Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमराठी लोकांसाठी माझा मिसळीचा
अमराठी लोकांसाठी माझा मिसळीचा अनुभव काही बरा नाही.
रगडा पॅटीस बेस्ट ऑप्शन आहे. रगडा आदल्या दिवशी करून ठेवता येईल. विकतच्या चटण्या वापरल्यास आणि स्वाती, अनु म्हणतायेत तश्या पॅटीज की झालं काम. हवं तर याबरोबर टॉर्टिया चीप्स ची शेव बटाटा पुरी किंवा कॉर्न भेळ ठेव. मला नाही वाटतं पुलावाची गरज आहे. हे बरचं हेवी होईल. गोडात मँगो मिल्कशेक मस्त वाटेल. किंवा कॅन्ड फळं एकत्र करून त्यात व्हीप्ड क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क घालून सकाळी मिक्स करून फ्रीजमध्ये ठेव. हे पण बर्यापैकी हेवी होतं. गोडासाठी अजून एक ऑप्शन म्हणजे मँगो पाय. हे पण आदल्या दिवशी करून ठेवता येईल.
मिसळीचा ऑप्शन तसा वाईट नाही,
मिसळीचा ऑप्शन तसा वाईट नाही, त्यात काय काय घालणार, कसं सर्व्ह करणार या वर अवलंबून आहे.
मी मिसळ अशी देते---- मूग किंवा मटकी ची साधीशी ऊसळ + पोहे चिवडा ( फार फॅन्सी नाही ) किंवा कांदा घालून फो. पोहे + उकडलेल्या बटाट्याची भरपूर आलं - हिरवी मिरची घालून केलेली भाजी + कच्चा कांदा कापून ( शक्यतो लाल कांदा )+फरसाण + कोथींबीर +खूप तिखट अशी तरी ( ही वेगळी बनवावी लागते ) +बारीक शेव
वरचं सगळं असेंब्ली लाइन सारखं लावून ठेवायचं. सर्वात शेवटी कापलेलं लिंबू आणि दही.
माझे मराठी - अमराठी सगळे गेस्ट तुटून पडतात अशा मिसळीवर.
हे तसं पोटभरीचं होतं . खूप मसालेदार पण होतं, त्यामुळे नंतरचा गोड पदार्थ दुधाचा असावा. मिल्क शेक,केक वीथ आईस क्रीम, रस मलाई वगैरे. अॅसीडीटीचा त्रास होत नाही.
अमराठी लोकां साठी मिसळ
अमराठी लोकां साठी मिसळ अज्जिबात नको, त्यांना त्याची "चव"(गुळाची चव सारखं) खरच कळत नाही आणी तु लिहिल्या प्रमाणे ब्रेड आणी हे काय दिलयं खायला असे भाव. पन्हं पण कधी करू नये.
वर जे लिहिलय तेच मी पण रीपीट करते. रगडा आधी करून ठेवता येतो. OreIda चे फ्रोझन हॅश ब्राऊन पॅटीस चांगले पडतात. फ्रोझन बटाटा सेक्शन मधे असतात. बरेच वेळा easily मिळत नाहीत मग तिथेच store brand घ्यायचे. Oven मधे गरम केले कि जास्ती तेलकट होत नाहीत.
नाहीतर, box madhale mashed potato चे पण छान बनवून ठेवता येतात. त्यात गरम पाणी घालायचं( गरम पाण्यात ते नाही घालायच), हिरवी मिरची, लसूण, जिरे कोथिंबीर वाटून, मीठ, लिंबाचा रस (मस्ट) घालून मळून घ्यायचं.छोटे पॅटिस बनवून ब्रेड क्रम्ब्स मधे घोळ्वून शॅलो फ्राय करायचे.
बरोबर मँगो शिरा आणी दही भात.
शुगोल ची पोस्ट आत्ता वाचली.
शुगोल ची पोस्ट आत्ता वाचली. Assembly line ची आयडिया छान आहे. म्हण्जे त्यांना हे पण कळेल कि काय काय पदार्थ आपण त्या करता बनवतो आणी सेल्फ सर्व्ह असलं कि आपला पण त्रास कमी.
अमराठी म्हण्जे नेमके कोण आहेत? कारण गुजराथी आणी नॉर्थ ईंडियन्स तसे चवी ढवी चे असतात, त्यामानानी साऊथ ईंडियन्स ना हे सगळंच नवीन असतं.
गुजराती, तमिळ, बंगाली,
गुजराती, तमिळ, बंगाली, तेलुगु, काश्मिरी अशी मिक्स्ड जनता आहे. गप्पा मारणे/दंगा करणे हा संध्याकाळचा मुख्य कार्यक्रम आहे, जेवण त्याच्या जोडीला. त्यामुळे मिसळ किंवा रगडा पॅटिस सारखा सेल्फ सर्व ला सोपा मेन्यू बरा पडेल. एक वयस्कर काका-काकू आहेत त्यांना बरं पडावं म्हणून सोबत थोडा दहीभात करता येईल. आणि तुम्ही सुचवलेल्यापैकीच काहीतरी गोडाचं. बघू काय ठरतंय.
