इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
देसाई मी मुळात प्रश्नच
देसाई मी मुळात प्रश्नच विचारला नाही, मत मांडल आहे की जनरलाईज नका करू. ९ वी १० ला ट्युशन असतात. कारण पालकांना शिकविता येईल असे नाही.
आणि इथे कुमॉन नाही का? देशी पब्लीक मद्ये १० पैकी ६ लोकांना मी कुमॉन मध्ये टाकताना बघीतले, एक दोघांनी तुझी मुलगी का जात नाही / किती चांगले असते असे लेक्चर दिलेले ऐकले.
)
क्लास मध्ये वाहून जाणारे लोक आहेत, ते इथेही तुम्हाला दाखवेन. इथे माझ्या मुलीच्या मैत्रीनीला कराटे, स्वीमी, पियानो आणि रिंक असे क्लास आहेत.
-
मागच्या वर्षी जुन ते सप्टे मी माझ्या मुलीला भारतातील शाळेत पाठवले, ड्राय रन म्हणून आणि ती घरी आल्यावर कधीही वी / डी एस आय किंवा टिव्ही समोर नव्हती. (रादर ह्यातील टी व्हीच माझ्या घरी नव्हता आणि सलग ३ १/२ तिला त्याची गरज वाटली नाही ) मी जिथे राहतो तिथे मी मुलं बघीतली की जी बाहेरही खेळतात, उलट जेंव्हा सप्टे आला तेंव्हा माझी मुलगी वापस यायला तयार नव्हती कारण असे खेळणे तिला इथे मिळत नाही. रोज तिला ८;३० नंतर बोलावावे लागायचे. (म्हणजे तसे बाहेर खेळणारेही मुल आहेत की
दोन्ही प्रकारचे पालक दोन्ही कडे असतात, त्यामुळे ह्या बाबतीत जनरलाईज करता येईल असे मला वाटत नाही. आणि तुमची पहिली पोस्ट तशी वाटली म्हणून तसे लिहिले ते ही शाळेचा फर्स्ट हॅन्ड अनुभव घेऊन!
वाचतोय.. सवडीनं लिहिन (जुलै
वाचतोय.. सवडीनं लिहिन (जुलै मध्ये अमेरिकेतून परतून २ वर्षं होतिल)
आपण मुलांचा देखील फार बाऊ
आपण मुलांचा देखील फार बाऊ करतो असे मला वाटत आहे. ( अर्थात मुलं ५ वी सहावी ला असतील तर मुव्ह होणे अवघड आहे, पण मी बोलतोय ती मुलं चौथी पर्यंत ) माझे बहुतेक सर्व मित्र आता भारतात परतलेत, काही परतन्याच्या मार्गावर आहेत. सर्वांना १ ते ४ व एकाला ६ वी ची मुलगी आहे. त्यातील ३/४ च्या आतील मुलं भारतात फार लवकर रुळले असे ते सर्व पालक मला सांगतात. उलट आपल्याला रुळायला अवघड आहे असे त्यांचे म्हणने आहे कारण धुळ, धुर, पोलुशन, लाचखोरी, उद्दामपणा, आरामाची सवय, कामाच्या ठिकाणी नसणारा प्रो पणा इ इ त्यामुळे गेल्यावरही का आलो इथे अशी भावना काही जनांच्या मनात दोन एक महिने होती, ती नंतर गेली असे त्यांचे म्हणणे आहे. मुलं मात्र खरच लवकर सेटल होतात कारण खेळायला सवंगडी मिळतात (माझ्या मुलीचे उदा देखील माझ्या समोर आहेच.)
पण ती ६ वी तील मुलगी मात्र अजुनही (सहा महिने) डिस्टर्ब आहे, व्होनेजवर इथे मित्र मैत्रींनींना बोलले की तिला रडू कोसळते. त्यामुळे ३-४ थी पर्यंत मुव्ह झाले कदाचित सोपे असावे.
