Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सौदागर मधल्या गुळाला
सौदागर मधल्या गुळाला 'नलीनगुड' असे म्हणतात. तो चवीला खुप छान असतो. बंगाली लोक नलीनगुड वापरुन आईस्क्रिम पण करतात. [माझी कोलकत्याची शेजारीण घरी करत असे. पण मी मात्र नेहमी हॉटेल मधेच खात असे. अजुनही आठवण येते, शेजरणीची नाही आईस्क्रिमची
] 
तर इथल्या गुळाच्या पोस्टी हलवुन एक बाफ तयार होईल
आरती, त्याला 'नोलेनगुड'
आरती, त्याला 'नोलेनगुड' म्हणतात गं. तो पातळ असतो आणि मातीच्या छोट्या सुगडात सीलबंद करून विकतात.


तोंपासु. आता आला असेल बाजारात. घरी चाल्लेय १ तारखेला, तेव्हा खाणार नोलेनगुडेर शोंदेश. किंवा गरमागरम लुचीबरोबर (मैद्याची पुरी) पण मस्त लागतो हा गूळ.
अरे हो, बंगाली शब्द लिहिताना,
अरे हो, बंगाली शब्द लिहिताना, ओकारांतीच आला पाहिजे, विसरलेच मी
गावठी लाल पोह्यांचे गोड्/गुळ
गावठी लाल पोह्यांचे गोड्/गुळ पोहे, चहाबरोबर सोडुन काय काय करता येईल?? गावावरुन येऊन येऊन बरेच साठलेत..
वरदा, मिष्टी दोईसाठी पण हाच
वरदा, मिष्टी दोईसाठी पण हाच गुळ वापरतात ना?
आरती ओकारान्ती नाय ग,
आरती ओकारान्ती नाय ग, ओसुरूवाती.
बेकिन्ग सोडा म्हणजेच इनो का?
बेकिन्ग सोडा म्हणजेच इनो का?
मक्याचे पोहे तळुन न घेता,
मक्याचे पोहे तळुन न घेता, मावे मधे करता येतात का ? असल्यास कोणी स्पेसिफिकेश्न्स देउ शकेल का ?
इनोमध्ये खायच्या सोडा आणि
इनोमध्ये खायच्या सोडा आणि इतरही घटक असतात.. त्यामुळे तो खायच्या सोड्याऐवजी वापरला तरी चालू शकते.
आरती, योगायोग म्हणातात तो
आरती, योगायोग म्हणातात तो असा..
परवा बशीला तेल लावून त्यावर मक्याचे पोहे घालून मायक्रोवेवात हाय-लो सगळ्या पावर सेटिंग्ज्वर वेगवेगळ्या वेळांसाठी फुलवून बघितले. अजीबात फरक पडला नाही. ४-५ पोह्यांच्या मधल्या भागाला फोड आल्यासारखं झालं आणि कडा तशाच राहिल्या. शेवटी नाद सोडला.
कुणीतरी मायक्रोवेव ओव्हनात कुरडया छान होतात असं सांगितलं. प्रयोग म्हणून त्याही करून बघितल्या. फुलल्या नाहीतच, पण १५ सेकंदात अर्धवट जळल्या.
त्यापेक्षा तेलात तळून, टिपकागदावर तेल शोषून, कधीतरी थोड्या प्रमाणात खाल्लेलं बरं असं वाटायला लागलं.
इनोमधे खायचा सोडा आणि
इनोमधे खायचा सोडा आणि सायट्रीक अॅसिड असते. हे दोन घटक कोरडे असताना त्यांच्यात काहीच रासायनिक क्रिया होत नाही (आणि इनोमधे ते तसेच असतात) पण पाण्यात टाकल्याबरोबर दोघांची रासायनिक क्रिया होते.
त्यामूळे ज्यावेळी इनो वापरुन पदार्थ शिजवायचा (सहसा वाफवायचा) असतो त्यावेळी अगदी आयत्यावेळी म्हणजे पदार्थ उकडत ठेवायच्या आधी थोड्या पाण्यात मिसळून तो पदार्थात मिसळायचा. (इनो पिताना पण लगेच प्यावा लागतो. )तो मिसळून पदार्थ तसाच ठेवला तर काही उपयोग नाही.