थँक्स सगळ्यांना
माझा अनुभव चांगला आहे मिसळी
माझा अनुभव चांगला आहे मिसळी बाबत. नॉन मराठी जनतेने चापून खाल्ली होती. अगदी वर शुगॉल ने सांगितलंय तशीच असेंब्ली लाईन होती. बरोबर मी दहीवडा ठेवला होता आणी गोडाला मँगो पाय.
पन्हं पण कधी करू नये. >> अगदी
पन्हं पण कधी करू नये.
>> अगदी अगदी... माझा तर पोपटच झाला होत पन्ह करुन
पण त्याच लोकांना मिसळ मात्र खुप आवडली होती.
रविवारी घरी १ कुटुंब येणार
रविवारी घरी १ कुटुंब येणार आहे जेवायला (३ माणसे). काय करावे? मावस सासु सासरे आणि त्यांचा मुलगा. त्यामुळे छान बेत हवा आहे.

लेकीला शुक्रवारी भोंडल्याचं
लेकीला शुक्रवारी भोंडल्याचं आमंत्रण आहे. काहीतरी खिरापत घेऊन जायचा विचार आहे. सुचवाल का काही? वय वर्षं २ ते ११ च्या मुली आहेत.
खजुराचे लाडू कसे वाटतील ?
खजुराचे लाडू कसे वाटतील ?
खजुर, गुळपापडी, चुरमुरे
खजुर, गुळपापडी, चुरमुरे लाडु..
कॉर्न, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा किंवा भेळ,
खाण्डवी, आलू टिक्की, आप्पे.
पोटभरीचे हवय का असेच वरखाणे?
पुन्हा एकदा.. "या मायबोली..
पुन्हा एकदा.. "या मायबोली.. मदद मदद" (अलिफ लैला च्या तालावर!)
नवर्याच्या ऑफिसमध्ये ब्रेक्फस्ट्साठी काहितरी द्यायचंय. साधारण २५ जण असतील. ५-६ भारतीय (साउथ-नॉर्थ मिक्स) सोडले तर बाकी सारे जर्मन. मी साबुदाणा वडे (अगदी नावालाच मिरची घालून) त्याबरोबर पुदिना-खोबरं-कोथिम्बिर चटणी (बिन-मिरचीची) आणि गोड हवंय तर गाजर हलवा असा विचार करतेय. साबुदाणा वडा कसा वाटेल इथल्या लोकांना? कोणाला अनुभव आहे का? अजून काही सुचना असतील तर त्याही येउ देत!
गाजर हलवा ऐवजी तुपातला मुगाच
गाजर हलवा ऐवजी तुपातला मुगाच शिरा चांगला वाटेल
सा. वडा गरमच चांगला लागतो.
सा. वडा गरमच चांगला लागतो. तुला गरम देणे शक्य आहे का?
गोगो, वर्षाला अनुमोदन. जर गरम
गोगो, वर्षाला अनुमोदन. जर गरम वडा देता येणार नसेल तर गार अवस्थेतही चांगला लागू शकेल असा ब्रेफा दे.
इडली-चटनी , पराठे , साबुदाना
इडली-चटनी , पराठे , साबुदाना खिचडी , वडा-चटणी / पाव हेही ऑपशन्स आहेत.
मिसळ-पाव ऑपशन बाद होइल.. तिखट नाही करायचे म्हटल्यावर
सौम्य चवीची आलू-टिक्की/ बोंडा
सौम्य चवीची आलू-टिक्की/ बोंडा किंवा इतर कोणत्याही प्रकारची टिक्की / पॅटीस, मटारपोहे, भाज्या घालून केलेली इडली, मिक्स व्हेज कटलेट्स, रवा इडली, उपमा असा कोणताही चवीला सौम्य प्रकार.
चटणीत पुदिना शक्यतो नको... काही वेळा लोकांना त्याचा वास आवडत नाही. नारळ - कोथिंबीर चटणी ओके वाटेल.
गोडगोजिरी इंडिअन च पदार्थ
गोडगोजिरी इंडिअन च पदार्थ द्यायचे आहेत का? कारण नाहीतर butter bretzel , muffins , असे देता येतील. muffins पण घरी करत येतील. इंडिअन च हवे असेल तर चटणी sandwitch ´एका side ला butter लावून देता येतील. चटणी कमी तिखट कर. आणि muffins किंवा बेगाल्स बाहेरून आण´. आणि coffee .
माझा अनुभव: युरोपियन्सना आपले
माझा अनुभव: युरोपियन्सना आपले कांदेपोहे आवडतात - फक्त तिखटमीठाने माइल्ड करायचे. लिंबू, साखर, खोबरं, कोथींबीर, लोणचं त्यांच्या आवडीनुसार घेऊ द्यायची. आणि त्याबरोबर कुठल्याही तिखट्/सॉल्टी चिप्स ठेवायच्या. सा. वडा त्यांना खूप तेलकट होऊ शकतो. सा.खिचडी पण चालेल.