आम्ही सुद्धा काही
आम्ही सुद्धा काही वर्षांपुर्वी पर्यंत मुलाकरता म्हणून परत जायचं म्हणत होतो. इथल्या शाळा, शिक्षणाची पद्दत बघून आता तो मुद्दा बाद झाला. भारतातल्या शाळांमध्ये मलातरी असं काही स्पेशल दिसलं नाही जेणे करुन इथून आम्ही त्या करता भारतात जाऊ. मला तर इथल्या शाळांच्या पध्दती खुपच आवडल्या.
आता एकच मुद्दा उरला (आमच्या करता तरी) आई-वडिल. ह्यात सुद्धा दोन उप-मुद्दे आहेत. पहिला, आई-वडिलांच्या तब्यती. प्रामाणिकपणे सांगायचं तर काळजी आता पेक्षा १० वर्षांनंतरची आहे.पण मग १० वर्ष थांबलो तर मग मुलगा पुष्कळ मोठा होईल आणि त्याला इथून उठून आता भारतात जायचं हे सांगणं बरोबर वाटत नाही. थोडक्यात जर कायमचे जायचे असेल तर आमच्या हातात थोडीच वर्षं आता उरलीयेत.
)
दुसरा उप मुद्दा, मुलाला आजी-आजोबांचा, इतर सगळ्या गोतावळ्याचा सहवास अगदीच कमी मिळतो. ह्या मुद्द्याकडे बघायचा दॄष्टिकोन कालानुरुप जरा बदललाय आता. त्याला सहवास मिळत नाही हे त्याच्या पेक्षा आम्हाला (बायको आणि मी) आणि आमच्या आई-वडिलांना जास्त बोचतं हे लक्षात यायला लागलय. तो काही मोठा झाल्यावर अचानक एक दिवशी माझ्यापाशी येऊन, मला काही माझ्या आजी-आजोबांचा, नातेवाईंकांचा सहवास मिळाला नाही असा कांगावा करणार ह्याची मला खात्री आहे.
आता, आजी-आजोबांना, इतर नातेवाईकाना मुलाचा सहवास लाभावा ह्या करता इथून सोडून जाण्यात कितपत तथ्य आहे? (ह्याचे उत्तर माहित नाही
उपमुद्दा १ आणि २ ह्याची सांगड घालणारा आणि दोन्हींकरता एकच (जालिम ?) उपाय असलेली एकच गोष्ट म्हणजे ऐपत (माझ्यामते)
.
१०-१५ वर्षांनी आई- वडिलांची पुर्णपणे काळजी घेतील ह्या बेसिस वर जर लोकं ठेवता आली आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याका भारतात जाण्याची (किंवा त्यांना इथे बोलवण्याची) मुभा जर मिळाली (ह्यात वेळ किंवा फ्लेक्सिबिलीटी हा मुद्दा आहेच) तर हा सुवर्ण नाही पण त्याच्या जवळपासचा मध्य ठरु शकतो. आई-वडिल तसे "कूल" आहेत, तुम्हीच येऊन आमचं करा असं त्यांचे म्हणणं आजिबात नाही किंवा त्याही पुढे जाऊन त्यांनी "कायमचे तिकडे राहिलात तरी चालेल, आम्ही आमचं बघून घेऊ" असं उपरोधानी नाही पण अगदी दिलखुलासपणे सांगून टाकलय. तरी आपल्याला काळजी वाटायची ती वाटतेच.
आता बघू काय होतं ते....
केदार छान पोस्टस.. परदेसाई -
केदार छान पोस्टस..

परदेसाई - पोस्ट बघून आधी वाटलं झक्कींची पोस्ट वाचतेय - पुन्हा कन्फर्म केल
क्लास लावण्याविषयी - मी बारावीत फक्त गणिताचा क्लास लावलेला.. (वर्षाची १००० रु फी
) ते पैसे घालवायलाही माझी तयारी नव्हती (+ स्वतःवरचा विश्वास)
त्यावर माझ्या कसिननी मला छान सांगितलं "तू घरी एक तास बसून अभ्यास करणार आहेस का दररोज- . मास्तरला जास्त कळतं म्हणून क्लास नको लावूस.. पण त्यानिमित्तानं तू एक तास बसशिल तरी."
