बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी- हे बघ पटतयं का... थंडगार सरबत, कोकम वा आवळा- वेलकम ड्रिंक. खांड्वी साईड डिश वा स्टार्टर. विकतचं पण चालेल. कमी मसाल्यातले छोले, वा कुठलीही भाजी, दाल. शेंगदाणे चालत असतील तर, खमंग काकडी कोशींबीर म्हणून. चपाती, पराठा, मेथी पराठा काहीही चालेल + जीरा राईस. स्वीट मधे मलातरी आंब्याचा रस ओके वाटतोय... सोबत कुरड्या पापड तळता येतील.

माझ्याकडे जेवायला तीन लोक येणार आहेत. जरा सोपे पण खास प्रकार सांगा प्लीज. गोड विकत आणेन. मी ठरवलेला बेत- मोडाचे मूग + कांदा + कैरी / टमाटो- कोशिंबीर. एखादी ग्रेवी वाली भाजी वा छोले. विकतच्या पोळ्या (मला पोळ्या जमतच नाहीत आणि सगळ्यांसमोर तमाशा नको!) सोपा पुलाव. अजून काही करता येइल? काही +/- ठरवलेल्या मेनुमधे? गोड पण सुचवा. ध्न्स Happy

योगेश कुळकर्णी, bombino co. chya शेवयाची खीर बनवायला सोपी आहे. शेवया,साखर दुधात मिक्स करुन ठवळावे. त्यात ड्रायफ्रुट्स घाला. शेवया शिजल्या कि गेस बंद करा. थोड तूप, वेलची, जायफळ पूड घाला. खीर थोडी पातळ ठेवा. थंड किंवा गर्म कशीही छान लागते. Happy

काल रात्री मिनोतीच्या ब्लॉगवरची दलिया खीर करायचं ठरवलं. आताच खीर करून ठेवली आहे. सह्ही झाली आहे चवीला.

कुणी मिनोतीच्या संपर्कात असेल तर तिला स्पेशल धन्यवाद सांगा. Happy

योगेश कुलकर्णी : दाल तडका / दाल फ्राय, पापड. गोडात सोपे घरी करता येण्यासारखे प्रकार शिरा, खीर. किंवा आमरस. Happy

Veka, pasta with pesto ( bottled) or any other ready made sauce, cold cut sandwiches , salad and canned soup , garlic bread,
If you must eat desi thalipeeth, pohe, upama, Khara pongal, chutney-cucumber-tomatoe sandwich.

Thanks Medha for quick reply...we are tired of frozen n canned is something I avoid for myself but yup Pohe was my option anyway and glad to get other options....:)
If I get a recipe for khara pongal I would surely do it next Sat...:)
I always have this prob on Sat so any help always welcome...:)

काश्मिरी पुलावासोबत कुठल्या प्रकारचे रायते चांगले लागेल ? किंवा एकंदरीतच दुसरे तोंडीलावणे काय असावे ? पावभाजी आणि काश्मिरी-पुलाव हे दोन्ही पदार्थ एका जेवणात चांगले लागतील ना ?

थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये वाट्णे. म्हण्जे ती फसफसल्यासारखी दिसते.. कैरीच्या गोड लोणच्यात कधीकधी अशी मोहरी फेसून घालतात . चांगल लागत.

अगो, इकडे वाच, तुला साधारण कल्पना येईल आणि टीपा मिळतील. लाल मोहरी किंचीत पाण्याबरोबर वाटायची, त्याला मोहरी फेसणे असे म्हणतात. जाड चिरलेल्या काकडीत अगदी खूप घट्ट दही, अशी फेसवलेली लाल मोहरी आणि फक्त मीठ घालून रायतं करता येतं. तुमच्याकडे कमी तिखट खातात, त्यामुळे मोहरी जरा बेतानेच घे, ती नाकात जाते Happy

तिखटाचं लक्षात ठेवल्याबद्दल स्पेशल धन्यवाद मंजूडी Happy वाचली ती कृती.लिंबाच्या रसाबरोबर वाटायची कल्पना भारीच. फेसलेल्या मोहरीचा स्वाद आठवतोय लोणच्यातला पण स्वतः कधी केलं नव्हतं काही. नक्कीच करुन बघणार हे रायतं Happy

१५ लोकांसाठी मटार-कॉर्न मिक्स पुलाव आणि छोले असा बेत आहे. स्टार्टर्स मध्ये वेज पफ्स आहेत. आणि केक पण असेलच. तर छोले आणि पुलावासाठीच्या तांदळाचा, तसेच मटार अणि कॉर्नचा अंदाज सांगू शकाल का?

एक वाटी तांदुळाचा एका वाटी भाज्या घालून केलेला पुलाव साधारण तीन माणसांना दोनदा वाढण्याइतका होतो. म्हणजे तुम्ही पुलाव पुन्हा वाढणार असे गृहित धरले तर पंधरा माणसांच्या पुलावासाठी साधारण चार वाट्या तांदूळ आणि साडेतीन-चार वाट्या मटार+कॉर्न लागतील असा माझा अंदाज.

दोनशे ग्रॅम काबुली चण्याचे छोले (ग्रेव्हीसाठी दोन मोठे कांदे+दोन मोठे टोमॅटो घातले तर) पाच माणसांना दोनदा वाढण्याइतके होतात. तुम्हाला अर्धा किलो काबुली चणे पुरावेत असा माझा अंदाज.

