेस्टर्न? बुफे की टेबल सर्व. खूप देशातल्या बायका असतील तर सर्व मिळून आपल्या देशातील एक फेवरिट डिश आणू शकतील. फॉर अ ग्लोबल किड. Happy

एक साधा मेनू. पनीर माखनी, साखरभात, रोटीज, पालक पकोडा, बुंदी रायता. चिकन करी.

छोले, पुरी, श्रीखंड याच्याबरोबर चित्रान्न (कैरीचा भात) बरोबर होईल का ? याबरोबर कुठलं सलाड्/रायता/कोशिंबीर चांगलं वाटेल ?

छोले, पुरी, श्रीखंड याच्याबरोबर चित्रान्न (कैरीचा भात) बरोबर होईल का >> जिरा राइस, पीज पुलाव जास्त बरोबर वाटेल. बुंदी रायता, अनारदाना रायता पायनापल रायता बरोबर वाटेल.

कुठलंही टॉस्ड सलाड किंवा ग्रीन सलाड चालेल मवा.. श्रीखंड असताना दह्यातलं रायतं शक्यतो नको असं मला वाटतं.

Pages