आणि हे मला १००% पटलं..
बुवा, पोस्ट आवडली..
बुवा, पोस्ट आवडली..
बुवा, पोस्ट मस्त.
बुवा, पोस्ट मस्त.
बुवा, शाळेच्या मुद्द्याकरता
बुवा, शाळेच्या मुद्द्याकरता अगदी अगदी. पूर्वी जेव्हा मला मुलं नव्हती, आणि झाल्यावर जेव्हा ती शाळेत नव्हती तोवर मला भारतातल्या शाळा, अभ्यासपद्धती वगैरे प्रचंडच आवडायची पण आता मुलं इथल्या शाळांमध्ये जायला लागल्यावर इथेच जास्त बरं वाटतंय. त्याकरता भारतात जावंसं वाटत नाही.
आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल
आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.
परदेसाई - पोस्ट बघून आधी
परदेसाई - पोस्ट बघून आधी वाटलं झक्कींची पोस्ट वाचतेय << एवढी वैचारिक उंची?..
पियानो, स्विमिंगचे कळले नाही. म्हणजे मला वाटलं की आपण मुलांचा शालेय शिक्षणाला जोड म्हणून लावायच्या क्लासबद्दल बोलतोय. मेरा मिश्टेक हो गया..
माझे आई आणि वडील दोघे शिक्षक.
माझे आई आणि वडील दोघे शिक्षक. माझे वडील म्हणायचे, क्लास लावणे म्हणजे wastage of money, wastage of time and wastage of mind. समजा पैसा आहे आपल्याकडे , नो प्रोब्लेम. वेळ पण आहे (वेळेचे नियोजन करुन). पण wastage of mind हा जो प्रकार आहे तो कोणालाही परवडणारा नाही. याचे चांगले उदाहरण म्हणजे अगदी दुसर्या वर्षाच्या इंजि. मुलांना गणित पाठ करताना बघितले आहे. अजिबात अतिशयोक्ती नाही.
मुंबईत असताना मी खांदेश्वर मध्ये रहात होतो. एकदा खारघर जवळ असलेल्या कॉलेज्मधील एक शिक्षक भेटले. ते एका ट्युशन मध्ये शिकवायला जात होते. तेंव्हा त्यांना तासाला ५०० रु. मिळायचे तर (त्यांचा वर्षाचा पगार त्या क्लास पेक्षा कमी होता). त्यांना मी अगदी चकित होउन विचारले कि इंजि.ची इतकी मुले येतात क्लासला? ते म्हणाले, " ट्युशन हा या सगळ्या मुलांचा मानसिक आधार आहे." यांना अगदी पहिलीपासुन यांच्या पालकांनी spoon feeding ची सवय लावली आहे. एका बॅच मध्ये ४० ते ५० मुले असतात आणि असे बरेच बॅचेस... फी १०००० ते १५००० एका सेमिस्टरची. सगळा सिलॅबस २ महिन्यात शिकवतात. बरेच लोक मित्र जातात म्हणुन जातात. सांगायचा मुद्दा म्हणजे खरोखर शिकण्यासाठी क्लासचा काय उपयोग होतो ते अजुन देखिल माझ्या लक्षात आलेल नाहेय.
