युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रीज साफ कर म्हणजे त्यातले सगळे सामान बाहेर काढ असे म्हणायचे आहे का ? कारण फ्रिज स्वच्छच आहे Happy हा वास कांदा आत चिरुन ठेवल्याठेवल्या लागतो. दोन-तीन दिवसांनी कमी होतो / जातो. कांदा संपला की फ्रीजला अजिबात वास येत नाही ( त्यासाठी ती डबी आहेच. त्यात बहुतेक बेकिंग सोडाच आहे. )
दिनेशदा, कच्चा कांदाच हवा आहे. पटकन पोहे, उपम्यात घालायला किंवा भाज्या / उसळींवर कच्चा घ्यायला. तसंही एक कांदा एकावेळी संपत नाहीच. चिरुन ठेवला की हवा तितका घेता येतो. त्यामुळे असा चिरुन ठेवते.
लिंबं, सोडा आणि मीठ ह्या तिन्हीचा उपाय करुन बघते. खडे-मीठ नाहीये आत्ता घरात. साधे मीठ ठेवून बघते. Happy

कांद्याला वास येतो तो त्यातल्या गंधकाच्या संयूगाने. कापल्यावर त्याच्या पेशीतून तो मुक्त होतो आणि हवेच्या उष्णतेमूळे त्याची वाफ होते.
कांदा कापण्यापुर्वी निदान अर्धा तास तरी अख्खाच फ्रिजमधे ठेवायचा, असा कांदा कापताना वास येत नाही, कि डोळे झोंबत नाहीत. असाच कांदा कापून, मग फ्रीजमधे ठेवला तर चांगले. पण मधे मधे लाईट गेली, वा ते भांडे बाहेर काढून बरच वेळ ठेवले आणि मग परत आत तरी वास यायला लागेल.

कांदा चिरुन जास्तवेळ ठेऊ नये. असा कापुन ठेवलेला कांदा अपायकारक असतो. फ्रिजमधे ठेवला तरीही. मध्यंतरी मी इथे एक लिंक देखिल टाकली होती. सापडली तर परत टाकते.

कांदे आणतानाच लहान साईजचे आणायचे म्हणजे एका वेळेस एकच कांदा संपवता येइल. आणि उरलेला कांदा एकतर शिजवुन ठेवावा किंवा सरळ टाकुन द्यावा.

एका वेळी एक कांदा संपत नसेल तर त्याची साल न काढता तो अर्धा चिरणे. जितका लागतो तितका बारीक चिरून घेणे. उर्वरित अर्धा भाग (सालीसकटचा) झिपलॉकमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवता येतो. जास्त दिवस कांदा कच्च्या स्वरूपात फ्रीजमध्ये ठेवू नये यास अनुमोदन. त्या उरलेल्या कांद्यासाठी तब्येतीशी का खेळायचे?

असा कापुन ठेवलेला कांदा अपायकारक असतो. >>> अरे बापरे, असे पण आहे का ! मला वाटले होते कुठल्याही भाज्या चिरल्यावर जसा होतो तसा जीवनसत्वांचा नाश होत असेल.
हर्षदा, फ्रीझरमध्ये ठेवायची कल्पना चांगली आहे. फ्रोझन सेक्शनमध्ये चिरलेला कांदा मिळतो हे पाहिले होते तरी कधी हे डोक्यात आले नाही. धन्यवाद Happy
सिंडी, अकु ... झिपलॉक आणि फॉईलमध्ये ठेवून बघते.
लाजो, मध्ये तू कांद्याचे चार भाग करुन फ्रीजमध्ये ठेवले तर चालतील असे कुठेतरी लिहिले होतेस का ? बारीक चिरुन ठेवण्यापेक्षा तितपत तरी ठेवता येईल. कांदा चिरायचं खरंच जीवावर येतं म्हणून मग ही पूर्वतयारी. बाकी मी अशा भाज्या चिरुन ठेवत नाही शक्यतो. Sad

योडी, साधं मीठ बशीत ठेवून ठेवलंय फ्रीजमध्ये. वास थोडा कमी झालाय असं वाटतंय. धन्यवाद Happy

लाजो, मध्ये तू कांद्याचे चार भाग करुन फ्रीजमध्ये ठेवले तर चालतील असे कुठेतरी लिहिले होतेस का ?<<< नो नो नो... ती मी नसावी Happy

मी कधीही कांदा कापुन ठेवत नाही. सोयीच असत कबुल आहे पण तब्येतीला अपाय होण्यापेक्षा २ मिनीटं वेळ जास्त लागलेला परवडला. इन्फॅक्ट कांदा चिरल्या चिरल्या वापरावा... कापुन ठेवलाय मग भाजी चिरली मग फोडणी केली मग अर्धा तास आधी चिरलेला कांदा त्यात टाकला...असेही करु नये. मी शोधतेच ते आर्टीकल आणि पोस्टते इथे १-२ दिवसात.

