बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साबुदाण्याच्या पापडया चांगल आहे, कोथिंबीर/पालक्/कोबी/सुरळीची/अळू वडी ह्यापैकी कोणतीही १ अस ही ठेऊ शकतेस ऑईली नको असेल तर.

टोमॅटो सार, रेड कॅबेज साऊथ इंडीयन स्टाईल भात, फ्रोजन मेथी पराठे याबरोबर जाईल असे स्टार्टर आणि सॅलड्/कोशिंबीर तत्सम काहीतरी सुचवा. खाणार्‍या अमेरिकन आहे. धन्यवाद !!

अनु,
आलू टिकी, फ्रोजन समोसे, स्प्रिंग रोल, हराभरा कबाब, सोयाचे कबाब पैकी एक स्टार्टर म्हणुन आणि सॅलड मधे लेट्यूस पानं कापून त्यात मिरे पुड, मीठ, लेमन जूस, ऑलिव्ह ऑईल,सालमन (मॅरीनेटेड), सेलेरी पाने कापून, बीट किसून,विनेगर टाकून एकत्र करून मस्त लागेल, किंवा बीट कोशिंबीर किंवा मागे कुणितरी भेंडीची दह्यातली कोशिंबीर लिहिली होती, ती वापरू शकशील.

रायते - सलाड - कोशिंबीर पैकी :

बुंदी रायता / काकडी रायता / लाल भोपळ्याचे किंवा दुधीचे रायते / मोड आलेले हिरवे मूग + किसलेले गाजर + बारीक चिरलेली काकडी + भिजवलेली मूगडाळ + लिंबाचा रस + मीठ + साखर व वरून हवी असल्यास फोडणी / श्रावण घेवडा - मटार - दुधी वाफवून त्यांचे दह्यातील मीठ, मिरपूड, साखर घालून रायते.

स्टार्टर : पकौडे / कबाब / टिक्की / बोंडा प्रकारातील काही. किंवा तयार समोसे आणून समोसा चाट / ढोकळा आणून खमणी / स्प्राऊट चाट.

अकु....मोड आलेले हिरवे मूग + किसलेले गाजर + बारीक चिरलेली काकडी + भिजवलेली मूगडाळ + लिंबाचा रस + मीठ + साखर व वरून हवी असल्यास फोडणी>>> खूप सहि वाटतीये रेसीपी.... करुन पहीन्...काही टीपा आहेत का? मुग वाफवुन घ्यावे लागतात का?

आशु, अरुंधती : धन्यवाद! शुक्रवारी असल्यामुळे माझ्याकडे वेळ खुपच कमी आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. पण तुमच्या उत्तरांमुळे काहीतरी करु शकेन.

swarth: हे पहा http://www.manjulaskitchen.com/2009/09/29/sprouted-moong-salad/

एक केळवण करायचं आहे...१८ ते २० लोक असतील...
खालील पदार्थ फायनल आहेत...

नारळ+कैरी चटणी
दही काकडी खारी बुंदी घालुन..
सुरळी वडी
पनीर्+वेज मिक्स भाजी
आमरस
पोळ्या
भात? (व्हेज पुलाव किंवा शाही बिर्याणी दिनेशदांची)
पातळ भाजी/सूप ?( टोमॅटो सूप किंवा सार)

हा मेनु कसा वाटेल...?
बिर्याणी खुप हेवी होईल का? पण बिर्याणीची फर्माईश आहे...
आणि आमरस पण मस्ट आहे...

तसंच सुरळीवडी ऐवजी दुसरं छान काहीतरी सुचवाल का जे मला आदल्या दिवशी करुन ठेवता येइल...

आमरसा सोबत चालुन जाईल असं अजुन एखाद स्वीट पण सुचवा प्लीज...

अनू, ते मंजुळाताईंचं मूग सॅलड सह्हीये!
swarth, वर मी जे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सॅलड म्हटलंय त्यातले सर्व घटक आयत्यावेळी मिसळायचे. नाहीतर काकडीचे पाणी सुटते अनेकदा. त्याला वेगळ्या अशा टिप्स नाहीत. सर्व घटक भाज्या/ कडधान्य कच्चेच वापरले जाते. वाटल्यास मूग किंचित शिजवू / वाफवू शकता.

smitaklshripad >> मेनू मस्त आहे. भात - जिरा राईस / व्हेज पुलाव व सूप/ साराऐवजी तडका दाल / दाल फ्राय देखील ठेवता येईल. किंवा लेमन राईस / चित्रान्न/ मसूर-भात व सोबत सोलकढी असेही कॉम्बो ठेवता येईल.
सुरळीवडी ऐवजी कोथिंबीर वडी / कोबीचे भानोले - कोबीवड्या आदल्या दिवशी करू ठेवता येतील.