कोल्हापुरात अगदी नामांकित ज्यु. कॉलेज मध्ये (१० वी एकदम हाय कट ऑफ अॅडमिशन) सगळे बाहेर क्लासला जातात. मी काही लो़कांना विचारल अरे तु एवढे मार्क मिळवले १० वीत आता क्लास कशाला लावतो, तुझ तु करना अभ्यास. त्याने सांगितलं, सगळेच जातात क्लासला, म्हणुन कॉलेजमध्ये काहि शिकवत नाहीत. इनफॅक्ट मुलं कॉलेजमध्येच येत नाहीत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे देव जाणे.... पण मुलांची सायकॉलॉजी मात्र क्लास लावलाच पाहिजे अशी आहे. शाळा नुसती कुंकवापुरती
( पण या कुंकवासाठी मुले ४-५ किमी प्रवास करतात, बर्यपैकी फी पण भरतात)
शेवटी क्लासला जाणे न जाणे हे खुपच वैयक्तिक मत आहे, पण आपण क्लासला का जातोय या प्रशाचे उत्तर मिळाले तर नक्कि जावे. शाळेत शिकवित नाहित म्हणावे तर शाळा सुधा महागड्या आहेत. तेथे शिकवत नाहित असे तर कसे म्हणावे. शाळेत शिकवलेले समजत नाही म्हणावे तर मग क्लास मध्ये शिकवलेले कसे समजते, हे समजत नाही. बरे एखादा विषय असा असेल तर, क्लासवाल्यांचे पॅकेज (?) स्वस्त पडते म्हणून सगळे विषय घेतले जातात. तेंव्हा मात्र खरेच गंम्मत वाटते.
सगळ्यात महत्वाचे कारण, आई वडीलांना वाटते, आपण काय लक्ष देणार, (आपल्याला काहितरी प्रश्न विचारला आणि उत्तर देता आलं नाही तर, मुलाचे नुकसान होउ नये), त्यापेक्षा क्लास लावा व्हा मो़कळे.
माझ्या मते जेवढ्या लवकरात लवकर आपण मुलांना 'स्वयंपुर्ण' बनवु, तेवढे लवकर त्यांना या रॅट रेस मधुन बाहेर काढु. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना 'कसे शिकायचे' हेच शिकवायला हवे. मग अगदी १० वी १२ वी नंतर देखिल ते कुणावर अवलंबुन रहाणार नाहीत. सध्या माझ्या ८ वर्षाच्या मुलावर प्रयोग सुरु आहेत. त्याबद्दल दुसरीकडे कुठे तरी लिहतो....
असो बरेच विषयांतर झाले.....
डिस्लक्लेमरः क्लास लावुच नका असे काही नाही बरे.. हे अतिशय वैयक्तिक मत आहे (जे बर्याच लोकांना पटत नाही, इथे पण पटेल असे वाटत नाही). वर लिहलेले सगळे चुकिचे पण असु शकते...
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.
हा या बीबीचा विषय नाही पण
हा या बीबीचा विषय नाही पण आई-बाबांनां येतं म्हणून त्यांनींच मुलांनां का बरं शिकवायचं ..
कारणं बरीच असतील जसं की आई-वडील दोघांनांही शिकवण्याची कला अवगत नाही, नोकरी धंद्यामुळे वेळ नाहि वगैरे .. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सोनारानेच कान टोचलेलेच बरे असतात .. तेव्हा ट्युशन, क्लास ला पाठवणं वाईट असं मला वाटत नाही ..
केदार , <<ती घरी आल्यावर
केदार ,
<<ती घरी आल्यावर कधीही वी / डी एस आय किंवा टिव्ही समोर नव्हती. (रादर ह्यातील टी व्हीच माझ्या घरी नव्हता आणि सलग ३ १/२ तिला त्याची गरज वाटली नाही ) मी जिथे राहतो तिथे मी मुलं बघीतली की जी बाहेरही खेळतात, उलट जेंव्हा सप्टे आला तेंव्हा माझी मुलगी वापस यायला तयार नव्हती कारण असे खेळणे तिला इथे मिळत नाही. रोज तिला ८;३० नंतर बोलावावे लागायचे. (म्हणजे तसे बाहेर खेळणारेही मुल आहेत की )>>
<<मुलं मात्र खरच लवकर सेटल होतात कारण खेळायला सवंगडी मिळतात (माझ्या मुलीचे उदा देखील माझ्या समोर आहेच.)>>
या दोन्ही गोष्टींना अनुमोदन. मी ही अलिकडेच एक महिना भारतात राहिले. घरात टिव्ही नव्हताच. पण रोज संध्याकाळी ३ ते साडे तीन तास ग्राउंड मधे तीच्याबरोबर खेळायचे. १तासभर स्विमिंग किंवा पाण्यात आणि उरलेला अडीच तास ग्राउंड. आठ वाजता तीला परत बोलावल्यावर रोज रडारड. आमच्या इथेही खाली खेळणारी मुलं आहेत असे दिसले. तीला भारतातुन परत यायचेच नव्हते कारण इतका भरपुर वेळ खेळायला मिळायचे तीला. शाळा चालु झाल्यावर इतका वेळ खेळायला मिळेल का ते माहीत नाही पण रोज थोडावेळ शिवाय विकांताला तर नक्कीच मिळेल.
