निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सागरगोट्याची झाडं सायनला साधना विद्यालयापाशी बरीच आहेत. पण मला कधी ते सागरगोटे खाली पडलेले दिसत नाहीत Sad

सागरगोटे खाली पडलेले दिसत नाहीत>>अश्विनी अनुमोदन..
मी सागरगोटे असलेली वेल पाहीली आहे, त्याचे फळ वरुन काटेरी असते..

मी सागरगोटे असलेली वेल पाहीली आहे, त्याचे फळ वरुन काटेरी असते..
>>>>
आमच्या सोसायटी कंपाऊंड्मधे ७-८ झाडेच आहेत. अस वेली आणी झाड अस एकाच प्रकारात असतात का?? Uhoh

माहीत नाही.. आमच्याकडे शेताच्या बांधावर सागरगोट्यांची वेल मी खुपदा पाहीली आहे, धोतर्‍याच्या फळासारखे काटेरी फळ असते, फळ सुकुन उकललं की मग त्यातून सागरगोटे बाहेर येतात..

हो, हो सारीका म्हणते तशीच सागरगोट्याची वेल मी पण पाहिली आहे आणि त्याचे काटे बोचून घेत घेत लहानपणी त्याचे सागरगोटे पण गोळा केलेत इतरांना चटके द्यायला:D Lol :
सारीका तूझ ऑर्कीड एकदम मस्त!

आमच्या समोरच्या बंगल्यातल्या सोनचाफ्याच्या झाडावर एक खारुताई सकाळी आठ वाजल्यापासुन सारखी ओरडतेय. तिच्या ओरड्याने माझी धाकटी लेक खुप अस्वस्थ झाली आहे. तिला वाटतेय कि तिला काहीतरी लागलंय त्यामुळे ति पण रडतेय. पण आता मला पण वाटतयं कि ती बिचारी का ओरडतेय? सांग प्लिज

धन्स उजू..
साक्षी, कदाचीत साप वैगरे दिसला असेल म्हणून ओरडत असेल, किंवा तिची पिल्लं सुरक्षित नसतील.. तु जाऊन बघितलेस तर खुप बरे होईल..

तुला खेळायचे असतील तर आणुन देइन मी >>> हो Blush

साक्षी, खारुताई एकाच जागी बसलीय? खारी नुसत्या पळत असतात. एकाजागी आहे म्हणजे काही संकट (साप किंवा माऊ) उभं असेल किंवा तिला काहीतरी जखम झाली असेल.

सारिका कडील पक्षी - तांबट / पुकपुक्या / coppersmith barbet - तांबट कसे ठोकत असतात तसा -एकसारखा पुक पुक असा आवाज काढतो.
शुभांगी हेमंत - आता सप्टे. मधे मोगरा फुललाय ?, त्याखाली रानजाईचा फोटो आहे.
साक्षी - जवळपास कुठे मांजर वा शिकारी पक्षी आहे का बघा, सामान्यतः खारी सतत ओरडतच असतात - जरा irritating होतं ते.
सगळ्यांनी टाकलेले फोटो मात्र खूप छान आहेत. ऑर्किड भन्नाटच.

सागरगोट्याची वेलच असते पण ती बहुदा एका मोठ्या झाडाला लिपटून असते. त्याची शेंग म्हणजे जठराच्या आकाराची असते आणि भरपूर काटे असतात तिला.
तसे मोगरा, करवंद, गुलाब या प्रकारात झाड आणि वेल असे दोन्ही प्रकार दिसतात.
माझ्या घरच्या खिडकीत खारीने घरटे केले होते. काहीही कारण नसताना उगाचच दिवसभर कलकलाट करत असे. तसे कावळे वगैरे खारीच्या वाटेला जात नाहीत. तिचे दात फारच तीक्ष्ण असतात, म्हणून घाबरत असावेत. आणि तिलाही शेपटी फुगवून फिस्कारायची सवय असते.

जवळपास कुठे मांजर वा शिकारी पक्षी आहे का बघा, सामान्यतः खारी सतत ओरडतच असतात - जरा irritating होतं ते.>>> म्हणुन ओरडतात का खारी? आमच्या येथे सतत त्यांचा राबता असतो पण, मध्यंतरी ४-५ दिवस ओरडत होत्या आता परत नाही. मी ४ वर्षात प्रथमच त्यांचा आवाज ऐकला. कदाचीत आधी ऐकला असेल पण लक्षात नसेल आले. आता लक्ष दिले हा या धाग्याचा परिणाम आहे Happy

मी जी गो-ग्रिन नर्सरीचा धागा टाकला होता त्यात होता सागरगोट्याचा फोटो. परत जाउन पहायला लागेल धाग्यावर. तु जी वर झाड दिली आहेस त्याची आमच्या उरणच्या गार्डनमध्ये भरपुर आहेत.

