परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशवे, जोरदार अनुमोदन! मी स्वतः इथे शिकलो आहे. नोकरी मिळायची तेव्हा मिलाली पण वेटर, डिशवॉशर, स्टोअर अटेंडंट/क्लर्क ही कामं करुन अंगी स्ट्रीट स्मार्टपणा आला. Happy

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

झक्की, उपरोधीक असले तरी तुमचे हे पोस्ट चुकीचे आहे. भारतात कसे पैसे जास्त मिळतात, तिकडचे लोकंच कसे जास्त कमवतात, लाचलुचपत हे सर्व उपरोधीक मध्ये पण बोअर व्हायला लागले आहे आता. आणि हा एकच बाफ नाही इतर व गप्पांच्या बाफवरही तेच.

इथून तिथे जाणार्‍या सर्वांना भारतात लाचखोरी आहे, कामचुकार लोक आहेत हे माहिती आहे. पण उपयोग नाही कारण इथे वाचणारे / लिहिणारे सर्व लोक लाचखोर नाहीत.

उलट आता तुम्हाला भारतातील लोक म्हणतील मेडिकल इन्शुरंस कशाला १०० रू त डॉक्टर कडे गेलो की काम झाले! किंवा भारतातील मेडिकल टूरिझम का आणि किती वाढला आणी तिथे कोण जाते हे मी तुम्हाला सांगने नकोच. Happy

असो. निदान इथे तरी विषयाला धरून लिहूया.

आणि पगार फक्त आयटीचेच वाढले कारण ते अमेरिकेवर अवलंबून आहेत असा कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. फायनान्स आणि इतर कोअर सेक्टर मध्येही चांगल्या लोकांना चांगलेच पगार आहेत. ते ही आयटी बुम व्हायच्या आधी पासून. १९९९ मध्ये माझ्या बॉसला (जो फायनान्स कंट्रोलर होता) त्याला १८ लाख पगार होता! तर माझ्यासोबत नौकरीचा श्रीगणेशा केला तो आज २२ लाख रु पगार + कंपनीची कार घेतो! माझा भाऊ मॅकेनिकल इंजिनियर आहे, त्याला टिईला असतानाच ५.५० लाखाची महिंद्रा अ‍ॅटोची ऑफर आली! आणि माझ्या काळात इंजिनियर लोकांना ३००० रू महिना देखील कोणी देत नव्हते. एक वो दिन एक आज का दिन!

तस्मात भारत फक्त अमेरिकेवर अवलंबून आहे, पगार इथल्यामुळेच वाढतात असा कोणी समज करून घेऊ नये. चांगले लोक कुठेही चांगलेच असतात!! भारताची ऑरगॅनीक ग्रोथ प्रचंड आहे. आणि करियरच्या संधी इथे नाही तर आता तिथे चांगल्या आहेत. मिड आणि हाय लेवल साठी बाहेर राहिलेले लोक तिथे हवे असतात आणि त्यामूळे अशा लोकांना चांगले पॅकेज मिळतात. आणि वर लिहिल्या सारखे लोक १ लाख रू महिना खर्चाच्या सहज बाता करतात. माझे फायनान्स मधील मित्र ज्या पद्धतीने तिथे राहतात, ते बघून मला अमेरिकेत येऊन आपण नक्की काय अचिव्ह केलं हा प्रश्न खरोखर पडला होता!!

अर्थात मिळवणार्‍या मध्ये व निच्च मध्यमवर्गीयांमध्ये दरी प्रचंड आहे. मध्यमवर्गीय लोक आता नाहीसे होऊन तेच उच्चमध्यमवर्गीय होऊ घातले आहेत. वर काही लोकांनी जितके पगार सांगितले तेवढे भारतात सहज मिळतात. १५ लाख रू तर मोठ्या कंपन्यांमध्ये टिम लिडचा / सिनियर कन्सल्टंटचा पगार आहे, आर्थिक दरी आहेच पण तो ह्या बाफचा विषय नाही. त्यावर दुसरीकडे लिहिता येईल.