असो या बिबीचा विषय वेगळा आहे. पण आम्हालाही वाटतय की लवकर गेलो तर मुलीला सेटल होणे सोपे जाईल.
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.
वैद्यबुवा <<<<<<<<<तो काही
वैद्यबुवा <<<<<<<<<तो काही मोठा झाल्यावर अचानक एक दिवशी माझ्यापाशी येऊन, मला काही माझ्या आजी-आजोबांचा, नातेवाईंकांचा सहवास मिळाला नाही असा कांगावा करणार ह्याची मला खात्री आहे.>>>>>>>>>
अशीच खात्री आम्हालाही होती. पण दोन वर्षापूर्वी माझे सासरे वारले तेव्हा माझा मुलगा (१४ वर्षाचा ) हमसाहमशी रडला होता. म्हणाला तुम्ही इकडे आलात म्हणून मला कुणाचा सहवास नाही मिळाला. इथे तर आपलं कुणीच नाही. बरीच समजूत घालावी लागली होती. अशावेळेस शाळेत बरं चाललय ना वगैरे पण शंका येतात पण तसं काही नव्ह्तं त्याला जे मनापासून वाटलं ते त्याने व्यक्त केलं होतं.
मी शाळेत होतो तेव्हा गावामधे
मी शाळेत होतो तेव्हा गावामधे ५०% पेक्षा जास्त मुलं क्लासला जायची. आता ही टक्केवारी सुजाण, सुशिक्षीत पालकांमुळे कमी झाली असावी असे मला वाटत नाही. मुलांचा घरी अभ्यास घेऊ शकणारे पालक शेकडा ७०/८० टक्के असतात असं मला वाटत नाही (फारफार तर १०%). आई आणि वडिल नोकर्या करून (भरपूर पगार देणार्या नोकर्या भरपूर वेळ कामाचीही अपेक्षा ठेवतात) घरी येऊन मुलाला अभ्यासात मदत करू शकतील असेही मला वाटत नाही. मुंबई/पुण्या सारख्या शहरांमधे भरभरून क्लास वाह्त असतात हे ही मी चुकूनच पाहिल्याने मुलं क्लास शिवाय शिकतात असेही मला वाटत नाही.
मुंबईच्या सोसायट्यांमधे बॅडमिंटन कोर्टात गाड्या पार्क केलेल्या मात्र पाहिल्या आहेत. पार्क नावाला दिसत नाही. रस्त्यावर पाऊल टाकणं कठिण असताना मुलं कुठेतरी पार्कात जाऊ शकतील असं मला वाटत नाही.
Anyway, विषय तो नाहीय. परत जाताना तुम्हाला जमेल/पटेल अश्या ठिकाणी आणि अश्या शिक्षणासाठी जाणे महत्वाचे..
Mohana, mi pahilyandaach
Mohana, mi pahilyandaach aikla asa udaharan. Barober aahe, pudhe mulacha swabhav kasa develop hoto tya pramane tumchya mulala jasa waatla tasa dusrya mulanahi waatu shakata.