२६ जणांना जेवायला बोलावले आहे - भारतीय डिनरची फर्माइश आहे त्यांची. Happy जितक साधं आणि परंपरागत असेल तितकं छान. प्रचंड डीवर्स ग्रुप आहे हा. जास्त अमेरिकन आहेत काही व्हिएत्नामी, पर्शियन, फ्रेंच, आणि ३ भारतीय आहेत (त्यात माझ्या घरचे २ :)). काहीजण शाकाहारी/वेगन, आणि मधुमेही आहेत. हे सर्व लक्षात ठेवून हा बेत आखला आहे. कमी काम आणि वेळ हा पण एक निकष आहे. Wink
या मेनुबद्दल सांगा कसा वाटतोय ते:
जिरा राइस
दाल फ्राय
तंदूरी चिकन
मटकीची उसळ
बटाट्याची भाजी
चिकन बिर्याणी
साध्या पोळ्या - रोटी लँडच्या (नान सगळीकडे असतातच म्हणून जरा वेगळ आणि जास्त ऑथेंटिक)
काकडीची कोशिंबीर
साबुदाण्याच्या पापड्या तळून
स्टार्टर काय करावे??
गोड म्हणून शिरा?? की खीर?? खीर केली तर वेगळी काढून स्पेंडा घालणं सोपं पडतं. शिरा डबल काम होइल असं वाटतय.
डायबेटिस असलेल्यांसाठी स्पेंडा घालून भोपळ्याचा पाय करणार आहेच. ती पण फर्माइश आहे म्हणून. Happy

डेकोरेशनसाठी पणत्या, रांगोळी अशी सजावट करणार आहे घरी. पिण्यासाठी मॅंगोलस्सी, वाईन इ. असेल.

हो घरीच करणार आहे आणि एकटीने नाही दुकटीने. Happy नवरा सगळ्या भाज्या कापून देतो. आणि शेवटी सफाई पण करतो बर्‍यापैकी. मग मधलं काम विशेष नसतं ना. Happy पण क्रेडिट मात्र मिळतं. Happy मुलगी पण सजावटीचं काम करते - प्लेटस, चमचे, नॅपकिनस नीट लावून ठेवणे, सोप्या गोष्टींची चिराचिरी. इ. इ. त्यामुळे हा मेनु अवघड तर नाहीच आणि प्लॅनिंग नीट असलं की एक्झिक्युशन पटकन होतं.
पण मेनुविषयी फीडबॅक द्या की.

>>साधं आणि परंपरागत
म्हणजे restaurant style नको आहे का? जे बाहेर मिळते तेच ठेवायचे नसेल तर काही बदल सुचवते. बिर्याणी असेल तर तंदुरी चिकन नको. किंवा जिरा राईस आहे त्यामुळे बिर्याणी वगळून होम स्टाईल चिकन करी चालेल. बटाट्याच्या भाजीऐवजी ग्रीन बीन्स किंवा कोबी-मटार भाजी (ही आवडल्याचा अनुभव आहे) चालेल.
खीर चालेल. Vegan लोक असतील बिनदुधाची नाहीतर शिरा.
स्टार्टर बटाटा भजी. Wink वेळ नसेल तर मिनी समोसे इ. विकतचेही चालेल. दही नसलेली अजून एखादी कोशिंबीर चालेल.

मेनु छानच आहे. स्टार्टर मधे तुला तंदूर चिकन, साबुदाण्याच्या पापड्या, दिपचे सामोसे ,काकडी +टोमॅटोचे काप तुला ठेवता येतील.
दाल फ्राय ऐवजी तुला मसुराचे सुप्,टोमॅटोचे सुप ठेवणे कसे वाटते? डायबेटिस लोकांसाठी पाय आहे तर शिरा ठिक आहे. तो तुला आदल्यादिवशी पण करुन ठेवता येइल. पाहिजे तर आंब्याचा किंवा अननसाचा किंवा गुळाचा कर. रोटी लँडच्या चपात्या कशा असतात माहीत नाही. पण जवळपास कुणी पटेल नाही का चपात्या करणारी? पणत्या, रांगोळीची कल्पना मस्तच. पण जेवणा नंतर बडिशेप नक्की ठेव. त्यांना खुप आवडते.

धन्यवाद लोला. आणि हो >>>म्हणजे restaurant style नको आहे >>>>>
माझ्या मैत्रिणी Indian buffet घेतात तेव्हा त्याच त्या टिपीकल पंजाबी स्टाईल भाज्या, पालक-पनीर आणि क्रिमी चिकन, नान असतं. मी नेहमी त्यांना म्हणते की authentic Indian food इतकं oliy नसतं. सो त्यांना होममेड काही रोजच्या गोष्टी हव्या आहेत. Happy कोबी-मटारची भाजी पण चालेल बटाट्याएवजी. आणि ती डायबेटिस्वाल्यांना पण खाता येइल.
चिकनच्या बाबत मला पण बिर्याणी किंवा तंदुरी असं वाटतं आहे - तुझा सल्ला आवडला. विचार करते.
खीर वेगन करणं शक्य नाही मला. पण १ जणच आहे तशी आणि ती तशीही डाएट्-फ्रीक आहे त्यामुळे तिच्यासाठी नाही काही केल तरी चालेल. त्यामुळे खीरच करावी. Happy

Pages