Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बंगाली सहसा नदीतले, गोड्या
बंगाली सहसा नदीतले, गोड्या पाण्यातले खातात. ते तर दही माछ पण करतात. त्यांना सवयीने पण पोटाला त्रास नसेल होत.
(इती एका मास्तराने वरचे सांगितलेले जे मला पटले, तुम्हाला नाही पटले तर.. तुम्ही खावा दूध + मासे एकत्र करून, शेवटी काय पोटातच जाते एकाच ठिकाणी.. नाहीतर दुसर्या मार्गाने बाहेर आले तर समजा नाजूक नाही आहात आणि त्यात मराठी आहात म्हणून असेल असे समजा(तुमच्या मताने).
)
शूंपी म्हणते तसे लॅक्टोज
शूंपी म्हणते तसे लॅक्टोज ब्रेक डॉउन झाल्याने(फाटके दूध) बाधत नसेल. पण दूध प्यायलात(बासूंदी,आईसक्रीम वगैरे) तर त्रास होइल बहुधा.
प्या आणि लिहा इथे अनुभव.
पनीर, दही, ताक हे दुग्धजन्य
पनीर, दही, ताक हे दुग्धजन्य पदार्थ आणि दूध यांच्या गुणधर्मात फरक आहे. दूध चालत नाही. दही चालते. 'मीट' ला तर सर्रास चालते.
इथे मिळते ते मस्त चवीचे 'सीफूड बिस्क' सूप. यात क्रीम असते.
मी पिते नेहमी, मला कधी काही झाले नाही.
इथे मासे दुधात फ्रीज करतात.
इथे मासे दुधात फ्रीज करतात. दुधात मॅरिनेट करतात. त्याने फिशी स्मेल जातो. इंटर्नेटवरपण ह्याच्या रेसिपीज मिळतील.
आपल्याकडे का म्हणतात दूध आणि मासे चालत नाहीत कोण जाणे!
त्यांना काही नाही होत, मग
त्यांना काही नाही होत, मग मराठी कोठे इतके नाजुक का?>
माझा नवरा स्वतः आर्युवेदा मध्ये प्रॅक्टीस करतो. आणि तो नेहमी नीक्षून सांगतो मासे आणि दुध BIG NO.
कोणी प्रायोगिक तत्वावर करून
कोणी प्रायोगिक तत्वावर करून का नाही बघत, भारतातील मासे बांगडा, सुरमय, हलवा वगैरे दूधात बुडवून त्यांचे वास जातात का? व इथे लिवा अनुभव.
किंवा बांगडा खाताना दूध पिवून बघा, खाल्ल्यावर पिवा. दूध का दूध व मछली का मछली हो जायेगा...
आम्हाला बी कळल की... काय गोची आहे.
हे मला मिळाले, खरे खोटे देवाला माहित...
>>The only reason drinking milk and eating fish leads to that skin disease is that some fish which are not cooked properly when mixed with milk which is also un-clean, causes yeast to metastasizes in the stomach or a fungal growth.
This can lead to melanin production of our body to being stopped and thus causing white spots to appear all over our body.
If both milk and fish are clean and free of bacteria then it won't happen but you never know so its best not to drink milk and eat fish at the same time.
रविवारी सकाळी (९-१० वाजता)
रविवारी सकाळी (९-१० वाजता) ५-६ सिनीयर सिटिझन्स यायचेत नाश्त्याला. उपमा पोहे असं रोजचं करायचं नाहीय. परत वयाच विचार करता न तळलेल, हलकं पण वेगळं काही करायचा विचार आहे. उतप्पे आणि दहीवडे करायचा विचार करतेय. दुसरं काही सुचवू शकाल का? चहा असेलच. गोड काही द्यावं का बरोबर?
श्रद्धा, आप्पे,दडपे
श्रद्धा, आप्पे,दडपे पोहे,वाटली डाळ, मोकळी भाजणी यातलं बघा काही करता येईल का.