Majha aata paryantacha anubhav baghta, maajhe wadil, aai hyanchya barober tyani we'll ghalawla ki tyala tyanchi khup saway hote , lala laagto pan ekda nehmichya routine madhe to parat aalaa ki to khup aathwan kaadhun udaas wagaire disat naahi. Thodkyaat je ithe chalu asta , shaala , camp tyaache mitra, tyaat to ramto.
कुमॉन चे फॅड तर फारच
कुमॉन चे फॅड तर फारच बोकाळलंय. आमच्या इथे (जकार्ता) तर वय वर्ष ५ पासुन इंग्लिश आणि गणितासाठी कुमॉन ला पाठवणारे बरेच देशी लोक आहेत. आणि वर कौतुकाने पाल्याला किती फायदा होतो हेही सांगतात. या वयात क्लास म्ह्णजे निव्वळ सखीने सरी घातली म्ह्णुन मी पण....... असला प्रकार आहे
बुवा, माझ्या मुलाच्या बाबतीत
बुवा, माझ्या मुलाच्या बाबतीत पण सारखाच अनुभव आहे. त्यालाही आजी आजोबांबरोबर रहायला खुप आवडते पण रुटीन मधे आला की पुन्हा नेहेमिसारखा असतो, त्यावरुन आम्ही निष्कर्ष काढ्लाय की त्याला नातेवाईक असले तर आवडतात आणि नसले तर काहि अड्त नाही. आणि मला वाटते तेच बरंय. फार हळवी मुलं असली की बाहेर अॅड्जस्ट होणे कठिण जातं.
हा माझ्या मित्राचा अनुभव : ते
हा माझ्या मित्राचा अनुभव :
ते लोक भारतात परत गेले त्यावेळी त्यांची मुलगी ८/९ वीत होती. औंध / पाषाण भागातील शाळेत प्रवेश मिळाला. तिला काही विषयातले पटकन समजत नसे. म्हणुन माझ्या मित्राने शिक्षिकेला सांगितले की तिला पहिले काही महिने पटकन समजणार नाही तर कृपया लक्ष द्या. शिक्षिकेने सरळ सांगितले की मला प्रत्येकाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. मित्र म्हणाला ठिक आहे, पण मुलगी ज्यावेळी काही प्रश्न विचारेल त्यावेळी थोडे समजाउन सांगा. त्या शिक्षिकेने सांगितले की सरळ सांगितले की वर्गात ६० मुले आहेत , प्रत्येकाने एक-एक प्रश्न विचारला तर शिकवायचे कधी?
नंतर दुसर्या एका शिक्षकाने खाजगी शिकवणी लावायचा सल्ला दिला. मित्राला कामानिमित्त फिरावे लागत होते आणि मित्राच्या बायकोला शिकवणे ही कला अवगत नव्हती (शिकवताना पेशन्स संपुन चिडचिड वगैरे). शिकवणी ह्या प्रकाराविरुद्ध असुनही नाईलाजाने शिकवणी लावली.
कुमॉन काय असते? ९-१० च्या
कुमॉन काय असते?
९-१० च्या सायन्स - गणिताला सोडून क्लास लावायची खरंतर गरज नसते सर्वसामान्य बुद्धीच्या पाल्याला. सेमिइंग्लिश असेल तर आठवी जरा खडतर होते पण ठिके ना दोन टक्के कमी पडले आठवीला तर अशी कोणती जगबुडी होते? अर्थात शिकवणारे निदान बरे तरी हवेत यासाठी. प्रत्येक वर्षी अमुक एक मार्क(म्हणजे ९५% च्या वरच) हवेतच, पहिला नंबर आलाच पाहिजे इत्यादी अट्टाहास मला तरी अनाठायी वाटतो.