बटाट्या बद्दल पण सिमीलर लॉजिक वाचलय की बटाटा कापुन जास्त वेळ ठेऊ नये. उकडलेला बटाटाही फ्रिज मधे ठेवला तर २ दिवसाच्या आत संपवावा की अस काहितरी.

लाजो, आता बटाट्याबद्दल विचार बदललेत. पुर्वी विळीवर बटाट्याची पातळ साल काढणे म्हणजे कौशल्याचा मापदंड होता. मी तर बटाटा कापून धूणे याला पण विरोध करीन. त्यातल्या स्टार्चमुळेच तर रस्सा दाट व्हायला मदत होते.
फक्त कोंब आले असतील तर ते काढावेत. एखादा भाग हिरवा झाला तरी तो न वापरणेच चांगले.

बरोबर दिनेशदा Happy

इथेही बटट्याची सालं खुप पातळं असतात. बेक्ड पोटॅटो, पोर्टॅटो सॅलड साठी बटाटे वापरताना मीही सालं काढत नाही. फक्त आपल्या पद्धतीच्या भाज्या करताना मात्र सलम काढते. पण काचर्‍या करताना ठेवते सालं Happy इथे बटाट्याच्या ही किमान ८-१० व्हरायटीज मिळतात... बेबी पोटॅटोज पासुन ते जाम्भळ्या रंगाच्या सालांचे बटाटे, लांबुळके बटाटे.. एक ना दोन Happy

हो दिनेशदा.

इथेही बटट्याची सालं खुप पातळं असतात. बेक्ड पोटॅटो, पोर्टॅटो सॅलड साठी बटाटे वापरताना मीही सालं काढत नाही. फक्त आपल्या पद्धतीच्या भाज्या करताना मात्र सलम काढते. पण काचर्‍या करताना ठेवते सालं Happy इथे बटाट्याच्या ही किमान ८-१० व्हरायटीज मिळतात... बेबी पोटॅटोज पासुन ते जाम्भळ्या रंगाच्या सालांचे बटाटे, लांबुळके बटाटे.. एक ना दोन Happy

हो... मला तर कधी कधी ईतक गोंघळायला होत... Sad नक्कि कुठले घेवु... ब्रीटिश बटाटे, बेबि बटाटे, न्यु बटाटे, ओल्ड बटाटे....

दीपा,
आपल्या भारतीय पदार्थांसाठी जूनेच बटाटे चांगले.
(बटाट्याची साले कि भाजल्यावर ज्या जखमा होतात त्याच्या ड्रेसिंगसाठी वापरतात.)

बटाट्याची सालं शक्य तेव्हा काढावीच. बटाटे, वांगी, टोमॅटो या भाज्यांमधे सोलॅनिन (solanine) नावाचं द्रव्य असतं. ते एका विशिष्ट पातळीवर खाल्ल्यास विषारी आणि म्हणूनच हानिकारक असतं. प्रत्येकाचा सोलॅनिन टॉलरन्स वेगळा असला तरी बटाट्याच्या सालीत किंवा सालीलगत याचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्यामुळे साल काढून बटाटे खाणं चांगलं असं संशोधन आहे. बटाटे उजेडात ठेवले की हरितद्रव्य तयार व्हायला लागल्यामुळे हिरवे होतात. हरितद्रव्य नुकसान देणारं नसलं तरी त्याबरोबरच तयार होत जाणारं सोलॅनिन मात्र त्रासदायक ठरू शकतं. म्हणून बटाटे झाकून, अंधारात साठवावे.

(एवढं लिहून आजचा माझा शहाणापणाचा डोज संपवते. )

इथे हॅलोविन जवळ आल्यामुळे मी भोपळ्याच्या/स्क्वाअ‍ॅश्च्या रेसिपीज करत आहे सध्या. सगळ्या प्रकारच्या squash साठी त्याची साल काढणे कंटाळवाणे काम आहे. त्यासाठी काही टीपा आहेत का?
मी butternut squash ओव्हन मधे ठेवून भाजून घेते मग त्याचा गर सहज निघतो.
बाकीच्या प्रकारांची युक्ती सुचवा ना.

बटाट्याची सालं शक्य तेव्हा काढावीच>> मृ, मालती कारवारकराच्या पुस्तकात दिलय की सालीजवळ सगळ्यात जास्त जीवनसत्त्वं असतात, नविन् संशोधनानुसारते चुकीचे आहे का? तसंच वान्गी व टोमॅटोची पण सालं काढूनच वापरावे का?

अगो, कच्चा कांदा फ्रीजमध्ये टिकणे/ तो अपायकारक असणे - नसणे या पेक्षा जर तुला वाळवलेला कांदा तयार पाकिटात विकत मिळत असेल तर तसाही वापरून बघ. चव निश्चितच वेगळी लागेल. पण वेळ + श्रम + फ्रीजचा वास वाचतील.

