Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40
निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधना, आज बरेच दिवसांनी
साधना, आज बरेच दिवसांनी दिसतेयस गं माबोवर
जागू, त्या पिल्लाला माणसाचं पिल्लू जवळचं वाटत असेल गं. म्हणून धावत यायचं ते तुझ्यासमोर.
काल शेजारच्यांच्या तांबू
काल शेजारच्यांच्या तांबू गाईला एक गोंडस पिल्लू झालंय. बहुतेक मिक्स रंग असावा

मानुषी माझ्या माहेरी पुर्वी म्हशिंचा तबेला होता. तेंव्हा म्हशींनी बाळ घातल की मी त्या बाळांच्या सोबत खेळायचे
गुळ घालुन बनवलेला होममेड खरवस खायला जीव आसुसलाय
मानुषी,जागु,साधना
हे वाचुन या सगळ्यां आठवणी जाग्या झाल्या आता गावाकडे जाताना नक्की लक्षात ठेऊन् जाईन,
साधना लहानपणी खुप खाल्लय ग
साधना लहानपणी खुप खाल्लय ग खरवस. हल्ली अस दुधच नाही मिळत.
अश्विनी
साधना लहानपणी खुप खाल्लय ग
साधना लहानपणी खुप खाल्लय ग खरवस. हल्ली अस दुधच नाही मिळत.
अतिशय दुर्दैवाने सहमत.. मी मानुषीचे वाचल्यावर लगेच गावी फोन करुन दिवाळीला मी आल्यावर कुठुनतरी चिक मिळेल याची सोय करा असे मागणे घातले.
मानुषी खरवस खाऊन घे आणि आमच्या नावाने एकेक तुकडा बाजुला काढुन ठेव. अनिल, सेम तुलाही. तुला तर नक्कीच मिळेल खरवस खायला.
आनिल खरवस घेउन या आणि एक
आनिल खरवस घेउन या आणि एक निसर्ग जिटीजी ठरवा.
अनिल, मी पुण्यातच आहे.
अनिल, मी पुण्यातच आहे.
प्रथम, मला खरवस मिळाला पाहिजे.

आज आपल्या रुणुझुणू चा वाढदिवस
आज आपल्या रुणुझुणू चा वाढदिवस आहे. हॅपी बड्डे.
पण आपल्यालाच श्रीलंकेमधल्या फुलांचे फोटो मिळणार आहेत. (लवकरच.)
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा रुणुझुणू.
रुणुझुणू, वाढदिवसाच्या
रुणुझुणू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
रुणुझुणू, वाढदिवसाच्या
रुणुझुणू, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
जिप्या मी कास ला जायच्या प्रयत्नात आहे ह्या रविवारी. पण आजून नक्की नाही.
ससा आता जिप्स्या तुला टुकटुक
ससा आता जिप्स्या तुला टुकटुक करेल. मला करुन झाले.
स्-सा, मी पण बहुतेक जाणार आहे
स्-सा, मी पण बहुतेक जाणार आहे ह्या रविवारी कासला.
मला विसरू नका
मला विसरू नका बरका.........खरवसात मलाही वाटा ठेवा!
जागू, तू उरणच्या रानफुलांचे फोटो काढणारेस... आणि इथे दाखवणारेस. तसंच पुण्याच्या जरा बाहेर गेलं ना की अशीच खूप रानफुलं दिसतात.
शांकली तुला जर जमल तर तुही
शांकली तुला जर जमल तर तुही काढ तिथले फोटो. कासच्या पेक्षा वेगळी फुलेही फुलतात आमच्याइथे.
कासला जाताना तेथे खाण्याची
कासला जाताना तेथे खाण्याची वगैरे काय सोय आहे? की घरून डबा घेऊन जावे लागते? स्वत:ची गाडी घेऊन गेल तर रस्त्याची काय अवस्था आहे ? मला कुणीतरी सांगा ना!
