नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 July, 2009 - 09:47
naralibhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.

या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.

जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

BLACKCAT व वावे
भात छान दिसतोय.>>>>>> +१.

मी पण याच कृतीने केला काल नारळीभात, फक्त चिमुटभर मीठ टाकलं शिजताना. रंग, वास आणि चव सगळंच अप्रतिम जमून आलं. धन्यवाद स्वाती!

१. या कृतीमध्ये घरातल्या किती व्यक्तींचा सहभाग असावा? त्यातला पुरुषांचा सहभाग किती असावा?
२. फक्त खाण्यात सहभाग असला तर चालेल का?
३. या कृतीसाठी बाईला पूर्वतयारीसाठी किती अवधी मिळाला होता?
४. ही रेस्पी अंघोळ करून सोवळ्याने बनवणे आवश्यक आहे का?
५. तसे असल्यास अंघोळ करून सोवळे नेसावे की सोवळे नेसून अंघोळ करावी? उपप्रश्न- पुण्यात पुरुषांसाठी चांगले मुकटे कुठे मिळतील?
६. बोनस मार्कांसाठी - या प्रश्नांची जी उत्तरं आली असतील तीच का आली असावीत असं तुम्हाला वाटतं? या वर सोळा ओळींचा निभंद लिहा.

मी हल्ली तो कटकटीच्या रेसिपीने ना भा करणं सोडूनच दिलं आहे. ह्याच स्वाती च्या पद्धतीने करते. आजचा फोटो
मी आज नारळाचा चव तर घातला होताच पण थोडस नारळाचं दूध ही घातलं होत पाणी तेवढं कमी करून. ना दु मुळे मस्त क्रिमी झाला होता.
20210822_122925_0.jpg

मघाशीच या रेसिपीची आठवण आली आणि येउन पाहाते तो धागा हजर.
रिव्हिजन केली.
गेले ३-४ वर्षे ही रेसिपी मी वापरते आहे. अप्रतिम भात होतो.
परत परत धन्यवाद Happy

मी आज पहिल्यांदा केला नारळीभात. छान झाला. ही रेसिपी हीट आहे एकदम. गूळ जास्तीच घातला तेव्हा बऱ्यापैकी गोड चव आली. धन्यवाद स्वाती Happy

IMG_20220811_145728299_HDR~2.jpg

केला,खाल्ला.छान झाला होता.
पुढल्या खेपेस नारळाचे दूध घालून चोथा फेकण्यापेक्षा ते vatan तांदळात घालेन.

Best recipe, I used to make in pressure cooker- foolproof as mentioned in so many comments.
This time I used regular heavy bottom pan, used 2 cups of readymade coconut milk ( instead of fresh coconut) , 3 cups of water, 2 cups of jaggery,1 tablespoon sugar ( as organic jaggery powder was less sweet) . unfortunately cannot upload photos
Thank you for the recipe.

थोडेसे बदल करून ही कृती वापरली. निम्मा गुळ आधणाच्या पाण्यात विरघळवला. निम्म्या गुळाला तांदळाबरोबर चटका दिला.
एक वाटी पाणी कमी करुन त्याऐवजी डाबरचे नारळाचे दूध वापरले. पाणी व दूध यांचे एकूण प्रमाण अडिचपट होईल असे पाहिले. मस्त झाला.
फोटो नाही काढला Sad

यंदा दोन वर्षे जुना बासमती तांदूळ वापरला. दुप्पट पाणी घालून शिट्ट्या झाल्यावर आणि प्रेशर निघाल्यावर पाहिले तर अर्धा कच्चा आणि कडकडीत राहिला होता. मग पुन्हा अडीच वाट्या (एकूण साडे चार वाट्या, चौपटीहून जास्त) उकळते पाणी घालून पुन्हा शिट्ट्या काढल्या. मग ठीक झाला. मावशीबाई आधीच म्हणाल्या होत्या की पाणी जास्त लागेल.

मी भात अर्धा शिजवून त्यात गूळ घालतो, पाणी आपोआप सुटते, गरज वाटली तर घालतो

सगळे एकदमच शिजवले तर दाणे कडकडीत होतील अशी भीती वाटते , साखरभात होईल की चिरमुर्याचा लाडू होईल असे वाटते Proud

कुकरच्या भांड्यात म्हणजे आत पाणी घालून त्यात भांडे ठेवून होईल का ? की चिखल होईल ?

काल आयपी मध्ये केला आणि सुंदर झाला.
रेसिपी तंतोतंत फॉलो केली फक्त २ वाट्या तांदूळांना ३ वाट्यापाणी घातलं कारण आयपीत दीडपट पाण्यात भात मऊ मोकळा शिजतो हे माहित होतं.
गूळ ही कमी केला, तो अजुन थोडा कमी सुद्धा चालला असता वाटलं. धन्यवाद!
bc, सगळे एकत्र शिजवून दाणे कडकडीत नाही होत. पाणी मर्यादेत घातलंत तर चिखल ही नाही होणार.

पण direct हिट आणि स्टीम यात चवीत फरक पडतो

लग्ना , देवळातील खीर , साखरभात , शिरा , सांजा मोठ्या भांड्यात चूल , बर्नर यावर शिजवतात , घरात कुकर मध्ये केले तर तशी चव येणारच नाही.

त्या अळूच्या फतफत्याचेही तसेच आहे

हीरा,माझाही 3 वर्षे जुना बासमती तांदूळ होता. पावणेतीन वाट्या तांदळाला 6 वाट्या पाणी आणि जवळ जवळ 2 वाट्या नारळाचा रस घातला.अजून हलकेसे म्हणजे अर्धी वाटी (जे मी भात मऊ होईल म्हणून बाजूला काढले होते.) पाणी चालले असते.पण फार फरक जाणवला नाही.
Blackcat, सगळे एकदम घातले तरी कडकडीत होत नाही.बिंदस्टपणे करा.नेहमीचा जुना तांदूळ असेल तर 1 वाटीला 2.5वाटी गरम पाणी घ्या. छान होतो.प्रेशर pan किंवा कुकरमध्ये डायरेक्ट धागाकर्तीने लिहिल्यानुसार करा.

Pages