बटाट्याची सालं शक्य तेव्हा काढावीच>> मृ, मालती कारवारकराच्या पुस्तकात दिलय की सालीजवळ सगळ्यात जास्त जीवनसत्त्वं असतात, नविन् संशोधनानुसारते चुकीचे आहे का? तसंच वान्गी व टोमॅटोची पण सालं काढूनच वापरावे का?

नंदिनी, याबद्दल जास्त माहितीसाठी गोळा करावी लागेल. चांगल्या जर्नल्सच्या चकटफू आर्टिकल्सना अ‍ॅक्सेस नाही. पण ऑन- लाइन काही मिळाली तर नक्की सांगेन.

तळताना सोलॅनिन मूळ रुपात उरत नाही. म्हणून तळलेला बटाटा सालीसगट चालतो. Happy असं वाचल्याचं आठवतं. पण भाज्यांमधे, बेक करताना असं होत नाही. लहान मुलांना शक्यतोवर साल देऊ नये. (सालीलगतची जीवनसत्त्व दुसर्‍या कुठल्या पदार्थातून देता येतील.)

टोमॅटो आणि वांगी बर्‍याच जणांना सालं काढून खाताना बघितलंय.

पण हे धिंगाणे वाचल्यावर, 'आपल्या आधीच्या पिढ्या सगळी सालं पचवून उत्तम जगल्या, आता याला फॅड म्हणायचं की आणखी काही', असाही प्रश्न पडतो.

कच्च्या कांद्याची माहिती कुठे मिळाली? इथे तर म्हणतात, फ्रीजमधे ठेवला तरी चालतो. अमेरिकेत मिळणारे कांदे जंबो आकाराचे असतात, त्यामुळे एकावेळेस एक संपवणे कठीण असते, म्हणून खरा प्रश्न येतो.

मी ही शोधून पाहिले होते पण नाही सापडले कांदा कापून ठेवण्याबाबत काही. लाजो, लिंक देशील का शोधून. मॄण्मयी, मी ही बटाट्याच्या सालीत सत्व असते तेव्हा जमेल तेव्हा जरुर खावे असे वाचले होते. माझ्या मागच्या एका पोस्टमध्ये लिहिलेलाच मुद्दा येतो परतपरत Happy
अकु, वाळवलेला कांदा नाही पाहिला कुठे. तळलेला मिळतो. बिर्याणी, पुलावावर छान लागतो. पण रोज तळलेला कांदा खाण्यापेक्षा फ्रीजमध्ये चिरुन ठेवून खाल्लेला कधीही परवडला Wink

पुरण फिक्क झाल आहे. काय करता येईल? प्लिज सांगा . खुप केल आहे. इथल्या साखरेचा अंदाज आला नाही. मी अर्धा गुळ अर्धी साखर टाकली.

झी,पुरणात तिथली साखर मिक्स कर..चव घे..गोड झाले असेल तर हे मिश्रण मावे त ठेवुन एक चटका दे..म्हणजे १-१ मिनिटाने उघडुन चमच्याने ढवळ..थोडे घट्टसर झाले कि पोळीला योग्य पुरण तयारहोईल..त्यात वेलची-जायफळ पुड घाल

धनश्री, भोपळा किसताना सहज साल वेगळी राहते. मोठे तूकडे करुन उकडला तरी आतला गर खरवडून साल वेगळी करता येते. फोडी करुन भाजी करायची असेल तर साल ठेवलेलीच चांगली, नाहीतर फोडी गळून जातात. भोपळा म्हणून बटरनट वापरायचा असेल तर मात्र साल आवर्जून काढावी लागेल (त्याच्या सालीची अ‍ॅलर्जी येऊ शकते) त्यासाठी मोठे तूकडे करुन चाकूने किंवा पीलरने साल काढायची.

ह्ही स्वयंपाकातली युक्ती नाहीये पण बर्‍याचदा चांदीच्या भांड्यांच्या चमकदारपणा बद्दल बोलले जाते त्याविषयी.
चांदीची भांडि चमकवण्यासाठी सिल्वो हे मस्त सोल्यूशन आहे. वास वगैरे नाहीये अन हातांची जळजळ पण नाही होत. पॉलिश आहे एक प्रकारचं. कापसाच्या सहाय्याने लावायचं.
तसंच पितळेची भांडी चमकवण्यासाठी ब्रासो आहे. Happy

आता एक प्रश्न -
लसूण स्वयंपाकात वापरताना कधी चिरुन, कधी कुटून, कधी किसून अन कधी वाटून घालायचा ते कसे ठरवायचे ? म्हणजे कश्या प्रकारच्या स्वादासाठी कश्या स्वरुपात वापरायचा ? मी आपल्या नेहेमीच्या स्वैपाकात बारीक चिरुनच वापरते अन वाटणांमध्ये वाटून.

Pages