अमेरिके मधून MS , Ph.D करणं मला तरी काही गैर नाही वाटत..
हां पण कुणी अगदी अट्टाहास मात्र ठेवू नये
>>> मला हेच म्हणायचं होतं. नेमक्या शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद रुतु.

वेटरचे काम करण्यात काय कमिपणा आहे? >> काहीच नाही.

शुल्लक कामातून कमालीचा प्रोफेशनलपणा शिकायचा असेल तर जरूर एकदा अशी हलकी समजली जाणारी कामे इथे करून बघावीत >> पण मग प्रोफेशनलपणाच शिकायचा असेल तर सरळ ज्या प्रोफशनमधे करियर करायची इच्छा आहे त्याच प्रोफेशनमधली नोकरी का करू नये अमेरिकेत? त्यात ही प्रोफेशनलपणा शिकता येईल.

शुल्लक कामातून कमालीचा प्रोफेशनलपणा शिकायचा असेल तर जरूर एकदा अशी हलकी समजली जाणारी कामे इथे करून बघावीत...<<<
अगदीच पटले.
अमेरिकेतील ग्रॅड स्कूल तुम्हाला तुमच्या विषयाच्या शिक्षणाच्या पेक्षा बरंच काही जास्त आणि गरजेचं शिकवते यात वाद नाही.

केदारशी १००% सहमत!
भारताची ऑरगॅनीक ग्रोथ प्रचंड आहे. आणि करियरच्या संधी इथे नाही तर आता तिथे चांगल्या आहेत. >> अगदी बरोबर.

एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनाच.
इथे आणी तिथे हे प्रत्येकाचे व्यक्तीसापेक्ष टर्मस आहेत. त्यामुळे इथे तिथे लिहिताना कृपया इथे म्हण्जे भारतात कि परदेशात ते लिहाल का? वाचताना फार गोंधळ उड्तो. ( माझातरी )

भारताची ऑरगॅनीक ग्रोथ प्रचंड आहे. आणि करियरच्या संधी इथे नाही तर आता तिथे चांगल्या आहेत

हे खरे असावे. माझी सध्याची कंपनी पुर्णपणे भारतीय आहे, एमेन्सी नाही तरीही इथे साधारण १०% परदेशी लोक काम करताहेत. ग्रुपच्या ज्या सबसिडिअरीत मी काम करते तिथला CIO australian आहे नी CFO थायलंडचा आहे नी अजुनही बरेच लोक इतर पदांवर आहेत. मेन कंपनीत तर खुप गोरे दिसतात नी ते सगळे प्रॉपर एम्प्लॉयीज आहेत. त्यांच्या देशापेक्षा चांगली संधी इथे मिळाली असणार म्हणुनच ते इथे आले असणार ना? (इथला सध्याचा उकाडा सहन करत Happy )

केदार,
सर्व पोस्टस आवडल्या. अनुमोदन.

झक्की, उपरोधीक असले तरी तुमचे हे पोस्ट चुकीचे आहे. भारतात कसे पैसे जास्त मिळतात, तिकडचे लोकंच कसे जास्त कमवतात, लाचलुचपत हे सर्व उपरोधीक मध्ये पण बोअर व्हायला लागले आहे आता. आणि हा एकच बाफ नाही इतर व गप्पांच्या बाफवरही तेच. >>> याला तर कानामात्रावेलांटी सकट अनुमोदन.

>> लाचलुचपत हे सर्व उपरोधीक मध्ये पण बोअर व्हायला लागले आहे आता
>> याला तर कानामात्रावेलांटी सकट अनुमोदन.
बरोबर..

