युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडक म्हणजे दगड झाल्यात का? तस असेल तर वरवंटाच वापरावा लागेल

तस असेल तर लाडूच वरवंटा म्हणून वापरावा लागेल Proud

पण मूळात इतक्या कडक झाल्याच कश्या ?
खरे तर गुळपापडी त्यासाठीच फ्येमस होती. लहान बाळांना दात येतेवेळी मुद्दाम देत असत.

इकडच्या जवळच्या दुकानात मिळणारी गूळाची छोटी ढेप आणली. दोन्हीवेळेला गूळ किसून ठेवला की त्याचा पार पाकच झाला. एरवी कसा मस्त कीस पडतो. तसा न पडता मधाच्या कन्सिस्टंसी एवढा पातळ होतोय गूळ. Sad
कशामुळे?

गुळ स्वयपाकासाठीच आणला होता की आणखी काही कामासाठी? Proud ( असला गळका गूळ हातभट्टीला वापरतात... Proud उगाच पोलिसांची धाड पडायला नको. टाकून द्या. )

पण मूळात इतक्या कडक झाल्याच कश्या?>>> गुळाचे खडे कठीण होते, ते विरघळेपर्यंत मी परतत बसले. तसं करायला नको होतं, पाक जास्त झाला त्या गुळाचा. आणि आता आमच्याकडे कोणाला दात पण येत नाहीयेत. Wink

प्राची, थंडी असूनही गूळ पाघळला? नेऊन दे परत दुकानात.

आता संक्रांत येईलच>> केश्वि, आज २३ नोव्हेंबर आहे. तुझं 'आता'चं स्केल काय आहे नक्की? Proud

प्राची गुळात भेसळ आहे. परत दे. अथवा लगेच संपवून टाक. (गुळपापडी करून)

गूळाचा पाक खरेच फार लक्ष ठेवून करावा लागतो.

प्राची, पाण्याचा हात लागला, हवा गरम असेल तर असे होते. कधी कधी किसणीच्या धातूचा पण परिणाम होतो.

पूनम Proud

कधी कधी किसणीच्या धातूचा पण परिणाम होतो.>>> तसं काही नाही हो. दुसरी ढेप तर ठेवल्या टिकाणीच पाघळली. (मला मघाशी हा शब्द आठवत नव्हता :()
यावेळी परत करणं अवघड आहे, कारण, आणून बरेच दिवस झालेत. पण आता यापुढे लक्षात ठेवेन. वापरूच नको म्हणताय का हा गूळ?

मंजू, पुढच्या वेळेस तुपावर कणिक भाजून झाली की त्यावरच बारीक चिरलेला गूळ घाल आणि पटापटा कालथ्याने हलव. नीट विरघळला की ताटात थाप. मी नेहमी अशाच करते. यावेळी सुकं खोबरं आतच घातल्यामुळे ठिसूळ झाल्यात नाहीतर व्यवस्थित होतात.

कधी कधी फार रसायने वापरतात. रंग चांगला येण्यासाठी वगैरे. त्यामूळे चव घेऊन बघणेच उत्तम.

गोव्यामधे एक वेगळ्या म्हणजे पिरॅमिडच्या आकारातला गूळ मिळायचा. मस्त असायचा चवीला तो. रंगाने काळपट असला तरी चव मस्तच असायची. त्यांच्याकडच्या काही गोड पदार्थात आवर्जून तोच वापरतात.

यावेळी >>> हेच नडतं Happy
एरवी माझ्या चांगल्याच होतात गुपावड्या, 'यावेळी' गूळाचे खडे विरघळले नाहीत. असो Happy

काही विशेष निराळी नाही वाटली तर आमटीत चमचा-चमचा घालून संपवून टाक.>>> चव काही वेगळी नाहीये. पण फार जुन्या गुळाचा वास येतो तसा वास येतो डबा उघडल्यावर. Sad आमटीत वापरतेच आहे. पण दुसरी ढेपही पाघळल्याने जरा शंका वाटली.

आर्च !!

प्राची, जास्त खोल वास घेतला तर गरगरल्यासारखे नाही ना होत ? मला त्या गुळाची चांगलीच शंका यायला लागलीय आता !

घरी नवर्याने अतिउत्साहात yam किंवा sweet potato या पैकी एक काही तरी रताळ समजून खूप सारे आनले आहेत. एक तर ते नेमकी काय आहे ते कळत नाही आहे...दुसर त्याच काय करू?(उकळून दुधात कुचकरून खाण्या एवजी? )

प्राची, इतक्या प्रेमाने नको बघू ढेपेकडे. >> आर्च, कसलं गोड.. Lol
प्राची तिकडे लाजून लाजून चूर, लालेलाल झाली असेल. Happy

अदि, त्यातल्या एखाद्याचा तुकडा मोडून नुसता खाऊन बघ, त्यावरून अंदाज येईल चव काय आहे ते, त्यानुसार काचर्‍या, किस.. काहीही करू शकतेस.

खायचे खोबरेल तेल मुंबईत खात्रीशीर कुठून घ्यावे? (की गोव्यातून आणावे?)>
कोकणात बरेच ठिकाणी गिरणी आहेत. तिथे सुके नारळ घेउन जायचे असतात मग ते खोबरेल तेल काढुन देतात. माझ्या मते तरी अस्सल खोबरेल तेल तर तेच असाव. आमच्याकडे तर आधि मासे पण अशा खोबरेल तेलातच तळलेले असायचेत.

गोव्यामधे एक वेगळ्या म्हणजे पिरॅमिडच्या आकारातला गूळ मिळायचा. मस्त असायचा चवीला तो. रंगाने काळपट असला तरी चव मस्तच असायची. त्यांच्याकडच्या काही गोड पदार्थात आवर्जून तोच वापरतात.<<<
तो माडाचो सूर ना? म्हापश्याच्या मार्केटात मिळतो. माडाचा गूळ उसाच्या गुळापेक्षा कमी गोड असतो आणि कमी चिकट. त्याचंच तर दोद्याल करतात. (अहाहा दोंद्याल!) Happy

हो रीमा थोडसंच आणून ठेवायचंय नवर्‍याला मासे करायचा मूड झाला तर किंवा काही कोकणी/ गोवन/ कारवारी पदार्थासाठी.

अदि७८७ त्याच्या जरा जाडसर चकत्या करुन त्याला तिखट मिठ थोडी आम्चूर पावडर,लाउन थोडा वेळ ठेउन दे आणि नंतर बारिक रव्यात किंवा तांदळाच्या पिठात घोळउन त्या चकत्या शॅलो फ्राय करुन बघ. मस्त लागतात. पोळी सोबत किंवा नुसत्याच खायला. सुरण बटाटा वांग्याच्या सुद्धा अश्या कापा चांगल्या लागतात. Happy

yam किंवा sweet potato या पैकी एक काही तरी रताळ समजून खूप सारे आनले आहेत.

रताळ्याला स्वीट पोटॅटो म्हणतात ना?

Pages