Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हेज बिर्यानी नको असेल तर
व्हेज बिर्यानी नको असेल तर कुर्मा पुरी करा... बटाटा, वाटाणे घातलेला कुर्मा..
लाजो, साबुदाणा खिचडी.
लाजो, साबुदाणा खिचडी.
लाजो, दडपे पोहे, पातळ
लाजो, दडपे पोहे, पातळ पोह्याचा चिवडा, नाहीतर शेवयाचा/ साधा उपमा
बाकरवडी वगैरे असं साईडला ठेवता येईल.
मुगाचे वडे, चटणी + फ्रूट
मुगाचे वडे, चटणी + फ्रूट कस्टर्ड. सगळेच पटकन होणारे आहे.
लाजो , वाटाणे ,गाजर घालून
लाजो ,
वाटाणे ,गाजर घालून केलेला उपमा. वरती खोबरं,कोथींबीर किंवा शेव. बरोबर कॉफी.
गोडासाठी लाडु/कस्टर्ड /बर्फी यापैकी विकतचे किंवा घरी केलेले काहीही.
मला एक केळवण करायच आहे ती
मला एक केळवण करायच आहे ती पक्कि वेज आणी त्याला नोन-वेज खायच आहे...काय करता येइन???
मी विचार करत होते की स्टाटर नोन-वेज टेवावे आणि मैन कोर्से वेज मधे???काही चान कोम्बो सुचवा ना...
लाजो, मी मागे एकदा असेच
लाजो, मी मागे एकदा असेच पाहूणे आले होते तेव्हा कच्छी दाबेली बरोबर mango शिरा केला होता. शिरा, चटण्या, बटाटा सारण आधीच करुन ठेवता येत. पोटभरीच होत.
जामोप्या, अरूंधती, सीमा,
जामोप्या, अरूंधती, सीमा, आर्च, अंजली_१२, BS.... सर्वांना थॅंक्स
ऊपासाची मिसळ केली तर? पण सोबत गोड काय
आंब्याच्या शिर्याची आयडिया चांगली आहे
अजुन काही वेगळ सुचलं तर सांगा
लाजो उपास असेल तर मिसळ कर,
लाजो उपास असेल तर मिसळ कर, कारण त्याचा फार घोळ असतो गं
शेंगदाण्याची आमटी, बटाट्याचा चिवडा/किस, खिचडी...
अंब्याच्या शिर्याची आयडीया मस्त आहे.
दही शेवपुरी कसं वाटेल? करायला सोप्पं असतं, शिवाय जितकं बनवू तितकंच.. वाया ही जात नाही. उरलं तर पुर्या वरच नीट राहतात, उरलेलं फ्रिजात डंपायचं.
उपास मिसळ बरोबर नारळ वडी/
उपास मिसळ बरोबर नारळ वडी/ शिरा/ राजगिरा किंवा कोणताही झटपट लाडू असं देता येईल.
उपास मिसळी बरोबर, रताळ्याच्या
उपास मिसळी बरोबर, रताळ्याच्या फोडी, गुळ शेंगदाणे घालुन ?
किंवा गाजराचा / दुधीचा हलवा. आदल्या दिवशी करुन ठेवता येतो.
उपास मिसळीबरोबर, फ्रुट्सॅलड
उपास मिसळीबरोबर, फ्रुट्सॅलड किंवा ट्रायफल पुडींग (उपवास नसेल तर)
लाजो, veg puff pastry कशी
लाजो, veg puff pastry कशी वाटत्ये? सारण आदल्या दिवशी करुन ठेवता येईल. pastry sheets तर तयारच मिळतात. पाहुणे यायच्या थोडं आधी सारण भरुन तयार ठेवता येईल आणि नंतर पाहुणे आल्यावर बेक करता येईल. १५-२० मिनिटं लागतील.
गोडात आंबा घालुन शिरा छान वाटतोय. पण वेळ नसेल तर नुसती फळं कापुन त्यावर whipped क्रीम, ड्रायफ्रुट्स घालुन सर्व करता येईल.
मी १२ अमराठी लोकांना शनिवारी
मी १२ अमराठी लोकांना शनिवारी रात्री जेवायला बोलावलं आहे, गेल्या वेळी श्रीखंड, भरली वांगी, मसाले भात, सार, वगैरे केला होतं, आता काय करु? please सुचवा !!!
