नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 July, 2009 - 09:47
naralibhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.

या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.

जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केला केला......

नारळाचं दूध थोडं कमी होतं म्हणून थोडं खोबरंही घातलं. बाहेरच शिजवला. केशरही भरपूर घातला. काजू, बदाम काप आधीच तुपात तळून बाजूला ठेवले आणि मग त्याच तुपात लवंगा घालून बाकी कृतीनुसार भात केला. गूळ घातलाच आणि वर एक चमचा साखरही घातली. बेदाणे, वेलचीपूड देखिल आहेत.

सर्व जिन्नस घालून भात शिजण्यापूर्वी :

नारळीभात तयार आहे :

मी पण केला ग आज.
बाहेरच शिजवला. गुळ घालून प्रथमच केला. comments वाचून गुळ वाढवला , मस्त गोड झालाय !

मस्त झाला. धन्यवाद स्वाती.
मी निम्मे पाणी, निम्मे नारळ दूध वापरले. अप्रतिम झाला आहे चवीला.

मी पण केला काल. एकदम मस्त झाला.
गुळाची पावडर होती ती एक वाटी आणि ती जरा अगोड असल्याने एक वाटी ब्राऊन शुगर वापरली.
कुकर मधेच शिजवला. चार वाट्या पाणि घतल्यावर खीर होईल का काय अशी धाकधुक होत होती. पण मस्त खुटखुटीत भात झाला.

गुळ अगदी ब्राऊन असल्याने फार ब्राऊन रंगाचा झाला भात.
मामीचा भात फार सुरेख दिसतोय.

आणि हो थोडे मीठ घालायला हवे होते. तर नंतर रात्री गरम करताना. पाव वाटी पाण्यात किंचीत मीठ घालुन ते शिंपडून मावे मधे गरम केला. तसा जास्त छान लागला.

एकदम सोपी पाकृ. थँक्यु.

तर..
सालाबादप्रमाणे यावर्षीही नारळीपौर्णिमेला आलेल्या या नारळी भाताच्या साथीची लागण मलाही झाली.
मी अनब्लीच्ड ऑर्गॅनिक गूळ वापरला होता त्यामुळे भाताला मोदकाच्या सारणासारखा मस्तं चॉकलेटी- सोनेरी रंग आला होता.
एकदम मस्तं झाला होता. साखर घाल्ञ्न केलेल्या नारळीभातापेक्षा कैकपटींनी भारी.
गोड न खाणार्‍या आणि कोंकणी डीएनए नसलेल्या चार लोकांनी सुद्धा मिटक्या मारत खाल्ला.

धन्यवाद स्वाती!

image_45.jpg

हे वर्षूला रंगाचा अंदाज येण्यासाठी. मला फोटो काढायला वेळ मिळाला नाही पण लेकाने दुसर्‍या मोबाईलवर काढून ठेवला होता.

हाहाहाहाहा........ हैला... बरोबरे.. लक्षातच नाही आलं ते...

गोड बनवण्यातलं घोर (अ)ज्ञान , एक्स्पोज झालं नं Proud

वॉव..साउंड्स टेंप्टिंग.. साती , अनब्लीच्ड ऑर्गेनिक गूळ कुठे मिळतो??

माझं ही गोडाशी भयंकर वाकडंये..पण हा असा केलेला ना भा खावासा वाटतोय...

>>
गोड बनवण्यातलं घोर (अ)ज्ञान , एक्स्पोज झालं नं>> नाही वर्षू. जर हळद म्हणाली असतीस तर मात्र पितळच उघडं पडलं असतं Proud

माझा पण यावेळी या रेसिपीने मस्त जमला ना.भा.मात्र गुळामुळे केशरी न येता ब्राउनिश रंग आला. नेहमी साखरेचा करते तेव्हा केशरी रंग जमतो बरोबर.
मामी, तुझा गुळामुळे रंग बदलला नाही का ? कोणता गूळ वापरला ? टेक्श्चरही वेगळं वाटतंय - तू नारळापेक्षा नारळ दूध ह मेजर इन्ग्रेडियन्ट घेतलायस म्हणून बहुधा. चांगला लागत असेल फ्लेवर.

मनीमोहोर, हो गं. केशरी नारळीभात झालाय तो.

एकतर मी केशर खरंच भरपूर वापरलंय. गूळही पिवळा होता. रेडिमेड नादु आहे आणि खोबरं (खरंतर नेहमी अजिबातच घालत नाही कारण नारळाच्या दुधातच भात शिजवते) अगदी थोडं आहे. नादु पण तसं कमीच होतं.

टेक्षर वेगळं म्हणजे काय मै? कदाचित ओलावा कमी झाला असेल. भात मोकळा झाला होता. चव मस्त होती मात्र. पुढच्यावेळेस जास्त दूधात शिजवेन.