सोडा मिसळताना मात्र पदार्थात जर आम्लाचा अंश नसेल तर वेगळा घालावा लागतो.
धन्यवाद मन्ड्ळी, मग मी
धन्यवाद मन्ड्ळी, मग मी केकसाठी, बेकिन्गसाठी खायच सोडा वापरु का? मला इथे वेगळा बेकिन्ग सोडा मिळत नाहिये फक्त बेकिन्ग पावडर मिळते आहे ...?
मृण्मयी परवा बशीला तेल लावून
मृण्मयी
परवा बशीला तेल लावून त्यावर मक्याचे पोहे घालून मायक्रोवेवात हाय-लो सगळ्या पावर सेटिंग्ज्वर वेगवेगळ्या वेळांसाठी फुलवून बघितले >> मोठ्ठाच योगायोग. मी पण हे सगळे केले. शेवटी इथे येऊन प्रश्न विचारला.
मदत! मदत! परवा दह्याऐवजी
मदत! मदत!
) त्याचे काय काय करु?
परवा दह्याऐवजी चुकून सोअर क्रीम आणले गेलेय. (सगळं जर्मनमध्ये Soure Sahne नाव आणि चित्रावरुन दही वाटले मग गूगल केले तर कळाले Curd ला Quark म्हणतात. पुढच्यावेळेस घरी अभ्यास करुन मग यादी घेऊन जाईन.
आणखी एक इथे इंडक्शन कूकटॉप आणि जाड फ्राईंग पॅन आहे. या उपलब्ध सामग्रीत जरा मऊ पोळ्या कशा जमतील? मी काल थोड्या जाड करुन डायरेक्ट कॉईलवर भाजल्या. But there has to be some better way!
इंडक्शन कूकटॉप आणि जाड
इंडक्शन कूकटॉप आणि जाड फ्राईंग पॅन आहे.
अगदी छान जमतील.मी तशा पॅनमध्ये पराठे करत होतो. . खास चपातीचा तवा मिळतो तो वापरा/
राजसी साधा सोडा आम्लाच्या
राजसी साधा सोडा आम्लाच्या संगतीत तर बेकिंग पावडर वरच्या तपमानाला कार्यरत होते. त्यामूळे बेक करायच्या पदार्थात आंबट पदार्थ नसेल तर बेकिंग पावडरच वापरावी लागेल.
आशू, सावर क्रिम म्हणजे चक्का
आशू, सावर क्रिम म्हणजे चक्का ना? साखर मिसळून श्रीखंड कर
इथे चकल्याही लिहिल्यात आर्चने.
जागोमोहनप्यारे, सामान
जागोमोहनप्यारे, सामान वाढवायचं नाहीये ओ.

मंजूतै, ओ मंजूतै! इथे दोन पातेली, एक फ्राईंग पॅन, झारा आणि डाव एवढाच संसार आहे. चकल्या??!! गरीबावर दया करा.
श्रीखंड बघेन. थंडीतही.
अगं मी आपलं सुचवलं. तू इथे
अगं मी आपलं सुचवलं. तू इथे घेऊन ये तो डबा, आणि इकडे चकल्या कर.
आणि थंडीत दही खाणार होतीस, मग श्रीखंड खायला काय? किंवा तो डबा दही म्हणूनच वापरून टाक की...
आशूडी, सावर क्रीम दह्याऐवजी
आशूडी, सावर क्रीम दह्याऐवजी सॅलड / कोशिंबीर / फळांचे काप यांबरोबर वापरून गट्टं स्वाहा करावे!
त्यात वेगवेगळ्या हर्ब्ज / मिरपूड / मोहरी पूड वगैरे प्रकार वापरून निरनिराळे स्वाद आणता येतात.