पण झक्कींसाठी भारत्-अमेरीका हा विषय ही एक शटल ट्रेन आहे, नियमानुसार ती इकडून तिकडे अशा चकरा मारत रहाते.. तीचे वेळापत्रक आणि स्टेशने आता सर्व मा.बो. करांना पाठ झाले आहे. साईडींग ला घेतल्या शिवाय पर्याय नाही Happy

केदार,
फायनांस मध्ये पगार लठ्ठ असतात पण कौटूंबीक जीवन (ऊपल्बध वेळ या अर्थी) हालाचे आहे असे चित्र मला दिसले.

असो. मा.बो. वरील ऊसगावाहून परतोनी आलेल्या फेमस आयशॉट उर्फ राफा च्या परतोनि पाहे च्या डायरीतील काही पाने ईथे वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे..

केदार, शाळेंविषयी पूर्ण अनुमोदन.

माझ्या मुलीने केजी US मध्ये आणि मुलाने भारतात केले. मला खुपच फरक आढळला.

मुलीला गृहपाठ विकएन्ड ला असायचा. रोज एक पुस्त़क वाचायचे असे असायचे. बाकी काही फारसे आठवत नाही.

मुलाच्या वेळेस्,प्रत्येक महीन्यात ह्या महीन्यात् काय होणार आहे ते सांगितले जायचे. पुस्तकांच्या सुरवातीला एक नोट असायची की जे आम्ही शिकवतो ते मुलांनी पाठ करवे अशी अपेक्षा नाही आहे तरी कृपया मुलांकडून पाठ करुन घेउ नये. :-).
गृहपाठ विकएन्ड ला असायचा. त्यात अक्षरं गिरवायला असायचे. शाळेत मुलांची इतक्या विषयांशी ओळख केली की आम्हालाच कौतुक वाटले की मुलाला किती माहीती आहे. वर परिक्षा नाही. Happy

आपल्या वेळेसच्या शाळा आणि आताच्या शाळा ह्यात खुप फरक आहे. आताच्या बालमोहन मध्ये पण वर्गात २५च मुलं आहेत.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

लाचलुचपत नाही भारतातील पगार इ इ बद्दल लिहिले आहे आपण. आणि मी लिहिले की इतर बाफवर वाचून उपरोधीक आहे हे माहित असून सुद्धा खूप कंटाळा आला. आपल्याला लिहायचा अधिकार आहे तसा मला त्यावर माझे मत लिहायचा अधिकार नाही का?

तुम्हीच माझ्या लिखाणातून मला अभिप्रेत नसलेले वाईट फक्त बघणार, कधी चांगले बघणारच नाही, तर मी पण तुमचे लिहीलेले वाचून, मी आपले मला जे वाटते ते लिहीतो. >>> हा शोध तुम्ही कधी लावला? मी कधी लिहिले आहे तसे? अनेक वर्षांनंतर मी आज आपल्याला उपरोधीकचा कंटाळा आलो असे म्हणालो कारण इतर दोन तीन बाफवर तेच चालू होते .

मी जर केदार किंवा योग किंवा रैना यांना कधी चांगले म्हंटले तरी त्यांना ते उपरोधिकच वाटेल. कारण स्वतः चांगले आहोत यावर विश्वास असण्या ऐवजी झक्की वाईट आहेत, यावर जास्त विश्वास!! >>>
धन्य झालो झक्कीसाहेब! एकदा आपल्या विरोधी एक पोस्ट्ट लिहिली की मला आता विरोधक फळीवर टाकून मोकळे. बरं बाबा तुम्ही म्हणाल तसे. तसा समज करणारे आणि लिहिणारे तुम्हीच. कोण थांबवणार? आणि माझा माझ्यावर विश्वास कसा आणि किती आहे हे मी इथे कशाला लिहू? की इथे लिहिले म्हणजे सर्टीफाय होईल?