माशांवर बंगाली मिठाई चालते.
माशांवर बंगाली मिठाई चालते. बिन्धास्त करणे/ आणणे.
श्रद्धा, उत्तप्पा आणि दहीवडे
श्रद्धा, उत्तप्पा आणि दहीवडे - दोन्हीमधे उडदाची डाळ. आणि इतक्या लोकांना गरम उत्तप्पे करून वाढणं थोडं जिकिरीचं नाही का होणार?
मिसळ चालेल का? कडधान्यांची किंवा उपासाची मिसळ आणि चहा. किंवा जरा वेगळा पदार्थ म्हणून शेवयांच्या इडल्या आणि चटणी? किंवा व्हेजिटेबल कटलेट/ हराभरा कबाब?
mala please koni sangal ka
mala please koni sangal ka KESAR kontya companycha, brandcha changla asto?
Please mail kara
Please mail kara>> मेल कशाला,
Please mail kara>> मेल कशाला, इथे असल तर सगळ्यांनाच मार्गदर्शन होइल.
दडपे पोहे आणि कटलेट छान
दडपे पोहे आणि कटलेट छान वाटतय. हो उतप्पे गरम गरम करणं वेळखाऊ होइल खरं.
रावि, मंजूडी
खुप आभार!
शनिवारी नववर्षाच्या स्वागताची
शनिवारी नववर्षाच्या स्वागताची पार्टी आहे. जगभरातले वीसेक लोक आहेत. वयोगट २५ ते ४०. प्रत्येकजण एकेक पदार्थ आणणार आहे. माझा व नवर्याचा असे दोन पदार्थ न्यायचे आहेत. वेजीटेरियन पदार्थ हवे आहेत. भात नको. माझ्याकडे मायक्रोवेव, मिक्सर, फूड प्रोसेसर नाहीयेत. आणि एकंदरित स्वयंपाकाचे कौशल्य कमीच आहे. तेव्हा काय करता येईल?
सध्या मी फुलके करून त्यात भाज्या भरून रॅप करायच्या विचारात आहे. दुसरा पदार्थ भजी.
मृदुला, उपासाची बटाट्याची
मृदुला, उपासाची बटाट्याची भाजी (जिर्याची फोडणी दिलेली) हा पर्याय कसा वाटतो बघ. फुलके + ही भाजी असे करता येईल. किंवा आलू प्राठे??
या खेरीज भजीचा पर्यायही देखील मस्त वाटत आहे. पालक/ कांदा / ओवा/ मिरची भजी / पनीर - चीज पकौडे इ. प्रकार देखील खपतील असे वाटते. फक्त २० लोकांसाठी मजबुतीत तळण काढावे लागेल.
स्प्राऊट चाट किंवा भेळ / दही बटाटा शेव पुरी (तयार चटण्या मिळत असल्यास)
मृ, पावभाजी आणि गुलाबजामुन?
मृ, पावभाजी आणि गुलाबजामुन? किंवा शेवयाची खीर/ गाजर हलवा. / मालपुवे एकदम सोपे पदार्थ आहेत.
मृदुला, वीस लोकांसाठी फुलके
मृदुला, वीस लोकांसाठी फुलके करणं कटकटीचं काम नाही वाटत का? आणि पुन्हा भाजी ही करावी लागेल ना?
त्यापेक्षा पावभाजी/फ्रुट कस्टर्ड्/ड्राय चिली पनीर (अल्पनाची एक रेसिपी छान आणि सोपी आहे)/रवा किंवा तांदळाची खीर वगैरे "जरा" सोपे पडेल. रवा खीर तर खुपच सोपी पडते. त्यातच खजुर आणि इतर सुकामेवा घालायचा. शेवयांसारखं परतायला मोठं भांडं ही नाही लागणार. वीस लोकांना वीस चमचे(टे.स्पून) रवा पुरेल बहुतेक (इतर पदार्थ आहेत हे गृहीत धरुन). मलाही इतकी करण्याचा अंदाज नाही पण नुसती खीर केली तर मी दोघांना ३ चमचे रवा घेते आणि तुप अंदाजानी. साधारण २ चमचे किंवा कमीच
यात दुध घालाल तितकं कमीच कारण ते शोषलं जातं रव्यात.