नाहीतर सावर क्रीममध्ये साधे क्रीम, साखर मिसळून फळे, सुकामेवा काप इ. सोडायचे, गार करायचे व फ्रूटखंड म्हणून हादडायचे!
जागोमोहनप्यारे, सामान
जागोमोहनप्यारे, सामान वाढवायचं नाहीये ओ.
मी पण कमी सामानातच पराठे करायचो.. एका पॅनमध्ये आधी बटाटा शिजवायचा. मग पाणी टाकून देऊन, बटाटा, पीठ वगैरे त्यातच कालवून कणकेचा गोला करुन थापायचा आणि मग जाडजून एकच पराठा त्याच पॅनमध्ये भाजायचा..
१५ दिवसानी मग बाकी तवा , पोळपाट वगैरे आणले.. पोळपाट नाही तर पोळ्या कशा करनार? मग आलू पराठा योग्य पर्याय आहे. 
ओके, धन्यवाद. मंजूने दुसरीकडे
ओके, धन्यवाद. मंजूने दुसरीकडे दिलेली पराठ्यांसोबत संपवण्याची आयडियाही चांगली आहे.
लाटणे आणलेय. चॉपिंग ट्रे = पोळपाट.
आशू , विपू चेक कर .
आशू , विपू चेक कर .:)
संपदा आणि अगो ने विपुत
संपदा आणि अगो ने विपुत सांगितल्याप्रमाणे सोअर क्रीम दह्याला पर्याय म्हणूनही वापरता येते. भाज्या, कोशिम्बीरीत इ. आणि सर्वात सोपी युक्ती म्हणजे नुसते खाणे. दह्यापेक्षा लो फॅट. वर अरुंधतीनेही तेच म्हटले आहे.
) दोन्ही बिघडू शकतात. तस्मात कितीही जाड पॅन असेल तरी तो तापण्याची वाट पाहणे.
संपदा उवाच : इंडक्शन प्लेटवर पोळी थेट भाजल्याने प्लेट + पोळी (बाय डिफॉल्ट
हे इथे माहितीसाठी रहावं म्हणून लिहीलं.
इंडक्शन प्लेटवर पोळी थेट
इंडक्शन प्लेटवर पोळी थेट भाजल्याने प्लेट + पोळी (बाय डिफॉल्ट ) दोन्ही बिघडू शकतात
इंडक्शन म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन ना? त्याच्यावर भाम्डे नसेल तर ते चालूच होणार नाही. ( हे असलेच ना? http://prestigesmartkitchen.com/induction-cook-tops-c-11 .. मी ते समजून उत्तर लिहिले आहे.)
नाही. असा नाहीये.
नाही. असा नाहीये.
मग ती हॉट प्लेट असेल.. खाली
मग ती हॉट प्लेट असेल.. खाली चौकोनी डबा आणि वर ग्रामोफोन डिस्कसारखी.. http://shopping.rediff.com/categories/kitchen-utilities-&-appliances/kit...
याच्यावर पोळी टाकल्यास मात्र दोन्ही बाद होण्याचे चान्सेस आहेत.
संपदा, तू फोटो दिल्यावर फरक
संपदा, तू फोटो दिल्यावर फरक कळला
सिरॅमिकचाच आहे आमच्याकडे. तो भांडं नाही ठेवलं तरीही तापतो. इलेक्ट्रिक कॉईलपेक्षा तो साफ करायला मात्र फारच सोपा पडतो हा मोठाच फायदा आणि कॉईलपेक्षा जरा लवकर तापतो असेही वाटले.
जामोप्या , तुम्ही म्हणताय
जामोप्या , तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ईंडक्शनवाला कूकटॉप त्यावर भांडं नसेल तर तापतच नाही . मला वाटतंय आशूकडे ह्या लिंकमध्ये दिलाय तसा सिरॅमिकचा असावा .
http://www.google.de/search?tbm=isch&hl=de&source=hp&biw=1120&bih=602&q=...
लिंबाचा रस फ्रीज मधे किती
लिंबाचा रस फ्रीज मधे किती दिवस टिकतो?
Pages