पण झक्कीला शिव्या देत बसून विषयांतर करू नका. >>. झक्कींनी भारतात किती पैसे, दोन्ही कडे पगार असे लिहून विषयांतर केले. उलट मी असे लिहिले की इथे जाऊ पाहणारी लोक चर्चा करत आहेत, इथेही तेच विषयांतर नको.

१०, १० वर्षानंतर पण कोणी परत जातो, तर नक्की का जातो, ह्या मागे काय ड्रायव्हर असतात, कुठे नेमकं खुपतं, समाधान भेटत नाही की अजुन काही? ह्या सर्वांची चर्चा इथे अपेक्षित आहे. बाफला तेच नेहमीचे भारत विरूद्ध अमेरिका वळण लागू नये म्हणून मी ती पोस्ट लिहिली होती.

माझे चुकलेच. झक्की आपण मोठ्या मनाने मला माफ करा. तुमच्याच भाषेत सांगायचे तर हवं तर आपणच योग्य तो अधिकार वापरून माझा आयडी रद्द करा. मग तर झाले? पण असे वाद घालायची माझी इच्छा नाही. तुम्ही आणि इतरांनी जो पाहिला तो भारत आहेच, पण दुसराही भारत हळू हळू का होईना जन्म घेतोय हे लिहिण्यासाठी ते शाळेचे पोस्ट टाकले, इकॉनॉमीतील बदलावांबद्दल लिहिले . . पण बहुदा चुकच केली.

>>मी जर केदार किंवा योग किंवा रैना यांना कधी चांगले म्हंटले तरी त्यांना ते उपरोधिकच वाटेल. कारण स्वतः चांगले आहोत यावर विश्वास असण्या ऐवजी झक्की वाईट आहेत, यावर जास्त विश्वास!!

पहा! पुन्हा उपरोधिकच लिहीलत .. Happy

चला पुढे भांडत बसू नका आपसात. मराठी माणसाची एकीच नाय.
एकीचे बळ मिळते फळ (आणि दुसरीचे ?) Happy
असो, काही नविन प्रश्न : दुहेरी नागरिकत्व खरच अस्तित्वात आहे का ? की नुसतीच चर्चा चालू होती. त्याचे फायदे तोटे काय ? ज्यांना केव्हाही परत जायचे आहे त्यांना असे दुहेरी नागरिकत्व घेऊन परत भारतात येता येऊ शकते का ? आल्यास तिकडचे कर चालू राहतात का ? तसेच हे फक्त अमेरिकेपुरते मर्यादित आहे की कोणत्याही परदेशात असलेल्या भारतीयास मिळू शकते ?

फायनांस मध्ये पगार लठ्ठ असतात पण कौटूंबीक जीवन (ऊपल्बध वेळ या अर्थी) हालाचे आहे असे चित्र मला दिसले.>>थोड्याफार प्रमाणात अनुमोदन.'थोड्याफार ' कारण एवड्या मोठ्या प्रमाणात मिळणारा पैसा driving force असतो,इतका की पैसा कमाविणार्‍यालाही ह्याचे खुप वाइट वाटत नाही आणि कुटुंबातले लोकही सम्जाउन घेतात कारण इतर भारतीय लोकांच्या तुलनेत हे आकडे खुप म्हणजे खुपच चांगले आहेत.
ह्यात लिंगभेदही नसतो .पुण्या मुंबैइमधे (इतर ठिकाणचा मला अनुभव नाही ,)बायकांनाही कुटुंबातले लोक पुर्ण सहकार्य करतात जर आर्थिक मोबदला चांगला असेल तर.
पेशवा अनुमोदन,अमेरीकेत शिकायला मिळत असेल तर नक्की शिकावे.
soha,
२००० सालानंतर लोकांनी तिकडे यायच्या चौकशा करणे बंद केले ह्याचे मुख्य कारण मुलांना campus मधे मिळणार्‍या नोकर्‍या ,आणि नोकरीमधुनच मिळनारा h1, पण भारताचा उच्चशिक्षणाचा दर्जा आहे तेव्हडाच आहे, तो सुधारलाय म्हणुन लोक अमेरीकेची चौकशी करत नाहीत असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे.