माझं कौशल्य आणि अनुभव कदाचित तुझ्याइतकाच असेल किंवा कमीच, त्यामुळे ह्या पर्यायाचा विचार करु शकतेस
खिरीचा पर्याय चांगला आहे.
खिरीचा पर्याय चांगला आहे. एकदा करून पहायला पाहिजे. एव्हढा रवा नाहीये घरात. जवळ कुठे मिळतो का बघते.
गाजर हलवा पण छान आयडिया. करून बघायला हवा.
ड्राय चिली पनीरची पाकृ बघते.
बाकी, करून घेऊन जायचंय त्यामुळे पोर्टेबल पदार्थ हवेत.
रच्याकने, नववर्ष आझरी मैत्रिणीचे आहे. भारतीय लोक आम्ही दोघेच. त्यामुळे जास्त तिखट/ मसालेदार नेणे रिस्की.
मी चुकून चिली पनीर लिहिलं
मी चुकून चिली पनीर लिहिलं वरती पण खरी रेसिपी ही आहे:
http://www.maayboli.com/node/21147
यात मी एकदा चिकन ऐवजी पनीर वापरुन पाहिलं होतं. फिंगर फुड म्हणून मस्त वाटलं.
पराठा ठेपला टाइप पदार्थ आणि
पराठा ठेपला टाइप पदार्थ आणि दही.
केशराला उत्तर नाही का दिले
केशराला उत्तर नाही का दिले कुणी ?
चांगले केशर, स्पेन, काश्मिर आणि इराण मधे होते. त्या डबीवर देश लिहिलेला असतो.
क्वालिटीच्या बाबतीत पण हाच क्रम आहे.
केशर घेताना त्यात जास्तीत जास्त तंतू गडद रंगाचे असावेत. केशरी, पिवळ्या तंतूंची संख्या कमी
असावी. प्रत्यक तंतू हा मूळाशी थोडा रुंद आणि वर निमुळता असावा. खरे केशर वासावरुन ओळखता येते. त्यातला तंतू हा चिवट असतो. तो सहसा तुटत नाही. म्हणून केशर नेहमी गरम करुन दूधात किंवा
लिंबाच्या रसात खलून घ्यावे लागते,
केशरात प्राजक्ताच्या देठाची किंवा मक्याच्या तंतूची भेसळ करतात. प्राजक्ताचे देठ आखुड तर मक्याचे तंतू लांब असतात. तसेच ते एकाच आकाराचे असतात.
खरे केशर दूधात किंवा लिंबाच्या रसात टाकल्याबरोबर त्याचा रंग निघत नाही. तो काही वेळाने निघतो. खरे तर वास हिच जास्त खात्रीची परिक्षा आहे.
केशराची किम्मत बघता ते तंतू मिठाईत वर दिसतील एवढे वापरले तर मिठाईची किंमतही खुपच जास्त ठेवावी लागेल !!
दिनेशदा, चांगली माहिती. मी
दिनेशदा, चांगली माहिती.
मी मास्टरफुड कंपनीचा केशर वापरते. किंमत बर्यापैकी असते पण एकदम प्युवर.
भारतात जाताना एकदा केशर घेऊन गेले होते. तेव्हा एका काकुंना ते दिले. तेव्हापासुन त्यांनी सांगितले आहे की माझ्यासाठी इतर काहीच आणत जाऊ नकोस पण केशराची डबी आठवणीने आणत जा!
दिनेशदा तुमचे खुप खुप आभार.
दिनेशदा तुमचे खुप खुप आभार. खुप चांगली व महत्त्वाची माहिती दिलीत.