प्रज्ञा, कासला खाण्यापिण्याची
प्रज्ञा, कासला खाण्यापिण्याची सोय नाही आहे. पण २२ किमी अंतरावर सातारा शहरात राहण्याची/जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. स्वतःची गाडी असल्यास उत्तम. रस्तापण चांगल्या स्थितीतील आहे. दोन दिवसाचा बेत केल्यास एक दिवस कास पठार/लेक आणि दुसरा दिवस सज्जनगड, ठोसेघर धबधबा आणि चाळकेवाडी पवनचक्क्या अशी भटकंती होऊ शकते.
आता एव्हढी माहिती दिल्यावर माझ्यासाठी सातारी कंदी पेढे आणायला मात्र विसरू नकोस.
जागू, मी लवकरच असे फोटो इथे
जागू, मी लवकरच असे फोटो इथे देणारेय.
रुणुझुणुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
'पुष्पपठार कास' ह्या नावाचं सातारच्या डॉ.संदीप श्रोत्री यांचं पुस्तक आहे त्यात सर्व माहिती फुलांच्या रंगीत फोटो आणि माहितीसकट दिली आहे. ते पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.
शांकली ते पुस्तक मुंबईत मिळेल
शांकली ते पुस्तक मुंबईत मिळेल का ? लोकल लायब्ररीत मिळेल का?
मिळेल.पण लोकल लायब्ररीचं काही
मिळेल.पण लोकल लायब्ररीचं काही सांगू शकत नाही.कारण अशा पुस्तकांचा वाचकवर्ग खूप कमी असतो; त्यामुळे लायब्ररीत ठेवतील याची जरा शंका आहे.
कास पठाराबद्द्ल संपूर्ण माहिती नकाशासकट दिली आहे. शिवाय आजूबाजूला असलेल्या धबधब्यांची माहिती रंगीत फोटोंसकट दिली आहे. मिळालं तर जरूर विकत घे.
जिप्सी धन्स. सातारी कंदी पेढे
जिप्सी धन्स.
सातारी कंदी पेढे तुझ्याकडे कसे पोहोचवायचे ते सांग म्हणजे घरपोच पार्सल पाठवता येइल.
बर शांकली इथल्या लायब्ररित
बर शांकली इथल्या लायब्ररित नाही मिळाल तर दादरच्या आयडीयल मधुन घेईन.
जिप्सी प्रज्ञाला तुझा नको
जिप्सी प्रज्ञाला तुझा नको माझा अॅडरेस दे. तु काय नेहमी जातच असतोस भटकंतीला तुला कधीही मिळतील.
प्रज्ञा, जिप्स्याला पेढ्यांचा
प्रज्ञा, जिप्स्याला पेढ्यांचा फक्त (त्यानेच काढलेला) फोटो पाठवायचा.
शांकली,
या पुस्तकांचे अर्थकारण वेगळेच आहे. रंगीत चित्रे छापली तर किंमत खुप वाढते आणि मराठी लोक ते विकत घेत नाहीत असे दुकानदार सांगतात. डॉ डहाणुकरांची अनेक पुस्तके, गोईण वगैरे चित्रांशिवाय पुर्ण आनंद देऊ शकत नाहीत.
आणि तशी रंगीत छपाईही महागच पडते. त्यापेक्षा सिडींची किंमत (निर्मिति) कमी असते. पण मग त्यासाठी वाचकाकडे कॉम्प्यूटरच हवा.
मीना प्रभूंच्या पुस्तकात जी चित्रे छापतात त्यांच्या कितीतरी पट संखेंने त्यांच्याकडे फोटो असतात, पण त्यांनाही तडजोड करावीच लागते.
मराठीत फक्त पाककलेवरची आणि धार्मिक पुस्तकेच जास्त खपतात, असे वाचले होते.
दिनेशदा, असेल तसंही. पण ह्या
दिनेशदा, असेल तसंही. पण ह्या 'पुष्प पठार कास' या पुस्तकाची किंमत १५०/- रु. इतकी आहे.
