युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेग्नंसीमधे खाल्ला तर चालेल ना>>>> अंजली, चव घेउन बघ. दक्षिणा म्हणतेय तसे घरी केलेला अनेक वर्ष चांगला राहतो. जराही शंका असेल तर नको खावूस. preservative नक्कीच असणार त्यात.
तु कशासाठी मागवला होतास, मी कदाचित त्याला पर्याय सुचवू शकेन.

ओक्के दिनेशदा, हो शंका आहेच थोडी कारण त्यात प्रिझर्वेटिव आहेतच आणि बरणी उघडल्यावर काल थोडा फेस दिसला आता सकाळी पाहिले तर प्लेन आहे.

ज्ञाती, अग मला मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी व्हावा म्हणून सासुबाईंनी पाठवला होता, पण सगळ्यांचे वाचून असं वाटतंय नको ट्राय करायला

अंजली_१२, हल्ली इंग्रो मध्ये फ्रोझन व्हेजीटेबल च्या सेक्शन मध्ये फ्रोझन आवळे मिळतात. नुसते खायला किंवा मोरावळा करायला दोन्हीला चांगले.

हो ईंग्रो मधे पाहिले आहेत आता तेच आणीन Happy धन्स तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल. इथे कोणी सोबत नसले तरी माबोकरांचा खूप आधार वाटतो.

सुके खोबरे किसायला त्रास होत असल्यास ते १ तास आधी पाण्यात भिजवुन ठेवावे. आणि मगच
किसावे. किस पण चांगला पडतो आणि त्रासही होत नाही.

ईडली चा रवा भिजवल्यावर व त्यात उडदाची भिजवलेली डाळ बारीक करुन घातल्यावर , एका
कांदयाच्या ४ फोडी करुन त्या भिजविलेल्या पिठात घालाव्यात. म्हणजे थंडीच्या दिवसात सुद्धा
पीठ लवकर फरमेंट होते व ईडली सुंदर होते.

स्नेहल, पीठाला कांदयाचा वास थोडासाच येतो. पण जाणवण्याईतका येत नाही.

कांदापोहे करते वेळी फोडणीत कांदा टाकताच त्यावर लिंबु पिळावे व हळद घालावी म्हणजे रंग पिवळा
व कांदा चकचकीत दिसतो.

१ ते २ ब्रेडचे स्लाईस , पाणी घालुन मिक्सरमधुन पेस्ट करुन ती पेस्ट धिरड्याच्या पिठात घातल्यास
धिरडी खमंग व कुरकुरीत होतात.:)

खायचे खोबरेल तेल मुंबईत खात्रीशीर कुठून घ्यावे? (की गोव्यातून आणावे?)
तसेच मी कधी कशातच व्हिनेगर वापरलेले नाही आजवर. स्वादासाठी म्हणून कधी कधी व्हिनेगर वापरायला सांगितले असेल तर ते इथे (म्हणजे देशात) कुठल्या ब्रँडचे आणि काय बघून घेतात?
नुसते व्हिनेगर आणि बाल्समिक व्हिनेगर यातला फरक काय?

याची उत्तरे आधी कुठे आली असल्यास लिंक द्या.

खोबरेल तेलाचे काही ब्रँड्स आहेत. साधारणपणे जिथे मँगलोरी किंवा केरळी लोक राहतात तिथे एखादे मँगलोर स्टोअर असतेच. (कुर्ल्याला कमानीला आहे) तिथे मिळते. अगदी केसाला लावायचे तेलही (पॅराशुट वगैरे, जर त्यात काही रसायने नसतील तर ) वापरता येते.

व्हीनीगर मधे सिंथेटीक असते ते वापरले तरी चालते. राईस, अ‍ॅपल, ग्रेप्स, सायडर अश्या अनेक प्रकारात ते मिळते आणि त्याचा स्वाद थोडासा वेगवेगळा असतो. पण थोड्या प्रमाणात वापरायला सिंथेटीक चांगले. त्यातही पाण्यासारखे दिसणारे आणि सोया सॉस सारखे दिसणारे, असे दोन प्रकार आहेत. पाण्यासारखे असते त्याचा वास थोडा कमी असतो.

व्हिनीगर फक्त जेवणातच नव्हे तर, ड्रेनेज साफ करण्यासाठी, केसांना चमक आणण्यासाठी, रंगीत कपड्यांचे रंग चमकदार करण्यासाठी, घरातला धूर घालवण्यासाठी, लोणचे टिकवण्यासाठी, जादूसाठी वापरता येते.

शेवग्याच्या शेंगा आमटीत घलताना आधी त्या तेलात परताव्यार. नंतर मिठाच्या पाण्यात उकडुन
घेउन आमटीत घालाव्यात. लवकर शिजतात आणि अधिक चवदार लागतात. Happy

कोबीची भाजी करताना ,कोबी चिरुन झाल्यावर धूउन मीठ लावुन ठेवावे. त्यामुळे कोबी पटकन
शिजतो आणि उग्र वास येत नाही.

गुलाबजामचा पाक आहे. त्याच काय करता येइल?
>>>>>>>>>>गोड पुरी , गोड चपाती
परत गुलाब जाम, रस्सगुल्ल्या साठी पाक वापरता येईल, परठा करताना आगदी ठोदा पाक घालायचा.. तेला एवजी,
चहा मधे टकता येईल Wink

काजु बदाम पेस्ट कशी टीकवावी??

अगं पाकात लिंबू पिळून थोडा गरम कर. थोडी वेलचीची पूड घाल. ताटलीत पोळी पसर, त्यावर थोडा सुधारस ओत. गुंडाळी कर आणि खात बस.

हो घालतात आणि मस्त लागतं Happy पण ते नालासाठी घोडा आणल्यासारखं होईल म्हणून वेलचीवर भागवावं असं वाटलं Proud

अक्के Lol

मला सुधारस प्रकार कधीच आवडला नाही... मी गुलाबजामचा पाक तसाच पोळीला लावुन, नुसताच चमच्या चमच्याने खाऊन संपवते. त्याला एक जो मस्त गुलाबजामुनी खरपूस वास येतो तो मला खुप आवडतो Happy

मंजुडी, थोड्या हलकेच वाफवुन बघ.
नाहीतर सरळ मिक्सरमधुन काढ आणि दूध घालुन खीर कर नाहीतर पोळीत सारण म्हनून घाल... (हा स्वानुभव Proud )

मंजे, मी पण गेल्या आठवड्यात केल्या. माझ्या जाम ठिसूळ झाल्या. अलगद उचलून खाऊन संपवल्या. मी वरुन लावायची सुक्या खोबर्‍याची पावडर आतच घातल्याने असं झालं.

तुझ्या वड्या फोडता येतायत का बत्त्याने? त्याचा भुगा करता आला तर थोडा डिंक तळून त्यात घातला आणि सुकं खोबरं/खारकेची पूड व साजूक तूप घालून लाडू होतील का?

आम्ही सुधारसात पिकलेलं केळं आणि मे महिन्यात हापूसच्या अंब्याच्या फोडी घालतो.
माझी मोठी बहिण सई माझ्या प्रत्येक वाढदिवसाला सुधारस करून मला जेवायला बोलवते. Happy

Pages