एवरेस्टचा केसरहि चांगला असतो अस एकले होते, त्याबद्द्ल काय मत आहे?
वत्सलाताई, तुम्हि कुठे रहाता?
अमेरिकेतल्या देशी स्टोअर्समधे
अमेरिकेतल्या देशी स्टोअर्समधे गॅदरिंग ब्रँडचे स्पॅनिश केसर मिळते - ते एकदम मस्त आहे. त्याची किंमत गेल्या वीसेक वर्षात अगदी १५ डॉलर पासून ते ८० -१०० डॉलर पर आउंस ( ३१ ग्रॅम ) पाहिलीय. पण क्वालिटी एकदम भारी. भारतातल्या नातेवाईकांची कायम डिमांड असते .
स्पॅनिश केसर ला अनुमोदन्.रंग
स्पॅनिश केसर ला अनुमोदन्.रंग ,वास दोन्ही अप्रतिम .भारतात एवेरेस्ट चे केसर चांगले आहे. जैन मंदिरात मिळणारे केशर उत्तम असते..कोणत्याही जैन मंदिरात मिळते.भक्तांनी देवाला अर्पण केलेले विकायला ठेवतात्.किंमत व गुणवत्ता योग्य असते.
पाहुण्यांसाठी चिकन बिर्याणी
पाहुण्यांसाठी चिकन बिर्याणी बनवायची आहे. तर बरोबर काय बनवु? म्हणजे ग्रेव्ही तर बनवावीच लागणार. पण कोणती?
Brunchसाठी उपमा, पोहे, इडली,
Brunchसाठी उपमा, पोहे, इडली, पुलाव, पाव्-भाजी, साबु-खिचडी, मिसळ, छोले-पुरी सोडून काही तरी तिखटाच पण पोटभरीच सुचवा ना प्लीज. बरोबर veg puffs आणि zucchini/banana/pumkin-oats muffins करणार आहे.
दहीवडे?
दहीवडे?
आप्पे-चटणी / भाज्या घातेलेली
आप्पे-चटणी / भाज्या घातेलेली कॉर्न भेळ / भाज्या-मूग घातलेली दलिया खिचडी ?
अत्यंत कॅलरी काँशस / तेल-तिखटाची सवय नसलेल्या लोकांसाठी चार दिवसांसाठी चवदार मेन्यू सुचवा. तसेच नॉर्मल खाणार्यांनाही तोच मेनू खाता येईल असे असेल तर उत्तम, म्हणजे २-२ प्रकार दर वेळी करावे लागणार नाहीत. धन्यवाद.

भाज्या घातेलेली कॉर्न भेळ / भाज्या-मूग घातलेली दलिया खिचडी हे मला सुचले आहेत, अजून काय करता येईल ?
अति स्वैपाक कौशल्य नसणारे अन अति खटपट नसलेले सुचवले तर धन्यवाद.
(फारच कंडीशन्स आहेत असं दिसतंय एकूण. ;))
@BS पिकलेट्स्/वॉफ्लस्/पॅनकेक्
@BS
पिकलेट्स्/वॉफ्लस्/पॅनकेक्स विथ सिरप, फ्रुट्स, आयस्क्रिम्/क्रिम,
बेक्ड हांडवो / रव्याचा भाज्या घालुन तिखट केक, मेथी चा तिखट केक (पाकृ आहे इथेच)
टोस्टेड बॉम्बे सॅडविचेस - काकडी, टॉमेटो, हिरवी चटणी, चीज इ इ ..
स्टफ्ड ब्रेड रोल्स - सगळं सामान टेबलवर ठेवायच आणि मेक युअर ओन म्हणायचं... हव तर टोस्ट करायचे रोल्स.
हवा चांगली असेल तर बार्बेक्युचा ऑप्शन पण आहे...
@ मवा,
पिकलेट्स/पॅनकेक्स चा ऑप्शन सोडुन बाकीचे तुलाही चालतिल असं वाटतय
Pages