सारिका तो पक्षीही येतो आमच्याइथे.

मस्त आज बर्‍याच दिवसांनी निसर्ग बहरला ह्या बिबिवर.

ते झाड होय, तो जंगली बदाम. याला लाल हिरवी छान फूले येतात पण भयंकर घाणेरडा वास येतो. दादरला राजा शिवाजी विद्यालयाच्या मागे बरिच आहेत.

शुभांगी,
तुमच्या फोटोवरून ती पांढरी सावर असावी असे वाटतेय. खोड,पाने,फांद्यांची रचना आणि हिरव्या शेंगा सर्व (पांढर्‍या सावरी सारखीच) वाटताहेत. मार्चच्या सुमारास फुलते का झाड? पांढर्‍या सावरीची फुलं जरा आकाराने लहान असतात. त्यामुळे नीट निरखून बघितल्याशिवाय चटकन दिसत नाहीत.
पण उकललेल्या शेंगा मात्र जंगली बदामासारख्या वाटताहेत. त्याची फुलं फार दुर्गंधी असतात.
अवनी, हो ना ते पिवळ्या तबेबुयाचे झाड तोडलंय. फार सुंदर दिसायचं फुलल्यावर.

शुभांगी , तुम्ही फोटो टाकलाय तो सागरगोट्याचा नाही, सागरगोट्याचं छोटं झूडुप असतं. संयुक्त पर्ण असतात ( कढीपत्यासारखी ) पिवळ्या छोट्या फुलांचे गुच्छ असतात - बहुतेक सिझलपिनिया फॅमिली आहे. अन शेंगा बाहेरून काटेरी असतात अन अशा उमलेल्या कधी मी तरी पाहिल्या नाहीत. त्या तोडून आणून चाकूने फोडाव्या लागतात. सागरगोट्याची लागवड करत नाहीत. समुद्रकाठी, ओढ्या / नाल्या काठी आपोआप उगवतात / वाढतात.

मेधा, सागरगोट्याच्या शेंगा (त्यांना शेंगा म्हणवत नाही ) नक्कीच उकलतात. चाकूने त्या उघडणे निसर्गाला अपेक्षित नसावे. मला नलिनीने फोटो पाठवला होता, सापडला तर बघतो.

किती किती ती माहिती येथे. आज बर्‍याच दिवसांनी आले येथे. छानच गप्पा चालल्या आहेत. माझ्यासाठी भरपुर नविन आणि रोचक माहिती.

दिनेशदा,
तुम्ही दिलेल्या दोन्ही लिंक्स बघितल्या. अ प्र ति म...... एवढंच म्हणू शकते.
एका दमात बघणं/वाचणं तर शक्य नाही; पण एकेक भाग/ पान शांतपणे बघीन. खूप खूप धन्यवाद.
सध्या Mutant Planet हा प्रोग्रॅम चालू झालाय. रात्री ८.०० वा ता.(ही IST आहे).मी अजून बघितला नाहीये. उद्या पासून कदाचित जमेल.ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर बघावा.
मागील वर्षी अटेंबरो साहेबांचा Life नावाचा असाच सुंदर प्रोग्रॅम झाला होता.

haay sumangal ag aajach mala tujhi aathavan yet hoti. mhatal barech divas tujha contact nahi. nemaki tujhi post. kashi aahes ? ag tya hirvya chaphyachya biya aaikadun madhe bharapur paus jhala tyat galun kharab jhalya. pan kalaji karu nakos mi ithun konakadun tari gheun tula dein.

majhyakade marathi ka lihita yet nahi ? pratisadacya khalacha barach yet nahi.

आमच्या दारात सध्या प्राजक्ताच्या फुलांची उधळण होउन मस्त सडा पडत आहे. हार करण्यासाठी मन आणि हात शिवशिवतात पण अपुरी वेळ मध्येच आड येते.

वा!! काय मस्त फोटो. मला तर फोटो बघूनच इथे सौदीत सुवास ही आला फुलांचा. अन लहानपणची कविता ही आठवली, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले..... हिंदीत पारिजातकाच्या फुलांना " हरसिंगार अस सुंदर नाव आहे हर= शंकर ज्याने शृंगार करतो असा हरसिंगार!!

सुंदर फोटो जागू. असूदेत कि सडा, नाहीतरी दिवस वर आला कि ती कोमेजणारच.
जागू कुठे डबल प्राजक्त मिळाला तर अवश्य बघ. भरगच्च दिसते फूल.

श्रीकांत, कोरल जास्मिन हे पण नाव छान आहे.

Pages