आमरसाबरोबर जाणारे दुसरे स्वीट म्हणजे आईसक्रीम!! Happy

मी ह्या शनिवारीकेलं होतं मोड आलेल्या हिरव्या मुगाचे सॅलड. काही तरी चुकलं खरं. मी काकडी आणि टोमाटो घातला, मुग ५ मिन. शिजवुन घेतले, पण दही आणि दुध (पातळ होण्यासाठी) घातलं आणि पदार्थ बीघड्ला (दुध फाटलं) - माला वाटतं मी दूध नको होतं घालाय्ला किवा लिम्बु पिळाय्ला हवं होतं :-(.....

स्मिता, माझ्या सासरी आमरसाबरोबर पुरळपोळी करतात.. ़जास्त त्रास असेल तर सरळ एखाद्या कुटूंबसखी वगैरेमध्ये Order पण देता येईल ...:)

Barbecue पार्टीसाठी एखादी डिश करुन घेउन जायच आहे काय करता येईल? मी एकटीच शाकाहारी आहे त्यामुळे काय करु कळतच नाही आहे.

अंजलीची रेसिपी आहे व्हेज बर्गरची ईथेच. भाज्या,पनीर,मश्रूम मॅरिनेट करून नेता येतील. कॉर्न भाजून खाता येईल.

http://www.maayboli.com/node/16779 (कबाब)

ईथे अजून थोडी शाकाहारी ग्रिलिंगची चर्चा आहे.
http://www.maayboli.com/node/2549?page=98
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/50131.html ( ही लिंक आयई मधे बघा)
http://www.maayboli.com/node/18726 ही डीजेची रेसिपी पण छान आहे ग्रिल्ड पेपर्सची.
http://www.maayboli.com/node/4549 मेधाची पाककृती आहे स्टफ्ड मश्रूम्सची. ते पण ग्रिल करून छान लागतात.

१.मोठा कॉलीफ्लावर अखंड ठेवून पानं, काढून फक्त देठ ठेवायचा. पाच मिनीटे हळद मीठ घातलेल्या पाण्यात उकडून घ्यायचा. आतल्या फटींमधे हिरवी चटणी (आलं, लसूण, जीरं, कोथिंबीर, पुदीना, हिरवी मिरची. अनारदाणे) लावायची. बाहेरून तंदूरी मसाला लावायचा (दही, मसाला, तूप, लिंबाचा रस). ग्रिलवर झाकण लावून (नसेल तर फॉइल लावून) भाजायचा. सर्व्ह करताना वरून चाट मसाला घालायचा.

२. साल काढायच्या पीलर ने झुकीनीच्या लांब, पातळ चकत्या / साल काढायच्या. त्यावर मीठ, मीरपूड स्प्रिंकल करा. पनीर चे १ इंच लांब, अर्धा इंच जाडीचे तुकडे हिरव्या चटणीत घोळवून झुकीनीच्या चकत्यांमधे गुंडाळायच्या वर टूथपिक लावून ग्रील करायचं. ही कृती बहुतेक मृण्मयीनं पार्ल्यात दिली होती. थोडी बदलून एकदा करून बघीतली होती. End result एकदम सही, हटके होता. नेहमीच्या त्याच त्याच बार्बेक्यू रेसेपीजपेक्षा.

सगळ्यांना Thanks.
अंजली तुमच्या दोन्ही रेसीपी सही आहेत करुन बघते आणि रिझल्ट ईथे कळवते Happy

पनीर्च्या क्यूब्स ना खोबरे , लसूण , जराशी हिरवी मिरची ( वाटण पांढरट राहील एवढे ) वाटण लावून ग्रिल करा, लै भारी लागते.