इथले अनेक क्लास घोकंपट्टी करून घेणे पलिकडे काहीही करत नाहीत. उदा. खरंत शालेय गणितामधे पाढे, फॉर्म्युले पाठ करणे आणि पद्धती समजावून घेणे आणि सराव यापलिकडे काय गरज पण ६ वी ची मुले गणिते पाठ करताना मी पाह्यलीयेत. अमितने ६ संत्री आणली, रूपाने १० चिकू आणले, सुरेशने ३ फळे खाल्ली तर एकूण किती फळे उरली यात मुलांची नावे, फळांची नावे, फळे च्या ऐवजी इतर काही असे आल्यास या मुलांना गणिताचे उत्तर येत नाही हे पाहून थक्क व्हायला झाले होते. असो.. विषयांतर खूप झाले.
शालेय शिक्षणाचा नक्की उद्देश काय? आपल्या पाल्याला आपण शालेय शिक्षण नक्की कशासाठी देतोय? याचीच उत्तरे मुळातून शोधायची गरज वाटायला लागलीये.
कुमॉन काय असते? >>> प्रॅक्टीस
कुमॉन काय असते?
>>> प्रॅक्टीस करत करत पुढे जाण्याचा क्लास रीडींग आणि मॅथ साठी ..
बॅटल हाइम ऑफ द टायगर मदर
बॅटल हाइम ऑफ द टायगर मदर नावाचे पुस्तक वाचले आहे का? ती बाई चायनीज इमिग्रंट असते व मुलींना पियानो व व्हायोलिन शिकवून पारंगत करण्यासाठी फार मेहनत घेते. पण चीन मध्ये परत जात नाही. खूप इन्स्पायरिंग पुस्तक आहे.
शाळे नंतर ग्रॅड व पीजी शिक्षणासाठी तरी यूएस, युके, सिंगापूरला पर्याय नाही. भारतीय पर्याय आहेत पण तुमच्या मुलांना एक नैसर्गिक प्लस मिळालेला आहे. ते जास्त डिफायनिंग यीअर्स असणार मुलांसाठी. यूके मध्ये पीजी साठी इकनॉमिक्स मध्ये एक वर्षा चा २० लाख खर्च आहे.
हे खर्च तुम्हाला सहज झेपतील जे भारतातील पालकांना जड जातील.
बादवे आता आठवी नववी शिक्षणखर्चासाठी ही बँक लोन मिळते भारतात.
बादवे आता आठवी नववी
बादवे आता आठवी नववी शिक्षणखर्चासाठी ही बँक लोन मिळते भारतात. >> ऑ!!
ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही यातली दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे
ज्यांच्याकडे आहे आणि
ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही यातली दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे <<< खरंय.
वाचतोय..
वाचतोय..
>>> सुरुवातीला सौ. ला जर जड
>>> सुरुवातीला सौ. ला जर जड गेले, पण माझ्या सारख्या नवर्याला तिच्या नातेवाइकांसमोर न्यायचे म्हणजे, त्यापेक्षा, तिनेच त्यांच्यापासून दूर रहाण्याचा प्रचंड स्वार्थत्याग केला.
झक्कीबोवा,
मानलं तुम्हाला. तुमच्या उपरोधिक लिखाणाला तोड नाही. उपरोधिक लिहिणं/बोलणं शिकवायला तुम्ही जर शिकवणी घेणार असाल तर तुमची शिकवणी लावण्याची आपली तयारी आहे.
मानलं तुम्हाला. तुमच्या
मानलं तुम्हाला. तुमच्या उपरोधिक लिखाणाला तोड नाही. उपरोधिक लिहिणं/बोलणं शिकवायला तुम्ही जर शिकवणी घेणार असाल तर तुमची शिकवणी लावण्याची आपली तयारी आहे. >> मी पण.
कधी सुरू करताय? :-p
शाळे नंतर ग्रॅड व पीजी
शाळे नंतर ग्रॅड व पीजी शिक्षणासाठी तरी यूएस, युके, सिंगापूरला पर्याय नाही. >> मामी.. हे जर अजून विस्तारून सांगणार काय? भारतात ग्रॅड आणि पीजी का नाही करू शकत?
Pages