नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 July, 2009 - 09:47
naralibhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.

या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.

जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, मस्त नी सोपी आहे क्रुती! धन्यवाद Happy

स्वाती, आधणाच्या पाण्यातच गूळ विरघळवून घेतला तर चालेल का?

मी याच क्रुतिने केलाय आज नारळिभात...खुप मस्त झालाय, (मी पाणी १/२ वाटि जास्त घातले).
क्रुतीसाठि धन्यवाद!

खरेच नारळीभात एकदम मस्त जमला ! मला देखील पाणी १ वाटी जास्त लागले. मन्जुडी, मी आधणाच्या पाण्यात आधी गुळ वीरघळवून घेतलेला.

माझ्यामते छानच झाला होता<<<
मग नवर्‍याला आवडला नाही का? Wink मला किंचित गोड चालला असता असं वाटलं. पुढच्या वेळी गूळ किंचित जास्त घालेन.

नारळ घालणार नसाल तर साखर तांदुळाच्या पाऊण पट पुरायला हवी. आणि मग पाणीही तांदुळाच्या दुपटीहून थोडं कमीच लागेल.

(ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.)

वर्षा बरे झाले धागा वर काढलास.

मला रेसिपी हवी होती तेव्हा सापडला होता.. पण काल मिलालाच नाही. मी पण नारळीपौर्णिमेला केलेला भात या पध्दतीने. मस्त आणी सोपा Happy

आज केला होता या पद्धतीने नारळीभात. एकदम मस्त आणि सोप्पा. Happy आमच्याकडे गोड जरा जास्त लागतं म्हणून गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं होतं.
स्वाती या पाककृतीसाठी खूप धन्यवाद.

स्वाती, मीपण गेल्या कित्येक वर्षापासुन तुझ्याच पध्दतीने करते. एकदम मस्त होतो हा भात. कधीच बिघडला नाही. Happy

मी कधीच केलेला नाहीये. या क्रुतीने करून बघते सोपी आहे. भात तूप व लवंग यांचा वास किती मस्त येतो ना. भिशीच्या मैत्रीणींसाठी करून नेते.

खवणीने खवतात त्यालाच चव म्हणतात ना ? >>>>>> हो का? Uhoh मला वाटलं काहितरी वेगळंच असेल म्हणून...... शंका समाधानाबद्दल धन्यवाद! Happy

नारळाचा चव ताजा लागेल की फ्रीजरमधला चालेल आधी करुन ठेवलेला ?
सोपा वाटत आहे या कृती ने. एकदम वाचून आत्ताच करुन बघावासा वाटत आहे. Happy

आज घरी जाऊन करतेच!!! नारळीभाताबरोबर दुसरं काय करायचं? म्हणजे फक्त नारळीभातच करायचा का?

कृती वर आणल्याबद्दल धन्यवाद>>>> अनुमोदन. Happy मीही १-२ दिवसांत शोधणारच होते ही कृती. Proud
मवा, बिन्धास्त कर. खूप मस्त होतो या कृतीने. Happy

Pages