निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिला, अगं तो फोटो मोबाइल कॅमेर्‍यातून काढला आहे.. स्पष्ट दिसावा म्हणून फक्त फुलांचा दिला..
आता हा तुझ्यासाठी..
IMG_1244.JPG

<<<<<<<<सारंग सोसायटीपासच्या मुक्तांगण-बाल-रंजन केंद्राच्या आवारातील पिवळ्या तबेबुयाचे झाड तोडलंय..>>>>अगं काय सांगतेस शांकली.....उन्हाळ्यात भर उन्हात दुपारी फक्त ते झाड डोळे भरून बघता यावं
म्हणून वाट वाकडी करून जायचे मी त्या रस्त्यानी .......

जागु, खुप् च सुन्दर.... तुझी बाग खर् च मस्त आहे.. आणि तु सुगर ण पण भारि आहेस.. सग्ळे तुझे

पदाथ मस्त अस् तात....

अगं हे मोठी करमळीचे झाड आहे. निसर्गाच्या गप्पा भाग २ वर बघ. खाली करमळ म्हणुन सर्च कर. भरपुर माहिती आहे. हे झाड स्टार आहे इथले Happy

सारीका तू भाग १ पासुन सगळ वाच. त्यात बरीच माहीती गोळा झाली आहे. मग तु मला म्हणालीस की करमळाच झाड आहे तुझ्याकडे ते हेच ना ? की तू वेगळ कशाला करमळ म्हणालीस ? मी तुला वेळ मिळाल्यावर फोन करेन.

प्रिती धन्स ग.

अनिल आघाडा ही एक औषधी वनस्पति आहे. गणेशाला वहायच्या पत्रीत तिला स्थान
आहे. त्याच्या कोवळ्या पानाची भाजी करतात, काड्यांनी दात घासतात. आणि त्याच्या
बिया पण खाद्य आहेत. श्रावणातल्या पूजेला पण तो लागतो.

शांकली,The Best of Nature ही PBS चॅनेलवरच्या गेल्या 25 वर्षांतील उत्तम क्लींपिंगचे
संकलन आहे. बीबीसीइतका चित्रीकरणाचा दर्जा नसला तरी संकलन उत्तम आहे. बीबीसीवर
न दिसलेली काही अप्रतिम दृष्ये टिपलीत.
http://www.pbs.org/wnet/nature/bestofnature/
इथे थोडेफ़ार वाचायला मिळेल.

तुझ्या सिटाऊटचेही फोटो टाक ना. मला घरी कमळासाठी बागेत छोटे तळे (२*३) करायचेय. मागे गेलेले तेव्हा खड्डा खणुन ठेवलेला. आतापर्यंत बुजलाही असेल. तळे कसे बनवले ते लिही आणि फोटोही टाक म्हणजे कल्पना येईल. तुझ्या लिलीजच्या फोटोत तसे पाहिले तळे थोडेफार.

अरेरे.. माझे काखेत कळसा अन गावाला वळसा झाले, करमळीची खूप फळे मी आणली होती, रोपं करुन लागतील का ते बघायचे होते.. प्रयोग फसला.. Sad
जागू, मी म्हणाले ते फळ वेगळे, गोव्यात मंगेशीच्या मंदीराबाहेर काही बायका तिखट मीठ लावलेली स्टार फ्रुट विकतात, मी त्याला करमळी समजले.. मग स्टार फ्रुट्चे मराठी नाव काय?

तारा फळ Lol

काय गं जागू.. Rofl
आत्तच वाचले, दिनेशदांनी तारा फळालाही छोटी करमळीच म्हटले आहे..
आता मला त्याचे झाड हवे.. तु शोध बरं लवकर.. Happy

ते आंबट तुरट करमळ मस्तच लागतं. ज्युसी असेल तर अजूनच छान.

हे मोठं करमळ पण खातात का? त्याला पण अशाच रेषा असतात का?

माधव, नाव तेच असले तरी कूळ वेगळे आहे.
अश्विनी, मोठ्या करमळीचे फळही खाता येते. आंबट लागते, त्याचे लोणचेही घालतात.

मी वर जी लिंक दिली आहे त्यातले एक घोड्याचे दृष्य बघण्यासाठी काही जणांना त्रास होऊ शकतो, पण त्या संदर्भात निर्माता / दिग्दर्शक जे म्हणाला आहे तेही अवश्य ऐका.

सारीका आमच्याइथल्या नर्सरींमध्ये सापडल तर घेउन ठेवेन तुझ्यासाठी.

अश्विनी तुम जिओ हजार साल साल के दिन हो पचास हजार. वाढदिवसाच्या तुला हर्दिक शुभेच्छा. नंतर फोनतेच.

ठेंकू गं Happy

ह्या सारिकाचा प्रोफाईल फोटो मस्त आहे Happy

माहित आहे हं की या निसर्गाच्या गप्पा नाहीत Proud

अश्विनी मी लावलेली आठीळ काही रुजली नाही. Sad तुला सांगायचे राहूनच गेले होते.
आठीळ (फणसाची बी) कशी लावायची असते? मी वरचे टरफल काढून लावली होती.

माधव टरफल वगैरे नाही काधायचे तशीच लावायची असते ती आठळी. आमच्याइथे तर बाहेर पडली असेल तरी पावसात त्याला लगेच मोड येतो.

सोसायटीच्या आवारात बहरलेले गजग्याचे (सागरगोटे) झाड. लहान बाळाच्या बाळगुटीत असतो गजगा पोट न दुखण्यासाठी.
याची फळे काकडीसारखी हिरवीगार लांब असतात. लहानपणी म्हातारी म्हणुन जो कापुस आपण उडवायचो तसा कापुस या फळांमधुन वाळल्यावर उडतो. खोडाला ही गोलाकार शेंग फुटुन फळे लागतात.

जवळुन

गजग्याची फळे

फळे फुटुन बाहेर आलेले गजगे

या झाडाचे खोड, फांद्या फारच तकलादु असतात वार्‍याच्या अतिवेगानेही कोलमडुन पडतात. झाड अतिषय भराभर वाढते. उंच आणि सरळ वाढते.

आमच्या गॅलरीत फुललेला 'मे फ्लॉवर' दुसरे काही शास्त्रिय नाव असेल तर जाणकार सांगतीलच.

मोगरा फुलला

याचे नाव माहित नाही

ब्रम्हकमळाच्या कळ्याच दिसल्या मला पण कधी फुलले हे कळालेच नाही

Pages