महेश,

थोडे गुगलून पहा सर्वांची उत्तरे मिळतील.. Happy
तरिही दुहेरी नागरीकत्व असे काही नाहीये.. its misnomer, संदिग्ध आहे..
एका वेळी फक्त एकाच देशाचा पासपोर्ट आणि मतदानाचा हक्क देखिल एकाच देशात असतो. oci म्हणजे अमेरीकेचे नागरीकत्व घेतलेल्या मूळ भारतीय वंशजाना, भारतात आजीवन (वेगळा विसा प्रत्त्येक वेळी ना काढता) प्रवासाची सोय असते, ईतकच!
तिकडचा (अमेरीकेचा) कर चालू रहातो पण ते exemptions, deductions, allowance (upto 90k usd/yr) and taxation treaty वगैरे लक्षात घेता भारतात कर भरल्यावर अमेरीकेत भरण्याएव्हडे काही शिल्लक रहात नाही (पण शिवाय अमेरीकेत वेगळा धंदा असेल तर कर बसतो. तेव्हा तज्ञ कर्-सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यावे).
ईतर प्रत्त्येक देशाचे नियम वेगळे आहेत..
अलिकडे भारत सरकारने नवीन टूम काढली आहे- जे निव्वळ nri आहेत म्हणजे अजूनही भारताचे नागरीक (पासपोर्ट) पण ईतर देशात स्थायिक, ते भारतात कर भरतात का हे बघायला नविन समिती, यंत्रणा राबवलीये.. त्यामूळे विशेषतः गल्फ, अमिराती येथील करमुक्त देशी बांधवांचे धाबे दणाणले आहे असे ऐ़कून आहे. Happy
असो. तेव्हा "परतोनि पाहे" च्या आधी नेमकी कुठून परतोनी पाहणार आहात त्यानुसार आर्थिक बाबींचा हिशेब भिन्न लागू शकतो, सामाजिक मुद्दे कदाचित सर्वच बाबतीत सारखे असायची शक्यता आहे.
ऊ.दा: वर्षाला ७५ लाख "करमुक्त" पगार अमिरातीत असेल तर तो मनुष्य देशात परत जाताना आणि तितकाच पगार ऊसगाव मध्ये मात्र "करपात्र" असल्याने दोन्ही बाबतीत परत जातानाची आर्थिक गणिते वेगळी असतील.
आता वर्षाचा ७५ लाख वा जास्त करमुक्त पगार सोडून देशात परत कुणी जाईलच काय (निव्वळ अर्थिक तत्वावर!) ? तर तसेही आहेत, प्रत्त्येकाची कारणे वेग-वेगळी Happy

योग धन्यवाद ! तसे तर गुगलून पाहिले तर आजकाल सर्वच माहिती मिळू शकते.
पण मग इकडची चर्चा कशी चालू रहाणार ? Wink
इकडे विचारण्याचे अजुन एक कारण म्हणजे जर कोणाला प्रत्यक्ष अनुभव असतील तर त्यामधुन जास्त चांगली माहिती मिळू शकते.

एफ एम सीजी व इले. कंपन्या जसे सामसंग, युनीलीवर सारख्यानी एम्प्लॉइजना २० - ४० लाख बोनसेस दिले आहेत यावरषी. पगार व पर्क्स व्यतिरिक्त. वरील कंपन्यात काम करणारे प्रोफेशनल्स त्यांच्या मेहनतीचाच पैसा घेत आहेत. त्याचा लाचलुचपतीशी काहीही संबंध नाही. उद्योग चालवूनही इतके रिटर्न्स मिळत नाहीत. मलातरी हे खूप इंप्रेसिव वाटले. वरील बोनस हे जागतिक पातळीवर बरोबर आहेत कि कमी आहेत?

