निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
सगळ्या फुलपाखरांच्या अळ्या अचानक आल्या होत्या तशा अचानक गायब. आणि लिंबाला नवी पालवी फुटतेय..
एकच कोश झाला होता तो पण गळुन पडला :-(..

श्रिकांत, दिनेशदा सडा तर असतोच. इतके हार नाही करु शकत. अगदी मोठी टोपली भरुन निघेल एवढी फुले सध्या पडताहेत. मी ह्यावर एक लेख लिहिला आहे. काही दिवसांत प्रकाशित करेन.

निकिता, पक्ष्यांनी खाल्ल्या त्या. वाईट वाटते पण निसर्गाचे कायदे वेगळे असतात.

अमि,
भारतात नाही पण सिंगापूरला बघितला होता मी. तिथे सेंट गार्डन म्हणून एक भाग आहे तिथे सर्व सुगंधी फुलांची झाडे लावलीत.

जागू,
वाट बघतोय लेखाची. (इतकी सगळी उस्तवार करुन, या बाईला सगळ्याला वेळ कसा मिळतो कुणास ठाऊक ?)

जागू प्राजक्ताचा फोटो सुंदर. तू सगळे तुझे सुगंधी फुलांचे फोटो एकत्र करून त्या जिप्शासारखे एक फिचर कर. मस्त सुगंधी लेख होऊन जाईल.

अकोल्याला लहानपणी आम्ही पारिजातकाच्या खाली चादर बांधून ठेवायचो. सकाळी सकाळी ती चादर फुलांनी भरून आधीच गेली नसली तर झाड थोडेसे हलवायचे. अन मग गणपती महालक्ष्म्यां करता हार करणे सुरु.!!

शुभांगी, तो कापसाचा फोटो पाहिल्यावर असे वाटले की पाखरांची घरटीच वरच्या बाजूने टिपली आहेत. त्यातल्या बिया अंड्यांसारख्या दिसल्या. जागू, प्राजक्ताचा सडा मस्तच!

Shrikant to prajaktacha paus mi ajun padate.

Sasa, sarika, Gajanan, Manushi Thanks.

are mala koni sanga mala pratisad Marathit ka deta yet nahit ? varacha barach nahi disat.

हे फोटो माझा मित्र नरेश याने अंबोलीला काढले आहेत (त्याच्या परवानगीनेच इथे पोस्ट करत आहे :-)).
मला हे फोटो खुपच आवडले. बॅकग्राउंडला संपूर्ण धुके आहेत. Happy
या फुलांची नावे माहित आहे का कुणाला?
दिनेशदा, साधना ???

संशय अशासाठी कि सफेद मुसळी हे "शक्ती"वर्धक औषध आहे आणि अर्थातच महागही. असे असून कावळेसादच्या कड्यावर हि वनस्पति मुबलक आहे.
माझ्या आणि साधनाच्या गप्पा झाल्या होत्या यावर.
कुठे गायब झाली ही साधना ?

.

हाSSSSSSय.... मेरे लिये भी क्या कोई उदास बेकरार है......

फोटो सुंदर आहेत.. दिनेश ही मुसळीच आहे. Chlorophytum malabaricum

आंबोलीबद्दल आपण बोललोय बरेचदा. महादेवगड पॉईंटवर आणि कावळेसाद पॉईंटवर आजही ब-याच दुर्मिळ औषधी वनस्पती मिळतात. गावात ब-याच लोकांना माहितीही आहे वापर कसा करायचा याची पण नविन पिढीला यात रस नाहीय.

http://www.huffingtonpost.com/2011/09/17/pumpkin-found-hanging-in-_0_n_9...

आमच्या इथे आता फॉल सीझन सुरु. परवा पासून प्रचंड थंडी पण वाढली. स्टारबक्स मधे माझी आवडती "pumpkin latte" पण मिळायला सुरवात झाली.

http://www.thenewstribune.com/2011/09/16/1827203/pumpkin-found-hanging-i...

गावात ब-याच लोकांना माहितीही आहे वापर कसा करायचा याची पण नविन पिढीला यात रस नाहीय.
साधना,
दुर्मिळ वनस्पती कुठल्या,त्यांच महत्वही मुळात नविन पिढीला माहित नाही,पण रस मात्र मात्र नसायला काय झालं ?
दिनेशदा आणि तुम्ही लोकांमुळे आमच्यासारख्यांना थोडीफार माहिती मिळते, यातच समाधान मानायच.
जागु,
वाह ! दारासमोर हा असा प्राजक्ताच्या फुलांचा सडा ....नशीबवान आहात तुम्ही !

Happy

दुर्मिळ वनस्पती कुठल्या,त्यांच महत्वही मुळात नविन पिढीला माहित नाही,पण रस मात्र मात्र नसायला काय झालं ?

रस नाही कारण त्यांचे महत्व माहित नाही, डोळ्यांनी ओळखता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे जे मला वाटते ते हे की वनौषधीच्या उपायांना एक शिस्त पाहिजे असते. अमुकच खायचे, अमुकच वेळी खायचे, औषध अमुक गोष्टीबरोबरच घ्यायचे इ.इ. आज ही शिस्त मोडलीय. शिस्तीअभावी वनौषधींचा आधी दिसत असायचा तेवढा प्रभाव आता दिसत नाही आणि त्यामुळे रस राहात नाही.

आजची पिढी आणि बरेचदा मी सुद्धा मला स्वतःलाच खुप गोंधळलेली वाटते. आधीच्या पिढ्यांमध्ये ब-याच गोष्टी 'मोठ्यांनी सांगितले म्हणुन' केल्या जात. आज प्रत्येक गोष्टीत 'हे का करावे?' हा प्रश्न विचारला जातो, ज्याचे उत्तर बरेचदा आपल्याकडे नसते. का करावे हे माहित नसल्यामुळे केले जात नाही. काही काळापुर्वी स्वतःचा वेगळा असा विचार न करता आजुबाजुंच्या सोबतीने आयुष्य पुढे जात असे. आज स्वतःचा वेगळा विचार करण्याइतपत बुद्धी आलीय. त्यामुळे जुने विचार व्यर्थ वाटायला लागलेत पण त्याचबरोबर नविन विचार काय ते मात्र कळत नाहीय. जुन्याची कास सोडलीय पण नविन काय हाती धरावे हे मात्र अजुन सापडले नाहीय अशी काहीतरी विचित्र गोची झालीय. Happy

माझ्या कुंडितल्या मिरचीची पानं आत वळत आहे आणि रंग पण थोडा गडद झालाय?. वाढ कमी झाल्या सारखी वाटते. Sad
काय करु?

निकिता वळत आहेत म्हणजे किड लागल्या सारखी वळत आहेत का ? तसे असेल तर मागच्या गप्पांमध्ये घरगुती औषधाचा उल्लेख आला आहे. ते ट्राय करुन बघ.

साधना माझी तिठा कथा आठवतेय का ?
कधी कधी आपली स्वत:ची वाट स्वत:च निर्माण करायची असते.

निकिता कधी कधी पाने गुंडाळणारी अळी पण असते. एखादया वळलेल्या पानाच्या
आत काय आहे, ते बघायला पाहिजे.

वा! मजा आली या गप्पा वाचून.

निकिता, कीड वगैरे नसेल, पाने जराशीच आत वळत असतील तर याचा अर्थ पाणी, प्रकाश किंवा खत कमी पडते आहे. जर बाहेर वळत असतील तर मात्र कीड आहे आणि त्यावर कीटकनाशकाचा तातडीचा उपाय करायला हवा.

Pages