इंग्रो मधे हरभर्‍याच्या शेंगा ( सोलाणे) मिळाले तर ते पण न्या. सगळ्यांना आवडतात.
पायनॅपल स्लाइसेस ग्रिल करून त्याबरोबर फ्रेंच व्हनिला आइसक्रीम .

लोला.....लोल्स....:)

पुलंच्या पुर्वरंग मध्ये मला वाट्तं उल्लेख आहे की त्यांनी जपान्यांक्डॅ त्यांच्या पद्धतीच खाल्लं त्या न्यायाने तुम्ही त्यांना आपले पदार्थ ओळ्ख करुन देउ शकाल.. फक्त तिखट ना।ई वापरायचं
My own exp with Americans they love our Batata bhaji and puri with no spice or less Mirchi in Ba chi Bha...tandoori pan tyanna Aawadte aani gulag jam is ATF dessert
Rest tips you would get. From Japanla asnaare Mabokars.. Good luck..:)

लोला Happy अग लोकं जपानी आहेत. आणि जेवण सध्या तरी देसी करायचे आहेत. पण मग काय मेन्यु करावा त्या बद्दल मदत हवी आहे.

वेका, अग गोरे पाव भाजी पण खातात, आणि त्यांच्या सोबत आपण बरेच वेळा कामाच्या निमित्ताने असतोच. त्यामुळे साधारण काहितरी अंदाज येतो गं. पण या लोकांबद्दल मला काहिच माहिती नाहि.

रिमझिम मी जपाण्यांसाठी पुर्वी केलेला आणी त्यांना आवडलेला बेत :

मेथी मलई मटर
कमी स्पावसी चिकन करी ( बोनलेस वापरावे )
बोनलेस चिकन वापरुन बिर्यानी
चपाती
आंबा लोणचे ( आवडते या लोकांना )

आणी मॅगो मस्तानी ( आंबा खुप आवडीने खातात )

शाळेच्या year end party साठि काही पदार्थ सुचवा. सर्व देशाची मुले आहेत त्यामुळे indian नको आहे. 50 मुले आहेत त्यामुळे झटपट होणारे किंवा आदल्या दिवशी करावे लागेल. तसा cup cake / garlic bread चा option आहे. पण नवीन काही असल्यास पाहीजे. मुले साधारण १०-१६ वयाची आहे त्यामुळे ब्रेड-जाम वगैरे नको प्लीज. शिवाय उचलुन देता येणारा पदार्थ पाहीजे. धन्यवाद.

मशरूम सूपची कॄती हवी आहे.
मशरूम पांढर्‍या रंगाचे साधारण छोट्या लिंबाच्या आकाराचे आहेत.

मैत्रीणिनो आणि पार्टी स्पेशलिस्ट्नो...... माला मदत हवी आहे!!!!! माझ्या मुलाचा (५ वर्ष) येत्या १५ तार्खेला वाढ्दिवस आहे. त्या साठी मेनु सुचवाल आणि किति अन्न लागेल ते पण?

डीटेल्सः
१. वाढ्दीवस पार्कात करणार आहे.
२. उन्हाळा पण असेल.
३. अर्धी जनता अमेरिकन, अर्धी भारतीय....
४. रवीवारी ४-७ अशी वेळ आहे,
५. पावर पोइन्ट्स आहेत पार्क शेड मधे (अन्न गरम करता येइल)
६. ४० मोठी आणि ३० लहान मुले आहेत

माझ्या डोक्यातील मेनु (बदलेल्च बहुतेक)
१. चिप्स (विथ ग्लोकोमोले/ साध्या चिप्स)
२. समोसा
३. व्हेजी प्लाटर किंवा क्ट फ्रुट्स
४. पिझ्झा (चीज/ वेजी/ पनीर पिझा केन अम मधुन) - हे केलं तर किति पिझे लागतील? / स्याड्वीच (जीमी जोन्स)/ दाबेली/किंवा एखादा वन डीश व्हेजी पदार्थ????
५. पुलाव/ तवा पुलाव/ बीर्याणी - हे मी घरी करणार आहे - किति कपाचा करु?
६. केक (किति लागेल १/२ शीटर पुरेल का?)
७. जुस/ कोल्ड ड्रिन्क्स ई.

आणि काही आयडीया ची कलपना असेल तर जरूर सांगा..... आभारी आहे......

Pages