मी १२ अमराठी लोकांना शनिवारी
मी १२ अमराठी लोकांना शनिवारी रात्री जेवायला बोलावलं आहे, गेल्या वेळी श्रीखंड, भरली वांगी, मसाले भात, सार, वगैरे केला होतं, आता काय करु? please सुचवा !!!
बरीच अमराठी लोकं असतील तर मी
बरीच अमराठी लोकं असतील तर मी पूर्ण मराठी मेन्यु करत नाही. मिक्स न मॅच करायला बरं वाटतं. हवंतर यावेळी छोले, पुर्या, मेथी मटर मलई/कोफ्ता/मटर पनीर वगैरे करुन पहा.
आईडिया चांगली आहे पण त्यातली
आईडिया चांगली आहे पण त्यातली एक फमिली माझ्या कडे दोन वेळा आलेली आहे, आणि मी पनीर कढई केली आहे मागे, छोले भटुरे, पालक पनीर, पुलाव, रस मलई , बुंदी रायता, कसा वाटेल?
बरोबर सुरळीची च्या वड्या?
सुरळीच्या वड्या चांगल्या
सुरळीच्या वड्या चांगल्या आहेत. इथे मायबोलीवर मायक्रोवेवमधल्या सुरळीच्या वड्या अशी रेसिपी आहे बघा. अगदी नवशिक्यांनीही छान जमल्या असं म्हटलंय. त्या ट्राय करु शकता.
ही
ही बघा
http://www.maayboli.com/node/30803
अजून एक बेत - वांग्याचं भरीत
अजून एक बेत - वांग्याचं भरीत ,फ्लॉवर बटाटा रस्सा, पोळ्या, गाजर-मुग डाळ कोशिंबीर, सोलकढी, जीरा राईस, रसमलाई ? कुठला चांगला?
thanks, सायो मी त्या
thanks, सायो मी त्या सुरळीच्या वड्या केल्या, एकदम मस्त झाल्या !!
दोन्ही बेत चांगले आहेत. पहिला
दोन्ही बेत चांगले आहेत. पहिला खूप नॉर्थी आणि दुसरा खूप मराठी आहे. तेव्हा जर
छोले, वांग्यांचं भरीत, गाजर मूग डाळ कोशिंबीर, सार्/सोलकढी, जिरा राईस, रसमलाई असा मिक्स न मॅच बेत केलात तर?
ही पण आईडिया मस्त आहे, thanks
ही पण आईडिया मस्त आहे, thanks
नीता, गाजर मुगडाळ कोशिंबीर
नीता, गाजर मुगडाळ कोशिंबीर पाककृती टाकणार का? सध्या इथे गाजरांचा सीझन आहे.
इथेच लिहिते गाजर-मुगडाळ
इथेच लिहिते गाजर-मुगडाळ कोशिंबीर -
२ मोठी गाजर, एक मुठ मुग डाळ, नारळ, कोथिंबीर, फोडणीला तेल
मुग डाळ १-२ तास भिजत ठेवावी. गाजर किसून त्यात भिजलेली मुग डाळ घालावी. नारळ, कोथिंबीर,मीठ, चवीला साखर, मिरची बारीक चिरून किंवा लाल तिखट
सर्व निट कालवून त्यावर भरपूर तेलाची फोडणी घालावी. वरून लिंबू पिळावे.
मातोश्रीना कसल्याशा रेसिपी
मातोश्रीना कसल्याशा रेसिपी कॉन्टेस्टमधे भाग घ्यायचा आहे. त्यांची मेन थीम तांदूळ आहे पण भाताचे प्रकार नकोत. काहीतरी वेगळे पदार्थ सुचवा.
भाताचे पकौडे / खीर - पायसम् /
भाताचे पकौडे / खीर - पायसम् / कटलेट्स.
नीरडोसा, मुरुक्कु , घावन
नीरडोसा, मुरुक्कु , घावन
तांदळाच्या पीठाची उकड किंवा
तांदळाच्या पीठाची उकड किंवा मोदक.
तांदळाच्या रव्याचे उपीट
प्राची, रेसिपी स्पर्धेला(सर्व
प्राची, रेसिपी स्पर्धेला(सर्व बाया ४५+) हे पदार्थ फारच सोपे नाही का होणार?? अकु, भात नकोय.
आस. डोसे, घावन वगैरे पण खूप सिम्पल वाटतील, मी आईला फिरनी सुचवलय. अजून काही वेगळे पदार्थ असतील तर सांगा.
Pages