अशी ही बातमी वाचली कि जर एखाद्या माणसास परत भारतात पोस्टिंग ऑफर करत असतील तर ते त्यांच्या फॅमिलीशी, मुख्यत्वे करून बायको शी डीटेल वार बोलतात. शंका निरसन करतात व पॅरिटी समजावून सांगतात. कारण बायको मुले सहमत नसतील तर इतका मोठा बदल घड्वून आणणे अवघड आहे. भारतातील चांगल्या कंपन्यांतील एचार व सल्लागार तितकी मेहनत घेत आहेत जेणेकरून परतोनी पाहे प्रकार सुखकर होईल.

संदर्भ इको टाइम्स.

पण दुसराही भारत हळू हळू का होईना जन्म घेतोय हे लिहिण्यासाठी ते शाळेचे पोस्ट टाकले, इकॉनॉमीतील बदलावांबद्दल लिहिले >> अगदी अगदी हेच मला ही लिहायचे होते पण तितकेसे जमले नाही. एका विशिष्ट लेव्हल ला परदेशातील लाइफस्टाइल, सेक्युरिटी व कंफर्ट लेव्हल आणि भारतातील खास फायदे, अंतरीचे समाधान ह्याचा मेळ घालता येतो. मोस्ट वेलकम.

दुहेरी नागरिकत्व खरच अस्तित्वात आहे का ? की नुसतीच चर्चा चालू होती. त्याचे फायदे तोटे काय ? >>
हो पण भारतासाठी नाही. अमेरिकन नागरिकत्व हे रेसिप्रॉसिटीवर आधारीत आहे उदा. ज्या इतर देशात दुहेरी नागरिकत्व मान्य आहे त्यांचे दुहेरी नागरिकत्व हे अमेरिकेला मान्य आहे. माझे एक ओळखीचे अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडा या तिन्ही देशाचे नागरिक आहेत कारण पाकिस्तान आणि कॅनडाला दुहेरी नागरिकत्व मान्य आहे. भारताला दुहेरी नागरिकत्व मान्य नाही त्यामुळे एखाद्या भारतीय नागरिकाला अमेरिकन नागरिकत्व घेताना भारतीय नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो. (प्लेज ऑफ अलेजीयन्स प्रमाणे).

ओसीआय हे वर योग ने लिहिल्याप्रमाणे भारताचा "लाइफलोंग विसा" आहे. त्यानुसारः
१. निवडणुका लढता येणार नाहीत.
२. शेतीची जमीन खरेदी करता येणार नाहीत.
३. शासकीय पदे घेता येणार नाहीत.
बाकी जी मुले ओसीआय आहेत त्याना कॉलेजात वाढीव फी द्यावी लागते. शाळात फारसा फरक पडत नाही.

ज्यांना केव्हाही परत जायचे आहे त्यांना असे दुहेरी नागरिकत्व घेऊन परत भारतात येता येऊ शकते का ?
>>
हो. ग्रीनकार्ड झाल्यानंतर अमेरिकन नागरिकत्वासाठी ५ वर्षानी अर्ज करता येतो. (अमेरिकन नागरिकाशी लग्न झालेले असल्यास ३ वर्षानी). या ५ वर्षातील किमान २.५ वर्षे अमेरिकेत घालवलेले असणे आणि २ वर्षापेक्षा जास्त सलग अमेरिकेबाहेर नसणे या अटी आहेत. जर या अटींचा भंग झाला तर परत ४ वर्षे थांबावे लागते.
अमेरिकन नागरिक असल्यास अमेरिकेत अमुक वर्षे राहिलेच पाहिजे अशी अट नाही. त्यामुळे अमेरिकन नागरिकत्व घेउन दीर्घकाळ अमेरिकेबाहेर राहता येते. त्यामुळे परत जायला काही अडचण येत नाही. ओसीआय असल्यास कितीही वेळा ये-जा करता येते. लाइफलाँग विसा असल्याने अमेरिकेतील भारतीय दुतावासातील अतिशय "सुंदर आणि सुखद" अनुभव न घेण्याचे भाग्य लाभते Happy