बटाटा पोहे आणि नारळ, गाजर,
बटाटा पोहे आणि नारळ, गाजर, बीटरूटापैकी एकाच्या (किंवा मिक्स) वड्या. वड्या आधी करून ठेवता येतील आणि सोपे पडेल.
माझ्याकडे एक मराठी आणि एक
माझ्याकडे एक मराठी आणि एक गुजराथि जोडप जेवायला येणार आहे (lunch)..त्याना प्रत्येकी एक मुलगि आहे...क्रुपया मला मदत करा ..कुठला बेत ठिक राहिल?
समोसा - खजुर चटणी + पुदिना चटणी
वान्गी भरित
कोशिबीर
पोळी
दाल फ्राय - जीरा राईस
गोड - रवा-खोबर लाडु + तयार सोहन पापडी
छोले भटुरे दाल फ्राय - जीरा
छोले भटुरे
दाल फ्राय - जीरा राईस
गोड - रवा-खोबर लाडु + तयार सोहन पापडी
कसे वाटेल????

दुपारच्या जेवणासाठी येतायेत
दुपारच्या जेवणासाठी येतायेत न. मग पोळ्या, कोशिंबीर, एखादी भाजी( वांगी/ फ्लॉवर +बटाटा रस्सा) किंवा एखादी उसळ, दाल फ्राय, भात ठीक वाटेल.
दाल,जीरा राईस ऐवजी मसाले भात, टोमॅटो सार सुद्धा चांगलं वाटेल. त्याबरोबर भजी/ कोथिंबीर वडी किंवा मग पापड तळून असं ठेवता येईल.
गोड पदार्थ म्हणून पानात लाडू वाढण्या ऐवजी बासुंदी, खीर जमेल का? किंवा गुलाबजाम घरी करायचे किंवा विकत आणता आले तर.
धन्यवाद बिल्वा .... menu
धन्यवाद बिल्वा .... menu change karate...गुलाबजाम घरी तर नाही जमणार
पण विकत आणता येतील 
एका केळवणासाठी पुढील मेनु
एका केळवणासाठी पुढील मेनु ठरवला आहे :
सुरळीची वडी/पालक वडी
पुदीना चटणी
दही काकडी
काजु मसाला ( यात थोडे पनीर पण घालीन )
टोमॅटो भात
साधा वरण भात
पोळ्या
बासुंदी / श्रीखंड
ठीक वाटतोय का मेनु?
काजु मसाला जरा घट्ट्सर भाजी होईल तर टोमॅटो भातासोबत काही दुसरे पातळ कॉम्बो करता येईल का?
सोलकढी कशी वाटेल? पण १२ लोकांसाठी किती नारळ लागतील?
किंवा मटकीची रस्सेदार उसळ?
प्लीज सुचवा लवकर..
रवीवारी आहे कार्यक्रम...
माझ्यामते मटार-पनीर / उसळ
माझ्यामते मटार-पनीर / उसळ योग्य राहील...
मला वाटते फिश /चिकन सोबत योग्य राहते ..
सोलकढी
रविवारी दुपारी ६ मोठी माणसं
रविवारी दुपारी ६ मोठी माणसं चहाला यायची आहेत @ ५.०० वाजता... ना धड डिनर ना धड आफ्टरनून टी...
मी कच्छी दाबेली करायच्या विचारात आहे.
त्याबरोबर अजुन काय करता येइल? गोडाचं काय करू?
मी पुढच्या आठवड्यात देशात येत्येय त्यामुळे खरतर आवरा-आवरी, पॅकिंग वगैरे मधे अजिब्बात जास्त वेळ मिळणार नाहिये, पण अगदी जवळचे फॅमिली फ्रेंड्स काका काकू आलेत त्यांच्या लेकाकडे त्यामुळे बोलावलं आहे त्यांना घरी. तरी प्लिज, आधी करुन ठेवता येण्यासारखे काहितरी सुचवा. केक नको..........
चाट नको कारण त्यांच्या लेकाकडे गेलो होतो लास्ट विकेंड तेव्हा त्यांच्या सूनेने, पापडी चाटच केले होते....
प्लिजच सुचवा....
व्हेज बिर्याणी आणि गुलाब
व्हेज बिर्याणी आणि गुलाब जामुन... ( मला पण बोलवा..
)
जामोप्या... दुपारी ५ वाजता
जामोप्या... दुपारी ५ वाजता व्हेज बिर्याणी
दहीवडे / पकौडे दुधी हलवा /
दहीवडे / पकौडे
दुधी हलवा / गा. ह. / ड्राय फ्रूट्स इ. घालून खीर / गोडाचे आप्पे / गुजा + आईस्क्रीम / शाही टुकडा
Pages