सातार्याच्या रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रकाशित झाले आहे त्यामुळे कदाचित किंमत माफक असावी.
पण काही पुस्तकं मात्र खरंच खूप महाग आहेत. प्रत्येक गोष्ट कमर्शियली राबवायची आणि अफाट नफा कमवायचा हेच दिसून येतं.
डॉ.डहाणूकरांसारखा दृष्टीकोन असणार्या व्यक्ती खूप कमी आहेत.
१५० रुपये म्हणजे स्वस्तच
१५० रुपये म्हणजे स्वस्तच म्हणायला हवे.
कासच्या बाबतीत एक आहे, तिथे उमलणारी सगळीच फूले, सगळ्यांनाच दिसतील असे नाही. कारण त्यांचा उमलण्याचा काळ वेगवेगळा असतो.
आता बरेच लोक तिथे जातात, त्यामूळे थोडीशी बंधने हवीत. (तशी आहेत का माहित नाहीत), पण सगळीकडे फिरणे, फुले तोडणे यावर बंधने हवीतच.
आता बरेच लोक तिथे जातात,
आता बरेच लोक तिथे जातात, त्यामूळे थोडीशी बंधने हवीत. (तशी आहेत का माहित नाहीत), पण सगळीकडे फिरणे, फुले तोडणे यावर बंधने हवीतच.>>>>दिनेशदा, आता बंधन आली आहेत. ठराविक जागेच्या पुढे/आत जाण्यास सक्त मनाई आहे. फुले तोडणार्याला शिक्षा आहे. पोलिस आणि वनकर्मचारी असतात तेथे.
दिनेशदा, तुम्हाला पूर्ण
दिनेशदा,
तुम्हाला पूर्ण अनुमोदन. खरंय कासला भेट देणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अभ्यासासाठी म्हणून बर्याच वनस्पती मुळासकट उपटल्या जातात. रानवाटा ही संस्था सातार्यात खूप चांगलं काम करतिये. कास पठारावर फुलांच्या अशा काही जाती आहेत की त्या फक्त तिथेच सापडतात. त्यामुळे त्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा म्हणून युनेस्कोकडे सादर केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर रानवाटाचं काम खूप मोलाचं आहे.
लोकांवर बंधनं असली तरी त्यांनी ती पाळणं महत्वाचं आहे. साधं शांत राहून निरीक्षण (शांत म्हणजे तोंड बंद ठेऊन!) करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.
असो, असं बरंच बरंच आहे. वाचणार्याला बोअर व्हायचं. जिव्हाळ्याचा विषय आला की मी वहावत जाते.
लोकांवर बंधनं असली तरी
लोकांवर बंधनं असली तरी त्यांनी ती पाळणं महत्वाचं आहे. साधं शांत राहून निरीक्षण (शांत म्हणजे तोंड बंद ठेऊन!) करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.>>>>>>अगदी अगदी
वाचणार्याला बोअर व्हायचं. >>>>>बिलकुल नाही
असेच लिहित रहा 
माझ्या किचनमधून मागच्या
माझ्या किचनमधून मागच्या गल्लीतल्यांचा भोपळ्याचा वेल दिसतो. सकाळी सकाळी हाताच्या पंजाएवढी पिवळी धमक फुलं आणि हिरवी गार पानं पाहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फक्त हे फोटो जाळीतून घेतले आहेत. म्हणून स्पष्ट नाहीत. तशी कंपाउंड वॉल फार उंच नाही पण मी इथे भोपळ्याच्या फुलांचे फो़टो काढायला जर का भिंतीवर चढले तर ......मलाच बघायला लोक जमतील. तर असो......!
आता हे गेटजवळचे झाड . नाव
आता हे गेटजवळचे झाड . नाव माहिती नाही.




आणि हे पपईचे झाड. सध्या ब्रेकफास्टला रोज पपई. या वेळच्या छान आहेत.
Pages