आल्यास तिकडचे कर चालू राहतात का ? >>
हो. अमेरिकन नागरिकाला जगात कुठेही राहिले तरी त्याचे ग्लोबल उत्पन्नाचे रीटर्न अमेरिकेत भरावे लागतात.
जर भारतात कर भरला असेल तर त्याचे क्रेडीट तिथे मिळते. त्यामूळे तिथला कर अगदीच कमी/नगण्य होउ शकतो. बाकी योगने लिहिले आहेच.

तसेच हे फक्त अमेरिकेपुरते मर्यादित आहे की कोणत्याही परदेशात असलेल्या भारतीयास मिळू शकते ?
>>मला फक्त अमेरिकेचे माहित आहे. इतर देशाबद्दल कोणाला माहित असल्यास कृपया लिहावे.

आम्ही गेल्या वर्षी जुनमधे भारतात परतलो. आम्हा चौघांकडेही ओसीआय आहे. आणि भारतातले महागडे शिक्षण (अजुन १५ वर्षानी..) न झेपल्यामुळे मुलांसाठी परतीचा मार्ग खुला ठेवला आहे. वर दिलेली माहिती मी परतण्यापुर्वी जमा केलेल्या माहितीवर आधारीत आहे. त्यात कुणाला चुक आढळल्यास कृपया सांगावे म्हणजे करेक्ट करता येइल.

धन्यवाद.

१. अमेरीकेत जन्मलेल्या मुलाला (अमेरीकन पासपोर्ट-धारक) अमेरिकन नागरिकत्व त्यागून भारतिय नागरीकत्व कसे मिळवायचे ?
२. एकदा अमेरिकन नागरिकत्व त्यागल्यावर ते 'अमेरिकेत जन्म झाला आहे' या कारणास्तव पुन्हा सहज मिळू शकते का?
३. भारतात अमेरिकन नागरिक असलेल्या मुलाला SAT वगैरेचा अभ्यास करायचा असल्यास त्याचे मार्गदर्शन, पुस्तके, क्लास ई कुठे मिळू शकेल याची कोणाला कल्पना आहे का? तसेच भारतातली बारावी + SAT हे अमेरिकेच्या विद्यापिठात प्रवेश मिळवायला ग्राह्य मानले जाते का? नसल्यास दुसरा काही मार्ग आहे का बारावीनंतर अमेरिकेच्या विद्यापिठात प्रवेश मिळवायला?

१. अमेरीकेत जन्मलेल्या मुलाला (अमेरीकन पासपोर्ट-धारक) अमेरिकन नागरिकत्व त्यागून भारतिय नागरीकत्व कसे मिळवायचे ?>>>
http://travel.state.gov/law/citizenship/citizenship_776.html

arc,
भारतातल्या उच्च-शिक्षणाचा दर्जा आहे तसाच आहे तर मग २००० सालानंतर असं काय झालं अचानक की सगळ्या multi-national कंपन्यांनी भारतातल्या मुलांना नोकर्या द्यायला सुरवात केली?
बरं ह्या नोकर्या फक्त IT पुरत्या मर्यादित नाहीत. Automobile, Electronics, Designing, Medical अश्या अनेक क्षेत्रात भारतातल्या मुलांना संधी उपलब्ध आहेत. असं असताना अमेरिकेत उच्च-शिक्षणाचा अट्टाहास का करावा?
अमेरिकेत काय जगात कुठेही उच्च्-शिक्षण घेणे चांगलेच आहे. पण शेवटी शिक्षणाचा उद्देश अर्थार्जनच असतो ९०% लोकांसाठी.

Pages