मीही नाभा फक्त नादुमध्ये शिजवला होता.नादु जरा जास्तच झाले होते.मस्त तुपतुपीत झाला होता.पुढल्यावेळी तूप कमी घालून असाच नादूमधे शिजवणार आणि थोडे खोबरे पण टाकणार.

होऽऽ... मामीचा केशरीभात दिसतोय. पण सुंदर दिसतोय.

सातीचा परफेक्ट नारळीभात दिसतोय. गुळाचा रंग मस्त दिसतोय.

नारळाचं दूध आणि गूळ वापरणार्‍यांनो, गुळामुळे दूध फाटलं नाही ना?
माझं फाटलं :-|
पण मी तसंच दामटून शिजवला भात. पनीर चालतं की नाही पोटाला? Wink
चवीत काही फरक पडला नाही. आणि काही कळ्ळं नाही कोणाला. Proud
गुळात भरपूर केमिकल्स होती वाट्टं.

सातीचा परफेक्ट नारळीभात दिसतोय. >>> हुश्श. माझा तसाच झाला होता. पण ओरिजिनल कसा दिसतो हे माहित नसल्याने मी केलाय तसाच दिसतो असे घरी सांगितले होते Wink

ना.दु चे पनीर ? Wink जसे सोयाचे पनीर म्हणजे तोफु तसे ना.दु.चे पनीर म्हणजे कायतरी नाव ठरवुन फेमस करायला पाहीजे Wink

गुळात भरपूर केमिकल्स होती वाट्टं >> कनक गुळ किंवा २४मंत्राऑर्गॅनिक वा तत्सम वगैरेचा गुळ आण.
कनक गुळ कधीकधी स्टारबझारमधे मिळतो पावडर किंवा खडे असतात . तो मिळाला तर मस्तच.
ऑर्गॅनिक म्हणुन जो मिळतो तो स्टार बझार किंवा हायपरसिटी किंवा बिगबास्केट मधे मिळतो. आणि बहुतेक वेळा पावडर स्वरुपात असतो. जरा अगोड असतो पण. इथे बघ अनेक प्रकार आहेत.
मात्र हे गुळ पुपो वगैरे ला चालतात का ते माहित नाहीत. कुणी ट्रायल बेसवर करुन पहा आणि सांगा.

ही वर्षू. जर हळद म्हणाली असतीस तर मात्र पितळच उघडं पडलं असतं
>>
मी ती हळद असावी असं मनोमन ठरवून टाकलेलं.

काय मस्त नि सोप्पी पा.कृ. आहे. मला पण जमला छान, पहिल्याच प्रयत्नात. मी नारळाचा चव मिक्सरमधे फिरवून घेतला, त्यामुळे अजिबात मधे मधे आला नाही.

सातीचा परफेक्ट नारळीभात दिसतोय. >>> हुश्श. माझा तसाच झाला होता +१

पण एक काकु करायच्या ना.भा तेव्हा थोडासा केशरी, पिवळा नि थोडा पांढरा असं कलर कॉम्बो असायचं ..
म्हणजे तयार भात घेवुन पण करता येतो का? फोडणीच्या भातासारखा?

तयार भात घेवुन पण करता येतो का? फोडणीच्या भातासारखा >>> होय..
ओगले आजींची रेस्पी तशीच आहे..

नारळ + गूळ शिजवुन घ्यायच आणी वरुन भात घालयचा

आणि हा मी केलेला नारळीभात.

नारळाचं अप्रस दूध काढून त्यात तांदळाच्या निम्मा गुळ आणि थोडी साखर मिक्स केले, केशर, वेलची घालून गॅसवर सतत ढवळत घट्ट होऊ दिले.
तुपावर लवंग, वेलची टाकून तांदूळ परतले व दुसर्‍यांदा काढलेल्या ना. दुधात भात शिजवून घेतला. तो गार झाल्यावर मोकळा करुन घेतला व घट्ट झालेला पाक यात मिक्स करुन राइस कूकरमध्ये घालून पूर्ण दूध आटवले.

nb.jpg

सर्वांचे प्रयोग भारी जमलेत. Happy

मला साखरभात म्हणून जो माहिती आहे त्यात नारळ घालत नाहीत. तो एकतर साखरेचा पाक करून त्यात तयार भात घालून करतात किंवा 'बैठा' म्हणजे या रेसिपीसारखा साखर वगैरे तांदुळातच घालून शिजवतात. त्यात केशर घातलं की झाला केशरी भात.

नारळीभातात मी गूळच घालते, साखर अजिबात नाही. आणि मी कधी नादुत शिजवलेला नाही. हा गूळ असल्यामुळे ब्राउन दिसतो. ओगले आज्जींची पद्धत वर कोणीतरी लिहिली आहे, ती पारंपारीक पद्धत झाली.

Pages