निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार इकडच्या सगळ्या निसर्गप्रेमींना....मी पद्मजा. मायबोलीवर नवीनच आहे. पण थोडा आधी पासून इकडचे लेख, गप्पा वाचल्या आहेत....
या निसर्गाच्या गप्पा पण...नकळत निसर्गाबद्दल आवड निर्माण झालीये.....मला पण तुमच्या मध्ये सहभागी व्यायला आवडेल...मी पण इकडे आलं तर चालेल?

पद्मजा हे काय विचारणं झालं का ?
इथे सगळ्यांचेच स्वागत आहे.

निकिता, मिरच्या येत नाहीत तोपर्यंत पानाचे कौतूक. एकदा मिरच्या लागल्या कि पानांना कुणी विचारत नाही.

पानामागून (कानामागून नाही) आली आणि तिखट झाली, म्हणतात ते काय ऊगीच ?

निकिता,
टोमॅटोची रोपे लहान असतील तर टॉप्सि टर्व्ही चा प्रयोग करता येईल. यात बाटली उलटी टांगून त्यात खाली रोप लावायचे (झाकणाला भोक पाडून) ते अर्थातच उलटे वाढते पण जास्त जोमदार वाढते.
या नावाने सर्च केल्यास नेटवर माहिती मिळेल.

Happy

धन्यवाद दिनेशदा.....खूपच छान वाटतंय...आता मला पण जरा माझ्या शंका विचारता येतील. आणि तुमच्या सारखे जाणकार असताना त्यांचं निरसन होईल..यात काही वादच नाही...

जिप्सी कासच्या पठारचे फोटो कुठे आहेत ? मला जरा मेल करुन रुट आणि सध्याची फुलांची परिस्थिती सांगशील का ? म्हणजे मला शनिवारी जायची तयारी करता येईल. उरण वरुन किती तास लागतील ?

धन्यवाद जिप्सी....तुम्ही अपलोड केलेले सगळेच फोटो उत्तम असतात..खूपच छान...

हल्ली रस्त्याने जाताना लाल भडक रंगाची मोठ्ठी फुले असलेलं एक झाड दिसायला लागलाय..
त्याचं नाव जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे. फोटो काढता आला की इकडे टाकेनच (शंकांना सुरवात Wink ).

पद्मजा ते स्पॅथोडीया / पचोडिया / युगांडा फ्लेम ट्री / स्क्वीर्ट ट्रि असणार. या नावाने इथे सर्च केले तर अधिक माहिती, मायबोलीवरच मिळेल.

हो दिनेशदा.....ते बहुदा स्पॅथोडीयाच असाव.... इकडे निसर्गाच्या गप्पा-१ मधेच मिळालं..फोटो सहित...
छानच...:)

साधना,
वनोषधीबद्दल तुमचा अभ्यास नक्कीच आहे, १०००% अनुमोदन !
Happy

पद्मजा,
आपलं या पानावर स्वागत आहे.
Happy

माझं अमांडा आणि सदाफुली बारीक उंच वाढताहेत. आणि खूप खाली वाकली आहेत. बरं फांद्याही इतक्या असंख्य आल्या आहेत की कुठे बांधायचे तेच कळत नाही. सदाफुलीच्या फांद्या कटिंग करू का?
अमांडाच्या फांद्या इतक्या सुंदर आहेत की कटिंगला मन होत नाहीत आणि त्याला कळ्याही आहेत.
सुचवा.

मानुषी दोन्ही झाडे आटोपशीरच ठेवावी लागतील. आधी त्यांनी किती जागा व्यापायची त्याचे नियोजन करुन अनावश्यक पसारा काढायलाच हवा (अमांडा साधारण कुंपणच्या भिंतीजवळ लावतात, म्हणजे सर्व पसारा आणि फुले बाहेरच्या बाजूला राहतात.) कळ्या काय, येतीलच परत.

ओके दिनेशदा(ठांकू!)मग उद्याच फांद्या कापते. सदाफुली त्यामानाने लहान आहे. पण अमांडा अतीच वेगात वाढतय. आठी दिशाना फांद्या फुटल्यात. आणि हे सिटाउटमधे आहे तर वहिवाटीच्या रस्त्यात येतात या फांद्या!

काल शेजारच्यांच्या तांबू गाईला एक गोंडस पिल्लू झालंय. बहुतेक मिक्स रंग असावा. अंधारात नीट दिसलं नाही. आणि त्याची आई इकडे तिकडे फिरत असते. त्याला दूध पाजायला रोज संध्याकाळी येते. तशी ती आली होती....मी पिल्लू बघायला गेले तेव्हा. खूप मस्त वाटलं!
अरे कुठे आहात सगळे आँ?

मानुषी - त्या गोंडस पिल्लाचा फोटो टाका ना प्लीज...., तसे म्हणाल तर सर्व प्राण्यांची पिल्ले अगदी गोंडसच असतात.....

सध्या आमच्या झुंबरात २ बुलबुलची गोंडस पिले आहेत. बहुतेक आज किंवा उद्या ते घरट्यातुन खाली येतीत. त्यांचे आई बाबा सारखे त्यांना काहीतरी खाऊ घेउन येतात आणि चोचीत भरवत असतात.

हो शशांक .. मी काल raatree गेले होते पहायला. आता आज फोटो काढीन इथे टाकायला.

मानुषी होना.

मानुषी माझ्या माहेरी पुर्वी म्हशिंचा तबेला होता. तेंव्हा म्हशींनी बाळ घातल की मी त्या बाळांच्या सोबत खेळायचे. ते जेंव्हा उठत तेंव्हा पहिला दुध प्यायला जात आणि पिउन त्याला तरतरी आली की लगेच इकडे तिकडे धावायला लागत. हया वासरांबरोबर मी पकडापकडी खेळायचे. वासरू माझ्यासमोर जोरात धावत येउन उभ रहायच. सुरुवातीला वासरू जोरात धावत आपल्याकडे येतय हे पाहताना भिती वाटायची पण नंतर कळल की ते येउन आपल्यासमोर उभ राहत. धन्स जुन्या आठवणी जाग्या केल्यास.

नाही रे सगळा बोंबला (बोंबील नाही) झाला Lol अरे आमच्या सोबत कंपनी नाही कोण आणि उद्या निघालो तरी २ च्या नंतर त्यामुळे सगळी धावपळ दगदग. पण रानफुले मात्र मी पाहणार, फोटो काढणार ती आमच्या उरणची. माझ्या ऑफिसच्या दिशेने खुप फुले फुलली आहेत. रविवारी मी तिथे फोटो काढायला जाणार आहे.

जिप्स्या जास्त टुकटुकु नकोस. तुझे दिवस लांब नाहीत अडकण्याचे. Lol
आणि आमच्याइथे एवढी सुंदर फुले फुलतात ना आणि वेगळी ती पाहून मीच तुला सोमवारी टुकटूक करणार आहे.

हा एक नमुना.

Ranful.JPG

Pages