बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपतीच्या सिवशी घरी नाश्त्यासाठी साधारणपणे दोन कुटुंबे येणार आहेत (प्रत्येकी चार) मला काहीतरी मराठी पदार्थ करायची फर्माईश आहे Uhoh गोडामधे उकडीचे मोदक होतील आणि नंतर चहा कॉफी सरबत. पण सोबत खायला काय ठेवू? मी साबुदाण्याची खिचडी करेन् म्हणत होते, पण पाहुण्यापैकी दोघे मधुमेही आहेत. मिसळ करावी म्हटलं तर लहान मुले खाणार नाहीत. कांदापोहे अगदीच साधा मेनू वाटतोय. आदल्या दिवशी करून ठेवता येइल किंवा बरीचशी तयारी करता येइल असा मेनू सुचवा.

मंजूडी, इथले लोक तिन्ही त्रिकाळ भातच खातात. Proud त्यामुळे नाश्ता टाईप मेनूमधे सुचव ना. भाजणीचे वडे करावे म्हटले तर नेमकी भाजणी संपली. गिरणीवाला म्हणे, किमान दहाकिलो असेल तर दळून देइल. Sad त्यामुळे तो ऑप्शन कॅन्सल.

मटार उसळ आणि पुर्‍या? सोबत लोणचे/ रायते ठेवता येईल हवं असल्यास.
किंवा मेथी/ कोथिंबीर/पालक/ कोबीचे पराठे, दही, लोणचे.

मटार घालून उपमा/ शेवयांचा उपमा/ मिसळ/ कोथिंबीर वडी-लसूण चटणी (वडी मोठी कापायची २इंच बाय २इंच, प्रत्येकी तीन चार पुरेशा व्हाव्यात)

भाज्या घातलेला उपमा व चटणी वरून शेव पेरून.
अळू वडी /कोथिंबिरवडी
मधुमेहींसाठी बेस्ट.
प्लेट मस्त दिसेल. उपमा, दोन दोन वड्या व मोदक.

सुरळीच्या वड्या जर मला जमल्या तर कूकिंगचे क्लासेस सुरू नसते का केले???

चिऊ, बव झाले गं एकदा करून. सारखं तेच नको ना!!

मामी, साऊथमधे उपमा अगदीच नॉर्मल. बरं एक सांगा. पिठल्याच्या वड्या आणि त्यावर रस्सा अशी कायतरी एक डिश असते ना? त्याला काय म्हणतात? किंवा कांदाभजी-अळूवडी आणि कोबीचे भानोले हे कॉम्बोकसे वाटेल??

पिठल्याच्या वड्या आणि त्यावर रस्सा अशी कायतरी एक डिश असते ना? त्याला काय म्हणतात? >> आम्ही तरी रस्सा पिठले म्हणतो. पण हा प्रकार भाकरी / पोळी बरोबरच छान लागतो आणि जेवणात. हा नाष्ट्याचा अ‍ॅटम नाही असे माझे मत.

अळूवडी आणि कोबीचे भानोले >> हे दोन्ही तुला आधी उकडुन / तयारी करुन टेह्वता येइल Happy

भाजणीचे थालपीठही चांगला ऑप्शन आहे. जर कुणी गरमा गरम करायला असेल तर Happy

वर्‍याचे तांदूळ सरसरीत (भगर), का ची को.

वाटली डाळ (कोरडी) किंवा कैरीची डाळ (कैरी नसल्यामुळे लिंबाचा रस घालून)

दडपे पोहे / कोळाचे पोहे

पाटवड्या / भानवले

तिखटामिठाचा सांजा (वरून ओले खोबरे/ कोरडे खोबरे, कोथिंबीर, शेव, लिंबाची फोड)

१. ति़खट मीठाच्या पुर्‍या आदल्या दिवशी करुन ठेवल्या तरि चालतील.
२. भिजवलेल्या हरभरा डाळीचे वडे , पालक पकोडा किंवा ज्वारीच्या पीठाचे थालिपीठ आणि दही छान वाटेल ( पण गरम केले तर जास्ती मजा येईल.)

नंदिनी, डाळबाटी चा बेत कसा वाटतो ?
किंवा घरची भाजणी सं पली असेल तरी केप्र ची थालीपीठ भाजणी विकत आणून थालीपीठं करता येतील.

साधना Proud

कोणी येणार असेल तर शक्यतो नविन पदार्थ (पहिल्य्न्दाच ट्राय) करू नये. काही फजिती झालीच तर माकाचु वर विचारण्यासाठी पण वेळ नसतो. Happy

नेहमीप्रमाणे रुचिराबाई मदतीला धावल्या. पोह्याचे पॅटिस आणि पुदिन्याची चटणी असा बेत ठरवलाय. पॅटिस आधी करून ठेवेन. पाहुणे आल्यावर शॅलो फ्राय करेन.
रच्याकने, डाळबाटी (राजस्थानी) आणि जळगावकडे करतात त्या डाळबाटीमधे काही फरक आहे का???

कुणाला अमराठी (पण भारतीय) लोकांना मिसळ खाऊ घालायचा अनुभव आहे का? ६-७ लोक वीक डे ला येणारेत आणि चारीठाव स्वैपाक करायला वेळ नाही आणि इच्छाही नाही. तर मिसळ केल्यास मेजॉरिटी अमराठी जनतेच्या पसंतीस उतरेल काय? नुसतीच स्प्राऊट्स ची 'करी' आणि ब्रेड खायला दिला असे नाही ना वाटणार? सोबत एखादा लाईट पुलाव करावा का? गोडाचे करायला वेळ मिळाल्यास डीजेच्या आईचा आंब्याचा शिरा नाहीतर मग काहीतरी विकतचे असा विचार आहे. पुलाव + गोडाचे साठी सजेशन्स वेलकम. आदल्या दिवशी करून ठेवता येण्याजोगा (आणि कमीत कमी सुगरण स्किल्स लागणारा :p) गोडाचा पदार्थ असेल तर उत्तम.

रगडा पॅटिस.
आधी करून ठेवता येईल. पॅटिस करत बसायचे नसतील तर त्या फ्रोझन पॅटीज नसतात का ब्रेकफास्टसाठीच्या? त्या चालतात.

पावभाजी त्याच ग्रूपच्या गेट टुगेदरला गेल्या महिन्यात झाली, त्यामुळे पावभाजीवर फुली आहे Sad
फ्रोझन पॅटीस म्हणजे मॉर्निग स्टार वगैरे?

ब्रॅन्ड नाही लक्षात. पण सूपरमार्केटमधे ब्रेकफास्ट सेक्शनमधे (जिथे फ्रोझन वॉफल्स वगैरे असतात तिथे) असतात. हॅश ब्राऊन पॅटीज म्हणत असावेत.

हॅश ब्राउन्सची आयडीया सहीये रगडा पॅटीस साठी.
मिसळ मी एवढ्या साठी म्हणत होते कि हा 'आमच्याकडचा' प्रकार म्हणून खाऊ घालता येईल. नकोच म्हणताय का?

Pages